< यिर्मया 50 >
1 १ बाबेल देश व खास्द्यांच्या लोकांविषयी हे वचन परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्या हाती सांगितले.
Az ige, melyet szólt az Örökkévaló Bábelről, Kaszdím országáról, Jirmejáhú próféta által.
2 २ राष्ट्रांत घोषणा कर व ऐकू येईल असे सांगा! निशाण उंच करा आणि ऐकू येईल असे सांगा. गुप्त ठेवू नका. म्हणा, बाबेल घेतली आहे. बेल लज्जित झाला आहे. मरदोख मोडला आहे. त्यांच्या मूर्तींची फजीती झाली आहे. त्यांचे पुतळे मोडले आहेत.
Jelentsétek a nemzetek között és hallassátok és emeljetek zászlót, hallassátok, ne titkoljátok el, mondjátok: Bevétetett Bábel, szégyent vallott Bél, megrettent Meródakh, szégyent vallottak bálványai, megrettentek undokságai.
3 ३ उत्तरेकडचे एक राष्ट्र तिच्याविरूद्ध उठले आहे, ते तिचा देश ओसाड करील. तिच्यात कोणीएक मनुष्य किंवा पशूही राहणार नाही. ते दूर पळून जातील
Mert felvonult ellene egy nemzet északról, az majd pusztává teszi országát és nem lesz benne lakó, embertől állatig elköltöztek, tovamentek.
4 ४ परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात आणि त्यावेळी इस्राएलाचे व यहूदाचे लोक एकत्र येऊन बरोबर रडत जातील आणि परमेश्वर आपला देव याला शोधतील.
Ama napokban és amaz időben, úgymond az Örökkévaló, jönni fognak Izrael fiai, ők és Jehúda fiai egyetemben, egyre sírva fognak menni és az Örökkévalót, Istenüket fogják keresni.
5 ५ ते सियोनेची वाट विचारतील व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. ते जातील आणि म्हणतील जो कधी मोडला जाणार नाही अशा सर्वकाळच्या कराराने आपण स्वत: परमेश्वराशी जोडले जाऊ.
Cziónt kérdezik, az ide vivő útra van az arcuk. Gyertek és csatlakozzatok az Örökkévalóhoz, örök szövetséggel, mellyel nem felejthető.
6 ६ माझे लोक हरवलेला कळप असे झाले आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना डोंगरात भटकविले आहे. त्यांनी त्यांना टेकड्या टेकड्यांतून फिरवले आहे. ते गेले, ते कोठे राहत होते ती जागा ते विसरले.
Elveszett juhok volt a népem, pásztoraik megtévesztették őket, hegyekre csábították őket, hegyről halomra mentek, elfelejtették heverő helyüket.
7 ७ प्रत्येकजण जो कोणी त्यांच्याकडे बाहेर गेला त्यांनी त्यास खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, आम्ही दोषी नाही, कारण परमेश्वर त्यांचे खरे राहण्याचे ठिकाण आहे, परमेश्वर जो त्यांच्या पूर्वजांची आशा त्याच्याविरुध्द त्यांनी पाप केले आहे.
Mind akik rájuk találtak, megették őket és szorongatóik azt mondták: nem esünk bűnbe; azért hogy vétkeztek az Örökkévaló ellen, az igazság hajléka és őseik reménye, az Örökkévaló ellen!
8 ८ “बाबेलच्या मध्यापासून भटका आणि खास्द्यांच्या देशातून निघून जा; जसे कळपाच्या पुढे चालणारा एडका तसे तुम्ही व्हा.
Költözzetek el Bábelből, és Kaszdím országából vonuljatok ki, és legyetek mint a bakok a nyáj előtt.
9 ९ कारण पाहा, मी उत्तरेकडून मोठ्या राष्ट्रांचा समूह उठवून बाबेलाविरूद्ध आणीन आणि ते सज्ज होऊन येतील. ते तिच्याविरूद्ध स्वतः तेथे बंदोबस्त करतील. तेथपासून ते बाबेल जिंकून घेतला जाईल. त्यांचे बाण निपुण वीरासारखे आहेत; ते व्यर्थ होऊन परत येत नाही.
