< यिर्मया 36 >

1 यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वरापासून वचन आले. ते म्हणाले,
유다 왕 요시야의 아들 여호야김 사 년에 여호와께로서 예레미야에게 말씀이 임하니라 가라사대
2 तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.
너는 두루마리 책을 취하여 내가 네게 말하던 날 곧 요시야의 날부터 오늘까지 이스라엘과 유다와 열방에 대하여 나의 네게 이른 모든 말을 그것에 기록하라
3 कदाचित यहूदाचे लोक मी जे अरिष्ट त्यांच्यावर आणण्याचे योजले आहे, ते ऐकतील. कदाचित प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून वळेल, मग मी त्यांच्या अन्यायाची व पापांची क्षमा करीन.
유다 족속이 내가 그들에게 내리려한 모든 재앙을 듣고 각기 악한 길에서 돌이킬듯 하니라 그리하면 내가 그 악과 죄를 사하리라
4 मग यिर्मयाने नेरीयाचा मुलगा बारूख याला बोलावले आणि परमेश्वराने त्याच्याशी बोललेली सर्व वचने यिर्मयाने सांगितली व बारूखाने पटावर लिहून काढली.
이에 예레미야가 네리야의 아들 바룩을 부르매 바룩이 예레미야의 구전대로 여호와께서 그에게 이르신 모든 말씀을 두루마리 책에 기록하니라
5 पुढे यिर्मयाने बारूखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, “मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही.
예레미야가 바룩을 명하여 가로되 나는 감금을 당한지라 여호와의 집에 들어갈 수 없은즉
6 म्हणून तू जा आणि मी सांगितल्याप्रमाणे तू जे पटावर लिहीले ते वाच. परमेश्वराच्या मंदिरात उपवासाच्या दिवशी, लोकांस ऐकू येतील आणि यहूदा नगरांतून आलेल्या सर्व लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखव.
너는 들어가서 나의 구전대로 두루마리에 기록한 여호와의 말씀을 금식일에 여호와의 집에 있는 백성의 귀에 낭독하고 유다 모든 성에서 온 자들의 귀에도 낭독하라
7 कदाचित् ते परमेश्वरापुढे आपली दयेची विनंती सादर करतील. कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या कुमार्गापासून वळेल, कारण परमेश्वराचा जो क्रोध व कोप या लोकांविरूद्ध सांगितला आहे तो भयंकर आहे.”
그들이 여호와앞에 기도를 드리며 각기 악한 길을 떠날듯 하니라 여호와께서 이 백성에 대하여 선포하신 노와 분이 크니라
8 म्हणून यिर्मयाने संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारूख याला जे आज्ञापिले होते ती प्रत्येकगोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंडाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली.
네리야의 아들 바룩이 무릇 선지자 예레미야의 자기에게 명한대로하여 여호와의 집에서 책에 있는 여호와의 말씀을 낭독하니라
9 योशीयाचा पुत्र यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात यरूशलेमेतल्या सर्व लोकांनी व जे सर्व लोक यहूदाच्या नगरांतून यरूशलेमेस आले त्यांनीही परमेश्वराच्या आदरासाठी उपासाची घोषणा केली.
유다 왕 요시야의 아들 여호야김의 오년 구월에 예루살렘 모든 백성과 유다 성읍들에서 예루살렘에 이른 모든 백성이 여호와 앞에서 금식을 선포한지라
10 १० तेव्हा बारूखाने मोठ्याने यिर्मयाची गुंडाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखकाचा मुलगा गमऱ्या याच्या खोलीत, वरील अंगणात, नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली.
바룩이 여호와의 집 윗뜰 곧 여호와의 집 새문 어귀의 곁에 있는 사반의 아들 서기관 그마랴의 방에서 그 책에 있는 예레미야의 말을 낭독하여 모든 백성에게 들리니라
11 ११ आता शाफानाचा मुलगा गमऱ्या, याचा मुलगा मीखाया परमेश्वराची सर्व वचने त्या पुस्तकातून ऐकली.
사반의 손자요 그마랴의 아들인 미가야가 그 책에 있는 여호와의 말씀을 다 듣고
12 १२ तो खाली राजाच्या घरात चिटणीसाच्या खोलीत गेला. तेव्हा पाहा, सर्व अधिकारी, लेखक अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानाचा मुलगा गमऱ्या व हनन्याचा मुलगा सिद्कीया आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे बसले होते.
