< ईयोब 12 >
1 १ नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,
И отвечал Иов и сказал:
2 २ “तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल.
подлинно, только вы люди, и с вами умрет мудрость!
3 ३ माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासही माहित नाहीत?
И у меня есть сердце, как у вас; не ниже я вас; и кто не знает того же?
4 ४ माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात.
Посмешищем стал я для друга своего, я, который взывал к Богу, и которому Он отвечал, посмешищем - человек праведный, непорочный.
5 ५ जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे.
Так презрен по мыслям сидящего в покое факел, приготовленный для спотыкающихся ногами.
6 ६ परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात. केवळ त्यांच्या स्वत: चे हातच त्यांचे देव आहेत.
Покойны шатры у грабителей и безопасны у раздражающих Бога, которые как бы Бога носят в руках своих.
7 ७ पण आता पशूंस विचार, ते तुला शिकवतील, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हास सांगतील.
И подлинно: спроси у скота, и научит тебя, у птицы небесной, и возвестит тебе;
8 ८ किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि,
или побеседуй с землею, и наставит тебя, и скажут тебе рыбы морские.
9 ९ या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहित नाही असा, त्यांच्या मध्ये कोण प्राणी आहे.
Кто во всем этом не узнает, что рука Господа сотворила сие?
10 १० जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो.
В Его руке душа всего живущего и дух всякой человеческой плоти.
11 ११ ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का
Не ухо ли разбирает слова, и не язык ли распознает вкус пищи?
12 १२ वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो.
В старцах - мудрость, и в долголетних - разум.
13 १३ देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.
У Него премудрость и сила; Его совет и разум.
14 १४ देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांस ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
Что Он разрушит, то не построится; кого Он заключит, тот не высвободится.
15 १५ पहा, जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसास मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.
Остановит воды, и все высохнет; пустит их, и превратят землю.
16 १६ त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत.
У Него могущество и премудрость, пред Ним заблуждающийся и вводящий в заблуждение.
17 १७ तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो.
Он приводит советников в необдуманность и судей делает глупыми.
18 १८ तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो.
Он лишает перевязей царей и поясом обвязывает чресла их;
19 १९ तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.
князей лишает достоинства и низвергает храбрых;
20 २० तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो, आणि वृद्धांची विद्वत्ता काढून घेतो.
отнимает язык у велеречивых и старцев лишает смысла;
21 २१ तो राजकुमारावर तिरस्काराची ओतनी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो.
покрывает стыдом знаменитых и силу могучих ослабляет;
22 २२ तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्यूलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.
открывает глубокое из среды тьмы и выводит на свет тень смертную;
23 २३ तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांस नष्ट करतो.
умножает народы и истребляет их; рассеивает народы и собирает их;
24 २४ देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.
отнимает ум у глав народа земли и оставляет их блуждать в пустыне, где нет пути:
25 २५ प्रकाशाविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या मनुष्या सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.”
ощупью ходят они во тьме без света и шатаются, как пьяные.