< यिर्मया 48 >

1 मवाबाविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलांचा देव, असे म्हणतोः “नबोला हायहाय, कारण ते उध्वस्त झाले आहे. किर्या-थाईम काबीज केले गेले आहे आणि त्याची मानहानी झाली आहे. तिचे किल्ले पाडण्यात आणि अप्रतिष्ठीत केले गेले आहेत.
לְמוֹאָב כֹּה־אָמַר יְהֹוָה צְבָאוֹת אֱלֹהֵי יִשְׂרָאֵל הוֹי אֶל־נְבוֹ כִּי שֻׁדָּדָה הֹבִישָׁה נִלְכְּדָה קִרְיָתָיִם הֹבִישָׁה הַמִּשְׂגָּב וָחָֽתָּה׃
2 मवाबाचा आदर राहिला नाही. हेशबोनात त्यांच्या शत्रूने तिच्याविरूद्ध अनिष्ट योजिले आहे. ते म्हणाले, ‘या व आपण तिचा राष्ट्राप्रमाणे नाश करू.’ मदमेनासुद्धा नाश होईल, तलवार तुझ्या पाठीस लागेल.
אֵין עוֹד תְּהִלַּת מוֹאָב בְּחֶשְׁבּוֹן חָשְׁבוּ עָלֶיהָ רָעָה לְכוּ וְנַכְרִיתֶנָּה מִגּוֹי גַּם־מַדְמֵן תִּדֹּמִּי אַחֲרַיִךְ תֵּלֶךְ חָֽרֶב׃
3 पाहा, होरोनाईमातून जुलूम व मोठा नाश होत आहे, असा किंकाळीचा आवाज येत आहे.
קוֹל צְעָקָה מֵחֹרוֹנָיִם שֹׁד וָשֶׁבֶר גָּדֽוֹל׃
4 मवाबाचा नाश झाला आहे. तिची मुले ऐकू येईल असे रडत आहे.
נִשְׁבְּרָה מוֹאָב הִשְׁמִיעוּ זְּעָקָה (צעוריה) [צְעִירֶֽיהָ]׃
5 ते रडत रडत लूहीथाच्या टेकडीवर चढत आहेत, कारण खाली होरोनाईमाच्या रस्त्यांवर नाशामुळे किंकाळ्या ऐकू येत आहेत.
כִּי מַעֲלֵה (הלחות) [הַלֻּחִית] בִּבְכִי יַעֲלֶה־בֶּכִי כִּי בְּמוֹרַד חוֹרֹנַיִם צָרֵי צַעֲקַת־שֶׁבֶר שָׁמֵֽעוּ׃
6 पळा! आपले जीव वाचवा व रानातल्या झाडाप्रमाणे व्हा.
נֻסוּ מַלְּטוּ נַפְשְׁכֶם וְתִֽהְיֶינָה כַּעֲרוֹעֵר בַּמִּדְבָּֽר׃
7 कारण तू आपल्या कर्मावर आणि संपत्ती यावर भाव ठेवला आहे, म्हणून तुही पकडला जाशील. मग कमोश आपले याजक आणि पुढाऱ्यांसह बंदिवासात जाईल.
כִּי יַעַן בִּטְחֵךְ בְּמַעֲשַׂיִךְ וּבְאוֹצְרוֹתַיִךְ גַּם־אַתְּ תִּלָּכֵדִי וְיָצָא (כמיש) [כְמוֹשׁ] בַּגּוֹלָה כֹּהֲנָיו וְשָׂרָיו (יחד) [יַחְדָּֽיו]׃
8 कारण नाश करणारा प्रत्येक नगरात येईल. एकही नगर सुटणार नाही. परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल व पठारेही उध्वस्त होतील.
וְיָבֹא שֹׁדֵד אֶל־כׇּל־עִיר וְעִיר לֹא תִמָּלֵט וְאָבַד הָעֵמֶק וְנִשְׁמַד הַמִּישֹׁר אֲשֶׁר אָמַר יְהֹוָֽה׃
9 मवाबाला पंख द्या, कारण तिला खचित दूर उडून जाता यावे. तिची नगरे टाकाऊ होतील, तेथे त्यामध्ये कोणी राहणार नाही.
תְּנוּ־צִיץ לְמוֹאָב כִּי נָצֹא תֵּצֵא וְעָרֶיהָ לְשַׁמָּה תִֽהְיֶינָה מֵאֵין יוֹשֵׁב בָּהֵֽן׃
10 १० जो कोणी परमेश्वराच्या कामात आळशी आहे तो शापीत आहे; आणि जो कोणी आपली तलवार रक्तपातापासून आवरतो तोही शापित आहे.
