< यिर्मया 36 >
1 १ यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वरापासून वचन आले. ते म्हणाले,
And it was don, in the fourthe yeer of Joachym, sone of Josie, kyng of Juda, this word was maad of the Lord to Jeremye, and seide,
2 २ तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.
Take thou the volym of a book, and thou schalt write therynne alle the wordis, whiche Y spake to thee ayens Israel and Juda, and ayens alle folkis, fro the dai in whiche Y spak to thee, fro the daies of Josie `til to this dai.
3 ३ कदाचित यहूदाचे लोक मी जे अरिष्ट त्यांच्यावर आणण्याचे योजले आहे, ते ऐकतील. कदाचित प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून वळेल, मग मी त्यांच्या अन्यायाची व पापांची क्षमा करीन.
If perauenture whanne the hous of Juda herith alle the yuels whiche Y thenke to do to hem, ech man turne ayen fro his worste weye, and Y schal be merciful to the wickidnesse and synne of hem.
4 ४ मग यिर्मयाने नेरीयाचा मुलगा बारूख याला बोलावले आणि परमेश्वराने त्याच्याशी बोललेली सर्व वचने यिर्मयाने सांगितली व बारूखाने पटावर लिहून काढली.
Therfor Jeremye clepide Baruk, the sone of Nerye; and Baruk wroot of the mouth of Jeremye in the volym of a book alle the wordis of the Lord, whiche he spak to hym.
5 ५ पुढे यिर्मयाने बारूखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, “मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही.
And Jeremye comaundide to Baruk, and seide, Y am closid, and Y may not entre in to the hous of the Lord.
6 ६ म्हणून तू जा आणि मी सांगितल्याप्रमाणे तू जे पटावर लिहीले ते वाच. परमेश्वराच्या मंदिरात उपवासाच्या दिवशी, लोकांस ऐकू येतील आणि यहूदा नगरांतून आलेल्या सर्व लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखव.
Therfor entre thou, and rede of the book, in which thou hast write of my mouth the wordis of the Lord, in hering of the puple, in the hous of the Lord, in the dai of fastyng; ferthermore and in heryng of al Juda, that comen fro her citees, thou schalt rede to hem;
7 ७ कदाचित् ते परमेश्वरापुढे आपली दयेची विनंती सादर करतील. कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या कुमार्गापासून वळेल, कारण परमेश्वराचा जो क्रोध व कोप या लोकांविरूद्ध सांगितला आहे तो भयंकर आहे.”
if perauenture the preier of hem falle in the siyt of the Lord, and eche man turne ayen fro his worste weie; for whi the strong veniaunce and indignacioun is greet, which the Lord spak ayens this puple.
8 ८ म्हणून यिर्मयाने संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारूख याला जे आज्ञापिले होते ती प्रत्येकगोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंडाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली.
And Baruk, the sone of Nerie, dide aftir alle thingis, which Jeremye, the prophete, comaundide to hym; and he redde of the book the wordis of the Lord, in the hous of the Lord.
9 ९ योशीयाचा पुत्र यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात यरूशलेमेतल्या सर्व लोकांनी व जे सर्व लोक यहूदाच्या नगरांतून यरूशलेमेस आले त्यांनीही परमेश्वराच्या आदरासाठी उपासाची घोषणा केली.
Forsothe it was doon, in the fyueth yeer of Joachym, sone of Josie, kyng of Juda, in the nynthe monethe, thei prechiden fastynge in the siyt of the Lord, to al the puple in Jerusalem, and to al the multitude, that cam togidere fro the citees of Juda in to Jerusalem.
10 १० तेव्हा बारूखाने मोठ्याने यिर्मयाची गुंडाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखकाचा मुलगा गमऱ्या याच्या खोलीत, वरील अंगणात, नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली.
And Baruc redde of the volym the wordis of Jeremye, in the hous of the Lord, in the treserie of Gamarie, sone of Saphan, scryuen, in the hiyere porche, in the entring of the newe yate of the hous of the Lord, in audience of al the puple.
11 ११ आता शाफानाचा मुलगा गमऱ्या, याचा मुलगा मीखाया परमेश्वराची सर्व वचने त्या पुस्तकातून ऐकली.
