< यिर्मया 46 >
1 १ परमेश्वराचे वचन राष्ट्रांविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे आले ते असे.
上主傳給耶肋米亞先知論及外邦的話。
2 २ मिसरासाठीः मिसराचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्कमीशात होते. योशीयाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने पराभव केला. त्याविषयीः
關於埃及:對於埃及王法郎乃苛,於猶大王約史的兒子約雅金第四年,在幼發拉的河附近的加克米士,被巴比倫王拿步高擊敗的軍隊:
3 ३ लहान ढाली व मोठ्या ढाली तयार करा आणि लढावयास कूच करा
你們應準備盾牌鎧甲,衝鋒上陣!
4 ४ तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
騎士,你們應裝備戰馬,快騎上,戴上盔,磨快槍,披甲出陣!
5 ५ हे मी काय पाहतो? ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकांचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत. असे परमेश्वर म्हणतो.
怎麼﹖我看見他們驚惶潰退,他們的勇士遭受襲擊,急速奔逃,不敢回顧,竟然恐怖四起﹖──上主的斷語。
6 ६ चपळ दूर पळून जाऊ शकणार नाहीत आणि सैनिक निसटू शकणार नाहीत. ते अडखळतील आणि फरात नदीच्या उत्तरेस पडतील.
敏捷的不能逃脫,英勇的不能自救,在靠近幼發拉的河的北岸,瓦解覆滅!
7 ७ नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे
那如尼羅,水波起伏如河流,湧上來的是誰﹖
8 ८ उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे. तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन.
埃及如尼羅,水波起伏如河流,湧上來說:「我湧上來淹沒大地,掃滅城市和城中的居民。
9 ९ घोड्यांनो, वर जा. रथांनो, तुम्ही, क्रोधीत व्हा. सैनिकांना बाहेर जाऊ द्या, जे पारंगत ढालकरी माणसे कूश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकविणारे पारंगत लूदीम माणसे त्यांच्याबरोबर जा.
戰馬上前,戰車急馳,戰士出陣,持盾的雇士人和普特人,張弓的路丁人!
10 १० कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.
這一天正是我主萬軍的上主,報復自己仇敵的復仇日,刀劍必要吞噬、飽嘗、痛飲他們的鮮血;在靠近幼發拉的河北岸,我主萬軍的上主必要執行一場大屠殺。
11 ११ “हे मिसराच्या कुमारी कन्ये, गिलादाला वर जा आणि औषध मिळव. तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस. तुझ्यासाठी काही इलाज नाही.
埃及的處女! 你儘管上基肋阿得去拾取香草,只是徒然增添藥材;你已無法治療!
12 १२ राष्ट्रांनी तुझी बदनामी ऐकली आहे. पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरूद्ध अडखळत आहेत. ते दोघेही एकत्र पडतील.”
萬民聞知了你的羞辱,大地充滿了你的哀哭;噫! 勇士衝向勇士,雙方同時倒仆。
13 १३ जेव्हा बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आला आणि मिसर देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले ते असे की,
上主論及巴比倫王拿步高前來攻擊埃及地,對耶肋米亞先知說的話:
14 १४ मिसरास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या. तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.
你們在埃及宣傳,在米革多耳傳報,在諾夫及塔黑培乃斯傳布說:你起來準備! 刀劍已在你四周撕殺。
15 १५ तुझा देव अपीस का दूर पळून गेला आहे? तुझा बैल-देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे.
怎麼,阿丕斯逃跑了,你的牛神也站立不住﹖原來上主已將牠推倒。
16 १६ जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत, उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ.
你的混合部隊已離心潰退,各向自己的同僚說:起來,回到我們的民族,我們的生身地去,遠避吞殺的刀劍!
17 १७ त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.
人應給埃及王法郎起個綽號,叫「時機過後的叫囂。」
18 १८ ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.
我永在──那稱謂萬軍上主的君王的斷語──有一位必要前來,勢如群山中的大博爾,又如海濱的加爾默耳。
19 १९ अगे कन्ये, जी तू मिसरात राहते, ती तू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर. कारण नोफचा नाश होऊन व ते भयकारक होईल याकरिता तेथे कोणी राहणार नाही.
寄居在埃及的女兒! 請你自備流徙的行裝,因為諾夫將要變為荒野,被火焚燒,再沒有人居住。
20 २० मिसर खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडून नांगी असणारा किटक येत आहे. तो येत आहे.
埃及是一頭美麗的小母牛,但是有一隻牛蠅從北方向她撲來。
21 २१ तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
她的傭兵在她內雖像肥胖的牛犢,也一同轉身逃遁,不能抵抗,因為他們遭殃的日子,受罰的時期,已來到他們身上。
22 २२ मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.
她發聲嘶嘶好像蛇行,因為敵人正在率軍前進,好像伐木的樵夫,帶著斧鉞向她衝來:
23 २३ परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.
砍伐她的森林──上主的斷語──雖然它稠密得不可侵入,因為他們多於蝗蟲,不可勝數。
24 २४ मिसराच्या कन्येला लज्जीत करण्यात येईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल.
埃及女兒,已被交在北方民族手裏,遭受污辱。
25 २५ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, म्हणतो, “पाहा, मी नो येथल्या आमोनाला व फारोला, मिसराला आणि त्याच्या देवांना व त्याच्या राजांना म्हणजे फारोला आणि जे त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांना शिक्षा करीन.
萬軍的上主,以色列的天主說:「看,我必懲罰諾地的阿孟,法郎和埃及,埃及的神祇和君王,以及信賴法郎的人,
26 २६ मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.
將他們交在圖謀他們性命的巴比倫王拿步高和他臣僕的手中;但是以後,埃及仍如昔日有人居住──上主的斷語。
27 २७ परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही.
至於你,我的僕人雅各伯,你不用害怕;以色列,你不必驚慌;因為,看,我必從遠方救出你來;從充軍之地,救出你的後裔;雅各伯必將歸來,居享安寧,無所恐懼。
28 २८ परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”
雅各伯,我的僕人! 你不用害怕──上主的斷語──有我與你同在;誠然,對我使你流徙所至的各民族,我要加以毀滅;但是你,我必不毀滅,只依照正義懲罰你,不讓你全然免罰。