< यिर्मया 44 >
1 १ जे सर्व यहूदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपन्हेस, मेमफिस व पथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले ते असे होते.
The word that was maad to Jeremye, and to alle the Jewis, that dwelliden in the lond of Egipt, dwellinge in Magdalo, and in Taphnys, and in Memphis, and in the lond of Phatures,
2 २ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, यरूशलेम व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट मी आणली, ते तुम्ही पाहिली आहेत. पाहा, आता ती नगरे उजाड झाली आहेत. तेथे राहण्यास कोणीही जिवंत नाही.
and seide, The Lord of oostis, God of Israel, seith these thingis, Ye sien al this yuel, which Y brouyte on Jerusalem, and on alle the citees of Juda; and lo! tho ben forsakun to dai, and no dwellere is in tho;
3 ३ कारण हे त्यांच्या स्वतःचे नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहित नाहीत अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुःखावले.
for the malice which thei diden, to terre me to wrathfulnesse, and that thei yeden, and maden sacrifice, and worschipiden alien goddis, whiche thei knewen not, bothe ye, and thei, and youre fadris.
4 ४ मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.
And Y sente to you alle my seruauntis profetis; and Y roos bi nyyte, and sente, and seide, Nyle ye do the word of sich abhomynacioun.
5 ५ पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.
And thei herden not, nether bowiden doun her eere, that thei schulen be conuertid fro her yuels, and schulden not make sacrifice to alien goddis.
6 ६ म्हणून माझा क्रोध व संताप ओतला गेला आणि यहूदाच्या नगरांत व यरूशलेमेच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड व उजाड झाली आहेत.
And myn indignacioun and my strong veniaunce is wellid togidere, and is kindlid in the citees of Juda, and in the stretis of Jerusalem; and tho ben turned in to wildirnesse, and wastnesse, bi this dai.
7 ७ म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत: विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.
And now the Lord of oostis, God of Israel, seith these thingis, Whi doon ye this greet yuel ayens youre soulis, that a man of you perische and a womman a litil child and soukynge perische, fro the myddis of Juda, nether ony residue thing be left in you,
8 ८ कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी.
that terre me to wraththe bi the werkis of youre hondis, in makynge sacrifice to alien goddis in the lond of Egipt, in to which ye entriden, that ye dwelle there, and that ye perische, and be in to cursyng, and in to schenschipe to alle the folkis of erthe?
9 ९ तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा व त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात व यरूशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?
Whether ye han foryete the yuels of youre fadris, and the yuels of the kingis of Juda, and the yuels of her wiues, and youre yuels, and the yuels of youre wyues, whiche thei diden in the lond of Juda, and in the cuntreis of Jerusalem?
10 १० ते या दिवसापर्यंत, अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले, त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाहीत.”
Thei ben not clensid `til to this dai, and thei dredden not, and thei yeden not in the lawe of the Lord, and in myn heestis, whiche Y yaf bifore you, and bifore youre fadris.
11 ११ “यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, मी तुमचे अनिष्ट करण्यासाठी आणि सर्व यहूदाचा नाश करण्यासाठी तुमच्या विरोधात होईन.
Therfor the Lord of oostis, God of Israel, seith these thingis, Lo! Y schal sette my face in you in to yuel,
12 १२ कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहूदाच्या अवशिष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की, ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तलवारीने आणि दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोरापर्यंत सर्व तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टींचे विषय होतील.
and Y schal leese al Juda, and Y schal take the remenauntis of Juda, that settiden her faces, to go in to the lond of Egipt, and to dwelle there; and alle schulen be waastid in the lond of Egipt, thei schulen falle doun bi swerd, and schulen be wastid in hungur, fro the leeste `til to the mooste, thei schulen die bi swerd and hungur, and schulen be in to swering, and in to myracle, and in to cursyng, and in to schenschipe.
