< यिर्मया 4 >
1 १ परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील. तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस,
O Israele, se tu torni, dice l’Eterno, se tu torni a me, e se togli dal mio cospetto le tue abominazioni, se non vai più vagando qua e là
2 २ आणि जर तू परमेश्वर जिवंत आहे अशी शपथ, सत्यतेने, न्यायाने आणि न्यायीपणाने वाहशील, तर त्याच्या ठायी राष्ट्रे आपणास आशीर्वादीत म्हणतील व त्याच्या ठायी हर्ष करतील.”
e giuri per l’Eterno che vive! con verità, con rettitudine e con giustizia, allora le nazioni saranno benedette in te, e in te si glorieranno.
3 ३ कारण परमेश्वर यहूदा व यरूशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो: “तुम्ही आपली जमीन नांगरा, काट्यांमध्ये बी पेरु नका.
Poiché così parla l’Eterno a quei di Giuda e di Gerusalemme: Dissodatevi un campo nuovo, e non seminate fra le spine!
4 ४ अहो यहूदातील मनुष्यांनो आणि यरूशलेममधील रहिवास्यांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाही तर तुमच्यातील कोणालाही विझवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हास जाळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्ये आहेत.”
Circoncidetevi per l’Eterno, circoncidete i vostri cuori, o uomini di Giuda e abitanti di Gerusalemme, affinché il mio furore non scoppi come un fuoco, e non s’infiammi sì che nessuno possa spegnerlo, a motivo della malvagità delle vostre azioni!
5 ५ “यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरूशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’
Annunziate in Giuda, bandite questo in Gerusalemme, e dite: “Suonate le trombe nel paese!” gridate forte e dite: “Adunatevi ed entriamo nelle città forti!”
6 ६ खुण म्हणून ध्वज उभारा व तो सियोनेच्या दिशेने दाखवा आणि सुरक्षिततेसाठी पळा. थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट व भयानक विध्वंस आणीत आहे.
Alzate la bandiera verso Sion, cercate un rifugio, non vi fermate, perch’io faccio venire dal settentrione una calamità e una grande rovina.
7 ७ सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे, आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जिथे कोणी राहत नाही असे, तुमच्या शहरांना भयामध्ये आणि ओसाडी मध्ये पालटायला तो आपल्या स्थानांतून निघून येत आहे.
Un leone balza fuori dal folto del bosco, e un distruttore di nazioni s’è messo in via, ha lasciato il suo luogo, per ridurre il tuo paese in desolazione, sì che le tue città saranno rovinate e prive d’abitanti.
8 ८ म्हणून स्वत: ला गोणताट गुंडाळा, रडा आणि मोठ्याने आक्रोश करा. कारण परमेश्वराचा क्रोध आमच्यापासून मागे फिरला नाही.”
Perciò, cingetevi di sacchi, fate cordoglio, mandate lamenti! perché l’ardente ira dell’Eterno non s’è stornata da noi.
9 ९ “आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदेष्टे भयभीत होतील.”
E in quel giorno avverrà, dice l’Eterno, che il cuore del re e il cuore de’ capi verranno meno, i sacerdoti saranno attoniti, e i profeti stupefatti.
10 १० तेव्हा मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांस खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हास शांती मिळेल.’ तलवार तर जिवापर्यंत पोचली आहे.”
Allora io dissi: “Ahi! Signore, Eterno! tu hai dunque ingannato questo popolo e Gerusalemme dicendo: Voi avrete pace mentre la spada penetra fino all’anima”.
11 ११ त्या वेळेला या लोकांस व यरूशलेमेला असे सांगण्यात येईल. “उजाड टेकड्यावरुन गरम वाऱ्याच्या झळा माझ्या लोकांच्या कन्येकडे येतील. तो त्यांना उफळायला किंवा स्वच्छ करायला येणार नाही.”
In quel tempo si dirà a questo popolo e a Gerusalemme: Un vento ardente viene dalle alture del deserto verso la figliuola del mio popolo, non per vagliare, non per nettare il grano;
12 १२ हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे आणि तो माझ्या आज्ञेवरून येत आहे, आणि मी आता त्यांच्याविरुद्ध माझा निकाल जाहीर करीन.
un vento anche più impetuoso di quello verrà da parte mia; ora anch’io pronunzierò la sentenza contro di loro.
13 १३ पाहा! तो ढगाप्रमाणे आक्रमण करील, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत. त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्हांला हाय! कारण आम्ही लुटलेले आहो.
Ecco, l’invasore sale come fan le nuvole, e i suoi carri son come un turbine; i suoi cavalli son più rapidi delle aquile. “Guai a noi! poiché siam devastati!”
14 १४ हे यरूशलेमे, तू तारली जावी, म्हणून तू आपल्या हृदयातील पाप धुऊन काढ. “पाप कसे करावे” हे तुझ्या मनातील खोल विचार किती काळ राहतील?
O Gerusalemme, netta il tuo cuore dalla malvagità, affinché tu sia salvata. Fino a quando albergheranno in te i tuoi pensieri iniqui?
15 १५ कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे.
Poiché una voce che viene da Dan annunzia la calamità, e la bandisce dai colli d’Efraim.
16 १६ “राष्ट्रांना ह्याबद्दल विचार करण्यास लावा. पाहा! यरूशलेमेविरूद्ध घोषीत करा की, दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत आणि यहूदाच्या विरूद्ध ते आपला शब्द उच्चारत आहेत.