And whanne Mychie, the sone of Gamarie, sone of Saphan, hadde herd alle the wordis of the Lord,
12 १२ तो खाली राजाच्या घरात चिटणीसाच्या खोलीत गेला. तेव्हा पाहा, सर्व अधिकारी, लेखक अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानाचा मुलगा गमऱ्या व हनन्याचा मुलगा सिद्कीया आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे बसले होते.
of the book, he yede doun in to the hous of the kyng, to the treserye of the scryuen. And lo! alle the princes saten there, Elisama, the scryuen, and Dalaie, the sone of Semeye, and Elnathan, the sone of Achabor, and Gamarie, the sone of Saphan, and Sedechie, the sone of Ananye, and alle princes.
13 १३ तेव्हा बारूख लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असताना जी सर्व वचने मीखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली.
And Mychee telde to hem alle the wordis, whiche he herde Baruc redynge of the book, in the eeris of the puple.
14 १४ मग त्या सर्व अधिकाऱ्यांनी बारूखाकडे कूशीचा मुलगा शलेम्या याचा मुलगा नथन्या याचा मुलगा यहूदी याला पाठवून सांगितले की, “ज्या गुंडाळीतून तू लोकांच्या कानी पडेल असे वाचले ती तू आपल्या हाती घेऊन ये.” नेरीयाचा मुलगा बारूख ती गुंडाळी आपल्या हातात घेऊन त्यांच्याजवळ आला.
Therfor alle the princes senten to Baruc Judi, the sone of Nathathie, sone of Selemye, sone of Chusi, and seiden, Take in thin hond the book, of which thou reddist in audience of the puple, and come thou. Therfor Baruc, the sone of Nereie, took the book in his hoond, and cam to hem.
15 १५ मग ते त्यास म्हणाले, “खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव.” म्हणून बारूखाने तो पट वाचला.
And thei seiden to hym, Sitte thou, and rede these thingis in oure eeris; and Baruc redde in the eeris of hem.
16 १६ असे झाले की, जेव्हा त्यांनी सर्व वचने ऐकली तेव्हा प्रत्येक मनुष्य भयभीत होऊन एकमेकांकडे वळले. ते बारूखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने खचित राजाला कळवतो.”
Therfor whanne thei hadden herd alle the wordis, thei wondriden ech man to his neiybore, and thei seiden to Baruc, Owen we to telle to the kyng alle these wordis?
17 १७ मग ते बारूखाला म्हणाले, “तू यिर्मायाच्या तोंडची सर्व वचने कशी लिहीली, हे आम्हास सांग?”
And thei axiden hym, and seiden, Schewe thou to vs, hou thou hast write alle these wordis of his mouth.
18 १८ बारूख त्यांना म्हणाला, “त्याने ही सर्व वचने मला सांगितली व मी ते शाईने या पटावर लिहिली.”
Forsothe Baruc seide to hem, Of his mouth he spak, as redynge to me, alle these wordis; and Y wroot in a book with enke.
19 १९ मग ते अधिकारी बारूखाला म्हणाले, “जा, तू स्वतः आणि यिर्मयासुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.”
And alle the princes seiden to Baruc, Go, be thou hid, thou and Jeremye; and no man wite where ye ben.
20 २० मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले व त्यांनी त्यास ही वचने कळवली.
And thei entriden to the kyng, in to the halle; forsothe thei bitoken the book to be kept in to the treserie of Elisame, the scryuen. And thei telden alle the wordis, in audience of the kyng.
21 २१ राजाने यहूदीला ती गुंडाळी आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा चिटणीसाच्या खोलीतून गुंडाळी घेतली. नंतर यहूदीने तो राजाला व त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्याने वाचून दाखविला.
Therfor the kyng sente Judi, that he schulde take the book. Which took the book fro the treserie of Elysame, the scryuen, and redde in audience of the kyng, and of alle the princes, that stoden aboute the kyng.
22 २२ आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती.
Forsothe the kyng sat in the wyntir hous, in the nynthe monethe; and a panne ful of coolis was set bifore hym.
23 २३ तेव्हा असे झाले की, यहूदीने तीन चार पाने वाचल्यावर राजाने चाकूने ते कापले आणि ती सर्व गुंडाळी शेगडीतल्या विस्तवात नष्ट होऊन जाईपर्यंत त्याने त्यामध्ये फेकून दिली.
