< यिर्मया 42 >

1 नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले.
فَتَقَدَّمَ كُلُّ رُؤَسَاءِ ٱلْجُيُوشِ وَيُوحَانَانُ بْنُ قَارِيحَ، وَيَزَنْيَا بْنُ هُوشَعْيَا، وَكُلُّ ٱلشَّعْبِ مِنَ ٱلصَّغِيرِ إِلَى ٱلْكَبِيرِ،١
2 ते त्यास म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर.
وَقَالُوا لِإِرْمِيَا ٱلنَّبِيِّ: «لَيْتَ تَضَرُّعَنَا يَقَعُ أَمَامَكَ، فَتُصَلِّيَ لِأَجْلِنَا إِلَى ٱلرَّبِّ إِلَهِكَ لِأَجْلِ كُلِّ هَذِهِ ٱلْبَقِيَّةِ. لِأَنَّنَا قَدْ بَقِينَا قَلِيلِينَ مِنْ كَثِيرِينَ كَمَا تَرَانَا عَيْنَاكَ.٢
3 आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार.”
فَيُخْبِرُنَا ٱلرَّبُّ إِلَهُكَ عَنِ ٱلطَّرِيقِ ٱلَّذِي نَسِيرُ فِيهِ، وَٱلْأَمْرِ ٱلَّذِي نَفْعَلُهُ».٣
4 मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हास सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”
فَقَالَ لَهُمْ إِرْمِيَا ٱلنَّبِيُّ: «قَدْ سَمِعْتُ. هَأَنَذَا أُصَلِّي إِلَى ٱلرَّبِّ إِلَهِكُمْ كَقَوْلِكُمْ، وَيَكُونُ أَنَّ كُلَّ ٱلْكَلَامِ ٱلَّذِي يُجِيبُكُمُ ٱلرَّبُّ أُخْبِرُكُمْ بِهِ. لَا أَمْنَعُ عَنْكُمْ شَيْئًا».٤
5 मग ते यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर परमेश्वर तुझा देव आमच्याविरूद्ध खरा व प्रामाणिक साक्षीदार होवो.
فَقَالُوا هُمْ لِإِرْمِيَا: «لِيَكُنِ ٱلرَّبُّ بَيْنَنَا شَاهِدًا صَادِقًا وَأَمِينًا إِنَّنَا نَفْعَلُ حَسَبَ كُلِّ أَمْرٍ يُرْسِلُكَ بِهِ ٱلرَّبُّ إِلَهُكَ إِلَيْنَا،٥
6 ते चांगले असो किंवा जर ते वाईट असले तरी आम्ही परमेश्वर आमचा देव ज्याच्याकडे आम्ही तुला पाठवत आहो त्याची वाणी आम्ही ऐकू. अशासाठी की, जेव्हा आम्ही परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकतो तेव्हा आमच्याबरोबर चांगले व्हावे.”
إِنْ خَيْرًا وَإِنْ شَرًّا. فَإِنَّنَا نَسْمَعُ لِصَوْتِ ٱلرَّبِّ إِلَهِكَ ٱلَّذِي نَحْنُ مُرْسِلُوكَ إِلَيْهِ لِيُحْسَنَ إِلَيْنَا إِذَا سَمِعْنَا لِصَوْتِ ٱلرَّبِّ إِلَهِنَا».٦
7 मग दहा दिवसानंतर असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.
وَكَانَ بَعْدَ عَشَرَةِ أَيَّامٍ أَنَّ كَلِمَةَ ٱلرَّبِّ صَارَتْ إِلَى إِرْمِيَا.٧
8 म्हणून यिर्मयाने कारेहाचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांस बोलावले.
