< यिर्मया 5 >

1 परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन.
Prođite ulicama jeruzalemskim, pogledajte dobro i raspitajte se, tražite po njegovim trgovima, pa ako nađete ijednoga čovjeka koji čini pravo i traži istinu, oprostit ću ovom gradu” - riječ je Jahvina.
2 परमेश्वर जिवंत आहे, जरी ते असे म्हणतात ती ते खोटी शपथ वाहत आहेत.”
Pa kad i govore: “Živoga mi Jahve!” doista se krivo zaklinju.
3 हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.
Jahve, nisu li oči tvoje upravljene k istini? Biješ ih, ali njih ne boli; zatireš ih, al' oni odbijaju pouku tvoju. Čelo im je tvrđe od litice, odbijaju da se obrate.
4 तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.
Rekoh: “Samo siromasi tako ludo postupaju, jer ne znaju puta Jahvina ni pravo Boga svojega.
5 म्हणून मी महत्वाच्या लोकांकडे जाऊन त्यांना देवाचा संराष्ट्र घोषीत करीन. कारण त्यांना कमीत कमी परमेश्वराचा आपल्या देवाचा नियम तर माहीत आहे.” पण त्यांनी तर एकमताने जू मोडले आहे आणि तो साखळदंड तोडला आहे जो त्यांना देवासोबत बांधून होता.
Poći ću, dakle, velikima i njima ću govoriti, jer oni poznaju put Jahvin i pravo Boga svojega.” Ali oni svi složno razbiše jaram i sve veze pokidaše.
6 म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.
I zato ih šumski lav napada, vuk pustinjski razdire, leopardi vrebaju gradove njihove, tko god iziđe iz njih bit će rastrgan. Jer su grijesi njihovi mnogobrojni, mnogostruki otpadi njihovi.
7 मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.
“Zašto da ti oprostim? Sinovi me tvoji napustiše, zaklinju se lažnim bogovima. Ja ih nasitih, oni preljub učiniše, u bludničinu kuću nagrnuše.
8 भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते मोकाट फिरत होते. प्रत्येक पुरुष त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीसाठी किंकाळला.
Oni su k'o ugojeni, sileni konji: ržu za ženom bližnjega svoga.
9 तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो, असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का?
Pa da to ne kaznim - riječ je Jahvina - narodu takvu da se ne osvetim?
10 १० तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस. तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही.
Popnite se na zidove! Razarajte! Uništite, ali ne posvema! Iščupajte sve čokote jer nisu Jahvini.
11 ११ कारण यहूदा व इस्राएल घराण्याने माझा फार विश्वासघात केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Da, podlo me izdadoše dom Izraelov i dom Judin” - riječ je Jahvina.
12 १२ त्यांनी मला नाकार दिला, ते म्हणाले; “तो खरा नाही, अरीष्ट आम्हांवर नाही येणार, किंवा आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.
Zanijekaše Jahvu, rekoše: “Nema ga! Zlo nas neće snaći, nećemo iskusiti ni gladi ni mača!
13 १३ संदेष्टे हे पोकळ वाऱ्या प्रमाणे होतील आणि परमेश्वराचे वचन आम्हांला घोषीत करायला कोणीच नाही. त्यांच्या धमक्या त्यांच्यावरच येवो.”
[13a] A proroci su poput vjetra, govornika nema među njima!”
14 १४ यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तू हे बोलला याकारणास्तव पाहा, मी जे शब्द तुझ्या मुखात घालत आहे, ते आगीप्रमाणे असतील आणि हे लोक लाकडाप्रमाणे असतील. कारण ती आग त्यांना खाऊन टाकील.
Zato ovako govori Jahve, Bog nad Vojskama: “Zato što su tako govorili, [13b] evo što će im se zbiti: U oganj ću pretvoriti svoje riječi u tvojim ustima, a narod ovaj u drvo da ga oganj proždre.
15 १५ पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, मी दूरुन एक राष्ट्र आणतो, ते शक्तीशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील भाषा तुला माहीत नाहीत. किंवा ते काय बोलतात ते तू समजू शकणार नाही.
Evo, dovest ću na vas narod izdaleka, dome Izraelov - riječ je Jahvina. Narod nepobjediv, narod drevan, narod kojega jezik nećeš znati, ni razumjeti što govori.
16 १६ त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत.
Tobolac mu je razjapljen grob. Svi su oni po izboru junaci.
17 १७ तुझे पीक व तुझी भाकर जी तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींनी खावी ती ते खाऊन टाकतील, ते तुझी मेंढरे व तुझी गुरे ते खाऊन टाकतील. ते तुझी द्राक्षेवली आणि अंजीर झाडे खाऊन टाकतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील, ज्याच्यावर तुम्ही विसंबून होता.”
