< ईयोब 1 >
1 १ ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक व सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासून दूर राही.
Bijaše èovjek u zemlji Uzu po imenu Jov; i taj èovjek bijaše dobar i pravedan, i bojaše se Boga, i uklanjaše se oda zla.
2 २ ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या.
I rodi mu se sedam sinova i tri kæeri.
3 ३ ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता.
I imaše stoke sedam tisuæa ovaca i tri tisuæe kamila i pet stotina jarmova volova i pet stotina magarica, i èeljadi veoma mnogo; i bijaše taj èovjek najveæi od svijeh ljudi na istoku.
4 ४ प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत.
I sinovi njegovi sastajahu se i davahu gozbe kod kuæe, svaki svoga dana, i slahu te pozivahu tri sestre svoje da jedu i piju s njima.
5 ५ जेव्हा भोजनसमारंभाचे दिवस पूर्ण झाल्यावर, ईयोब त्यांना बोलवून त्यांची देवासाठी पुन्हा शुद्धी करी. तो मोठ्या पहाटेस लवकर ऊठे आणि त्याच्या प्रत्येक मुलासाठी होमार्पण करीत असे, तो म्हणत असे, “कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि त्यांच्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल.” ह्याप्रमाणे ईयोब नित्य करीत असे.
I kad bi se obredili gozbom, pošiljaše Jov i osveæivaše ih, i ustajuæi rano prinošaše žrtve paljenice prema broju svijeh njih; jer govoraše Jov: može biti da su se ogriješili sinovi moji i pohulili na Boga u srcu svom. Tako èinjaše Jov svaki put.
6 ६ एक दिवस असा आला कि त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही तेथे आला.
A jedan dan doðoše sinovi Božji da stanu pred Gospodom, a meðu njih doðe i Sotona.
7 ७ परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि तिच्यावर खाली-वर चालत जाऊन आलो आहे.”
I Gospod reèe Sotoni: otkuda ideš? A Sotona odgovori Gospodu i reèe: prohodih zemlju i obilazih.
8 ८ परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोब याच्याकडे लक्ष दिलेस काय? पृथ्वीत त्याच्यासारखा सरळ आणि सात्विक, देवभिरू व दुष्टतेपासून दूर राहणारा असा कोणीही मनुष्य नाही.”
I reèe Gospod Sotoni: jesi li vidio slugu mojega Jova? nema onakoga èovjeka na zemlji, dobra i pravedna, koji se boji Boga i uklanja se oda zla.
9 ९ नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “ईयोब देवाचे भय ऊगीच बाळगतो काय?
A Sotona odgovori Gospodu i reèe: eda li se uzalud Jov boji Boga?
10 १० तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती, आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हातांच्या कामांस यश दिले आहेस, आणि भूमीत त्याचे धन वाढत आहे.
Nijesi li ga ti ogradio i kuæu njegovu i sve što ima svuda unaokolo? djelo ruku njegovijeh blagoslovio si, i stoka se njegova umnožila na zemlji.
11 ११ पण जर तू आपला हात पुढे करून त्याच्याजवळ असणाऱ्या सर्वस्वावर टाकशील तर तो आत्ताच तुझ्या तोंडावर तुझा त्याग करील.”
Ali pruži ruku svoju i dotakni se svega što ima, psovaæe te u oèi.
12 १२ परमेश्वर सैतानास म्हणाला, “पाहा, त्याचे सर्व जे काही आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.
A Gospod reèe Sotoni: evo, sve što ima neka je u tvojoj ruci; samo na njega ne diži ruke svoje. I otide Sotona od Gospoda.
13 १३ एक दिवस असा आला की, जेव्हा त्याची मुले आणि त्याच्या मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात जेवत होते व द्राक्षरस पीत होते.
A jedan dan kad sinovi njegovi i kæeri njegove jeðahu i pijahu vino u kuæi brata svojega najstarijega,
14 १४ तेव्हा एक निरोप्या ईयोबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि त्यांच्याबाजुस गाढवी चरत होत्या,
Doðe glasnik Jovu i reèe: volovi orahu i magarice pasijahu pokraj njih,
15 १५ शबाई लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घेवून गेले. खरोखर, त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, हे तुला सांगण्यासाठी मीच निभावून आलो आहे.”
A Saveji udariše i oteše ih, i pobiše momke oštrijem maèem; i samo ja jedan utekoh da ti javim.
16 १६ पहिला हे सांगत असतांनाच दुसरा आला आणि म्हणाला, “आकाशातून दैवी अग्नीचा वर्षाव झाल्यामुळे मेंढरे आणि चाकर जळून गेले, आणि मीच तेवढा बचावून तुला सांगायला आलो आहे.”
Dok ovaj još govoraše, doðe drugi i reèe: oganj Božji spade s neba i spali ovce i momke, i proždrije ih; i samo ja jedan utekoh da ti javim.
17 १७ तो बोलत असतांनाच, आणखी दुसरा आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून, त्यांनी उंटावर हल्ला केला, आणि ते त्यांना घेवून गेले. होय, आणि त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, आणि हे तुला सांगावयास मीच निभावून आलो आहे.”
Dokle ovaj još govoraše, doðe drugi i reèe: Haldejci u tri èete udariše na kamile i oteše ih, i pobiše momke oštrijem maèem; i samo ja jedan utekoh da ti javim.
18 १८ आत्तापर्यंत तो हे सांगत असतांनाच, आणखी एक आला आणि म्हणाला, “तुझी मुले आणि मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात खात होते व द्राक्षरस पीत होते.
Dokle ovaj još govoraše, doðe drugi i reèe: sinovi tvoji i kæeri tvoje jeðahu i pijahu vino u kuæi brata svojega najstarijega;
19 १९ तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या चार कोपऱ्यास धडकले, आणि ते त्या तरूणावर पडले आणि ते मरण पावले, केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास इथे आलो.”
A to vjetar velik doðe ispreko pustinje i udari u èetiri ugla od kuæe, te pade na djecu i pogiboše; i samo ja jedan utekoh da ti javim.
20 २० तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली.
Tada usta Jov i razdrije plašt svoj, i ostriže glavu, i pade na zemlju i pokloni se,
21 २१ तो म्हणाला, “मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो.”
I reèe: go sam izašao iz utrobe matere svoje, go æu se i vratiti onamo. Gospod dade, Gospod uze, da je blagosloveno ime Gospodnje.
22 २२ या सर्व स्थितीतही, ईयोबाकडून पाप घडले नाही, देवाने चूक केली आहे असे काही तो मुर्खासारखा बोलला नाही.
Uza sve to ne sagriješi Jov, niti reèe bezumlja za Boga.