< यिर्मया 51 >
1 १ परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि लेब-कामाईत जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने खळबळ उडवीन.
Ezt mondja az Úr: Ímé, én pusztító szelet támasztok Babilon ellen és azok ellen, a kik az én ellenségem szívében lakoznak.
2 २ मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील, कारण ते तिला अरिष्टाच्या दिवशी चहूकडून तिच्याविरूद्ध होतील.
És szórókat küldök Babilon ellen, és felszórják őt, és földét kiüresítik, mert mindenfelől ellene lesznek a veszedelem napján.
3 ३ तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये. तिच्या तरुणांना वाचवू नको. तिच्या सर्व सैन्याला विध्वंसकाच्या हवाली कर.
A kézívesre kézíves vonja fel íjját, és arra, a ki pánczéljába öltözik. Ne kedvezzetek ifjainak, öldössétek le egész seregét:
4 ४ कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील.
És essenek el megöletve a Káldeusok földén, és átverve az ő utczáin.
5 ५ कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास, त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने त्यांना सोडले नाही.
Mert nem hagyatott el Izráel és Júda az ő Istenétől, a Seregek Urától, noha az ő földök rakva vétekkel az Izráelnek Szentje ellen.
6 ६ बाबेलामधून पळून जा. प्रत्येक मनुष्याने आपणास वाचवावे. तिच्या अन्यायात नष्ट होऊ नये. कारण परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे. तो तिला तिचे सर्व प्रतिफळ भरून देईल.
Fussatok ki Babilonból, és kiki mentse meg az ő lelkét, ne veszszetek el az ő gonoszságáért, mert az Úr bosszúállásának ideje ez, megfizet néki érdem szerint.
7 ७ बाबेल परमेश्वराच्या हातातील सोन्याचा पेला होता, तिने सर्व देशाला धुंद केले आहे. राष्ट्रे तिचा द्राक्षरस प्याली आणि ते विवेकशून्य झाले.
Arany pohár volt Babilon az Úr kezében, a mely megrészegíté ez egész földet; nemzetek ittak az ő borából, azért bolondultak meg a nemzetek.
8 ८ बाबेल अकस्मात पडेल आणि नाश होईल. त्याची शकले पडतील. तिच्यासाठी शोक करा. तिच्या वेदनेसाठी तिला औषध द्या. कदाचित् ती बरी होईल.
Hamar elesett Babilon és összeomlott, jajgassatok felette, kössétek be balzsammal az ő sebét, hátha meggyógyul!
9 ९ बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व दूर आपल्या देशात जाऊ. कारण तिचा गुन्हा आकाशास पोहचला आहे; त्याचा आभाळापर्यंत ढीग झाला आहे.
Gyógyítottuk Babilont, de nem gyógyult meg. Hagyjátok el őt, és menjünk kiki a maga földére, mert az égig hatott az ő ítélete, és felemelkedett a felhőkig.
10 १० परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या, परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या.
Kihozta az Úr a mi igazságainkat, jertek és beszéljük meg Sionban az Úrnak, a mi Istenünknek dolgát.
11 ११ बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराने माद्य राजाचा आत्म्यास चिथावणी दिली आहे कारण बाबेलाचा नाश करावा अशी त्याची योजना होती. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याचे मंदिर उध्वस्त केल्याबद्दलचा सूड आहे.
Élesítsétek a nyilakat, töltsétek meg a tegzeket; felindította az Úr a Médiabeli királyok lelkét, mert Babilon ellen van az ő gondolatja, hogy elveszesse azt, mert az Úr bosszúállása ez, az ő templomáért való bosszúállása.
12 १२ बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा. पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा, कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे.
Babilonnak kőfalain tűzzétek ki a zászlót, erősítsétek meg az őrséget, szerezzetek vigyázókat, rendeljétek el a leseket: mert az Úr meggondolta és meg is cselekszi azokat, a miket szólott Babilon lakói ellen.
13 १३ तुम्ही लोक जे बहुत पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतात, जे तुम्ही लोक खजिन्यांनी धनवान आहात, तुझा शेवट आला आहे. तुझ्या आयुष्याची दोरी आता संक्षीप्त केली आहे.
Oh te, a ki lakozol a nagy vizek mellett, a kinek kincsed temérdek, eljött a te véged és a te rablásod határa!
14 १४ सेनाधीश परमेश्वराने आपल्याच जीविताची शपथ वाहिली आहे की, “टोळाच्या पीडेप्रमाणे, मी तुला तुझ्या शत्रूंनी भरीन.” ते तुझ्याविरूद्ध युद्धाची आरोळी करतील.