왕궁에 내려가서 서기관의 방에 들어가니 모든 방백 곧 서기관 엘리사마와 스마야의 아들 들라야와 악볼의 아들 엘라단과 사반의 아들 그마랴와 하나냐의 아들 시드기야와 모든 방백이 거기 앉았는지라
13 १३ तेव्हा बारूख लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असताना जी सर्व वचने मीखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली.
미가야가 바룩의 백성의 귀에 책을 낭독할 때에 들은 모든 말로 그들에게 고하매
14 १४ मग त्या सर्व अधिकाऱ्यांनी बारूखाकडे कूशीचा मुलगा शलेम्या याचा मुलगा नथन्या याचा मुलगा यहूदी याला पाठवून सांगितले की, “ज्या गुंडाळीतून तू लोकांच्या कानी पडेल असे वाचले ती तू आपल्या हाती घेऊन ये.” नेरीयाचा मुलगा बारूख ती गुंडाळी आपल्या हातात घेऊन त्यांच्याजवळ आला.
이에 모든 방백이 구시의 증손 셀레먀의 손자 느다냐의 아들 여후디를 바룩에게 보내어 이르되 너는 백성의 귀에 낭독한 두루마리를 손에 가지고 오라 네리야의 아들 바룩이 두루마리를 손에 가지고 그들에게로 가매
15 १५ मग ते त्यास म्हणाले, “खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव.” म्हणून बारूखाने तो पट वाचला.
그들이 바룩에게 이르되 앉아서 이를 귀에 낭독하라 바룩이 그들 귀에 낭독하매
16 १६ असे झाले की, जेव्हा त्यांनी सर्व वचने ऐकली तेव्हा प्रत्येक मनुष्य भयभीत होऊन एकमेकांकडे वळले. ते बारूखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने खचित राजाला कळवतो.”
그들이 그 모든 말씀을 듣고 놀라서 서로 보며 바룩에게 이르되 우리가 이 모든 말을 왕에게 고하리라
17 १७ मग ते बारूखाला म्हणाले, “तू यिर्मायाच्या तोंडची सर्व वचने कशी लिहीली, हे आम्हास सांग?”
그들이 또 바룩에게 물어 가로되 네가 그 구전하는 이 모든 말을 어떻게 기록하였느뇨 청컨대 우리에게 이르라
18 १८ बारूख त्यांना म्हणाला, “त्याने ही सर्व वचने मला सांगितली व मी ते शाईने या पटावर लिहिली.”
바룩이 대답하되 그가 그 입으로 이 모든 말을 내게 베풀기로 내가 먹으로 책에 기록하였노라
19 १९ मग ते अधिकारी बारूखाला म्हणाले, “जा, तू स्वतः आणि यिर्मयासुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.”
이에 방백들이 바룩에게 이르되 너는 가서 예레미야와 함께 숨고 너희 있는 곳을 사람에게 알리지 말라 하니라
20 २० मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले व त्यांनी त्यास ही वचने कळवली.
그들이 두루마리를 서기관 엘리사마의 방에 두고 뜰에 들어가 왕께 나아가서 이 모든 말로 왕의 귀에 고하니
21 २१ राजाने यहूदीला ती गुंडाळी आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा चिटणीसाच्या खोलीतून गुंडाळी घेतली. नंतर यहूदीने तो राजाला व त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्याने वाचून दाखविला.
왕이 여후디를 보내어 두루마리를 가져오게 하매 여후디가 서기관 엘리사마의 방에서 가져다가 왕과 왕의 곁에 선 모든 방백의 귀에 낭독하니
22 २२ आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती.
때는 구월이라 왕이 겨울 궁전에 앉았고 그 앞에는 불피운 화로가 있더라
23 २३ तेव्हा असे झाले की, यहूदीने तीन चार पाने वाचल्यावर राजाने चाकूने ते कापले आणि ती सर्व गुंडाळी शेगडीतल्या विस्तवात नष्ट होऊन जाईपर्यंत त्याने त्यामध्ये फेकून दिली.
