< यिर्मया 52 >

1 सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षाचा होता; अकरा वर्षे त्याने यरूशलेमेवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्नाकर यिर्मयाची मुलगी होती.
ゼデキヤは位に即きしとき二十一歳なりしがヱルサレムに於て十一年世ををさめたりその母の名はハムタルといひてリブナのヱレミヤの女なり
2 यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले.
ゼデキヤはヱホヤキムが凡てなしたる如くヱホバの目の前に惡をなせり
3 आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरूशलेम व यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले.
すなはちヱホバ、ヱルサレムとユダとを怒りて之をその前より棄てはなちたまふ/是に於てゼデキヤ、バビロンの王に叛けり
4 मग असे झाले की, त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दहाव्या दिवशी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सर्व सैन्याबरोबर यरूशलेमेविरूद्ध चाल करून आला. त्याने त्याच्यापुढे तळ ठोकला आणि त्यांच्याभोवती वेढ्याची भिंत बांधली
ゼデキヤの世の九年十月十日にバビロンの王ネブカデネザルその軍勢をひきゐてヱルサレムに攻めきたり之に向ひて陣をはり四周に戌樓を建て之を攻めたり
5 म्हणून सिद्कीया राजाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता.
かくこの邑攻圍まれてゼデキヤ王の十一年にまでおよびしが
6 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता.
その四月九日にいたりて城邑のうち饑ること甚だしくなり其地の民食物をえざりき
7 मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.
是をもて城邑つひに打破られたれば兵卒は皆逃て夜の中に王の園の邊なる二個の石垣の間の門より城邑をぬけいで平地の途に循ひておちゆけり時にカルデヤ人は城邑を圍みをる
8 पण खास्द्यांच्या सैन्याने राजाच्या पाठीस लागून यरीहोच्या मैदानात सिद्कीयाला गाठले. त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले.
茲にカルデヤ人の軍勢王を追ひゆきヱリコの平地にてゼデキヤに追付けるにその軍勢みな彼を離れて散りしかば
9 त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.
カルデヤ人王を執へて之をハマテの地のリブラにをるバビロンの王の所に曳きゆきければ王彼の罪をさだめたり
10 १० बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली.
バビロンの王すなはちゼデキヤの子等をその目の前に殺さしめユダの牧伯等を悉くリブラに殺さしめ
11 ११ मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.
またゼデキヤの目を抉さしめたり斯てバビロンの王かれを銅索に繋ぎてバビロンに携へゆきその死る日まで獄に置けり
12 १२ आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरूशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.
バビロン王ネブカデネザルの世の十九年の五月十日バビロンの王の前につかふる侍衞の長ネブザラダン、ヱルサレムにきたり
13 १३ त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.
ヱホバの室と王の室を燒き火をもてヱルサレムのすべての室と大なる諸の室を燒けり
14 १४ राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खास्दी सैन्याने यरूशलेमेभोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली.
また侍衞の長と偕にありしカルデヤ人の軍勢ヱルサレムの四周の石垣を悉く毀てり
15 १५ सेनापती नबूजरदानाने यरूशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरूशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.
侍衞の長ネブザラダンすなはち民のうちの貧乏者城邑の中に餘れる者およびバビロンの王に降りし人と民の餘れる者を擄へ移せり
16 १६ पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
但し侍衞の長ネブザラダンその地のある貧者を遺して葡萄を耕る者となし農夫となせり
17 १७ परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले.
カルデヤ人またヱホバの室の銅の柱と洗盥の臺と銅の海を碎きてその銅を悉くバビロンに運び
18 १८ पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली.
また鍋と火鑪と燭剪と鉢と匙およびすべて用ふるところの銅器を取れり
19 १९ पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुप्याचे बनवली होती ती राजाचा अंगरक्षकांचा नायक तीदेखील घेऊन गेला.
侍衞の長もまた洗盥と火盤と鉢と鍋と燭臺と匙と斝など凡て金銀にて作れる者を取り
20 २० दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते.
またソロモン王がヱホバの室に造りしところの二つの柱と一の海と臺の下なる十二の銅の牛を取れりこのもろもろの銅の重は稱る可らず
21 २१ प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.
この柱は高さ十八キユビトなり又紐をもてその周圍を測るに十二キユビトあり指四本の厚にして空なり
22 २२ त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.
その上に銅の頂ありその頂の高さは五キユビトその周圍は銅の網子と石榴にて飾れり他の柱とその石榴も之におなじ
23 २३ असे तेथे कळसाच्या चाऱ्ही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती आणि जाळीकामावर सभोवती सर्व डाळिंबे शंभर होती.
その四方に九十六の石榴あり網子の上なるすべての石榴の數は百なり
24 २४ अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले.
侍衞の長は祭司の長セラヤと第二の祭司ゼパニヤと三人の門守を執へ
25 २५ सैनिकांवर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे सात माणसे राजाला सल्ला देत, ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याप्रमाणेच मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस, त्यांच्याबरोबर देशातील नगरात असलेले साठ महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले.
また兵卒を督る一人の寺人と王の前にはべるもののうち城邑にて遇しところの者七人とその地の民を募る軍勢の長なる書記と城邑の中にて遇しところの六十人の者を邑よりとらへされり
26 २६ नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले.
侍衞の長ネブザラダンこれらを執へてリブラに居るバビロンの王の許にいたれり
27 २७ रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.
バビロンの王ハマテの地のリブラにこれを撃ち殺せりかくユダはおのれの地よりとらへ移されたり
28 २८ नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.
ネブカデネザルがとらへ移せし民は左の如し第七年にユダ人三千二十三人
29 २९ नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरूशलेमेमधून नेले.
またネブカデネザルその十八年にヱルサレムより八百三十二人をとらへ移せり
30 ३० नबुखद्नेस्सराच्या राजाच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा अंगरक्षक नबूजरदान याने यहूदातले सातशे पंचेचाळीस लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून चार हजार सहाशे होते.
ネブカデネザルの二十三年に侍衞の長ネブザラダン、ユダ人七百四十五人をとらへ移したり其總ての數は四千六百人なりき
31 ३१ मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले.
ユダの王ヱホヤキンがとらへ移されたる後三十七年の十二月二十五日バビロンの王エビルメロダクその治世の一年にユダの王ヱホヤキンを獄よりいだしてその首をあげしめ
32 ३२ तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बाबेलात होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले.
善言をもて彼を慰めその位をバビロンに偕に居るところの王等の位よりもたかくし
33 ३३ अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले.
其獄の衣服を易へしむヱホヤキンは一生の間つねに王の前に食せり
34 ३४ आणि त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याच्या मृत्यूपर्यंत त्यास प्रत्येक दिवशी बाबेलाचा राजा नियमीत भोजनाचा भत्ता देत असे.
かれ其死る日まで一生の間たえず日々の分をバビロンの王よりたまはりて其食物となせり

< यिर्मया 52 >