Megesküdt a Seregek Ura az ő lelkére, mondván: Bizony betöltelek téged emberekkel, mint sáskákkal, és diadalmas éneket énekelnek felőled.
15 १५ त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने कोरडी भूमी स्थापिली आपल्या बुद्धीने आकाश पसरिले;
Az, a ki teremtette a földet az ő erejével, a ki megalapította a világot az ő bölcsességével, és kiterjesztette az egeket az ő értelmével.
16 १६ जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो. तो पावसासाठी वीजा निर्माण करतो आणि आपल्या कोठारातून वारा काढून पाठवतो.
Egy szavával vizek zúgását szerez az égben, és felhőket visz fel a föld határairól, villámokat készít az esőhöz, és kihozza a szelet az ő tárházaiból.
17 १७ प्रत्येक मनुष्य पशूसारखा ज्ञानहीन झाला आहे; प्रत्येक धातु कारागीर आपल्या मूर्तीमुळे लज्जित झाला आहे. कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत. तेथे त्यांच्यात जीवन नाही.
Minden ember bolonddá lett tudomány nélkül, minden ötvös megszégyenül a maga bálványa miatt, mert hazugság az ő öntése és nincs benne lélek.
18 १८ त्या निरुपयोगी आहेत, त्या चेष्टेचे काम आहे. त्यांच्या शिक्षेच्या दिवशी त्या नष्ट होतील.
Hiábavalóságok ezek, nevetségre való művek, az ő megfenyíttetésök idején elvesznek.
19 १९ पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.
Nem ilyen a Jákób osztályrésze mert mindennek teremtője és az ő örökségének pálczája, Seregek Ura az ő neve!
20 २० तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस. तुझ्याबरोबर मी राष्ट्रांना मोडून तुकडे तुकडे करीन आणि राज्यांचा नाश करीन.
Pőrölyöm vagy te nékem, hadi fegyverem, és nemzeteket zúztam össze veled, és országokat vesztettem el veled.
21 २१ तुझ्याबरोबर मी घोडे आणि त्यांचे स्वार त्यांचे तुकडे तुकडे करीन, तुझ्याबरोबर मी त्यांचे रथ आणि सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन.
És általad zúztam össze a lovakat és lovagjaikat, és általad zúztam össze a szekeret és a benne ülőt.
22 २२ तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याबरोबर मी तरुण पुरुष आणि कुमारी मुलगी यांचे तुकडे तुकडे करीन.
És összezúztam általad férfit és asszonyt, és összezúztam általad a vénet és a gyermeket, és összezúztam általad az ifjat és a szűzet,
23 २३ तुझ्याबरोबर मी मेंढपाळ व त्याचे कळप यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी शेतकरी आणि त्यांच्या बैलांची जोडी यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याबरोबर मी राज्यकर्ते व अधिकारी यांचे तुकडे तुकडे करीन.
És összezúztam általad a pásztort és nyáját, és összezúztam általad a szántóvetőt és az ő igamarháját, és összezúztam általad a hadnagyokat és a főembereket.
24 २४ परमेश्वर असे म्हणतो, मी बाबेलाला व खास्द्यांच्या देशातल्या सर्व राहणाऱ्यांनी जे अनिष्ट त्यांनी तुमच्या समक्ष सियोनेत केले आहे त्या सर्वांचे फळ भरून देईन.
És megfizetek Babilonnak és Káldea minden lakosának mindazokért az ő gonoszságaikért, a melyeket Sionban cselekedtek a ti szemeitek láttára, azt mondja az Úr.
25 २५ परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो. मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला कड्यांवरुन खाली लोटून देईन. मग बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुला करीन.
Ímé, én ellened fordulok, te romlásnak hegye, azt mondja az Úr, a ki az egész földet megrontottad, és kinyújtom reád kezemet, és levetlek téged a kőszikláról, és kiégett hegygyé teszlek téged.
26 २६ म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत; कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो.
És belőled nem visznek követ a szegletre és a fundamentomra, mert örökkévaló pusztaság leszel, azt mondja az Úr.
27 २७ पृथ्वीवर निशाण उंच करा. राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. तिच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रांना नेमा. तिच्याविरूद्ध अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना एकत्र बोलवा, तिच्याविरूद्ध हल्ला करण्यास सेनापतीची निवड करा. विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.
Tűzzétek ki a zászlót az országban, fújjátok meg a trombitát a nemzetek között, avassátok fel ellene a nemzeteket, gyűjtsétek össze ellene az Ararátnak, Menninek és Askenáznak országait, válaszszatok ő ellene hadvezért, hozzátok ki a lovakat mint rettenetes sáskasereget.