13 १३ जशी मी यरूशलेमेला शिक्षा केली, त्याप्रमाणे मिसर देशात राहणाऱ्या लोकांस तलवार, दुष्काळ व मरीने शिक्षा करीन.
And Y schal visite on the dwelleris of Egipt, as Y visitide on Jerusalem, in swerd, and in hungur, and in pestilence.
14 १४ म्हणून यहूदाचे जे कोणी उरलेले, फरारी, वाचलेले मिसर देशात उपरी म्हणून राहायला गेले आहेत, त्यातले जे कोणी ज्यांची यहूदा देशात परत जाण्याची आणि तेथे राहण्याची इच्छा आहे. त्यातील कोणीही परत जाणार नाही, कारण जे कोणी थोडके निसटून जातील त्यांच्यावाचून दुसरे कोणी परत जाणार नाहीत.”
And noon schal be, that schal ascape, and be residue of the remenauntis of Jewis, that goen to be pilgrimys in the lond of Egipt, and to turne ayen to the lond of Juda, to which thei reisen her soulis, that thei turne ayen, and dwelle there; thei schulen not turne ayen thidir, no but thei that fledden.
15 १५ नंतर आपल्या स्त्रिया दुसऱ्या देवास धूप जाळतात असे ज्या सर्व पुरुषांस माहित होते ते आणि ज्या सर्व स्त्रिया मोठ्या मंडळीत होत्या आणि मिसर देशात पथ्रोसात जे लोक राहत होते, अशा सर्वांनी यिर्मयाला उत्तर दिले.
Forsothe alle men answeriden to Jeremye, and wisten, that her wyues maden sacrifice to alien goddis, and alle wymmen, of whiche a greet multitude stood, and alle the puple of dwelleris in the lond of Egipt, in Fatures, and seiden,
16 १६ ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही.
We schulen not here of thee the word which thou spekist to vs in the name of oure Lord God,
17 १७ पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.
but we doynge schulen do ech word that schal go out of oure mouth, that we make sacrifice to the queen of heuene, and that we offre to it moist sacrifices, as we diden, and oure fadris, oure kingis, and oure princes, in the citees of Juda, and in the stretis of Jerusalem; and we weren fillid with looues, and it was wel to vs, and we sien noon yuel.
18 १८ जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतणे यापासून परावृत्त झालो तेव्हापासून आम्ही सर्व दारिद्र्याने दुःखी आहोत व तलवारीने व दुष्काळाने मरत आहोत.”
But fro that tyme, in which we ceessiden to make sacrifice to the queen of heuene, and to offre to it moist sacrifices, we hadden nede to alle thingis, and we weren wastid bi swerd and hungur.
19 १९ मग स्त्रिया म्हणाल्या, “जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळला व तिला पेयार्पणे ओतली, या गोष्टी आम्ही आपल्या पतीच्या संमतीशिवाय केल्या काय?”
That if we maken sacrifice to the queen of heuene, and offren to it moist sacrifices, whether withouten oure hosebondis we maden to it cakis, to worschipe it, and looues to be offrid?
20 २० मग यिर्मया सर्व लोकांस, स्त्रिया व पुरुषांस आणि ज्या सर्व लोकांनी त्यास उत्तर दिले, त्याने घोषणा केली व म्हणाला,
And Jeremye seide to al the puple, ayens the men, and ayens the wymmen, and ayens al the puple, that answeriden to hym the word, and he seide,
21 २१ “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यात, तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे आणि अधिकारी व देशातील लोक जो धूप जाळीत होते, त्याची परमेश्वरास आठवण नव्हती काय? कारण परमेश्वराच्या मनात हे आले. ते त्याच्या विचारात आले.
Whether not the sacrifice which ye sacrifisiden in the citees of Juda, and in the stretis of Jerusalem, ye, and youre fadris, youre kyngis, and youre princes, and the puple of the lond, terriden God to veniaunce? The Lord hadde mynde on these thingis, and it stiede on his herte;
22 २२ मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्करणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापीत केला, म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहिवासी नाही.
and the Lord myyte no more bere, for the malice of youre studies, and for abhomynaciouns whiche ye diden. And youre lond is maad in to desolacioun, and in to wondryng, and in to curs, for no dwellere is, as this dai is.