On će proždrijet' tvoju žetvu, tvoj kruh, sinove i kćeri tvoje, ovce i goveda tvoja, grožđe i smokve tvoje, razorit će ti gradove tvrde u koje se sada uzdaš.”
18 १८ “पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
“Ali ni tada - riječ je Jahvina - neću te posve uništiti.
19 १९ हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”
A kad budu pitali: 'Zašto nam Jahve, Bog naš, učini sve ovo?' ti ćeš im odgovoriti: 'Jer ste mene ostavili da biste služili tuđim bogovima u svojoj zemlji, služit ćete tuđincu u zemlji koja nije vaša!'”
20 २० याकोबाच्या घराण्याला ही वार्ता कळव आणि यहूदाला हे ऐकू दे.
“Objavite ovo domu Jakovljevu i obznanite po Judeji:
21 २१ मूर्ख लोकांनो, जे तुम्हास डोळे असून पाहत नाही व कान असून ऐकत नाही ते तुम्ही हे ऐका.
Čujte, dakle, ovo, narode ludi i nerazumni: oči imaju, a ne vide, uši imaju, a ne čuju!
22 २२ परमेश्वर म्हणतो, तुम्ही भीत नाही काय? किंवा माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापत नाही काय? मी सनातन नियमाने समुद्राच्याविरूद्ध वाळूची सीमा घातली आहे, जेणेकरून त्याने उल्लंघन करू नये. जरी समुद्र उठतो आणि खाली पडतो, तरी त्याच्याने उल्लंघवत नाही. जरी त्याच्या लाटा गर्जतात, तरी त्या ओलांडून जात नाही.
Zar se mene nećete bojati - riječ je Jahvina - zar nećete drhtati preda mnom koji sam stavio pijesak moru za granicu, za vječnu među koje nikad neće prijeći: ono se biba, al' je nemoćno, valovi mu huče, ali prijeći neće.
23 २३ पण हे लोक दुराग्रही हृदयाचे आहेत, जे बंडखोर होऊन दूर गेले आहे.
No, u naroda ovog srce je prkosno, nepokorno; oni se udaljiše - to je snaga njihova!
24 २४ यहूदातील लोक आपल्या हृदयात म्हणत नाहीत, परमेश्वर आपला देव, जो योग्य वेळेला आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. आणि आमच्याकरता नेमलेले आठवडे राखतो, त्याचे भय आपण धरू या.
Ne rekoše u srcu svome: 'Bojmo se Jahve, Boga svojega, koji nam u pravi čas šalje dažd rani i kišu kasnu i koji nam čuva tjedne određene za žetvu.'
25 २५ तुमच्या अन्यायाने या गोष्टी तुमच्यापासून राखून ठेवल्या आहेत. तुमच्या पापांनी तुम्हापासून चांगले ते आवरून धरले आहे.
Vaša bezakonja narušiše ovo, vaši vam grijesi uništiše blagostanje.
26 २६ कारण माझ्या लोकात काही दुष्ट मनुष्य आढळतात. दबा धरणाऱ्या फासेपारध्यांप्रमाणे ते एखद्यावर नजर ठेवतात. ते जाळे पसरतात आणि लोकांस पकडतात.
Da, u mome narodu ima zlikovaca: kao ptičari vrebaju iz zasjede, postavljaju zamke, hvataju ljude.
27 २७ पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.
Kao što je krletka puna ptica, tako su njihove kuće pune grabeža; postadoše tako veliki i bogati,
28 २८ ते पुष्ट झाले आहेत, स्वस्थ मनुष्यासारखे ते चकाकतात. त्यांनी दुष्टपणाची सर्व बंधने पार केली आहेत. ते लोकांच्या आणि अनाथांच्या विनंतींना समर्थन करत नाहीत. त्यांची भरभराट झाली आहे परंतू ते गरीबांचा न्याय न्यायीपणाने करत नाही.
tusti i ugojeni. Da, prevršila se mjera zla, ne brane prava, prava sirote ne sreću, ne mare za pravo sirotinje.
29 २९ परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का? “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का?
Pa da to ne kaznim - riječ je Jahvina - narodu takvu da se ne osvetim?
30 ३० देशात अत्याचार व भयानक घटना घडल्या आहेत.
Strahote i grozote zbivaju se u ovoj zemlji:
31 ३१ भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”
proroci laž proriču, a svećenici poučavaju na svoju ruku. A mojem narodu to omilje! Al' što ćete raditi na kraju?

< यिर्मया 5 >