< यिर्मया 41 >

1 पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.
Og det skete i den syvende Maaned, at Ismael, Nethanjas Søn, Elisamas Sønnesøn, der var af kongelig Byrd og en af Kongens Stormænd, og ti Mænd med ham kom til Gedalia, Ahikams Søn, til Mizpa; og de aade der Brød med hverandre i Mizpa.
2 पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.
Og Ismael, Nethanjas Søn, han og de ti Mænd, som vare med ham, stode op og sloge Gedalia, Ahikams Søn, Safans Sønnesøn, med Sværdet, og de dræbte ham, hvem Kongen af Babel havde sat over Landet.
3 नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले.
Og alle Jøderne, som vare hos ham, nemlig hos Gedalia i Mizpa, og Kaldæerne, som fandtes der, nemlig Krigsmændene, dem slog Ismael ihjel.
4 गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,
Og det skete den anden Dag, efter at han havde dræbt Gedalia, og ingen vidste det,
5 शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.
at der kom Mænd fra Sikem, fra Silo og fra Samaria, firsindstyve Mænd med afraget Skæg og sønderrevne Klæder og med Saar, de havde tilføjet sig; og de havde Madoffer og Virak i deres Haand for at bringe det til Herrens Hus.
6 तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”
Og Ismael, Nethanjas Søn, gik ud dem i Møde fra Mizpa, idet han græd, som han vedblev at gaa frem; og der han mødte dem, da sagde han til dem i Kommer til Gedalia, Ahikams Søn.
7 मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.
Og det skete, der de kom midt i Staden, da myrdede Ismael, Nethanjas Søn, dem, og kastede dem i Kulen, han og de Mænd, som vare med ham.
8 पण त्यांच्यातील दहा माणसे इश्माएलाला म्हणाली, “आम्हास मारु नको, कारण आमच्याजवळ गहू व सातू, तेल व मध यांचे साठे आम्ही शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने त्यांना इतर सहकाऱ्यासारखे मारले नाही.
Men der fandtes ti Mænd iblandt dem, som sagde til Ismael: Dræb os ikke, thi vi have Skatte skjulte i Ageren, Hvede og Byg og Olie og Honning; saa lod han dem være og dræbte dem ikke midt iblandt deres Brødre.
9 जी माणसे जिवे मारली त्या सर्वांची प्रेते इश्माएलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती हा मोठा खड्डा आसा राजाने खणला होता जेव्हा इस्राएलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला.
Og den Kule, hvori Ismael kastede alle de døde Kroppe af de Mænd, som han havde ihjelslaaet tillige med Gedalia, var den, som Kong Asa havde ladet gøre imod Baesa, Israels Konge; den fyldte Ismael, Nethanjas Søn, med de ihjelslagne.
10 १० पुढे जे मिस्पात होते त्या इतर सर्व लोकांस इश्माएलाने पकडले, राजाच्या मुली व जे सर्व लोक मागे मिस्पात राहिले होते ज्यांना अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला त्यावर नेमले होते. म्हणून नथन्याचा मुलगा इश्माएल याने त्यांना पकडून आणि अम्मोनी लोकांकडे पार जाण्यास निघाला.
Og Ismael bortførte som Fanger alle de overblevne af Folket, som vare i Mizpa, Kongens Døtre og alt Folket, som var blevet tilbage i Mizpa, hvilke Nebusar-Adan, den øverste for Drabanterne, havde betroet Gedalia, Ahikams Søn; dem bortførte Ismael, Nethanjas Søn, som Fanger og gik sin Vej for at drage over til Ammons Børn.
11 ११ पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली.
Der Johanan, Kareaks Søn, og alle de Høvedsmænd for Hæren, som vare med ham, hørte alt det onde, som Ismael, Nethanjas Søn, havde gjort,
12 १२ म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला.
da toge de alle Mændene til sig og droge hen for at stride imod Ismael, Nethanjas Søn; og de fandt ham ved det store Vand, som er i Gibeon.
13 १३ मग असे झाले की, जे सर्व लोक इश्माएलाबरोबर होते त्यांनी जेव्हा कारेहाचा मुलगा योहानान याला व जे सर्व सैन्याधिकारी त्याच्याबरोबर होते त्यांना पाहिले, ते खूप आनंदीत झाले.
Og det skete, der alt Folket, som var hos Ismael, saa Johanan, Kareaks Søn, og alle de Høvedsmænd for Hæren, som vare hos ham, da bleve de glade.
14 १४ नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.
Og alt Folket, som Ismael havde ført fangen bort fra Mizpa, vendte sig om, og de droge tilbage og gik hen til Johanan, Kareaks Søn.
15 १५ पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.
Og Ismael, Nethanjas Søn, med otte Mænd undkom fra Johanan og drog til Ammons Børn.
16 १६ नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.
Da tog Johanan, Kareaks Søn, og alle de Høvedsmænd for Hæren, som vare hos ham, alle de overblevne af Folket bort fra Mizpa, dem, som han havde ført tilbage fra Ismael, Nethanjas Søn, efter at denne havde ihjelslaget Gedalia, Ahikams Søn: Vældige, Krigsmænd og Kvinder og smaa Børn og Hofmænd, som han havde ført tilbage fra Gibeon.
17 १७ मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते
Og de droge af Sted og bleve i Kimhams Herberge, som var ved Bethlehem, for at drage videre og komme til Ægypten,
18 १८ खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.
for Kaldæernes Skyld; thi de frygtede for dem, fordi Ismael, Nethanjas Søn, havde slaget Gedalia, Ahikams Søn, ihjel, hvem Kongen af Babel havde beskikket over Landet.

< यिर्मया 41 >