And whanne Judi hadde red thre pagyns, ethir foure, he kittide it with the knyf of a scryueyn, and castide in to the fier, `that was in the panne, til al the book was wastid bi the fier, that was on the panne.
24 २४ परंतु राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकले तरी ते घाबरले नाहीत, त्यांनी आपले वस्त्रेही फाडली नाहीत.
And the kyng and alle hise seruauntis, that herden alle these wordis, dredden not, nethir to-renten her clothis.
25 २५ राजाने ती गुंडाळी जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी त्यास विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही.
Netheles Elnathan, and Dalaie, and Gamarie ayenseiden the kyng, that he schulde not brenne the book; and he herde not hem.
26 २६ यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.
And the kyng comaundide to Jeremyel, sone of Amalech, and to Saraie, sone of Esreel, and to Selemye, sone of Abdehel, that thei schulden take Baruc, the writer, and Jeremye, the profete; forsothe the Lord hidde hem.
27 २७ नंतर राजाने गुंडाळी व जी वचने बारूखाने यिर्मयाच्या मुखापासून ऐकून लिहीली होती ती जाळल्यावर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
And the word of the Lord was maad to Jeremye, the profete, aftir that the kyng hadde brent the book and wordis, whiche Baruc hadde write of Jeremyes mouth;
28 २८ परत जा, तू आपल्यासाठी दुसरी गुंडाळी घे आणि जी मुळची वचने पहिल्या गुंडाळीत होती, जी यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळली, ती सर्व त्यामध्ये लिही.
and he seid, Eft take thou another book, and write therynne alle the former wordis, that weren in the firste book, which Joachym, the kyng of Juda, brente.
29 २९ मग तू यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला सांग परमेश्वर असे म्हणतो, तू ही गुंडाळी जाळली व म्हणालास, खचित “बाबेलाचा राजा येईल आणि या देशाचा नाश करील व यातले माणसे व पशू या दोघांचाही नाश करील, असे हिच्यात तू का लिहीले आहे?”
And thou schalt seie to Joachym, kyng of Juda, The Lord seith these thingis, Thou brentist that book, and seidist, What hast thou write therynne, tellynge, The kyng of Babiloyne schal come hastynge, and schal distrie this lond, and schal make man and beeste to ceesse therof?
30 ३० म्हणून, यहूदाचा राजा यहोयाकीम याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, त्यास दावीदाच्या सिंहासनावर बसायला कोणी राहणार नाही. तर त्याचे प्रेत दिवसातल्या उन्हात आणि रात्रीतल्या थंडीत बाहेर टाकण्यात येईल.
Therfor the Lord seith these thingis ayens Joachym, king of Juda, Noon schal be of hym, that schal sitte on the seete of Dauid; and his careyn schal be cast forth to the heete bi dai, and to the forst bi niyt.
31 ३१ कारण मी त्याला, त्याच्या वंशजाला व त्याच्या सेवकांना त्यांच्या अन्यायामुळे मी शिक्षा करीन आणि जे सर्व अरिष्ट मी त्यांच्यावर व यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर व यहूदाच्या प्रत्येक व्यक्तीवर आणीन.
And Y schal visite ayens hym, and ayens his seed, and ayens hise seruauntis, her wickidnessis. And Y schal bryng on hem, and on the dwelleris of Jerusalem, and on the men of Juda, al the yuel which Y spak to hem, and thei herden not.
32 ३२ मग यिर्मयाने दुसरी गुंडाळी घेतली व ती नेरीयाचा मुलगा बारूख लेखकाला दिली. आणि जी गुंडाळी यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने अग्नीत जाळली होती तिच्यातील सर्व वचने त्याने यिर्मयाच्या तोंडून ऐकून तिच्यात लिहीली. आणखी त्यामध्ये तशाच दुसऱ्या पुष्कळ वचनांची भर घातली.
Forsothe Jeremye took an other book, and yaf it to Baruc, the writer, the sone of Nerie, which wroot therynne of Jeremyes mouth alle the wordis of the book, which book Joachym, the kyng of Juda, hadde brent bi fier; and ferthermore many mo wordis weren addid than weren bifore.