< यिर्मया 44 >

1 जे सर्व यहूदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपन्हेस, मेमफिस व पथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले ते असे होते.
הדבר אשר היה אל ירמיהו אל כל היהודים הישבים בארץ מצרים--הישבים במגדל ובתחפנחס ובנף ובארץ פתרוס לאמר
2 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, यरूशलेम व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट मी आणली, ते तुम्ही पाहिली आहेत. पाहा, आता ती नगरे उजाड झाली आहेत. तेथे राहण्यास कोणीही जिवंत नाही.
כה אמר יהוה צבאות אלהי ישראל אתם ראיתם את כל הרעה אשר הבאתי על ירושלם ועל כל ערי יהודה והנם חרבה היום הזה ואין בהם יושב
3 कारण हे त्यांच्या स्वतःचे नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहित नाहीत अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुःखावले.
מפני רעתם אשר עשו להכעסני ללכת לקטר לעבד לאלהים אחרים--אשר לא ידעום המה אתם ואבתיכם
4 मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.
ואשלח אליכם את כל עבדי הנביאים השכים ושלח לאמר אל נא תעשו את דבר התעבה הזאת--אשר שנאתי
5 पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.
ולא שמעו ולא הטו את אזנם לשוב מרעתם--לבלתי קטר לאלהים אחרים
6 म्हणून माझा क्रोध व संताप ओतला गेला आणि यहूदाच्या नगरांत व यरूशलेमेच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड व उजाड झाली आहेत.
ותתך חמתי ואפי ותבער בערי יהודה ובחצות ירושלם ותהיינה לחרבה לשממה כיום הזה
7 म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत: विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.
ועתה כה אמר יהוה אלהי צבאות אלהי ישראל למה אתם עשים רעה גדולה אל נפשתכם להכרית לכם איש ואשה עולל ויונק מתוך יהודה--לבלתי הותיר לכם שארית
8 कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी.
להכעסני במעשי ידיכם לקטר לאלהים אחרים בארץ מצרים אשר אתם באים לגור שם--למען הכרית לכם ולמען היותכם לקללה ולחרפה בכל גוי הארץ
9 तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात व यरूशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?
השכחתם את רעות אבותיכם ואת רעות מלכי יהודה ואת רעות נשיו ואת רעתכם ואת רעת נשיכם--אשר עשו בארץ יהודה ובחצות ירושלם
10 १० ते या दिवसापर्यंत, अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले, त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाहीत.”
לא דכאו עד היום הזה ולא יראו ולא הלכו בתורתי ובחקתי אשר נתתי לפניכם ולפני אבותיכם
11 ११ “यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, मी तुमचे अनिष्ट करण्यासाठी आणि सर्व यहूदाचा नाश करण्यासाठी तुमच्या विरोधात होईन.
לכן כה אמר יהוה צבאות אלהי ישראל הנני שם פני בכם לרעה--ולהכרית את כל יהודה
12 १२ कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहूदाच्या अवशिष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की, ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तलवारीने आणि दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोरापर्यंत सर्व तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टींचे विषय होतील.
ולקחתי את שארית יהודה אשר שמו פניהם לבוא ארץ מצרים לגור שם ותמו כל בארץ מצרים יפלו בחרב ברעב יתמו מקטן ועד גדול בחרב וברעב ימתו והיו לאלה לשמה ולקללה ולחרפה
13 १३ जशी मी यरूशलेमेला शिक्षा केली, त्याप्रमाणे मिसर देशात राहणाऱ्या लोकांस तलवार, दुष्काळ व मरीने शिक्षा करीन.
ופקדתי על היושבים בארץ מצרים כאשר פקדתי על ירושלם--בחרב ברעב ובדבר
14 १४ म्हणून यहूदाचे जे कोणी उरलेले, फरारी, वाचलेले मिसर देशात उपरी म्हणून राहायला गेले आहेत, त्यातले जे कोणी ज्यांची यहूदा देशात परत जाण्याची आणि तेथे राहण्याची इच्छा आहे. त्यातील कोणीही परत जाणार नाही, कारण जे कोणी थोडके निसटून जातील त्यांच्यावाचून दुसरे कोणी परत जाणार नाहीत.”
ולא יהיה פליט ושריד לשארית יהודה הבאים לגור שם בארץ מצרים ולשוב ארץ יהודה אשר המה מנשאים את נפשם לשוב לשבת שם--כי לא ישובו כי אם פלטים
15 १५ नंतर आपल्या स्त्रिया दुसऱ्या देवास धूप जाळतात असे ज्या सर्व पुरुषांस माहित होते ते आणि ज्या सर्व स्त्रिया मोठ्या मंडळीत होत्या आणि मिसर देशात पथ्रोसात जे लोक राहत होते, अशा सर्वांनी यिर्मयाला उत्तर दिले.
ויענו את ירמיהו כל האנשים הידעים כי מקטרות נשיהם לאלהים אחרים וכל הנשים העמדות קהל גדול וכל העם הישבים בארץ מצרים בפתרוס לאמר
16 १६ ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही.
הדבר אשר דברת אלינו בשם יהוה--איננו שמעים אליך
17 १७ पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.
