< यिर्मया 46 >

1 परमेश्वराचे वचन राष्ट्रांविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे आले ते असे.
Leli yilizwi likaThixo elafika kuJeremiya umphrofethi mayelana lezizwe:
2 मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः
Mayelana leGibhithe: Leli yilizwi elimayelana lebutho likaFaro Nekho inkosi yaseGibhithe, elanqotshwayo eKharikhemishi emfuleni iYufrathe nguNebhukhadineza inkosi yaseBhabhiloni ngomnyaka wesine kaJehoyakhimi indodana kaJosiya inkosi yakoJuda:
3 लहान ढाली व मोठ्या ढाली तयार करा आणि लढावयास कूच करा
“Lungisani amahawu enu, amakhulu lamancane, liphume liye empini.
4 तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
Bophani amabhiza, liwagade! Manini ezindaweni zenu lilezingowane zenu! Lolani imikhonto yenu, ligqoke impahla zempi!
5 हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.
Kuyini engikubonayo? Bayesaba, bahlehlela emuva, amabutho abo ehlulwe. Abaleka ngesiqubu anganyemukuli, njalo kulokwesaba izindawo zonke,” kutsho uThixo.
6 चपळ दूर पळून जाऊ शकणार नाहीत आणि सैनिक निसटू शकणार नाहीत. ते अडखळतील आणि फरात नदीच्या उत्तरेस पडतील.
“Olejubane kasoze abaleke kumbe olamandla aphephe. Ngasenyakatho, emfuleni iYufrathe bayakhubeka bawe.
7 नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे
Ngubani lo ophakama njengeNayili, njengemifula elamanzi agubhazelayo na?
8 उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे. तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन.
IGibhithe liphakama njengeNayili, njengemifula elamanzi agubhazelayo. Lithi: ‘Ngizaphakama ngembese umhlaba; ngizachitha amadolobho labantu bawo.’
9 घोड्यांनो, वर जा. रथांनो, तुम्ही, क्रोधीत व्हा. सैनिकांना बाहेर जाऊ द्या, जे पारंगत ढालकरी माणसे कूश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकविणारे पारंगत लूदीम माणसे त्यांच्याबरोबर जा.
Hlaselani, lina mabhiza! Qhubekani ngentukuthelo, lina zinqola zempi! Yanini phambili, lina mabutho, madoda aseKhushi lawePhuthi, aphatha amahawu, madoda aseLudi agoba idandili.
10 १० कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.
Kodwa usuku lolo ngolweNkosi, uThixo uSomandla, usuku lokuphindisela, olokuphindisela ezitheni zakhe. Inkemba izakudla ize isuthe, ize icitshe ukoma kwayo ngegazi. Ngoba iNkosi, uThixo uSomandla uzanikela umhlatshelo elizweni lasenyakatho ngasemfuleni iYufrathe.
11 ११ “हे मिसराच्या कुमारी कन्ये, गिलादाला वर जा आणि औषध मिळव. तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस. तुझ्यासाठी काही इलाज नाही.
Yana eGiliyadi uyethatha umuthi wokwelapha, wena Ndodakazi egcweleyo yaseGibhithe. Kodwa imithi uyandisela ize; akukho kusila kuwe.
12 १२ राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”
Izizwe zizakuzwa ngehlazo lakho; ukukhala kwakho kuzagcwala umhlaba. Elinye ibutho lizakhubeka kwelinye; womabili azawela phansi ndawonye.”
13 १३ जेव्हा बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आला आणि मिसर देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले ते असे की,
Leli yilizwi uThixo alikhuluma kuJeremiya umphrofethi ngokuza kukaNebhukhadineza inkosi yaseBhabhiloni ukuba ahlasele iGibhithe:
14 १४ मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या. तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.
“Memezelani lokhu eGibhithe, likubike laseMigidoli; kumemezeleni njalo laseMemfisi laseThahiphanesi lithi: ‘Manini ezindaweni zenu lilunge, ngoba inkemba idla abakhelene lani.’
