< यिर्मया 1 >
1 १ बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने:
Kalmomin Irmiya ɗan Hilkiya, ɗaya daga cikin firistoci a Anatot a yankin Benyamin.
2 २ म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात परमेश्वराचे वचन यीर्मयाकडे आले.
Maganar Ubangiji ta zo gare shi a shekara ta goma sha uku ta sarautar Yosiya ɗan Amon sarkin Yahuda,
3 ३ तसेच यहूदाचा राजा योशीया ह्याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या दिवसात, आणि यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पाचव्या महिन्यात, जेव्हा यरूशलेमधील लोकांस पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले.
da kuma a zamanin Yehohiyakim ɗan Yosiya sarkin Yahuda, har zuwa watan biyar na shekara goma sha ɗaya na Zedekiya ɗan Yosiya sarkin Yahuda, sa’ad da aka kai mutanen Urushalima zaman bauta.
4 ४ परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,
Maganar Ubangiji ta zo mini cewa,
5 ५ “मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे, आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे.”
“Kafin in siffanta ka a cikin ciki na san ka, kafin a haife ka, na keɓe ka; na naɗa ka ka zama annabi ga al’ummai.”
6 ६ मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.”
Sai na ce, “Kayya, Ubangiji Mai Iko Duka, ban iya magana ba; ni ɗan yaro ne kawai.”
7 ७ पण परमेश्वर मला म्हणाला, “मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे, आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.
Amma Ubangiji ya ce mini, “Kada ka ce, ‘Ni ɗan yaro ne kawai.’ Dole ka je wurin kowane mutumin da na aike ka ka kuma faɗa abin da na umarce ka.
8 ८ त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.”
Kada ka ji tsoronsu, gama ina tare da kai kuma zan kiyaye ka,” in ji Ubangiji.
9 ९ मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत.
Sai Ubangiji ya miƙa hannunsa ya taɓa bakina ya ce mini, “Yanzu na sa kalmomina a bakinka.
10 १० खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी, आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी, आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”
Duba, yau na naɗa ka a kan al’ummai da mulkoki don ka tumɓuke ka kuma rusar, ka hallaka ka kuma kakkaɓe, ka gina ka kuma shuka.”
11 ११ परमेश्वराचे वचन मजकडे आले, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या झाडाची एक शाखा दिसते.”
Maganar Ubangiji ta zo mini cewa, “Me ka gani, Irmiya?” Sai na amsa na ce, “Na ga reshen itacen almon.”
12 १२ परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.”
Ubangiji ya ce mini, “Daidai ne ka gani, gama ina lura in ga cewa maganata ta cika.”
13 १३ मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उकळती कढई दिसत आहे, जिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”
Maganar Ubangiji ta sāke zo mini cewa, “Me ka gani?” Na amsa na ce, “Na ga tukunya tana tafasa, tana juyewa daga arewa.”
14 १४ परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल,
Ubangiji ya ce mini, “Daga arewa za a zubo masifa a kan dukan mazaunan ƙasar.
15 १५ कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरूशलेमेच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील.
Ina shirin kiran dukan mutanen masarautar arewanci,” in ji Ubangiji. “Sarakunansu za su zo su kafa kursiyoyinsu a mashigin ƙofofin Urushalima; za su zo su kewaye dukan katangarta su kewaye dukan garuruwan Yahuda.
16 १६ आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पूजा केली, या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन.
Zan furta hukunci a kan mutanena saboda muguntarsu na yashe ni, suna ƙona turare ga waɗansu alloli suna kuma bauta wa abin da hannuwansu suka yi.
17 १७ यास्तव, तू स्वत: ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन.
“Ka kintsa kanka! Ka tashi tsaye ka faɗa musu abin da na umarce ka. Kada su firgita ka, in ba haka ba zan firgita ka a gabansu.
18 १८ पाहा, आज मी तुला मजबूत शहर व लोखंडी खांबाप्रमाणे आणि कांस्याच्या भिंतीप्रमाणे केले आहे, ह्यासाठी की तू या भूमीवरच्या सर्वांविरूद्ध यहूदाच्या राजांविरुध्द, त्याच्या अधीकाऱ्यांविरुध्द, तेथील याजकांविरूद्ध आणि लोकांविरूद्ध समर्थपणे उभे रहावे.
Yau na mai da kai birni mai katanga, ginshiƙin ƙarfe da bangon tagulla don ka tsaya gāba da dukan ƙasar, ya kuma yi gāba da sarakunan Yahuda da fadawan, da firistoci da kuma mutanenta.
19 १९ ते सर्व लोक तुझ्याविरूद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो.”
Za su yi yaƙi da kai amma ba za su ci nasara a kanka ba, gama ina tare da kai, zan kuma kiyaye ka,” in ji Ubangiji.