< यिर्मया 32 >
1 १ यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे नबुखद्नेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले.
वह कलाम जो शाह — ए — यहूदाह सिदक़ियाह के दसवें बरस में जो नबूकदनज़र का अट्ठारहवाँ बरस था, ख़ुदावन्द की तरफ़ से यरमियाह पर नाज़िल हुआ।
2 २ त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता.
उस वक़्त शाह — ए — बाबुल की फ़ौज येरूशलेम का घिराव किए पड़ी थी, और यरमियाह नबी शाह — ए — यहूदाह के घर में क़ैदख़ाने के सहन में बन्द था।
3 ३ यहूदाचा राजा सिद्कीया याने त्यास कैद केले होते आणि म्हणाला, तू का भविष्य करतो व म्हणतो परमेश्वर असे म्हणतो, पाहा, हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन आणि तो ते घेईल.
क्यूँकि शाह — ए — यहूदाह सिदक़ियाह ने उसे यह कह कर क़ैद किया, तू क्यूँ नबुव्वत करता और कहता है, कि 'ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है कि: देख, मैं इस शहर को शाह — ए — बाबुल के हवाले कर दूँगा, और वह उसे ले लेगा;
4 ४ आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातातून सुटणार नाही, कारण तो खरोखर बाबेलाच्या राजाच्या हाती दिला जाईल. व त्याच्याशी समोरासमोर बोलेल आणि तो आपल्या डोळ्यांनी राजाला पाहील.
और शाह — ए — यहूदाह सिदक़ियाह कसदियों के हाथ से न बचेगा, बल्कि ज़रूर शाह — ए — बाबुल के हवाले किया जाएगा, और उससे आमने — सामने बातें करेगा और दोनों की आँखें सामने होंगी।
5 ५ कारण सिद्कीया बाबेलाला जाईल आणि मी परमेश्वर असे म्हणतो की मी त्याची भेट घेईपर्यंत तो तेथे राहील. जरी तुम्ही खास्द्यांशी लढला तरी तुम्ही यशस्वी होणार नाही.
और वह सिदक़ियाह को बाबुल में ले जाएगा, और जब तक मैं उसको याद न फ़रमाऊँ वह वहीं रहेगा, ख़ुदावन्द फ़रमाता है। हरचन्द तुम कसदियों के साथ जंग करोगे, लेकिन कामयाब न होगे?
6 ६ यिर्मया म्हणाला, “परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले व म्हणाले,
तब यरमियाह ने कहा कि “ख़ुदावन्द का कलाम मुझ पर नाज़िल हुआ और उसने फ़रमाया
7 ७ पाहा, तुझा काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि म्हणेल जे माझे शेत अनाथोथात आहे ते तू आपल्यासाठी विकत घे, कारण ते खरेदी करण्याचा अधिकार तुझा आहे.
देख, तेरे चचा सलूम का बेटा हनमएल तेरे पास आकर कहेगा कि 'मेरा खेत जो 'अन्तोत में है, अपने लिए ख़रीद ले; क्यूँकि उसको छुड़ाना तेरा हक़ है।
8 ८ मग, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे माझ्या काकाचा मुलगा हानामेल, पहारेकऱ्यांच्या चौकात माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बन्यामीन देशातल्या अनाथोथात जे माझे शेत आहे ते तू विकत घे. कारण वतन करून घेण्याचा व ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा अधिकार तुझा आहे. ते आपणासाठी विकत घे. तेव्हा मला कळले की हे परमेश्वराचे वचन आहे.
तब मेरे चचा का बेटा हनमएल क़ैदख़ाने के सहन में मेरे पास आया, और जैसा ख़ुदावन्द ने फ़रमाया था, मुझसे कहा कि, मेरा खेत जो 'अन्तोत में बिनयमीन के 'इलाक़े में है, ख़रीद ले; क्यूँकि यह तेरा मौरूसी हक़ है और उसको छुड़ाना तेरा काम है, उसे अपने लिए ख़रीद ले।” तब मैंने जाना कि ये ख़ुदावन्द का कलाम है।
9 ९ म्हणून मी माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्याकडून अनाथोथातले ते शेत विकत घेतले आणि मी त्यास सतरा शेकेल रुपे मोजून दिले.
'और मैंने उस खेत को जो 'अन्तोत में था, अपने चचा के बेटे हनमएल से ख़रीद लिया और नक़द सत्तर मिस्काल चांदी तोल कर उसे दी।
10 १० नंतर मी खरेदीखतावर सही केली आणि मोहोरबंद केले आणि ते साक्षीला साक्षीदार ठेवले. मग मी तागडीने रुपे मोजले.