فَدَعَا يُوحَانَانَ بْنَ قَارِيحَ وَكُلَّ رُؤَسَاءِ ٱلْجُيُوشِ ٱلَّذِينَ مَعَهُ، وَكُلَّ ٱلشَّعْبِ مِنَ ٱلصَّغِيرِ إِلَى ٱلْكَبِيرِ،٨
9 आणि तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलाचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो,
وَقَالَ لَهُمْ: «هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ إِلَهُ إِسْرَائِيلَ ٱلَّذِي أَرْسَلْتُمُونِي إِلَيْهِ لِكَيْ أُلْقِيَ تَضَرُّعَكُمْ أَمَامَهُ:٩
10 १० जर तुम्ही परत गेला नाही आणि या देशात राहिला तर मी तुम्हास बांधीन आणि तुम्हास खाली पाडणार नाही; मी तुम्हास लावीन, उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते.
إِنْ كُنْتُمْ تَسْكُنُونَ فِي هَذِهِ ٱلْأَرْضِ، فَإِنِّي أَبْنِيكُمْ وَلَا أَنْقُضُكُمْ، وَأَغْرِسُكُمْ وَلَا أَقْتَلِعُكُمْ. لِأَنِّي نَدِمْتُ عَنِ ٱلشَّرِّ ٱلَّذِي صَنَعْتُهُ بِكُمْ.١٠
11 ११ ज्या बाबेलाच्या राजाला तुम्ही भीत आहात, त्यास भिऊ नका. हे परमेश्वराचे निवेदन आहे. कारण तुमचे रक्षण करणास आणि त्याच्या हातातून तुमची सुटका करण्यास, मी तुमच्याबरोबर आहे.
لَا تَخَافُوا مَلِكَ بَابِلَ ٱلَّذِي أَنْتُمْ خَائِفُوهُ. لَا تَخَافُوهُ، يَقُولُ ٱلرَّبُّ، لِأَنِّي أَنَا مَعَكُمْ لِأُخَلِّصَكُمْ وَأُنْقِذَكُمْ مِنْ يَدِهِ.١١
12 १२ कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हास तुमच्या देशात परत आणील.
وَأُعْطِيَكُمْ نِعْمَةً، فَيَرْحَمُكُمْ وَيَرُدُّكُمْ إِلَى أَرْضِكُمْ.١٢
13 १३ पण कदाचित् तुम्ही म्हणाल, आम्ही या देशात राहणार नाही. जर परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकणार नाही.
«وَإِنْ قُلْتُمْ: لَا نَسْكُنُ فِي هَذِهِ ٱلْأَرْضِ. وَلَمْ تَسْمَعُوا لِصَوْتِ ٱلرَّبِّ إِلَهِكُمْ،١٣
14 १४ तुम्ही कदाचित् म्हणाल, नाही, आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हास कोणतेही युध्द दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही. आम्ही तेथे राहू.
قَائِلِينَ: لَا بَلْ إِلَى أَرْضِ مِصْرَ نَذْهَبُ، حَيْثُ لَا نَرَى حَرْبًا، وَلَا نَسْمَعُ صَوْتَ بُوقٍ، وَلَا نَجُوعُ لِلْخُبْزِ، وَهُنَاكَ نَسْكُنُ.١٤
15 १५ तर आता यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तुम्ही खरोखर मिसर देशामध्ये जाऊन आणि तेथे राहण्याचे निश्चित करता,
فَٱلْآنَ لِذَلِكَ ٱسْمَعُوا كَلِمَةَ ٱلرَّبِّ يَابَقِيَّةَ يَهُوذَا، هَكَذَا قَالَ رَبُّ ٱلْجُنُودِ إِلَهُ إِسْرَائِيلَ: إِنْ كُنْتُمْ تَجْعَلُونَ وُجُوهَكُمْ لِلدُّخُولِ إِلَى مِصْرَ، وَتَذْهَبُونَ لِتَتَغَرَّبُوا هُنَاكَ،١٥
16 १६ तर ज्या तलवारीची तुम्हास भीती वाटते, ती मिसर देशात तुम्हास गाठेल. ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करीता, तो मिसरात तुमचा पाठलाग करील. आणि तुम्ही तेथे मराल.