Mert íme én feltámasztom és felhozom Bábel ellen nagy nemzetek gyülekezetét észak földjéről, hogy ellene sorakozzanak, onnan fog bevétetni. Nyilai olyanok, mint az öldöső hős, ki nem tér vissza, üresen.
10 १० खास्द्यांची लूट होईल. जे कोणी त्यांना लुटेल तो तृप्त होईल.” असे परमेश्वर म्हणतो.
És zsákmánnyá lesz Kaszdim, mind a zsákmánylói jóllaknak, úgymond az Örökkévaló.
11 ११ माझे वतन लुटणाऱ्यांनो, तुम्ही आनंद व उत्सव करता; जसे तुम्ही वासरू त्याच्या कुरणात सभोवती पाय आपटत उड्या मारते, बळकट घोड्याप्रमाणे खिंकाळता.
Bár örültök, bár ujjongtok, ti birtokomnak fosztogatói, bár ugrándoztok, mint a nyomtató üsző és nyerítetek, mint a paripák:
12 १२ तरी तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल. पाहा, ती राष्ट्रांत क्षुद्र, रान, कोरडी भूमी आणि वाळवंट होईल.
megszégyenült: anyátok nagyon, elpirult a ti szülőtök: íme a nemzetek vége: puszta, vadon és sivatag.
13 १३ परमेश्वराच्या क्रोधामुळे बाबेलात वस्ती होणार नाही, परंतु संपूर्ण उध्वस्त होईल. बाबेला शेजारून जो कोणी जाईल तो प्रत्येकजण तिच्यामुळे कंप पावेल आणि तिच्या सर्व जखमामुळे फूत्कार टाकेल.
Az Örökkévaló haragja miatt nem lesz lakva és pusztulássá lesz egészen; bárki elmegy Bábel mellett, eliszonyodik és pisszeg mind a csapásai fölött.
14 १४ तुम्ही सर्व बाबेलाविरूद्ध सभोवती मांडणी करून सज्ज व्हा. प्रत्येकजण जो कोणी धनुष्य वाकवतो त्याने तिच्यावर मारा करावा. तुमचा एकही बाण राखून ठेवू नका, कारण तिने परमेश्वराविरूद्ध पाप केले आहे.
Sorakozzatok Bábel ellen köröskörül, mind akik az íjat feszítik, lőjetek rá, ne kíméljétek a nyilat, mert az Örökkévaló ellen vétkezett.
15 १५ तिच्याविरूद्ध तिच्या सर्व सभोवताली विजयाची आरोळी मारा; तिने आपले सामर्थ्य समर्पण केले आहे. तिचे बुरुज पडले आहेत. तिच्या भिंती पाडल्या आहेत, कारण हा परमेश्वराचा सूड आहे. तिच्यावर सूड घ्या. तिने जसे दुसऱ्या राष्ट्रांना केले तसे तिचे करा.
Riadozzatok ellene köröskörül: kezét nyújtotta, bedőltek alapzatai, leromboltattak falai, mert az Örökkévaló bosszúja az: álljatok bosszút rajta, amint cselekedett, úgy cselekedjetek vele!
16 १६ बाबेलामधील पेरणारा आणि कापणीच्यावेळी विळा चालवणारा या दोघांचा नाश करा. जुलमाच्या तलवारीमुळे ते प्रत्येकजण आपल्या लोकांकडे वळतील; त्यांना आपल्या देशाकडे पळून जाऊ द्या.
Irtsatok ki magvetőt Bábelből és sarlófogót az aratás idején; az elnyomó kard miatt kiki népéhez fordulnak majd és kiki az országába futnak.
17 १७ “इस्राएल विखुरलेले मेंढरू आहे आणि सिंहाने दूर पळवून लावले आहे. प्रथम अश्शूराच्या राजाने त्यास खाल्ले; मग यानंतर, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने त्याचे हाडे मोडून टाकली आहेत.”
Elszéledt juh Izrael, oroszlánok kergették el; az első megette: Assúr királya, ez utolsó pedig csontjait törte: Nebúkadnecczár, Bábel királya.
18 १८ म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, जसे मी अश्शूराच्या राजाला शिक्षा केली तसे मी बाबेलाच्या राजाला व देशाला शिक्षा करणार आहे.
