< यिर्मया 52 >
1 १ सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षाचा होता; अकरा वर्षे त्याने यरूशलेमेवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्नाकर यिर्मयाची मुलगी होती.
१जब सिदकिय्याह राज्य करने लगा, तब वह इक्कीस वर्ष का था; और यरूशलेम में ग्यारह वर्ष तक राज्य करता रहा। उसकी माता का नाम हमूतल था जो लिब्नावासी यिर्मयाह की बेटी थी।
2 २ यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले.
२उसने यहोयाकीम के सब कामों के अनुसार वही किया जो यहोवा की दृष्टि में बुरा है।
3 ३ आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरूशलेम व यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले.
३निश्चय यहोवा के कोप के कारण यरूशलेम और यहूदा की ऐसी दशा हुई कि अन्त में उसने उनको अपने सामने से दूर कर दिया। और सिदकिय्याह ने बाबेल के राजा से बलवा किया।
4 ४ मग असे झाले की, त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दहाव्या दिवशी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सर्व सैन्याबरोबर यरूशलेमेविरूद्ध चाल करून आला. त्याने त्याच्यापुढे तळ ठोकला आणि त्यांच्याभोवती वेढ्याची भिंत बांधली
४और उसके राज्य के नौवें वर्ष के दसवें महीने के दसवें दिन को बाबेल के राजा नबूकदनेस्सर ने अपनी सारी सेना लेकर यरूशलेम पर चढ़ाई की, और उसने उसके पास छावनी करके उसके चारों ओर किला बनाया।
5 ५ म्हणून सिद्कीया राजाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता.
५अतः नगर घेरा गया, और सिदकिय्याह राजा के ग्यारहवें वर्ष तक घिरा रहा।
6 ६ चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता.
६चौथे महीने के नौवें दिन से नगर में अकाल यहाँ तक बढ़ गई, कि लोगों के लिये कुछ रोटी न रही।
7 ७ मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.
७तब नगर की शहरपनाह में दरार की गई, और दोनों दीवारों के बीच जो फाटक राजा की बारी के निकट था, उससे सब योद्धा भागकर रात ही रात नगर से निकल गए, और अराबा का मार्ग लिया। (उस समय कसदी लोग नगर को घेरे हुए थे)।
8 ८ पण खास्द्यांच्या सैन्याने राजाच्या पाठीस लागून यरीहोच्या मैदानात सिद्कीयाला गाठले. त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले.
८परन्तु उनकी सेना ने राजा का पीछा किया, और उसको यरीहो के पास के अराबा में जा पकड़ा; तब उसकी सारी सेना उसके पास से तितर-बितर हो गई।
9 ९ त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.
९तब वे राजा को पकड़कर हमात देश के रिबला में बाबेल के राजा के पास ले गए, और वहाँ उसने उसके दण्ड की आज्ञा दी।
10 १० बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली.
१०बाबेल के राजा ने सिदकिय्याह के पुत्रों को उसके सामने घात किया, और यहूदा के सारे हाकिमों को भी रिबला में घात किया।
11 ११ मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.
११फिर बाबेल के राजा ने सिदकिय्याह की आँखों को फुड़वा डाला, और उसको बेड़ियों से जकड़कर बाबेल तक ले गया, और उसको बन्दीगृह में डाल दिया। वह मृत्यु के दिन तक वहीं रहा।
12 १२ आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरूशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.
१२फिर उसी वर्ष अर्थात् बाबेल के राजा नबूकदनेस्सर के राज्य के उन्नीसवें वर्ष के पाँचवें महीने के दसवें दिन को अंगरक्षकों का प्रधान नबूजरदान जो बाबेल के राजा के सम्मुख खड़ा रहता था यरूशलेम में आया।
13 १३ त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.
१३उसने यहोवा के भवन और राजभवन और यरूशलेम के सब बड़े-बड़े घरों को आग लगवाकर फुँकवा दिया।
14 १४ राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खास्दी सैन्याने यरूशलेमेभोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली.
१४और कसदियों की सारी सेना ने जो अंगरक्षकों के प्रधान के संग थी, यरूशलेम के चारों ओर की सब शहरपनाह को ढा दिया।
15 १५ सेनापती नबूजरदानाने यरूशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरूशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.
१५अंगरक्षकों का प्रधान नबूजरदान कंगाल लोगों में से कितनों को, और जो लोग नगर में रह गए थे, और जो लोग बाबेल के राजा के पास भाग गए थे, और जो कारीगर रह गए थे, उन सब को बन्दी बनाकर ले गया।
16 १६ पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
१६परन्तु, दिहात के कंगाल लोगों में से कितनों को अंगरक्षकों के प्रधान नबूजरदान ने दाख की बारियों की सेवा और किसानी करने को छोड़ दिया।
17 १७ परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले.
१७यहोवा के भवन में जो पीतल के खम्भे थे, और कुर्सियों और पीतल के हौज जो यहोवा के भवन में थे, उन सभी को कसदी लोग तोड़कर उनका पीतल बाबेल को ले गए।
18 १८ पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली.
