< ईयोब 12 >

1 नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,
Då svara Job og sagde:
2 “तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल.
«Ja visst, de er dei rette folk, og visdomen døyr ut med dykk.
3 माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासही माहित नाहीत?
Men eg hev vit so vel som de; eg ei til atters stend for dykk; kven kjenner ikkje dette fyrr?
4 माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात.
Til spott for venen min vert eg som bad til Gud og bønhøyrd vart. Til spott vert rettvis mann og ærleg.
5 जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे.
Vanvyrd ulukka! tenkjer trygg mann, vanvyrdnad ventar deim som vinglar.
6 परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात. केवळ त्यांच्या स्वत: चे हातच त्यांचे देव आहेत.
Valdsmenn bur roleg i sitt tjeld; trygge er dei som tergar Gud, dei som hev Gud i neven sin.
7 पण आता पशूंस विचार, ते तुला शिकवतील, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हास सांगतील.
Spør bølingen, han skal deg læra, og fugl i luft, han segja skal,
8 किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि,
og tal til jordi, ho skal læra, og fisk i hav, skal melda deg:
9 या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहित नाही असा, त्यांच्या मध्ये कोण प्राणी आहे.
Kven skynar ei på alt i hop, at Herrens hand hev skapa det?
10 १० जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो.
Kvar livand’ sjæl han hev i handi og åndi åt kvart menneskje.
11 ११ ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का
Vert ordi ei med øyra prøvde, som du med gomen maten smakar?
12 १२ वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो.
Hjå folk med gråe hår er visdom, og vit hjå deim som liver lenge.
13 १३ देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.
Hjå honom visdom er og kraft, hjå honom råd og dømekraft.
14 १४ देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांस ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
Når han riv ned, kven byggjer upp? Når han set fast, kven løyser ut?
15 १५ पहा, जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसास मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.
Han stengjer vatnet, turkar det, slepper det, so det jordi øyder.
16 १६ त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत.
Hjå honom kraft og klokskap er; han eig båd’ vegvill og vill-leidar;
17 १७ तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो.
rådsherrar fører han som fangar, og domarar han gjer til dårar.
18 १८ तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो.
Han løyser konge-styring upp, legg reip kring livet på deim sjølve.
19 १९ तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.
Han fører prestar plundra burt og øyder ut eld’-gamle ætter.
20 २० तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो, आणि वृद्धांची विद्वत्ता काढून घेतो.
Han mælet tek frå øvde talar og vitet frå dei gamle menn,
21 २१ तो राजकुमारावर तिरस्काराची ओतनी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो.
og yver stormenn skam han øys og løyser beltet på dei sterke.
22 २२ तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्यूलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.
Han myrkret driv or holor ut og fører dimma fram i dagen.
23 २३ तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांस नष्ट करतो.
Han aukar folk og tynar deim; han spreider folk og fører deim;
24 २४ देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.
Han vitet tek frå jordheimsfyrstar og let veglaus heid deim vildra;
25 २५ प्रकाशाविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या मनुष्या सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.”
dei sviv i myrkret utan ljos, han let dei raga liksom drukne.

< ईयोब 12 >