Azért így szól az Örökkévaló, a seregek ura, Izrael Istene: Íme én megbüntetem Bábel királyát és országát, amint megbüntettem Assúr királyát.
19 १९ “मी इस्राएलाला त्याच्या मातृभूमीत स्थापित करीन. तो कर्मेल व बाशानावर चरेल. नंतर तो एफ्राईम व गिलाद येथील डोंगराळ प्रदेशात तृप्त होईल.”
És visszatérítem Izraelt tanyájára, hogy legeljen a Karmellen és Básánban és Efraim hegyén, meg Gileádban jól lakjék a lelke.
20 २० परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात आणि त्यावेळी, इस्राएलाचा अपराध शोधण्यात येईल, पण काहीच सापडणार नाही. मी यहूदाच्या पापाविषयी चौकशी करील, पण काहीच सापडणार नाही, कारण मी ज्यांना शेष असे राखून ठेवील त्यांना क्षमा करीन.”
Ama napokban és amaz időben, úgymond az Örökkévaló, keresik majd Izrael bűnét és nincsen és Jehúda vétkeit, de nem találtatnak, mert megbocsátok annak, akit. meghagyok.
21 २१ परमेश्वर असे म्हणतो, मराथाईम देशाविरूद्ध उठ, त्याच्याविरुध्द आणि पकोडच्या रहिवाश्यांवर चढाई कर. त्यांच्यावर तलवार ठेवून आणि त्यांचा संपूर्ण नाश करा. मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकगोष्ट कर.
Merátájim ország ellen – menj föl ellene és Pekód lakói ellen: karddal ölj és pusztíts utánuk, úgymond az Örökkévaló, és tégy mind aszerint, amint megparancsoltam neked.
22 २२ युध्दाचा मोठा आवाज आणि देशात प्रचंड नाश होत आहे.
Háború zaja van az országban és nagy romlás!
23 २३ सर्व देशांचा हातोडा कसा मोडून तोडून टाकिला आहे आणि नाश झाला आहे. राष्ट्रामध्ये बाबेल कसा ओसाड झाला आहे.
Mint vágatott le és töretett el az egész föld kalapácsa, mint lett pusztulássá Bábel a nemzetek között!
24 २४ हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा रचला आहे, तू पकडला गेला आहे आणि तुला समजले नाही. तू सापडलास व पकडला गेलास, आतापर्यंत तू परमेश्वराविरुद्ध भांडलास,
Tőrt vetettem neked és meg is fogattál, Bábel, s te nem tudtad; megtaláltattál és meg is ragadtattál, mert az Örökkévaló ellen gerjedtél föl.
25 २५ परमेश्वराने आपले शस्रागार उघडले आहे आणि आपली हत्यारे त्याने बाहेर आणली आहेत कारण त्यास आपला क्रोध अंमलात आणायचा आहे. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर यास खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे.
Kinyitotta az Örökkévaló az ő tárházát és kihozta haragjának fegyvereit, mert munkája van az Úrnak, az Örökkévalónak, a seregek urának Kaszdím országában.
26 २६ दूरवरुन तिच्यावर हल्ला करा. तिची धान्याची कोठारे उघडा आणि धान्याच्या राशीप्रमाणे त्याचे ढीग करा. तिचा अगदी नाश करा, तिच्यातील कोणालाही सोडू नका.
Gyertek ellene mindenfelől, nyissátok föl csűreit, hányjátok fel őt mint asztagokat és pusztítsátok ki, ne legyen maradéka.
27 २७ तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कत्तलीच्या जागी पाठवा. त्यांना हाय हाय, कारण त्यांचे दिवस आले आहेत, कारण त्यांच्या शिक्षेची वेळ आली आहे.
Öljétek le mind a tulkait, dőljenek le vágásra: jaj nekik, mert megjött napjuk, büntetésük ideje.
28 २८ बाबेल देशामधून जे कोणी वाचलेले आहेत ते पळून जात आहेत त्यांचा आवाज तेथे आहे. तो आवाज ते आमचा देव परमेश्वर याजकडून सूड, त्याच्या मंदिराविषयीचा सूड, सीयोनेस कळवित आहे.