१८और हाँड़ियों, फावड़ियों, कैंचियों, कटोरों, धूपदानों, और पीतल के और सब पात्रों को, जिनसे लोग सेवा टहल करते थे, वे ले गए।
19 १९ पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुप्याचे बनवली होती ती राजाचा अंगरक्षकांचा नायक तीदेखील घेऊन गेला.
१९और तसलों, करछों, कटोरियों, हाँड़ियों, दीवटों, धूपदानों, और कटोरों में से जो कुछ सोने का था, उनके सोने को, और जो कुछ चाँदी का था उनकी चाँदी को भी अंगरक्षकों का प्रधान ले गया।
20 २० दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते.
२०दोनों खम्भे, एक हौज और पीतल के बारहों बैल जो पायों के नीचे थे, इन सब को तो सुलैमान राजा ने यहोवा के भवन के लिये बनवाया था, और इन सब का पीतल तौल से बाहर था।
21 २१ प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.
२१जो खम्भे थे, उनमें से एक-एक की ऊँचाई अठारह हाथ, और घेरा बारह हाथ, और मोटाई चार अंगुल की थी, और वे खोखले थे।
22 २२ त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.
२२एक-एक की कँगनी पीतल की थी, और एक-एक कँगनी की ऊँचाई पाँच हाथ की थी; और उस पर चारों ओर जो जाली और अनार बने थे वे सब पीतल के थे।
23 २३ असे तेथे कळसाच्या चाऱ्ही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती आणि जाळीकामावर सभोवती सर्व डाळिंबे शंभर होती.
२३कँगनियों के चारों ओर छियानवे अनार बने थे, और जाली के ऊपर चारों ओर एक सौ अनार थे।
24 २४ अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले.
२४अंगरक्षकों के प्रधान ने सरायाह महायाजक और उसके नीचे के सपन्याह याजक, और तीनों डेवढ़ीदारों को पकड़ लिया;
25 २५ सैनिकांवर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे सात माणसे राजाला सल्ला देत, ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याप्रमाणेच मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस, त्यांच्याबरोबर देशातील नगरात असलेले साठ महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले.
२५और नगर में से उसने एक खोजा पकड़ लिया, जो योद्धाओं के ऊपर ठहरा था; और जो पुरुष राजा के सम्मुख रहा करते थे, उनमें से सात जन जो नगर में मिले; और सेनापति का मुंशी जो साधारण लोगों को सेना में भरती करता था; और साधारण लोगों में से साठ पुरुष जो नगर में मिले,
26 २६ नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले.
२६इन सब को अंगरक्षकों का प्रधान नबूजरदान रिबला में बाबेल के राजा के पास ले गया।
27 २७ रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.
२७तब बाबेल के राजा ने उन्हें हमात देश के रिबला में ऐसा मारा कि वे मर गए। इस प्रकार यहूदी अपने देश से बँधुए होकर चले गए।
28 २८ नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.
२८जिन लोगों को नबूकदनेस्सर बँधुआ करके ले गया, वे ये हैं, अर्थात् उसके राज्य के सातवें वर्ष में तीन हजार तेईस यहूदी;
29 २९ नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरूशलेमेमधून नेले.
२९फिर अपने राज्य के अठारहवें वर्ष में नबूकदनेस्सर यरूशलेम से आठ सौ बत्तीस प्राणियों को बँधुआ करके ले गया;
30 ३० नबुखद्नेस्सराच्या राजाच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा अंगरक्षक नबूजरदान याने यहूदातले सातशे पंचेचाळीस लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून चार हजार सहाशे होते.
३०फिर नबूकदनेस्सर के राज्य के तेईसवें वर्ष में अंगरक्षकों का प्रधान नबूजरदान सात सौ पैंतालीस यहूदी जनों को बँधुए करके ले गया; सब प्राणी मिलकर चार हजार छः सौ हुए।
31 ३१ मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले.
३१फिर यहूदा के राजा यहोयाकीन की बँधुआई के सैंतीसवें वर्ष में अर्थात् जिस वर्ष बाबेल का राजा एवील्मरोदक राजगद्दी पर विराजमान हुआ, उसी के बारहवें महीने के पच्चीसवें दिन को उसने यहूदा के राजा यहोयाकीन को बन्दीगृह से निकालकर बड़ा पद दिया;
32 ३२ तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बाबेलात होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले.
३२और उससे मधुर-मधुर वचन कहकर, जो राजा उसके साथ बाबेल में बँधुए थे, उनके सिंहासनों से उसके सिंहासन को अधिक ऊँचा किया।
33 ३३ अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले.
३३उसके बन्दीगृह के वस्त्र बदल दिए; और वह जीवन भर नित्य राजा के सम्मुख भोजन करता रहा;
34 ३४ आणि त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याच्या मृत्यूपर्यंत त्यास प्रत्येक दिवशी बाबेलाचा राजा नियमीत भोजनाचा भत्ता देत असे.
३४और प्रतिदिन के खर्च के लिये बाबेल के राजा के यहाँ से उसको नित्य कुछ मिलने का प्रबन्ध हुआ। यह प्रबन्ध उसकी मृत्यु के दिन तक उसके जीवन भर लगातार बना रहा।