אָרוּר עֹשֶׂה מְלֶאכֶת יְהֹוָה רְמִיָּה וְאָרוּר מֹנֵעַ חַרְבּוֹ מִדָּֽם׃
11 ११ मवाब लहानपणापासून सुरक्षित आहे. तो त्याच्या द्राक्षरसासारखा आहे त्यास या पात्रातून त्या पात्रात कधीच ओतले नाही. तो बंदिवासात कधी गेला नाही. म्हणून त्याची चव जितकी चांगली तितकी कायम आहे, आणि त्याचा वास न बदलता टिकून आहे.”
שַׁאֲנַן מוֹאָב מִנְּעוּרָיו וְשֹׁקֵט הוּא אֶל־שְׁמָרָיו וְלֹֽא־הוּרַק מִכְּלִי אֶל־כֶּלִי וּבַגּוֹלָה לֹא הָלָךְ עַל־כֵּן עָמַד טַעְמוֹ בּוֹ וְרֵיחוֹ לֹא נָמָֽר׃
12 १२ याकरीता परमेश्वर असे म्हणतो, “पाहा असे दिवस येत आहे की, मी त्याच्याकडे द्राक्षरस ओतणारे पाठवीन, तेव्हा ते त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्यांचे बुधले तुकडे तुकडे करतील.”
לָכֵן הִנֵּֽה־יָמִים בָּאִים נְאֻם־יְהֹוָה וְשִׁלַּחְתִּי־לוֹ צֹעִים וְצֵעֻהוּ וְכֵלָיו יָרִיקוּ וְנִבְלֵיהֶם יְנַפֵּֽצוּ׃
13 १३ मग जसे इस्राएलाचे घराणे आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला तसा मवाब कमोशाविषयी लज्जित होईल.
וּבֹשׁ מוֹאָב מִכְּמוֹשׁ כַּֽאֲשֶׁר־בֹּשׁוּ בֵּית יִשְׂרָאֵל מִבֵּית אֵל מִבְטֶחָֽם׃
14 १४ “आम्ही सैनिक, बलवान लढणारी माणसे आहोत असे तुम्ही कसे म्हणू शकता?
אֵיךְ תֹּֽאמְרוּ גִּבּוֹרִים אֲנָחְנוּ וְאַנְשֵׁי־חַיִל לַמִּלְחָמָֽה׃
15 १५ मवाब उजाड होईल आणि त्याच्या नगरावर हल्ला होईल. कारण त्याचे उत्तम तरुण वधाच्या जागी खाली उतरून गेले आहेत.” हे राजाचे सांगणे आहे, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.
שֻׁדַּד מוֹאָב וְעָרֶיהָ עָלָה וּמִבְחַר בַּחוּרָיו יָרְדוּ לַטָּבַח נְאֻם־הַמֶּלֶךְ יְהֹוָה צְבָאוֹת שְׁמֽוֹ׃
16 १६ मवाबाचे अरिष्ट लवकरच घडणार आहे; त्याची विपत्ती अत्यंत त्वरा करीत आहे.
קָרוֹב אֵיד־מוֹאָב לָבוֹא וְרָעָתוֹ מִהֲרָה מְאֹֽד׃
17 १७ जे सर्व तुम्ही मवाबासभोवती आहात विलाप कराल. आणि जे सर्व तुम्ही त्याची किर्ती जाणता, ते तुम्ही त्याच्यासाठी आक्रंदन करा, बळकट दंड, आदराची काठी तुटली आहे.
נֻדוּ לוֹ כׇּל־סְבִיבָיו וְכֹל יֹדְעֵי שְׁמוֹ אִמְרוּ אֵיכָה נִשְׁבַּר מַטֵּה־עֹז מַקֵּל תִּפְאָרָֽה׃
18 १८ अगे तू दीबोनात राहणाऱ्या कन्ये, तू आपल्या मानाच्या जागेवरून खाली ये आणि कोरड्या जमिनीवर बस. कारण मवाबाचा विनाश करणारा तुझ्यावर आला आहे तो तुझे बालेकिल्ले नष्ट करील.
רְדִי מִכָּבוֹד (ישבי) [וּשְׁבִי] בַצָּמָא יֹשֶׁבֶת בַּת־דִּיבוֹן כִּֽי־שֹׁדֵד מוֹאָב עָלָה בָךְ שִׁחֵת מִבְצָרָֽיִךְ׃
19 १९ अरोएरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पाहा! जे कोणी पळून व निसटून जात आहेत, त्यांना विचारा, काय झाले आहे?
