< यिर्मया 6 >

1 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरूशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
本雅明子民,請你們逃出耶路撒冷,在特科亞吹號,在貝特革楞豎立旗幟! 因為有一個災禍,即一個巨大的毀滅,已由北方隱約出現。
2 सियोनेची कन्या, जी सुंदर आणि नाजूक अशी आहे, तिचा मी नाश करणार आहे.
熙雍女郎仿佛美麗的草場,
3 मेंढपाळ आणि त्यांचे कळप तिच्याकडे जातील. ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतील. प्रत्येक मनुष्य स्वत: च्या हाताने कळपाची काळजी घेतील.
牧童領著自己的羊群坰她進發,在她四週張設帳幕,各據一方牧放。
4 “परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु. हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत.
「請你們備戰,向她進攻;來,讓我們在正午就上前進攻! 我們真不幸! 因為日已偏西,暮影已長!
5 तर आपण रात्रीच तिच्यावर हल्ला करु या व तिच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”
不妨! 就趁夜上去,破壞她的閭闕。」
6 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, शक्तीमान परमेश्वर असे म्हणतो, “झाडे कापा आणि यरूशलेमविरूद्ध मोर्चा बांधा. या नगरीला शिक्षा व्हावीच, कारण या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.
因為萬軍的上主這樣說:6.「他們該砍伐她的樹木,雀起壁壘,圍攻耶路撒冷,這該受罰的城市,因為在那裏充滿了壓榨。
7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच ही नगरी आपला दुष्टपणा ताजा ठेवते. तिच्यामध्ये लूटमार व हिंसाचार हे ऐकू येतात. पीडा आणि दु: ख सदोदीत माझ्या समोर आहे.
泉源怎樣湧出泉水,她就怎樣湧出邪惡;從那裏只可聽到強暴和迫害,我金看見疾病和瘡痍。
8 यरूशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन, आणि तुला ओसाड असे करीन, जेथे कोणीही राहू शकणार नाही.”
耶路撒冷! 你應接受訓戒,免得我的心疏遠你,使你荒涼,成為沒有人居住的地方。」
9 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.”
萬軍的上主這樣說:「你應像收拾葡萄,把以色列的遺民收拾淨盡;又如收割的人 向枝條再伸出你的手來。」
10 १० मी कोणाला घोषीत करू आणि चेतावणी देऊ, जेणेकरून ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुंता आहे म्हणून त्यांना ऐकू येत नाही. पाहा, परमेश्वराचे वचन त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जवळ आले आहे, पण त्यांना ते नको आहे.
我應對誰說,應警告誰,使他們聽信我呢﹖看,他們的耳朵遲鈍不靈,不能留心細聽;看,上主的話對他們已成了笑柄,一點也不感興趣
11 ११ म्हणून मी परमेश्वराच्या रागाने भरलो आहे. “तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओतणार आहे. पुरुष व त्याची पत्नी असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील.
為此,我滿懷上主火憤怒,我已無法再控制:「只得將憤怒發洩在街上的孩童和青年的隊伍身上,因為男人和女人,年長和年老的人,都要被擄去;
12 १२ त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील त्यांची शेते व त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना दिल्या जातील. मी माझा हात उगारून देशातील रहिवाश्यांवर हल्ला करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
他們的住它、莊田和妻室,都要歸他人,因為我要向本地的居民伸出我的手──上主的斷語。」
13 १३ “कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.
實在,從最小的到最的,都貪財圖利;從先知到司祭,都欺詐行事,
14 १४ आणि शांती नसता, शांती, शांती, असे म्हणून त्यांनी माझ्या लोकांची जखम वरवर बरी केली आहे.
草率治療我人民的瘡痍說:「好了,好了! 」其實卻沒有好。
15 १५ त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते लाजले का? त्यांना काही लाज वाटली नाही आणि त्यांनी पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. त्यांना कोणत्याही अपमानास्पद वागणूकीचा अनुभव घेतला नाही. यास्तव मी ज्यावेळी त्यांना शिक्षा करीन तेव्हा ते पडणाऱ्यांबरोबर पडतील. ते उध्वस्त केले जातील.” परमेश्वर असे म्हणतो.
他們既彿事可憎,就應當知恥;可是,他們不但毫不知恥,反而連羞愧也不知道是什麼;為此,他們要與倒斃者一同倒斃,在我降罰他們時,都要一厥不振──上主說。
16 १६ परमेश्वर असे म्हणतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा. चांगल्या रस्त्याची चौकशी करा, नंतर त्याच चाला आणि तुमच्या जीवा करता विसाव्याची जागा शोधा.” पण तुम्ही लोक म्हणाला, आम्ही जाणार नाही.