15 १५ तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.
Amabutho enu azabulawelwani na? Angeke ame, ngoba uThixo uzawalahlela phansi.
16 १६ जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत, उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ.
Azakhubeka kokuphela; azakuwa elekane. Azakuthi, ‘Vukani, kasibuyeleni emuva ebantwini bakithi lasemazweni akithi, kude kwenkemba yomncindezeli.’
17 १७ त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.
Khonale bazamemeza bathi, ‘UFaro inkosi yaseGibhithe ingumsindo omkhulu nje kuphela; uselahlekelwe lithuba lakhe.’
18 १८ ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.
Ngeqiniso elinjengokuthi ngikhona,” kutsho iNkosi, obizo layo nguThixo uSomandla, “kuzafika omunye onjengoThabhori phakathi kwezintaba, njengoKhameli ngasolwandle.
19 १९ अगे कन्ये, जी तू मिसरात राहते, ती तू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर. कारण नोफचा नाश होऊन व ते भयकारक होईल याकरिता तेथे कोणी राहणार नाही.
Lungisani impahla zekuthunjweni, lina abahlala eGibhithe, ngoba iMemfisi izadilizwa ibe lunxiwa olungahlali muntu.
20 २० मिसर खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडून नांगी असणारा किटक येत आहे. तो येत आहे.
IGibhithe ilithokazi elihle, kodwa isibawu siyeza silisongela sivela enyakatho.
21 २१ तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
Amabutho okuqatshwa aphakathi kwalo anjengamathole anonisiweyo. Lawo azaphenduka abaleke endawonye, kawayikuma, ngoba usuku lomonakalo luyeza phezu kwabo, isikhathi sabo sokujeziswa.
22 २२ मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.
IGibhithe izakhwaza njengenyoka ebalekayo lapho isitha sisondela ngobunengi baso; sizayihlasela ngamahloka okwabantu abagamula izihlahla.
23 २३ परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.
Sizagamula amahlathi ayo,” kutsho uThixo, “lanxa eminyene kanjani. Banengi kulentethe, ngeke babalwe.
24 २४ मिसराच्या कन्येला लज्जीत करण्यात येईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल.
Indodakazi yaseGibhithe izayangiswa, inikelwe ebantwini basenyakatho.”
25 २५ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, म्हणतो, “पाहा, मी नो येथल्या आमोनाला व फारोला, मिसराला आणि त्याच्या देवांना व त्याच्या राजांना म्हणजे फारोला आणि जे त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांना शिक्षा करीन.
UThixo uSomandla, uNkulunkulu ka-Israyeli uthi: “Sekuseduze ukuba ngijezise u-Amoni unkulunkulu waseThebesi, loFaro, leGibhithe kanye labonkulunkulu balo lamakhosi alo, lalabo abathembe uFaro.
26 २६ मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.
Ngizabanikela kulabo abafuna ukubabulala, kuNebhukhadineza inkosi yaseBhabhiloni lezikhulu zakhe. Kodwa muva, iGibhithe lizahlalwa ngabantu futhi njengasezinsukwini zakudala,” kutsho uThixo.
27 २७ परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही.
“Ungesabi, wena Jakhobe nceku yami; ungathuthumeli, wena Israyeli. Impela ngizakukhulula endaweni ekude, lenzalo yakho elizweni lokuthunjwa kwayo. UJakhobe uzakuba lokuthula futhi kanye lokuvikeleka, njalo kakho ozamthuthumelisa.
28 २८ परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”
Ungesabi wena Jakhobe nceku yami ngoba ngilawe,” kutsho uThixo. “Lanxa ngizachitha ngokupheleleyo izizwe zonke engakuhlakazela kuzo, wena angiyikukuchitha ngokupheleleyo. Ngizakujezisa kodwa ngokufaneleyo kuphela; angiyikukuyekela nje ungajeziswanga.”

< यिर्मया 46 >