Hallga, futamodók és menekülők Bábel országából, hogy jelentsék Cziónban, az Örökkévalónak, Istenünknek bosszúját, templomának a bosszúját.
29 २९ “बाबेलाविरूद्ध जो कोणी त्यांचे सर्व धनुष्य वाकवणारे धनुर्धारी यांना हुकूम द्या. त्यांच्याविरुद्ध तळ द्या आणि कोणालाही निसटू देऊ नका. तिने जे काही केले त्याची परतफेड करा. तिने जे माप वापरले तिला तसेच करा. कारण तिने परमेश्वरास, इस्राएलाचा पवित्र प्रभू याची अवज्ञा केली.
Hívjatok egybe Bábel ellen lövészeket, mindazokat, kik az íjat feszítik; táborozzatok ellene köröskörül, ne legyen menekvése, fizessetek neki cselekvése szerint, mind aszerint, amit tett, tegyetek vele, mert az Örökkévaló ellen kevélykedett, Izrael szentje ellen.
30 ३० म्हणून तिचे तरुण पुरुष नगरातल्या चौकात पडतील, आणि तिचे सर्व लढणारे त्या दिवशी नाश होतील.” असे परमेश्वर म्हणतो.
Azért hulljanak el ifjai a piacain és mind a harcosai semmisüljenek meg azon napon, úgymond az Örökkévaló.
31 ३१ “हे गर्विष्ठा, पाहा, मी तुझ्याविरूद्ध आहे” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण हे गर्विष्ठा, तुझा दिवस आला आहे, मी तुला शिक्षा करण्याची वेळ आली आहे.
Íme én ellened fordulok, kevélység, úgymond az Úr, az Örökkévaló, a seregek ura, mert megjött a napod, a midőn megbüntetlek.
32 ३२ म्हणून गर्विष्ठ अडखळून पडेल. तिला कोणीही उठवणार नाही. मी तिच्या नगरात आग पेटवीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकगोष्टीला खाऊन टाकिल.”
És megbotlik a kevélység és elesik, és nincs aki feltámasztja; és tüzet gyújtok városaiban, hogy megeméssze mindazt, ami körülötte van.
33 ३३ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोक, यहूदी लोक याजवर बरोबर एकत्र जुलूम होत आहेत. ज्या सर्वांना त्यांनी पकडून नेले आहे त्यांना अजून धरून ठेवले आहे.
Így szól az Örökkévaló a seregek ura: Ki vannak fosztogatva Izrael fiai és Jehúda fiai egyetemben, mind akik fogságba ejtették őket, erősen tartották őket, vonakodtak őket elbocsátani.
34 ३४ त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील, म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलाच्या रहाणाऱ्यावर संघर्ष आणील.”
Megváltójuk erős, Örökkévaló, seregek ura az ő neve, védve védi az ügyüket, hogy megnyugtassa a földet és megháborítsa Bábel lakóit.
35 ३५ परमेश्वर असे म्हणतो, खास्द्यांविरूद्ध, बाबेलाच्या राहणाऱ्याविरूद्ध, तिचे नेते व तिचे ज्ञानी माणसे यावर तलवार आली आहे.
Kard a kaldeusokra, úgymond az Örökkévaló, és Bábel lakóira, meg nagyjaira és bölcseire;
36 ३६ जे कोणी भविष्यासाठी वचन सांगतात त्यांच्याविरुद्ध तलवार आली आहे, याकरिता की, ते आपल्यास मूर्खाप्रमाणे प्रकट करतील. तिच्या सैनिकांविरूद्ध तलवार येत आहे, अशा रीतीने ते दहशतीने भरतील.
kard a hazugokra, hogy elbolonduljanak, kard hőseire, hogy megrettenjenek;
37 ३७ त्यांच्या घोड्याविरूद्ध, त्यांच्या रथावर आणि बाबेलाच्यामध्ये जे कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे. ते स्त्रियासारखे असे होतील. तलवार तिच्या भांडारावर आली आहे, आणि ती लुटली जाईल.
kard a lovaira és szekereire és mind a gyülevész népre, mely benne van, hogy asszonyokká legyenek, kard a kincseire, hogy elprédáltassanak!