上主這樣說:「你們應站在交叉路口,觀察探問舊路;那一條是好路,就在那路上走,你們的的心靈必獲安寧。」他們卻答說:「我們偏不走。」
17 १७ रणशिंगाचा आवाज ऐकायला तुमच्यावर मी रखवालदार नियूक्त केले. पण ते म्हणाले, आम्ही ऐकणार नाही.
我給你們派駐哨兵,你們連注意號聲! 」他們卻答說:「我們偏不注意。
18 १८ यास्तव राष्ट्रांनो, ऐका! पाहा, त्यांच्यासोबत काय होईल, याचे तुम्ही साक्षीदार आहात.
為此,萬民! 你們必需細聽;群眾! 你們應知道他們的遭遇。
19 १९ हे पृथ्वी, ऐक! पाहा, या लोकांवर मी अनर्थ आणणार आहे, म्हणजे त्यांच्याच विचारांचे फळ त्यांच्यावर आणीन. कारण त्यांनी माझ्या वचनांकडे दुर्लक्ष केलेच, पण ह्याव्यतीरिक्त ते धिक्कारले आहे.
大地注意:看,我必給這百姓帶來災禍,作他們失節的的苦果,因為他們沒有聽從我的言辭,拋棄了卜法律。
20 २० परमेश्वर म्हणतो, “शेबाहून धूप आणि दूरवरच्या देशातून गोड सुगंध माझ्या काय कामाचा? तुमची होमार्पणे आणि यज्ञ मला मान्य नाहीत.”
那些來自舍巴的乳香,出自遠方的香蒲,於我有何用﹖你們的全燔祭不受悅納,你的犧牲不樂我意。
21 २१ यास्तव परमेश्वर असे म्हणतो: “मी या लोकांविरूद्ध अडखळणे ठेवीन. त्यावर वडील व मुले अडखळून पडतील. राहणारे आणि शेजारी हे नष्ट होतील.”
為此,上主這樣說:「看,我將這人民設下絆腳石,使父子一起絆倒,使鄰居和朋友同趨滅亡。」
22 २२ परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून लोक येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.
上主這樣說:「看,有一個民族從北方前來,有一個強大的異邦從地極興起,
23 २३ ते धनुष्य आणि भाला उचलतील. ते क्रूर आहेत आणि ते दया करीत नाही. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जने सारखा आहे. आणि हे सियोन कन्ये, लढाईसाठी सिद्ध झालेल्या पुरूषांप्रमाणे विशिष्ट रचना करूण ते घोड्यांवरून स्वारी करतात.”
緊握弓戈,殘忍無情,像海嘯一般喧嚷,騎著戰馬,萬眾一心,嚴陣準備向你進攻,熙雍女郎! 」
24 २४ त्यांच्याबद्दल आम्ही बातमी ऐकली आहे. दुःखात आमचे हात कोलमडले आहेत. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.
我們聽到了這消息,束手無策,不勝憂慮,痛苦得有如臨產的婦女。
25 २५ बाहेर शेतात जाऊ नका आणि रस्त्यावर चालू नका. कारण शत्रूची तलवारी आणि धोका सगळीकडे आहे.
你們不要到田間去,不要在路上徘徊,因為敵人正在撕殺,四處令人恐怖。
26 २६ माझ्या लोकांच्या कन्ये, शोकवस्त्रे घाल आणि राखेत लोळ, एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत कर. कारण नाश करणारा अगदी एकाएक आपल्यावर येईल.
我的女兒──人民──你該穿上麻衣,輾轉於灰塵,悲哀傷心痛哭,如喪獨子,因為劫奪者要突然來襲擊我們!
27 २७ “यिर्मया, मी तुला पारखणारा असे केले आहे. म्हणजे तू त्यांच्या मार्ग तपासावा आणि पारखून पाहावा.
我立了你作我人民的查察員,原是為叫你認識並考察他們的行徑。
28 २८ ते सर्व लोक दुराग्रही आहेत. जे दुसऱ्यांची निंदा करतात. ते सर्व कास्य व लोखंड आहेत, जे भ्रष्टपणे वागतात.
他們盡是極頑固的叛徒,往來散播流言,確是壞透了的破銅爛鐵。
29 २९ भाता जळाला आहे, अग्नीतून शिसे जळून निघाले आहे, ते स्वत: ला व्यर्थच गाळीत राहतात, कारण जे दुष्ट ते काढून टाकलेले नाहीत.
風箱猛吹,雖有烈火,但鉛仍不溶化;煉工徒然鍛煉,渣滓總煉不掉。
30 ३० त्यांना ‘टाकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल. कारण परमेश्वराने त्यांना नाकारले आहे.”
人都稱他們為「拋棄的銀渣,」因為上主已將他們拋棄。

< यिर्मया 6 >