אֶל־דֶּרֶךְ עִמְדִי וְצַפִּי יוֹשֶׁבֶת עֲרוֹעֵר שַׁאֲלִי־נָס וְנִמְלָטָה אִמְרִי מַה־נִּֽהְיָֽתָה׃
20 २० मवाब लज्जित झाला आहे, कारण त्याचे तुकडे तुकडे झाले आहेत. आक्रोश आणि विलाप करा; मदतीसाठी रडा. मवाबाचा नाश झाला आहे आर्णोन नदीकाठच्या लोकांस सांगा.
הֹבִישׁ מוֹאָב כִּי־חַתָּה (הילילי וזעקי) [הֵילִילוּ ׀ וּֽזְעָקוּ] הַגִּידוּ בְאַרְנוֹן כִּי שֻׁדַּד מוֹאָֽב׃
21 २१ आता डोंगराळ प्रदेशावर शिक्षा आली आहे, होलोनावर, याहस व मेफाथ
וּמִשְׁפָּט בָּא אֶל־אֶרֶץ הַמִּישֹׁר אֶל־חֹלוֹן וְאֶל־יַהְצָה וְעַל־(מופעת) [מֵיפָֽעַת]׃
22 २२ दीबोन, नबो, बेथ-दिबलाथाईम
וְעַל־דִּיבוֹן וְעַל־נְבוֹ וְעַל־בֵּית דִּבְלָתָֽיִם׃
23 २३ किर्या-थाईम, बेथ-गामूल व बेथ-मौन यांचा
וְעַל קִרְיָתַיִם וְעַל־בֵּית גָּמוּל וְעַל־בֵּית מְעֽוֹן׃
24 २४ करोयोथ, बस्रा व मवाब देशामधील दूरची व जवळची नगरे यांवर न्यायनिवाडा आला आहे.
וְעַל־קְרִיּוֹת וְעַל־בׇּצְרָה וְעַל כׇּל־עָרֵי אֶרֶץ מוֹאָב הָרְחֹקוֹת וְהַקְּרֹבֽוֹת׃
25 २५ मवाबाचे शिंग तोडून टाकले आहे. त्याचा बाहू मोडला आहे. असे परमेश्वर म्हणतो.
נִגְדְּעָה קֶרֶן מוֹאָב וּזְרֹעוֹ נִשְׁבָּרָה נְאֻם יְהֹוָֽה׃
26 २६ “त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरूद्ध गर्वाने कृती केली आहे. आता मवाब स्वत: च्याच वांतीत हाताने टाळ्या वाजविल, म्हणून तोही हास्यविषय होईल.
הַשְׁכִּירֻהוּ כִּי עַל־יְהֹוָה הִגְדִּיל וְסָפַק מוֹאָב בְּקִיאוֹ וְהָיָה לִשְׂחֹק גַּם־הֽוּא׃
27 २७ कारण इस्राएल तुझ्या हास्याचा विषय झाला नव्हता का? तो चोरांमध्ये सापडला होता का? जितकेदा तू त्याच्याविषयी बोललास तितकेदा तू आपली मान हालवलीस.
וְאִם ׀ לוֹא הַשְּׂחֹק הָיָה לְךָ יִשְׂרָאֵל אִם־בְּגַנָּבִים (נמצאה) [נִמְצָא] כִּֽי־מִדֵּי דְבָרֶיךָ בּוֹ תִּתְנוֹדָֽד׃
28 २८ मवाबात राहणाऱ्यांनो, नगरे सोडून द्या आणि सुळक्यावर तळ द्या. खडकाच्या खळग्याच्या तोंडावर घरटे करणाऱ्या पारव्यांसारखे व्हा.”
עִזְבוּ עָרִים וְשִׁכְנוּ בַסֶּלַע יֹשְׁבֵי מוֹאָב וִֽהְיוּ כְיוֹנָה תְּקַנֵּן בְּעֶבְרֵי פִי־פָֽחַת׃
29 २९ “आम्ही मवाबाचा गर्व ऐकला आहे. त्याचा उद्धटपणा, त्याचा गर्विष्ठपणा, अहंकार, अभिमान आणि त्याच्या हृदयातली उन्मत्तता ही आम्ही ऐकली आहे.”
שָׁמַעְנוּ גְאוֹן־מוֹאָב גֵּאֶה מְאֹד גׇּבְהוֹ וּגְאוֹנוֹ וְגַאֲוָתוֹ וְרֻם לִבּֽוֹ׃
30 ३० परमेश्वर असे म्हणतो, मला स्वतःला त्याचे उर्मट बोलणे, त्याच्या कृत्यासारखी त्याची पोकळ बढाई मला माहित आहे.