يَحْدُثُ أَنَّ ٱلسَّيْفَ ٱلَّذِي أَنْتُمْ خَائِفُونَ مِنْهُ يُدْرِكُكُمْ هُنَاكَ فِي أَرْضِ مِصْرَ، وَٱلْجُوعَ ٱلَّذِي أَنْتُمْ خَائِفُونَ مِنْهُ يَلْحَقُكُمْ هُنَاكَ فِي مِصْرَ، فَتَمُوتُونَ هُنَاكَ.١٦
17 १७ म्हणून असे घडेल की, जी सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चित करतील, ते तेथे तलवार, दुष्काळ, किंवा मरीने मरतील. तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही, मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही.
وَيَكُونُ أَنَّ كُلَّ ٱلرِّجَالِ ٱلَّذِينَ جَعَلُوا وُجُوهَهُمْ لِلدُّخُولِ إِلَى مِصْرَ لِيَتَغَرَّبُوا هُنَاكَ، يَمُوتُونَ بِٱلسَّيْفِ وَٱلْجُوعِ وَٱلْوَبَإِ، وَلَا يَكُونُ مِنْهُمْ بَاقٍ وَلَا نَاجٍ مِنَ ٱلشَّرِّ ٱلَّذِي أَجْلِبُهُ أَنَا عَلَيْهِمْ.١٧
18 १८ कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.
لِأَنَّهُ هَكَذَا قَالَ رَبُّ ٱلْجُنُودِ إِلَهُ إِسْرَائِيلَ: كَمَا ٱنْسَكَبَ غَضَبِي وَغَيْظِي عَلَى سُكَّانِ أُورُشَلِيمَ، هَكَذَا يَنْسَكِبُ غَيْظِي عَلَيْكُمْ عِنْدَ دُخُولِكُمْ إِلَى مِصْرَ، فَتَصِيرُونَ حَلَفًا وَدَهَشًا وَلَعْنَةً وَعَارًا، وَلَا تَرَوْنَ بَعْدُ هَذَا ٱلْمَوْضِعَ».١٨
19 १९ यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वर तुम्हाविषयी बोलला आहे, तुम्ही मिसरात जाऊ नका. तुम्ही खरोखर जाणून घ्या आज मी तुम्हाविरुध्द साक्ष दिली आहे.
«قَدْ تَكَلَّمَ ٱلرَّبُّ عَلَيْكُمْ يَا بَقِيَّةَ يَهُوذَا: لَا تَدْخُلُوا مِصْرَ. ٱعْلَمُوا عِلْمًا أَنِّي قَدْ أَنْذَرْتُكُمُ ٱلْيَوْمَ.١٩
20 २० कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला.
لِأَنَّكُمْ قَدْ خَدَعْتُمْ أَنْفُسَكُمْ إِذْ أَرْسَلْتُمُونِي إِلَى ٱلرَّبِّ إِلَهِكُمْ قَائِلِينَ: صَلِّ لِأَجْلِنَا إِلَى ٱلرَّبِّ إِلَهِنَا، وَحَسَبَ كُلِّ مَا يَقُولُهُ ٱلرَّبُّ إِلَهُنَا هَكَذَا أَخْبِرْنَا فَنَفْعَلَ.٢٠
21 २१ कारण आज मी तुम्हास ते सांगितले आहे, पण त्याने जे काही माझ्याकडून सांगण्यासाठी पाठवले किंवा त्या कशातही तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची वाणी ऐकली नाही
فَقَدْ أَخْبَرْتُكُمُ ٱلْيَوْمَ فَلَمْ تَسْمَعُوا لِصَوْتِ ٱلرَّبِّ إِلَهِكُمْ، وَلَا لِشَيْءٍ مِمَّا أَرْسَلَنِي بِهِ إِلَيْكُمْ.٢١
22 २२ म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छिता त्यामध्ये तुम्ही तलवार, दुष्काळ आणि मरीने मराल.”
فَٱلْآنَ ٱعْلَمُوا عِلْمًا أَنَّكُمْ تَمُوتُونَ بِٱلسَّيْفِ وَٱلْجُوعِ وَٱلْوَبَإِ فِي ٱلْمَوْضِعِ ٱلَّذِي ٱبْتَغَيْتُمْ أَنْ تَدْخُلُوهُ لِتَتَغَرَّبُوا فِيهِ».٢٢

< यिर्मया 42 >