כי עשה נעשה את כל הדבר אשר יצא מפינו לקטר למלכת השמים והסיך לה נסכים כאשר עשינו אנחנו ואבתינו מלכינו ושרינו בערי יהודה ובחצות ירושלם ונשבע לחם ונהיה טובים ורעה לא ראינו
18 १८ जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतणे यापासून परावृत्त झालो तेव्हापासून आम्ही सर्व दारिद्र्याने दुःखी आहोत व तलवारीने व दुष्काळाने मरत आहोत.”
ומן אז חדלנו לקטר למלכת השמים והסך לה נסכים--חסרנו כל ובחרב וברעב תמנו
19 १९ मग स्त्रिया म्हणाल्या, “जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळला व तिला पेयार्पणे ओतली, या गोष्टी आम्ही आपल्या पतीच्या संमतीशिवाय केल्या काय?”
וכי אנחנו מקטרים למלכת השמים ולהסך לה נסכים המבלעדי אנשינו עשינו לה כונים להעצבה והסך לה נסכים
20 २० मग यिर्मया सर्व लोकांस, स्त्रिया व पुरुषांस आणि ज्या सर्व लोकांनी त्यास उत्तर दिले, त्याने घोषणा केली व म्हणाला,
ויאמר ירמיהו אל כל העם על הגברים ועל הנשים ועל כל העם הענים אתו דבר לאמר
21 २१ “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यात, तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे आणि अधिकारी व देशातील लोक जो धूप जाळीत होते, त्याची परमेश्वरास आठवण नव्हती काय? कारण परमेश्वराच्या मनात हे आले. ते त्याच्या विचारात आले.
הלוא את הקטר אשר קטרתם בערי יהודה ובחצות ירושלם אתם ואבותיכם מלכיכם ושריכם ועם הארץ אתם זכר יהוה ותעלה על לבו
22 २२ मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्करणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापीत केला, म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहिवासी नाही.
ולא יוכל יהוה עוד לשאת מפני רע מעלליכם מפני התועבת אשר עשיתם ותהי ארצכם לחרבה ולשמה ולקללה מאין יושב--כהיום הזה
23 २३ तुम्ही धूप जाळला आणि परमेश्वराविरूद्ध पाप केले व तुम्ही त्याची वाणी, त्याचे नियमशास्त्र त्याचे विधी किंवा त्याचे कराराचे आदेश, ऐकले नाहीत, हे अनिष्ट तुमच्याविरुध्द आजपर्यंत घडत आहेत.”
מפני אשר קטרתם ואשר חטאתם ליהוה ולא שמעתם בקול יהוה ובתרתו ובחקתיו ובעדותיו לא הלכתם על כן קראת אתכם הרעה הזאת--כיום הזה
24 २४ मग यिर्मया त्या सर्व लोकांस आणि स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही मिसर देशामध्ये आहात ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.
ויאמר ירמיהו אל כל העם ואל כל הנשים שמעו דבר יהוה כל יהודה אשר בארץ מצרים
25 २५ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.”
כה אמר יהוה צבאות אלהי ישראל לאמר אתם ונשיכם ותדברנה בפיכם ובידיכם מלאתם לאמר עשה נעשה את נדרינו אשר נדרנו לקטר למלכת השמים ולהסך לה נסכים הקים תקימנה את נדריכם ועשה תעשינה את נדריכם
26 २६ यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.
לכן שמעו דבר יהוה כל יהודה הישבים בארץ מצרים הנני נשבעתי בשמי הגדול אמר יהוה אם יהיה עוד שמי נקרא בפי כל איש יהודה אמר חי אדני יהוה בכל ארץ מצרים
27 २७ पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.
הנני שקד עליהם לרעה ולא לטובה ותמו כל איש יהודה אשר בארץ מצרים בחרב וברעב--עד כלותם
28 २८ नंतर जे काही थोडके लोक तलवारीपासून सुटतील ते मिसर देशामधून यहूदा देशात परत येतील. मग सर्व अवशिष्ट यहूदी मिसर देशात राहण्यास गेलेल्यांना कोणाचे शब्द खरे ठरले आहेत माझे किंवा त्यांचे ते त्यांना समजेल.
ופליטי חרב ישבון מן ארץ מצרים ארץ יהודה--מתי מספר וידעו כל שארית יהודה הבאים לארץ מצרים לגור שם דבר מי יקום ממני ומהם
29 २९ परमेश्वराचे हे सांगणे आहे की, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय.
וזאת לכם האות נאם יהוה כי פקד אני עליכם במקום הזה--למען תדעו כי קום יקומו דברי עליכם לרעה
30 ३० परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जसे मी यहूदाचा राजा सिद्कीयाला त्याचा शत्रू बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले त्याप्रमाणे मी मिसराचा राजा फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या हाती व त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्यांच्या हाती देईन.
כה אמר יהוה הנני נתן את פרעה חפרע מלך מצרים ביד איביו וביד מבקשי נפשו כאשר נתתי את צדקיהו מלך יהודה ביד נבוכדראצר מלך בבל איבו--ומבקש נפשו

< यिर्मया 44 >