23 २३ तुम्ही धूप जाळला आणि परमेश्वराविरूद्ध पाप केले व तुम्ही त्याची वाणी, त्याचे नियमशास्त्र त्याचे विधी किंवा त्याचे कराराचे आदेश, ऐकले नाहीत, हे अनिष्ट तुमच्याविरुध्द आजपर्यंत घडत आहेत.”
Therfor for ye maden sacrifice to idols, and synneden to the Lord, and herden not the vois of the Lord, and yeden not in the lawe, and in the comandementis, and in the witnessis of hym, therfor these yuels bifellen to you, as this dai is.
24 २४ मग यिर्मया त्या सर्व लोकांस आणि स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही मिसर देशामध्ये आहात ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.
Forsothe Jeremye seide to al the puple, and to alle the wymmen, Al Juda, that ben in the lond of Egipt, here ye the word of the Lord.
25 २५ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.”
The Lord of oostis, God of Israel, seith these thingis, and spekith, Ye and youre wyues spaken with youre mouth, and filliden with youre hondis, and seiden, Make we oure vowis whiche we vowiden, that we make sacrifice to the queen of heuene, and offre to it moist sacrifices; ye filliden youre vowis, and diden tho in werk.
26 २६ यास्तव जे तुम्ही यहूदी देशातले मिसर देशात राहता ते सर्व तुम्ही परमेश्वराची वचने ऐका; पाहा, मी आपल्या थोर नावाची शपथ वाहिली आहे की, सर्व मिसर देशामध्ये राहणाऱ्या यहूदा देशातल्या कोणत्याही मनुष्याच्या मुखाने परमेश्वर जिवंत आहे असे म्हणून माझे नाव पुन्हा घेण्यात येणार नाही.
Therfor, al Juda, that dwellen in the lond of Egipt, here ye the word of the Lord; Lo! Y swoor in my greet name, seith the Lord, that my name schal no more be clepid bi the mouth of ech man Jew, seiynge, The Lord God lyueth, in al the lond of Egipt.
27 २७ पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.
Lo! Y schal wake on hem in to yuel, and not in to good; and alle the men of Juda, that ben in the lond of Egipt, schulen be waastid, bi swerd and hungur, til thei be wastid outerli.
28 २८ नंतर जे काही थोडके लोक तलवारीपासून सुटतील ते मिसर देशामधून यहूदा देशात परत येतील. मग सर्व अवशिष्ट यहूदी मिसर देशात राहण्यास गेलेल्यांना कोणाचे शब्द खरे ठरले आहेत माझे किंवा त्यांचे ते त्यांना समजेल.
And a fewe men that fledden the swerd, schulen turne ayen fro the lond of Egipt in to the lond of Juda; and alle the remenauntis of Juda, of hem that entren in to the lond of Egipt, to dwelle there, schulen wite, whos word schal be fillid, myn ether hern.
29 २९ परमेश्वराचे हे सांगणे आहे की, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय.
And this schal be a signe to you, seith the Lord, that Y schal visite on you in this place, that ye wite, that verili my wordis schulen be fillid ayens you in to yuel.
30 ३० परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जसे मी यहूदाचा राजा सिद्कीयाला त्याचा शत्रू बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले त्याप्रमाणे मी मिसराचा राजा फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या हाती व त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्यांच्या हाती देईन.
The Lord seith these thingis, Lo! Y schal bitake Farao, the kyng of Egipt, in to the hond of hise enemyes, and in to the hond of hem that seken his lijf, as Y bitook Sedechie, the kyng of Juda, in to the hond of Nabugodonosor, kyng of Babiloyne, his enemye, and sekynge his lijf.