“Avvertitene le nazioni, fatelo sapere a Gerusalemme: degli assedianti vengono da un paese lontano, e mandan le loro grida contro le città di Giuda”.
17 १७ शेताचे रक्षण करणारे तसे ते तिच्याभोवती आहेत. कारण तिने माझ्या विरूद्ध बंड केले आहे. असे परमेश्वर म्हणतो.
Si son posti contro Gerusalemme da ogni lato, a guisa di guardie d’un campo, perch’ella s’è ribellata contro di me, dice l’Eterno.
18 १८ तूझे मार्ग आणि तुझे कर्म यानी तुला या गोष्टी आणून दिल्या आहेत. ही तुझी दुष्टाई आहे, आणि ती कडू या कारणाने तुझ्या हृदयापर्यंत पोचली आहे.”
Il tuo procedere e le tue azioni t’hanno attirato queste cose; quest’è il frutto della tua malvagità; sì, è amaro; sì, è cosa che t’arriva al cuore.
19 १९ माझे हृदय! माझे हृदय! मी माझ्या हृदयात दु: खी आहे. माझ्याठायी माझे हृदय अनावर झाले आहे. माझ्याने शांत बसवत नाही, कारण हे माझ्या जीवा तू रणशिंग्याचा आवाज, लढाईची ओरड ऐकली आहे.
Le mie viscere! le mie viscere! Io sento un gran dolore! Oh le pareti del mio cuore! Il mio cuore mi batte in petto! Io non posso tacermi; poiché, anima mia, tu odi il suon della tromba, il grido di guerra.
20 २० अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.
S’annunzia rovina sopra rovina, poiché tutto il paese è devastato. Le mie tende sono distrutte ad un tratto, i miei padiglioni, in un attimo.
21 २१ युद्धाचा झेंडा मी किती काळ पाहू? काय मला रणशिंग्याचा आवाज ऐकायला मिळेल?
Fino a quando vedrò la bandiera e udrò il suon della tromba?
22 २२ कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”
Veramente il mio popolo è stolto, non mi conosce; son de’ figliuoli insensati, e non hanno intelligenza; sono sapienti per fare il male; ma il bene non lo sanno fare.
23 २३ मी पृथ्वीकडे पाहिले आणि पाहा! ती उजाड आणि आकारविरहीत होती. मी आकाशाकडे पाहिले त्यामध्ये काही प्रकाश नव्हता.
Io guardo la terra, ed ecco è desolata e deserta; i cieli, e son senza luce.
24 २४ मी डोंगराकडे पाहिले आणि पाहा! ते कापत होते व सर्व टेकड्या थरथरत होत्या.
Guardo i monti, ed ecco tremano, e tutti i colli sono agitati.
25 २५ मी पाहिले आणि पाहा! पण कोठेही माणसे नव्हती आणि आकाशातील सर्व पक्षी पळाले होते.
Guardo, ed ecco non c’è uomo, e tutti gli uccelli del cielo son volati via.
26 २६ मी पाहिले आणि पाहा! फळबागेचे वाळवंट झाले होते आणि सर्व शहरे परमेश्वरा समोर, त्याच्या संतप्त क्रोधासमोर खाली ओढले गेले होते.
Guardo, ed ecco il Carmelo è un deserto, e tutte le sue città sono abbattute dinanzi all’Eterno, dinanzi all’ardente sua ira.
27 २७ परमेश्वर असे म्हणाला: “संपूर्ण देशाची नासधूस होईल, पण मी त्यांचा संपूर्ण नाश करणार नाही.
Poiché così parla l’Eterno: Tutto il paese sarà desolato, ma io non lo finirò del tutto.
28 २८ या कारणामुळे भूमी शोक करणार आणि वर आकाशे काळोख होतील. कारण मी माझे बेत घोषीत केले आहेत, मी त्यापासून माघार फिरणार नाही.”
A motivo di questo, la terra fa cordoglio, e i cieli di sopra s’oscurano; perché io l’ho detto, l’ho stabilito, e non me ne pento, e non mi ritratterò.
29 २९ प्रत्येक शहर स्वर व धनुर्धारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगरकड्याच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कोणीही राहणारे नसतील.
Al rumore dei cavalieri e degli arcieri tutte le città sono in fuga; tutti entrano nel folto de’ boschi, montano sulle rocce; tutte le città sono abbandonate, e non v’è più alcun abitante.
30 ३० आता तू उद्ध्वस्त होशील, तेव्हा काय करशील? जरी तू किरमिजी वस्त्रे घातली, आणि सोन्याच्या दागिण्याने आपल्याला सजवतेस, जरी तू काजळ घालून डोळे मोठे करतेस, पण जे मनुष्य तुझ्याकरता वासनाधीन होते आता तुझा तिरस्कार करतात. उलट, ते तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
E tu che stai per esser devastata, che fai? Hai un bel vestirti di scarlatto, un bel metterti i tuoi ornamenti d’oro, un bell’ingrandirti gli occhi col belletto! Invano t’abbellisci; i tuoi amanti ti sprezzano, voglion la tua vita.
31 ३१ त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”
Poiché io odo de’ gridi come di donna ch’è nei dolori; un’angoscia come quella di donna nel suo primo parto; è la voce della figliuola di Sion, che sospira ansimando e stende le mani: “Ahi me lassa! che l’anima mia vien meno dinanzi agli uccisori”.