28 २८ तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा.
Avassátok fel ellene a nemzeteket, Médiának királyait, az ő hadnagyait és minden főemberét, és az ő birodalmának egész földét.
29 २९ भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत.
És megrendül a föld és rázkódik, mert az Úrnak gondolatai beteljesednek Babilon ellen, hogy Babilon földét pusztasággá, lakatlanná tegye.
30 ३० बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.
Babilon vitézei felhagytak a viadallal, erősségeikben ülnek, elfogyott a vitézségök, asszonyokká lettek, felgyújtották lakhelyeit, zárait letörték.
31 ३१ बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे हे सांगण्यासाठी एका दूतामागून दुसरा दूत आणि एक जासूद दुसऱ्या जासूदाला सांगण्यास धावत आहेत.
Futár futár elé fut, és hírmondó a hírmondó elé, hogy megjelentse a babiloni királynak, hogy bevétetett az ő városa mindenfelülről.
32 ३२ नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत.
És a révhelyek elfoglaltattak, és az álló tavak tűzzel kiszáríttattak, és a vitézek elrettentek.
33 ३३ कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मळण्याच्या वेळी खळे जसे असते त्यासारखी बाबेलाची कन्या आहे. तिला पायाखाली तुडवण्याची वेळ आहे. अजून थोडा अवकाश आहे, मग तिच्या कापणीचा समय येईल.”
Mert ezt mondja a seregek Ura, az Izráel Istene: Babilon leánya olyan, mint a szérű, itt van az ő tapostatásának ideje, egy kis híja még, és eljő az ő aratásának ideje.
34 ३४ यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे.
Benyelt engem, megemésztett engem Nabukodonozor, a babiloni király, üres edénynyé tett engem, benyelt engem mint a sárkány, betöltötte a hasát az én csemegéimmel, és kivetett engemet.
35 ३५ मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील. “माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरूशलेम म्हणेल.
Az én rajtam esett erőszak és az én testem Babilonra térjen, azt mondja a Sionnak lakója, és az én vérem Káldeának lakosaira, azt mondja Jeruzsálem!
36 ३६ म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन. कारण मी बाबेलाचे समुद्र आटवीन आणि तिचे झरे सुकवून टाकीन.
Azért ezt mondja az Úr: Ímé, én megítélem a te ügyedet, és bosszút állok éretted, és kiszáraztom az ő tengerét, és kiapasztom az ő forrását.
37 ३७ बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल.
És Babilon kőrakássá lesz, sárkányok lakhelyévé, csudává, csúfsággá és lakatlanná lesz.
38 ३८ “बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील.
Együtt ordítanak, mint az oroszlánok, harsognak, mint az oroszlánkölykök.
39 ३९ जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो.
Az ő kedvöknek idején készítek nékik lakomát, és megrészegítem őket, hogy vígadjanak, és örökkévaló álmot aludjanak, és fel ne serkenjenek, azt mondja az Úr.
40 ४० “मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन.
Előhozom őket, mint a bárányokat a megmetszésre, mint a kosokat a bakokkal egyetemben.
41 ४१ शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे.
Mint bevétetett Sésák, és elfoglaltatott az egész földnek dicséreti! Milyen útálattá lett Babilon a nemzetek között!
42 ४२ बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे.
Feljött Babilonra a tenger, habjainak özönével elboríttatott.
43 ४३ तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही
Városai pusztává, sivataggá és kopár földdé lesznek, a melyen senki sem lakik, sem embernek fia át nem megy rajta.
44 ४४ म्हणून बाबेलात मी बेलाला शिक्षा करीन; त्यांने जे गिळले आहे ते मी त्याच्या तोंडातून बाहेर आणील, आणि राष्ट्रे त्याच्याकडे आपल्या संततीला बरोबर घेऊन वाहणार नाही. बाबेलाची भिंत पडेल.
Megfenyítem Bélt is Babilonban, és kivonom szájából, a mit benyelt, és többé nem futnak hozzá a nemzetek, Babilonnak kőfala is ledől.
45 ४५ माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा.
Jőjjetek ki belőle, oh én népem, és kiki szabadítsa meg lelkét az Úr haragjának tüzétől.
46 ४६ देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील.
És el ne olvadjon a ti szívetek és ne féljetek a hírtől, a mely hallatszik e földön, mikor egyik esztendőben hír jő, és a másik esztendőben is a hír, hogy erőszakosság van a földön, uralkodó tör uralkodóra!
47 ४७ यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील. तेव्हा तिचा संपूर्ण देश लज्जित होईल, आणि तिचे सर्व वधलेले तिच्यामध्ये पडतील.
