< यिर्मया 41 >
1 १ पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.
सातवें माह में एलीशामा का पौत्र नेथनियाह का पुत्र, राजपरिवार का वंशज इशमाएल, राजा के प्रमुख सेनापतियों में से एक तथा दस व्यक्ति अहीकाम के पुत्र गेदालियाह से भेंट करने मिज़पाह पहुंचे. जब वे वहां साथ बैठे हुए भोजन कर रहे थे,
2 २ पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.
नेथनियाह का पुत्र इशमाएल तथा उसके दस साथी उठे और तलवार के प्रहार से शापान के पौत्र, अहीकाम के पुत्र गेदालिया का वध कर दिया, गेदालियाह, जिसे बाबेल के राजा ने देश पर अधिपति नियुक्त किया था.
3 ३ नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले.
इशमाएल ने राजा के सारे यहूदियों का भी संहार कर दिया, अर्थात् वे, जो मिज़पाह में गेदालियाह के साथ थे, उसने उन कसदी सैनिकों का भी संहार कर दिया, जो उस स्थान पर पाए गए.
4 ४ गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,
दूसरे दिन, जब गेदालियाह की हत्या की जा चुकी थी, जिसके विषय में किसी को कोई संज्ञान न था,
5 ५ शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.
शेकेम से, शीलो से तथा शमरिया से अस्सी व्यक्ति वहां पहुंचे, उनकी दाढ़ी मूंड़ी हुई थी, वस्त्र फटे हुए तथा देह पर घाव लगे हुए थे, वे अपने साथ अन्नबलि एवं धूप लेकर आए थे, कि इन्हें याहवेह के भवन में ले जाएं.
6 ६ तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”
तब नेथनियाह का पुत्र इशमाएल मिज़पाह से उनसे भेंट करने निकला, इस समय वह रोता जा रहा था. जब उसकी भेंट इन अस्सी व्यक्तियों के समूह से हुई, उसने उनसे कहा, “चलिए, हम अहीकाम के पुत्र गेदालियाह से भेंट करने चलें.”
7 ७ मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.
उनके नगर में पहुंचते ही, नेथनियाह के पुत्र इशमाएल तथा उसके साथियों ने उनकी हत्या कर दी और उनके शव कुएं में फेंक दिए.
8 ८ पण त्यांच्यातील दहा माणसे इश्माएलाला म्हणाली, “आम्हास मारु नको, कारण आमच्याजवळ गहू व सातू, तेल व मध यांचे साठे आम्ही शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने त्यांना इतर सहकाऱ्यासारखे मारले नाही.
किंतु इन अस्सी में से दस जीवित रह गए थे, उन्होंने इशमाएल से आग्रह किया, “हमें जीवनदान दीजिए! हमारे पास गेहूं, जौ, मधु तथा तेल का भंडार है, जिसे हमने खेत में छिपा रखा है.” तब इशमाएल ने अन्य सत्तर के साथ उनकी हत्या नहीं की.
9 ९ जी माणसे जिवे मारली त्या सर्वांची प्रेते इश्माएलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती हा मोठा खड्डा आसा राजाने खणला होता जेव्हा इस्राएलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला.
वह कुंआ जिसमें इशमाएल ने उन लोगों के शव फेंक दिए थे, जिनकी उसने गेदालियाह के साथ हत्या की थी, राजा आसा द्वारा इस्राएल के राजा बाशा से अपनी सुरक्षा के उद्देश्य से निर्मित किया गया था. नेथनियाह के पुत्र इशमाएल ने इस कुएं को मरे हुओं के शवों से भर दिया.
10 १० पुढे जे मिस्पात होते त्या इतर सर्व लोकांस इश्माएलाने पकडले, राजाच्या मुली व जे सर्व लोक मागे मिस्पात राहिले होते ज्यांना अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला त्यावर नेमले होते. म्हणून नथन्याचा मुलगा इश्माएल याने त्यांना पकडून आणि अम्मोनी लोकांकडे पार जाण्यास निघाला.
तत्पश्चात इशमाएल ने मिज़पाह में निवास कर रहे सारे लोगों को बंदी बना लिया, राजा की बेटियों तथा मिज़पाह में शेष रह गए सभी यहूदी, जिन्हें अंगरक्षकों के प्रधान, नेबुज़रादान ने अहीकाम के पुत्र गेदालियाह के संरक्षण में छोड़ रखा था. इस प्रकार नेथनियाह के पुत्र इशमाएल ने इन सभी को बंदी बना लिया और वह अम्मोन वंशजों के देश की ओर इन्हें लेकर प्रस्थित हो गया.
11 ११ पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली.
नेथनियाह के पुत्र इशमाएल द्वारा किए गए इस संकट का समाचार कोरियाह के पुत्र योहानन तथा उसके साथ की संयुक्त सेना के सेनापतियों को प्राप्त हुआ,
12 १२ म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला.
इसलिये उन्होंने सभी पुरुषों को एकजुट किया और नेथनियाह के पुत्र इशमाएल से युद्ध करने के लिए तैयार हुए. नेथनियाह के पुत्र इशमाएल को उन्होंने गिबयोन के महा कुंड के निकट जा पकड़ा.
13 १३ मग असे झाले की, जे सर्व लोक इश्माएलाबरोबर होते त्यांनी जेव्हा कारेहाचा मुलगा योहानान याला व जे सर्व सैन्याधिकारी त्याच्याबरोबर होते त्यांना पाहिले, ते खूप आनंदीत झाले.
जैसे ही इशमाएल के सारे साथियों की दृष्टि कोरियाह के पुत्र योहानन तथा उसके साथी सेनापतियों पर पड़ी, वे पुलकित हो गए.
14 १४ नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.
इससे मिज़पाह में इशमाएल द्वारा बंदी बनाए गए सभी लोग मुड़कर कोरियाह के पुत्र योहानन के निकट आ गए.
15 १५ पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.
किंतु नेथनियाह का पुत्र इशमाएल योहानन से बचकर भाग निकला, उसके साथ आठ व्यक्ति भी बच निकले और अम्मोन वंशजों के देश पहुंच गए.
16 १६ नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.
तब कोरियाह के पुत्र योहानन तथा उसके साथ की सेना के सारे सेनापतियों ने मिज़पाह से लोगों के संपूर्ण लोगों को निकाल लिया, जिन्हें उसने नेथनियाह के पुत्र इशमाएल से विमुक्त किया था, जिन्हें इशमाएल ने अहीकाम के पुत्र गेदालियाह की हत्या के बाद बंदी बना लिया था, अर्थात्, सैनिक, स्त्रियां, बालक; तथा राज-दरबार के अधिकारी जिन्हें उसने गिबयोन से लौटा ले आया था.
17 १७ मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते
उपयुक्त समय आने पर मिस्र चले जाने के उद्देश्य से वे जाकर बेथलेहेम के निकटवर्ती नगर गेरुथ किमहाम में ठहरे रहे.
18 १८ खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.
क्योंकि उन्हें कसदियों का भय था. क्योंकि नेथनियाह के पुत्र इशमाएल ने अहीकाम के पुत्र गेदालियाह की हत्या कर दी थी, जिसको बाबेल के राजा ने देश पर अधिपति नियुक्त किया था.