여후디가 삼 편 사 편을 낭독하면 왕이 소도로 그것을 연하여 베어 화로 불에 던져서 온 두루마리를 태웠더라
24 २४ परंतु राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकले तरी ते घाबरले नाहीत, त्यांनी आपले वस्त्रेही फाडली नाहीत.
왕과 그 신하들이 이 모든 말을 듣고도 두려워하거나 그 옷을 찢지 아니하였고
25 २५ राजाने ती गुंडाळी जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी त्यास विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही.
엘라단과 들라야와 그마랴가 왕께 두루마리를 사르지 말기를 간구하여도 왕이 듣지 아니하였으며
26 २६ यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.
왕이 왕의 아들 여라므엘과 아스리엘의 아들 스라야와 압디엘의 아들 셀레먀를 명하여 서기관 바룩과 선지자 예레미야를 잡으라 하였으나 여호와께서 그들을 숨기셨더라
27 २७ नंतर राजाने गुंडाळी व जी वचने बारूखाने यिर्मयाच्या मुखापासून ऐकून लिहीली होती ती जाळल्यावर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
왕이 두루마리와 바룩이 예레미야의 구전으로 기록한 말씀을 불사른 후에 여호와의 말씀이 예레미야에게 임하니라 가라사대
28 २८ परत जा, तू आपल्यासाठी दुसरी गुंडाळी घे आणि जी मुळची वचने पहिल्या गुंडाळीत होती, जी यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळली, ती सर्व त्यामध्ये लिही.
너는 다시 다른 두루마리를 가지고 유다 왕 여호야김의 불사른 첫 두루마리의 모든 말을 기록하고
29 २९ मग तू यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला सांग परमेश्वर असे म्हणतो, तू ही गुंडाळी जाळली व म्हणालास, खचित “बाबेलाचा राजा येईल आणि या देशाचा नाश करील व यातले माणसे व पशू या दोघांचाही नाश करील, असे हिच्यात तू का लिहीले आहे?”
또 유다 왕 여호야김에 대하여 이같이 말하기를 여호와의 말씀에 그가 이 두루마리를 불사르며 말하기를 네가 어찌하여 바벨론 왕이 정녕히 와서 이 땅을 멸하고 사람과 짐승을 이 땅에서 없어지게 하리라 하는 말을 이 두루마리에 기록하였느뇨 하도다
30 ३० म्हणून, यहूदाचा राजा यहोयाकीम याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, त्यास दावीदाच्या सिंहासनावर बसायला कोणी राहणार नाही. तर त्याचे प्रेत दिवसातल्या उन्हात आणि रात्रीतल्या थंडीत बाहेर टाकण्यात येईल.
그러므로 나 여호와가 유다 왕 여호야김에 대하여 이같이 말하노라 그에게 다윗의 위에 앉을 자가 없게 될것이요 그 시체는 버림을 입어서 낮에는 더위, 밤에는 추위를 당하리라
31 ३१ कारण मी त्याला, त्याच्या वंशजाला व त्याच्या सेवकांना त्यांच्या अन्यायामुळे मी शिक्षा करीन आणि जे सर्व अरिष्ट मी त्यांच्यावर व यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर व यहूदाच्या प्रत्येक व्यक्तीवर आणीन.
또 내가 그와 그 자손과 신하들을 그들의 죄악을 인하여 벌할 것이라 내가 일찍 그들과 예루살렘 거민과 유다 사람에게 선포하였으나 그들이 듣지 아니한 그 모든 재앙을 내리리라 하셨다 하라
32 ३२ मग यिर्मयाने दुसरी गुंडाळी घेतली व ती नेरीयाचा मुलगा बारूख लेखकाला दिली. आणि जी गुंडाळी यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने अग्नीत जाळली होती तिच्यातील सर्व वचने त्याने यिर्मयाच्या तोंडून ऐकून तिच्यात लिहीली. आणखी त्यामध्ये तशाच दुसऱ्या पुष्कळ वचनांची भर घातली.
이에 예레미야가 다를 두루마리를 취하여 네리야의 아들 서기관 바룩에게 주매 그가 유다 왕 여호야김의 불사른 책의 모든 말을 예레미야의 구전대로 기록하고 그 외에도 그 같은 말을 많이 더 하였더라

< यिर्मया 36 >