< ईयोब 10 >

1 माझ्या आत्म्याला जीवीताचा कंटाळा आला आहे, मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडूपणेतून बोलेन.
Mi alma es cortada en mi vida: por tanto yo soltaré mi queja sobre mí, y hablaré con amargura de mi alma.
2 मी देवाला म्हणेन, मला उगाच दोष देऊ नकोस. तू मजशी विरोध का करतो ते मला सांग.
Diré a Dios: No me condenes: házme entender por qué pleitéas conmigo.
3 मला कष्ट देण्यात तुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस का?
¿Parécete bien que oprimas, y que deseches la obra de tus manos, y que favorezcas el consejo de los impíos?
4 तुला मानवी डोळे आहेत का? लोकांस दिसते ते तुला दिसते का?
¿Tienes tú ojos de carne? ¿ves tú como el hombre?
5 तुझे दिवस मनुष्याच्या आयुष्याइतकेच थोडे आहे, किंवा तुझे वर्ष हे लोकांच्या वर्ष सारखे आहे.
¿Tus días son como los días del hombre? ¿tus años son como los tiempos humanos,
6 तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापे धुंडाळीत असतोस.
Que inquieras mi iniquidad, y busques mi pecado?
7 मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. आणि तुझ्या हातातून मला कोणीही वाचवू शकणार नाही.
Sobre saber tú que yo no soy impío: y que no hay quien de tu mano libre.
8 तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला, आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत.
Tus manos me formaron, y me hicieron todo al derredor: ¿y hásme de deshacer?
9 मी विनंती करतो, विचार कर जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी मातीत मिळवणार आहेस का?
Acuérdate ahora que como a lodo me hiciste: ¿y hásme de tornar en polvo?
10 १० तू मला दुधासारखे ओतलेस आणि दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून काढले आहेस ना?
¿No me fundiste como leche, y como un queso me cuajaste?
11 ११ हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. आणि तू मला कातडीचे व मांसाचे कपडे चढविलेस.
Vestísteme de piel y carne, y cubrísteme de huesos y nervios.
12 १२ तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
Vida y misericordia hiciste conmigo; y tu visitación guardó mi espíritu.
13 १३ परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
Y estas cosas tienes guardadas en tu corazón: yo sé que esto está cerca de ti.
14 १४ जर मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
Si yo pequé acecharme has tú, y no me limpiarás de mi iniquidad.
15 १५ पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
Si fuere malo; ¡ay de mí! y si fuere justo, no levantaré mi cabeza, harto de deshonra, y de verme afligido.
16 १६ मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा सिंह जशा टपून बसून शिकार करतो तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.
Y vas creciendo, cazándome como león: tornando, y haciendo en mí maravillas:
17 १७ माझी चूक सिध्द करण्यासाठी तू माझ्या विरूद्ध नवीन साक्षीदार आणतोस. आणि माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल, तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील.
Renovando tus llagas contra mi, y aumentando conmigo tu furor, remudándose sobre mí ejércitos.
18 १८ तू मला जन्माला तरी का घातलेस? आणि मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
¿Por qué me sacaste del vientre? Muriera yo, y no me vieran ojos.
19 १९ मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
Fuera, como si nunca hubiera sido, llevado desde el vientre a la sepultura.
20 २० माझे आयुष्याचे दिवस थोडे नाहीत काय? म्हणून तू मला एकटे सोड.
¿Mis días no son una poca cosa? cesa pues, y déjame, para que me esfuerce un poco,
21 २१ जिथून मी परत येवू शकणार नाही तिथे, अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्यामध्ये मला थोडी विश्रांती मिळेल.
Antes que vaya, para no volver, a la tierra de tinieblas y de sombra de muerte:
22 २२ जेथे काळोख, निबीड अंधार आहे, अशा मृत्युछायेच्या प्रदेशात मी सांगण्याविणा जाईल, जेथे प्रकाश हा मध्यरात्रीसारखा आहे.
Tierra de oscuridad y tenebrosa sombra de muerte, donde no hay orden; y que resplandece como la misma oscuridad.

< ईयोब 10 >