Azért ímé, eljőnek a napok, és meglátogatom Babilon faragott képeit, és egész földe megszégyenül, és minden ő megöltjei elhullanak ő közötte.
48 ४८ मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील. कारण तिचा नाश करणारा उत्तरेकडून येईल.” परमेश्वर असे म्हणतो.
És örvendeznek Babilon felett az ég és a föld és minden benne valók, mert észak felől eljőnek reá a pusztítók, azt mondja az Úr.
49 ४९ बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे, तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील.
Babilon is elesik, Izráel megölöttjei, a mint Babilonban is elhullottak az egész föld megölöttjei.
50 ५० जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो.
Menjetek el, a kik megszabadultatok a fegyvertől, meg ne álljatok; emlékezzetek meg a távolból az Úrról, és jusson eszetekbe Jeruzsálem.
51 ५१ “आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.”
Megszégyenültünk, mert hallottuk a gyalázkodást, orczáinkat szégyen borította, mert idegenek jöttek az Úr házának szentségébe.
52 ५२ यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन, आणि तिच्या देशात जखमी झालेले कण्हतील.
Azért ímé, eljőnek a napok, azt mondja az Úr, és meglátogatom az ő faragott képeit, és egész földén sebesültek nyögnek.
53 ५३ कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो.
Ha az égbe hág is fel Babilon, és ha megerősíti is az ő erős magaslatát, pusztítók törnek reá tőlem, azt mondja az Úr.
54 ५४ “बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो.
Kiáltás hallatszik Babilonból, és a Káldeusok földéből nagy romlás.
55 ५५ कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे. त्यांचे शत्रू बहुत जलांच्या लाटांप्रमाणे गर्जना करीत आहेत. त्यांच्या गर्जनेचा गोंगाट फार बलवान होत आहे.
Mert elpusztítja az Úr Babilont, és kiveszíti belőle a nagy zajt, és zúgnak az ő habjai, mint a nagy vizek, hallatszik az ő szavok harsogása.
56 ५६ कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत. त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल.
Mert pusztító tör reá, Babilonra, és elfogatnak vitézei, eltörik az ő kézívök, mert a megfizetésnek Istene, az Úr, bizonynyal megfizet.
57 ५७ कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील व ते अंत नसणाऱ्या झोपेत झोपतील आणि कधी जागे होणार नाहीत.” असे राजाचे म्हणणे आहे; सेनाधीश परमेश्वर त्याचे नाव आहे.
És megrészegítem az ő fejedelmeit, bölcseit, hadnagyait, tiszttartóit és vitézeit, és örök álmot alusznak, és nem serkennek fel, azt mondja a király, a kinek neve Seregek Ura!
58 ५८ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल, आणि तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. मग तिच्या मदतीला येणाऱ्या लोकांची मेहनत निरुपयोगी होईल. जी प्रत्येकगोष्ट राष्ट्र तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल ती जाळण्यात येईल.”
Ezt mondja a Seregek Ura: Babilon széles kőfala földig lerontatik, és az ő büszke kapuit tűz égeti meg, és a népek hiába munkálkodnak, és a nemzetek a tűznek, és kifáradnak.
59 ५९ महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.
Ez a szó, a melylyel Jeremiás próféta utasította Seráját, Néria fiát, a ki a Mahásiás fia volt, mikor ő Babilonba méne Sedékiással, a Júda királyával, királyságának negyedik esztendejében; Serája pedig szállásmester vala.
60 ६० यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती.
És megírá Jeremiás egy könyvben mindazt a veszedelmet, a mely Babilont fogja érni, mindezeket a beszédeket, a melyek megirattak Babilon felől.
61 ६१ यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे.
És monda Jeremiás Serájának: Mikor Babilonba jutsz, és látod és elolvasod mind e szókat,
62 ६२ आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू स्वतः या स्थानाविषयी बोलला आहेस की, ते नष्ट होईल. मग तेथे कोणी रहिवासी किंवा लोक व पशू राहणार नाहीत. ती कायमची टाकाऊ होईल.’
Ezt mondjad: Uram, te szólottál e hely ellen, hogy elveszítsed ezt annyira, hogy lakó ne legyen benne embertől baromig, hanem örökkévaló pusztaság legyen.
63 ६३ मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे.
És mikor e könyv olvasását elvégzed, köss reá követ, és hajítsd be az Eufrátes közepébe.
64 ६४ म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली.
És ezt mondd: Így merül el Babilon, és meg nem menekedik a veszedelemtől, a melyet én hozok reá, akármint fáradjanak. Eddig vannak a Jeremiás beszédei.