38 ३८ तलवार तिच्या पाण्याविरूद्ध येईल, मग ते कोरडे होईल. कारण ती कवडीमोल मूर्तीचा देश आहे, आणि त्या लोकांस त्यांच्या भयंकर मूर्तींवरून वेडे झाले आहेत.
Szárazság a vizeire, hogy elszikkadjanak, mert bálványképek országa az és rémekkel őrjöngnek.
39 ३९ यास्तव रानटी पशू कोल्ह्यासहीत तेथे वस्ती करतील आणि तरुण शहामृग तेथे राहतील; कारण सर्व काळी तिच्यात पुन्हा कोणी कधीही रहाणार नाही. पिढ्यानपिढ्या तिच्यात कोणी वस्ती करणार नाही.
Azért laknak majd pusztai állatok vad ebekkel és laknak benne struccmadarak; nem lakják soha, többé és nem lesz lakva nemzedékre s nemzedékre.
40 ४० परमेश्वर असे म्हणतो, देवाने जसा सदोम, गमोरा आणि त्यांचे शेजारी यांचा नाश केला. त्याचप्रमाणे, तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तिच्यात राहणार नाही.
Mint mikor Isten feldúlta Szodomát és Amórát meg szomszédjait, úgymond az Örökkévaló, nem fog ott lakni senki és nem fog benne tartózkodni ember fia.
41 ४१ “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. कारण एक महान शक्तीशाली राष्ट्र आणि पुष्कळ राजे दूर देशातून उठत आहेत.
Íme nép jön északról, nagy nemzet, és sok királyok serkennek fel a föld hátuljáról.
42 ४२ ते धनुष्य व भाले धारण करतात. ते क्रूर आहेत आणि त्यांच्याजवळ दया नाही. त्यांचा आवाज समुद्राप्रमाणे गर्जत आहेत आणि अगे बाबेलच्या कन्ये ते घोड्यांवर स्वार होऊन लढणाऱ्या मनुष्याच्या स्वरुपात तुझ्याविरूद्ध येत आहेत.
Íjat és lándzsát ragadnak, kegyetlenek ők és nem irgalmaznak, hangjuk zúg mint a tenger és lovakon nyargalnak, felkészülve, mint harcra kész férfi, ellened, Bábel leánya.
43 ४३ बाबेलाच्या राजाने त्यांचे वर्तमान ऐकले आहे आणि त्याचे हात विपत्तीने गळाले आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्यास वेदनेने वेढले आहे.”
Hallotta Bábel királya a hírüket és ellankadtak kezei, szorultság ragadta őt meg, vajúdás, mint a szülő nőé.
44 ४४ “पाहा, जसा सिंह यार्देनेच्या दाट झुडुपांतून बाहेर येतो, तसा तो मजबूत वस्तीवर येईल. कारण ते एकाएकी तिच्यापासून पळून जातील, असे मी करीन. आणि जो मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन; कारण माझ्यासारखा कोण आहे? आणि मला कोण आज्ञा देईल? आणि कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?”
Íme, mint oroszlán, mely felszáll a Jordán büszkeségéből szilárd tanyára, egy szempillantás alatt elűzöm őket onnan, és aki csak ki van választva, azt rendelem ellene. Mert ki olyan, mint én, ki idézhet meg engem és ki az a pásztor, aki megáll előttem?
45 ४५ तर बाबेलाविरूद्ध परमेश्वराने जी योजना ठरवली आहे ती, खास्द्यांच्या देशाविरूद्ध जे संकल्प केले आहेत तेही ऐका; ते खचित कळपातील लहानांनादेखील, ओढून नेतील, त्यांचे कुरणाचे देश नाशाची जागा होईल.
Ezért halljátok az Örökkévaló határozatát, amelyet Bábelről határozott és gondolatait, melyeket gondolt Kaszdím országról: bizony elhurcolják őket, a juhok legkisebbjeit, bizony elpusztítják velük együtt a tanyájukat.
46 ४६ बाबेल जिंकून घेण्याच्या आवाजाने पृथ्वी हादरेल आणि त्यांच्या दुःखाची आरोळी राष्ट्रांमध्ये ऐकायला येईल.
Azon hírre, hogy elfoglaltatott Bábel, megrendült a föld, jajkiáltás hallatszott a nemzetek között.