אֲנִי יָדַעְתִּי נְאֻם־יְהֹוָה עֶבְרָתוֹ וְלֹא־כֵן בַּדָּיו לֹא־כֵן עָשֽׂוּ׃
31 ३१ म्हणून मी मवाबासाठी आक्रोश करून विलाप करीन आणि सर्व मवाबासाठी दुःखाने आरोळी मारीन. कीर हरेसाच्या लोकांसाठी मी आक्रंदन करील.
עַל־כֵּן עַל־מוֹאָב אֲיֵלִיל וּלְמוֹאָב כֻּלֹּה אֶזְעָק אֶל־אַנְשֵׁי קִֽיר־חֶרֶשׂ יֶהְגֶּֽה׃
32 ३२ हे सिब्मेच्या द्राक्षवेली, मी याजेरासाठी रडलो त्यापेक्षा तुझ्यासाठी मी अधिक रडेन. तुझ्या फांद्या क्षारसमुद्रापलीकडे गेल्या होत्या आणि त्या याजेरापर्यंत पोहोचल्या होत्या; पण विनाशकाने तुझ्या उन्हाळी फळांवर व तुझ्या द्राक्षांवर हल्ला केला आहे.
מִבְּכִי יַעְזֵר אֶבְכֶּה־לָּךְ הַגֶּפֶן שִׂבְמָה נְטִישֹׁתַיִךְ עָבְרוּ יָם עַד יָם יַעְזֵר נָגָעוּ עַל־קֵיצֵךְ וְעַל־בְּצִירֵךְ שֹׁדֵד נָפָֽל׃
33 ३३ म्हणून मवाबाच्या फळबागेतून व देशातून उत्सव व हर्ष दूर केलेले आहेत. मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षरस नाहीसा केला आहे. ते हर्षाने ओरडून द्राक्षे तुडविणार नाहीत. कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही.
וְנֶאֶסְפָה שִׂמְחָה וָגִיל מִכַּרְמֶל וּמֵאֶרֶץ מוֹאָב וְיַיִן מִיקָבִים הִשְׁבַּתִּי לֹא־יִדְרֹךְ הֵידָד הֵידָד לֹא הֵידָֽד׃
34 ३४ “हेशबोनापासून एलालेपर्यंत, याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम व एगलाथ-शलिशीयापर्यंत त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे, कारण निम्रीमाचे पाणी सुद्धा आटले आहे.
מִזַּעֲקַת חֶשְׁבּוֹן עַד־אֶלְעָלֵה עַד־יַהַץ נָתְנוּ קוֹלָם מִצֹּעַר עַד־חֹרֹנַיִם עֶגְלַת שְׁלִֽשִׁיָּה כִּי גַּם־מֵי נִמְרִים לִמְשַׁמּוֹת יִהְיֽוּ׃
35 ३५ परमेश्वर असे म्हणतो, कारण जो कोणीही उच्चस्थानी अर्पण करतो आणि त्यांच्या देवाला धूप जाळतो त्यास मी मवाबातून नाहीसे करीन.”
וְהִשְׁבַּתִּי לְמוֹאָב נְאֻם־יְהֹוָה מַעֲלֶה בָמָה וּמַקְטִיר לֵאלֹהָֽיו׃
36 ३६ म्हणून माझे हृदय मवाबासाठी बासरीसारखे विलाप करीत आहे, माझे हृदय कीर हरेसाच्या लोकांसाठी बासरीसारखे विलाप करीत आहे. त्यांनी मिळवलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.
עַל־כֵּן לִבִּי לְמוֹאָב כַּחֲלִלִים יֶהֱמֶה וְלִבִּי אֶל־אַנְשֵׁי קִֽיר־חֶרֶשׂ כַּחֲלִילִים יֶהֱמֶה עַל־כֵּן יִתְרַת עָשָׂה אָבָֽדוּ׃
37 ३७ कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुंडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे.
כִּי כׇל־רֹאשׁ קׇרְחָה וְכׇל־זָקָן גְּרֻעָה עַל כׇּל־יָדַיִם גְּדֻדֹת וְעַל־מׇתְנַיִם שָֽׂק׃
38 ३८ मवाबामध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि चौकात, तेथे सर्वत्र शोक होत आहे. कारण नकोसा असलेल्या पात्राप्रमाणे मी मवाबाचा नाश केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
עַל כׇּל־גַּגּוֹת מוֹאָב וּבִרְחֹבֹתֶיהָ כֻּלֹּה מִסְפֵּד כִּי־שָׁבַרְתִּי אֶת־מוֹאָב כִּכְלִי אֵֽין־חֵפֶץ בּוֹ נְאֻם־יְהֹוָֽה׃
39 ३९ “तो कसा मोडला आहे! आपल्या विलापात कसे आकांत करत आहे! मवाबाने लज्जेने कशी पाठ फिरवली आहे. म्हणून मवाब आपल्या सभोवतालच्या सर्वांना उपहास आणि दहशतीचा विषय झाला आहे.”
