< यिर्मया 38 >
1 १ यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शफाट्या व पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर यांनी ऐकली. तो सांगत होता,
Now it came to the ears of Shephatiah, the son of Mattan, and Gedaliah, the son of Pashhur, and Jucal, the son of Shelemiah, and Pashhur, the son of Malchiah, that Jeremiah had said to all the people,
2 २ “परमेश्वर असे म्हणतो जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळाने आणि मरीने मारला जाईल. पण कोणी खास्द्यांकडे निघून जाईल तो वाचेल, त्यास आपल्या स्वतःचा जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील.
These are the words of the Lord: Whoever goes on living in this town will come to his death by the sword or through need of food or by disease: but whoever goes out to the Chaldaeans will keep his life out of the power of the attackers and be safe.
3 ३ परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.”
The Lord has said, This town will certainly be given into the hands of the army of the king of Babylon, and he will take it.
4 ४ म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.
Then the rulers said to the king, Let this man be put to death, because he is putting fear into the hearts of the men of war who are still in the town, and into the hearts of the people, by saying such things to them: this man is not working for the well-being of the people, but for their damage.
5 ५ मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.”
Then Zedekiah the king said, See, he is in your hands: for the king was not able to do anything against them.
6 ६ मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.
So they took Jeremiah and put him into the water-hole of Malchiah, the king's son, in the place of the armed watchmen: and they let Jeremiah down with cords. And in the hole there was no water, but wet earth: and Jeremiah went down into the wet earth.
7 ७ आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.
Now it came to the ears of Ebed-melech the Ethiopian, an unsexed servant in the king's house, that they had put Jeremiah into the water-hole; the king at that time being seated in the doorway of Benjamin:
8 ८ म्हणून एबद-मलेख राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला,
And Ebed-melech went out from the king's house and said to the king,
9 ९ माझ्या स्वामी राजा, या मनुष्यांनी ज्या मार्गाने यिर्मया संदेष्ट्याबरोबर वाईट वागणूक केली. तो भुकेने तेथे मरावा म्हणून त्यांनी त्यास पाण्याच्या टाकीत टाकले, कारण तेथे नगरात काही अन्न नाही.
My lord the king, these men have done evil in all they have done to Jeremiah the prophet, whom they have put into the water-hole; and he will come to his death in the place where he is through need of food: for there is no more bread in the town.
10 १० नंतर एबद-मलेख कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, “येथून तीस माणसे बरोबर घे आणि यिर्मया संदेष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”
Then the king gave orders to Ebed-melech the Ethiopian, saying, Take with you three men from here and get Jeremiah out of the water-hole before death overtakes him.
11 ११ म्हणून एबद-मलेख याने त्या मनुष्यांचा ताबा घेतला आणि त्याच्या ताब्यातील मनुष्यांना घेऊन व कपड्यासाठी राजाच्या घरातील भांडारात खाली गेला. तेथून त्याने चिंध्या व झिजलेले कपडे घेतले आणि दोरांनी त्या पाण्याच्या टाकीत खाली सोडल्या.
So Ebed-melech took the men with him and went into the house of the king, to the place where the clothing was kept, and got from there old clothing and bits of old cloth, and let them down by cords into the water-hole where Jeremiah was.
12 १२ एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले.
And Ebed-melech the Ethiopian said to Jeremiah, Put these bits of old cloth under your arms under the cords. And Jeremiah did so.
13 १३ नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.
So pulling Jeremiah up with the cords they got him out of the water-hole: and Jeremiah was kept in the place of the armed watchmen.
14 १४ नंतर सिद्कीया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलावले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे. माझ्यापासून काही लपवू नकोस.”
Then King Zedekiah sent for Jeremiah the prophet and took him into the rulers' doorway in the house of the Lord: and the king said to Jeremiah, I have a question to put to you; keep nothing back from me.
15 १५ यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “जर मी तुला सांगितले, तर तू मला खचित मारणार नाहीस काय? आणि जर मी तुला सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस.”
Then Jeremiah said to Zedekiah, If I give you the answer to your question, will you not certainly put me to death? and if I make a suggestion to you, you will not give it a hearing.
16 १६ पण सिद्कीया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला, तो जिवंत आहे, मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्ये तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही.
So King Zedekiah gave his oath to Jeremiah secretly, saying, By the living Lord, who gave us our life, I will not put you to death, or give you up to these men who are desiring to take your life.
17 १७ मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील.
Then Jeremiah said to Zedekiah, These are the words of the Lord, the God of armies, the God of Israel: If you go out to the king of Babylon's captains, then you will have life, and the town will not be burned with fire, and you and your family will be kept from death:
18 १८ पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.”
But if you do not go out to the king of Babylon's captains, then this town will be given into the hands of the Chaldaeans and they will put it on fire, and you will not get away from them.
19 १९ सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”
And King Zedekiah said to Jeremiah, I am troubled on account of the Jews who have gone over to the Chaldaeans, for fear that they may give me up to them and they will put me to shame.
20 २० यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.
But Jeremiah said, They will not give you up: be guided now by the word of the Lord as I have given it to you, and it will be well for you, and you will keep your life.
21 २१ पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे.
But if you do not go out, this is what the Lord has made clear to me:
22 २२ यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे. तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत.
See, all the rest of the women in the house of the king of Judah will be taken out to the king of Babylon's captains, and these women will say, Your nearest friends have been false to you and have got the better of you: they have made your feet go deep into the wet earth, and they are turned away back from you.
23 २३ कारण तुझ्या सर्व स्त्रिया आणि मुलांना ते बाहेर खास्द्यांकडे नेतील आणि तू स्वतः त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. तू बाबेलाच्या राजाच्या हातात सापडशील आणि हे नगर अग्नीने जाळण्यात येईल.”
And they will take all your wives and your children out to the Chaldaeans: and you will not get away out of their hands, but will be taken by the hands of the king of Babylon: and this town will be burned with fire.
24 २४ मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही.
Then Zedekiah said to Jeremiah, Let no man have knowledge of these words, and you will not be put to death.
25 २५ मी तुझ्याशी बोललो हे अधिकाऱ्यांनी जर ऐकले, ते जर आले आणि तुला म्हणाले, तू राजाबरोबर काय बोललास ते आम्हास सांग. आमच्यापासून लपवून ठेवू नको अथवा आम्ही तुला ठार मारू आणि राजा तुला काय म्हणाला तेही आम्हास सांग
But if it comes to the ears of the rulers that I have been talking with you, and they come and say to you, Give us word now of what you have said to the king and what the king said to you, keeping nothing back and we will not put you to death;
26 २६ मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको.
Then you are to say to them, I made my request to the king, that he would not send me back to my death in Jonathan's house.
27 २७ नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले, राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तरे दिली. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले कारण त्यांनी यिर्मया व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते.
Then all the rulers came to Jeremiah, questioning him: and he gave them an answer in the words the king had given him orders to say. So they said nothing more to him; for the thing was not made public.
28 २८ ह्याप्रमाणे यिर्मया, यरूशलेम जिंकले जाईपर्यंत, पहारेकऱ्याच्या चौकात राहिला.
So Jeremiah was kept in the place of the armed watchmen till the day when Jerusalem was taken.