< यिर्मया 8 >
1 १ परमेश्वर असे म्हणतो: त्यावेळी, ते यहूदातील राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरूशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.
I den tidi, segjer Herren, skal dei taka beini åt Juda-kongarne og beini åt hovdingarne og beini åt prestarne og beini åt profetarne og beini åt Jerusalems-buarne ut or graverne deira,
2 २ आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
og breida deim ut for soli og for månen og heile himmelheren, som dei elska og tente, og som dei for etter, og som dei søkte, og som dei tilbad. Dei vert ikkje samla og ikkje gravlagde; til møk utyver marki skal dei verta.
3 ३ आणि या दुष्ट राष्ट्रातील जे उरलेले आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना घालवले आहे, ते जिवनाच्या ऐवजी मृत्यू निवडतील, परमेश्वर असे म्हणतो.
Og all leivningen som vert leivd av denne vonde ætti, på alle stader der dei leivde, der som eg driv deim burt, skal velja dauden heller enn livet, segjer Herren, allhers drott.
4 ४ तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय?
Og du skal segja med deim: So segjer Herren: Dett ein og stend ikkje upp att? eller gjeng ein burt og snur ikkje um att?
5 ५ तर मग यरूशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत? ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.
Kvi hev då denne Jerusalems-lyden falle frå med eit ævelegt fråfall? Dei held fast på sitt svik og vil ikkje snu um att.
6 ६ मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. कोणीही आपल्या केलेल्या वाईट कर्मांबद्दल ते क्षमा मागत नाहीत. जो असे म्हणतो, मी काय केले? असा कोणीएक नाही. तसा युद्धात घोडा धावतो तसे ते सर्व आपल्या मनात येईल तीथे जातात.
Eg gav gaum og lydde: dei talar det som ikkje er rett, det finst ikkje den mann som angrar sin vondskap og segjer: «Kva hev eg gjort!» Alle saman hev dei snutt seg burt i laupet, likeins som ein hest som renner av stad i strid.
7 ७ आकाशातील करकोचीसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे पण माझ्या लोकांस, परमेश्वराचे वचन माहीत नाही.
Jamvel storken under himmelen veit sine tider, og turtelduva og svala og trana ansar på tidi når dei skal koma, men mitt folk kjenner ikkje Herrens rett.
8 ८ आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत! असे तुम्ही म्हणता? कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे.
Korleis kann de segja: «Me er Sise, og Herrens lov er hjå oss?» vanneleg, sjå, lygn-pennen åt dei skriftlærde hev gjort henne til lygn.
9 ९ शहाणे लाजवले गेले आहेत, ते निराशेत आहेत आणि पकडले गेले आहेत. पाहा, त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा, जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले?
Dei vise vert til skammar, dei vert tekne av ræddhug og rådløysa. Sjå, Herrens ord hev dei vanda; kvar skulde dei då hava visdom ifrå?
10 १० म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजकापर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.
Difor vil eg gjeva konorne deira til andre, jorderne deira åt landvinnarar. For både små og store, alle saman søkjer dei låk vinning, både profet og prest, alle saman fer dei med svik.
11 ११ काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे.
Og dei fer lettvint åt med å lækja skaden åt dotteri, folket mitt, med di dei segjer: «Fred, fred!» endå det ingen fred er.
12 १२ त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील, असे परमेश्वर म्हणतो.
Dei skal standa til skammar, for dei hev gjort skjemdarverk. Dei korkje skjemmest eller veit kva det er å blygjast. Difor skal dei falla med deim som fell; i si heimsøkjingstid skal dei snåva, segjer Herren.
13 १३ परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना पुर्णपणे काढून टाकीन, द्राक्षवेलीवंर एकही द्राक्ष नसेल, आणि अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल, पाने सुकतील आणि जे काही त्यांना दिले आहे, ते त्यांच्यापासून निघून जाईल.
Eg vil gjera av med deim, segjer Herren. Det bid ikkje druvor på vintreet og ikkje fikor på fiketreet, og lauvet er visna. Og eg sender deim slike som skal koma yver deim.
14 १४ आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या आणि आम्ही मृत्यूमध्ये तिथे गप्प बसू परमेश्वर आमचा देव याने आम्हास गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुध्द पाप केले आहे, म्हणून त्याने आम्हांला विषारी पाणी प्यायला दिले आहे.
Kvifor sit me i ro? Samla dykk og lat oss ganga inn i dei faste byarne og tynast der! for Herren, vår Gud, vil lata oss tynast og gjeva oss eitervatn å drikka, av di me hev synda imot Herren.
15 १५ आम्ही शांतीची आशा केली पण आम्हांला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हास क्षमा करील असे आम्हास वाटले, पण पाहा! अरिष्टच आले.
Me ventar på fred, men det kjem ikkje noko godt, på ei tid med lækjedom, og sjå - fælske.
16 १६ त्यांच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्याच्या शक्तीशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पुर्ण पृथ्वी थरथरली आहे. कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस नाश करण्यासाठी आले आहेत.
Frå Dan høyrer ein frøsing av øykjerne hans, og for kneggjingi av dei spræke hestarne hans skjelv alt landet. Og dei kjem og et upp landet og det som i det er, byen og deim som i honom bur.
17 १७ कारण पाहा! मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन. त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हास दंश करतील. परमेश्वर असे म्हणतो.
For sjå, eg sender imot dykk ormar, basiliskar, som ikkje let seg mana burt, og dei skal bita dykk, segjer Herren.
18 १८ माझ्या दु: खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.
Å, kva kan hugsvala meg i sorgi! Hjarta er sjukt i meg.
19 १९ पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दूर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.
Sjå, naudropi frå dotteri, folket mitt, ljomar frå eit land langt burte: «Er då ikkje Herren i Sion? eller er ikkje kongen hennar der?» - Kvi hev dei harma meg med gudebilæti sine, med fåfenglege framande gudar?
20 २० “सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.”
Skurdonni er lidi, fruktonni er ende, men me er ikkje frelste.
21 २१ माझ्या लोकांच्या कन्येच्या जखमेमुळे मी जखमी झालो आहे. तिच्या सोबत घडलेल्या भयानक गोष्टींमुळे मी शोकात आणि निराशेत आहे.
Eg er tynt for tjonet på dotteri, folket mitt, eg gjeng i syrgjeklæde, fæla hev teke meg.
22 २२ गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.
Finst det då ikkje balsam i Gilead, eller bid det ingen lækjar der? Eller kvi hev ikkje dotteri, folket mitt, fenge bendsel på?