אֵיךְ חַתָּה הֵילִילוּ אֵיךְ הִפְנָה־עֹרֶף מוֹאָב בּוֹשׁ וְהָיָה מוֹאָב לִשְׂחֹק וְלִמְחִתָּה לְכׇל־סְבִיבָֽיו׃
40 ४० कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, शत्रू गरुडाप्रमाणे उडत आहे. तो आपले पंख मवाबावर पसरील.
כִּי־כֹה אָמַר יְהֹוָה הִנֵּה כַנֶּשֶׁר יִדְאֶה וּפָרַשׂ כְּנָפָיו אֶל־מוֹאָֽב׃
41 ४१ करोयोथ काबीज झाले आहे आणि त्यांचे बालेकिल्ले जप्त झाले आहेत. कारण त्या दिवशी मवाबी सैनिकांचे हृदय, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.
נִלְכְּדָה הַקְּרִיּוֹת וְהַמְּצָדוֹת נִתְפָּשָׂה וְֽהָיָה לֵב גִּבּוֹרֵי מוֹאָב בַּיּוֹם הַהוּא כְּלֵב אִשָּׁה מְצֵרָֽה׃
42 ४२ म्हणून मवाबाचा नाश होऊन ते राष्ट्ररुप राहणार नाही, कारण ते परमेश्वराविरूद्ध उद्धट झाले.”
וְנִשְׁמַד מוֹאָב מֵעָם כִּי עַל־יְהֹוָה הִגְדִּֽיל׃
43 ४३ परमेश्वर असे म्हणतोः “मवाबात राहणाऱ्यांनो, दहशत व खाच आणि सापळा तुमच्यावर येत आहेत.
פַּחַד וָפַחַת וָפָח עָלֶיךָ יוֹשֵׁב מוֹאָב נְאֻם־יְהֹוָֽה׃
44 ४४ जो कोणी दहशतीने घाबरुन पळेल तो खाचेत पडेल, आणि जो कोणी खाचेतून वर येतो तो सापळ्यात सापडेल, कारण मी हे त्याच्याविरुध्द म्हणजे मवाबावर त्याचे शासन घेण्याचे वर्ष आणिन.” असे परमेश्वर म्हणतो.
(הניס) [הַנָּס] מִפְּנֵי הַפַּחַד יִפֹּל אֶל־הַפַּחַת וְהָֽעֹלֶה מִן־הַפַּחַת יִלָּכֵד בַּפָּח כִּֽי־אָבִיא אֵלֶיהָ אֶל־מוֹאָב שְׁנַת פְּקֻדָּתָם נְאֻם־יְהֹוָֽה׃
45 ४५ जे पळून गेले होते ते हेशबोनाच्या छायेखाली निर्बल असे उभे राहिले, कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघाली आहे. ती मवाबाचे कपाळ आणि गर्विष्ठ लोकांचे डोके खाऊन टाकील.
בְּצֵל חֶשְׁבּוֹן עָמְדוּ מִכֹּחַ נָסִים כִּי־אֵשׁ יָצָא מֵחֶשְׁבּוֹן וְלֶהָבָה מִבֵּין סִיחוֹן וַתֹּאכַל פְּאַת מוֹאָב וְקׇדְקֹד בְּנֵי שָׁאֽוֹן׃
46 ४६ हे मवाबा, तुला हाय हाय! कमोशाच्या लोकांचा नाश होत आहे, कारण तुझी मुले बंदिवान आणि तुझ्या मुली बंदिवासात नेल्या जात आहेत.
אוֹי־לְךָ מוֹאָב אָבַד עַם־כְּמוֹשׁ כִּֽי־לֻקְּחוּ בָנֶיךָ בַּשֶּׁבִי וּבְנֹתֶיךָ בַּשִּׁבְיָֽה׃
47 ४७ “मी पुढील दिवसात मवाबाचा बंदिवास उलटवीन” असे परमेश्वर म्हणतो. येथे मवाबाचा न्यायनिवाडा संपतो.
וְשַׁבְתִּי שְׁבוּת־מוֹאָב בְּאַחֲרִית הַיָּמִים נְאֻם־יְהֹוָה עַד־הֵנָּה מִשְׁפַּט מוֹאָֽב׃

< यिर्मया 48 >