और मैंने एक कबाला लिखा और उस पर मुहर की और गवाह ठहराए, और चाँदी तराजू में तोलकर उसे दी
11 ११ पुढे मी खरेदीखत जे नियमाप्रमाणे व रीतीप्रमाणे मोहोरबंद केलेले होते ते आणि जे मोहोरबंद नव्हते तेही घेतले,
तब मैंने उस क़बाले को लिया, या'नी वह जो क़ानून और दस्तूर के मुताबिक़ सर — ब — मुहर था, और वह जो खुला था;
12 १२ माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्यासमक्ष आणि ज्या साक्षीदारांनी खरेदीखतावर सही केली होती त्यांच्यासमक्ष आणि जे सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले होते त्यांच्यासमक्ष, मी ते खरेदीखत महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा बारूख याच्या हाती दिले.
और मैंने उस क़बाले को अपने चचा के बेटे हनमएल के सामने और उन गवाहों के सामने जिन्होंने अपने नाम क़बाले पर लिखे थे, उन सब यहूदियों के सामने जो क़ैदख़ाने के सहन में बैठे थे, बारूक — बिन — नेयिरियाह — बिन — महसियाह को सौंपा।
13 १३ म्हणून त्यांच्यासमोर मी बारूखाला आज्ञा केली. मी म्हणालो,
और मैंने उनके सामने बारूक की ताकीद की
14 १४ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, हे मोहोरबंद केलेले खरेदीखत व मोहोरबंद नसलेले खरेदीखत यांच्या पावत्या घे. त्या दीर्घकाळ राहाव्या म्हणून नवीन पात्रात घालून ठेव.
कि 'रब्ब — उल — अफ़वाज, इस्राईल का ख़ुदा, यूँ फ़रमाता है कि: यह काग़ज़ात ले, या'नी यह क़बाला जो सर — ब — मुहर है, और यह जो खुला है, और उनको मिट्टी के बर्तन में रख ताकि बहुत दिनों तक महफ़ूज़ रहें।
15 १५ कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, या देशात पुन्हा घरे, शेते आणि द्राक्षमळे खरेदी करण्यात येतील.
क्यूँकि रब्ब — उल — अफ़वाज, इस्राईल का ख़ुदा, यूँ फ़रमाता है कि: इस मुल्क में फिर घरों और ताकिस्तानों की ख़रीद — ओ — फ़रोख्त होगी।
16 १६ नेरीयाचा मुलगा बारूख ह्याला खरेदीखताची पावती दिल्यावर, मी परमेश्वराची प्रार्थना केली आणि म्हणालो,
'बारूक — बिन — नेयिरियाह को क़बाला देने के बा'द, मैंने ख़ुदावन्द से यूँ दुआ की:
17 १७ अहा, प्रभू परमेश्वरा! पाहा! तू एकट्याने आपल्या महान सामर्थ्याने व आपला उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुला खूप अवघड आहे असे म्हणण्यास काहीच नाही.
'आह, ऐ ख़ुदावन्द ख़ुदा! देख, तूने अपनी 'अज़ीम क़ुदरत और अपने बुलन्द बाज़ू से आसमान और ज़मीन को पैदा किया, और तेरे लिए कोई काम मुश्किल नहीं है;
18 १८ परमेश्वर, तू हजारोंना विश्वासाचा करार दाखवतो व मनुष्यांचे अन्याय त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांच्या पदरी ओततो. तू थोर व सामर्थ्यवान देव आहेस. सेनाधीश परमेश्वर तुझे नाव आहे.
तू हज़ारों पर शफ़क़त करता है, और बाप — दादा की बदकिरदारी का बदला उनके बाद उनकी औलाद के दामन में डाल देता है; जिसका नाम ख़ुदा — ए — 'अज़ीम — ओ — क़ादिर रब्ब — उल — अफ़वाज है;
19 १९ तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.
मश्वरत में बुज़ुर्ग, और काम में क़ुदरत वाला है; बनी — आदम की सब राहें तेरे ज़ेर — ए — नज़र हैं; ताकि हर एक को उसके चाल चलन के मुवाफ़िक़ और उसके 'आमाल के फल के मुताबिक़ बदला दे।
20 २० तू मिसर देशात चिन्ह व चमत्कार केलेस. आजपर्यंत येथे इस्राएलात आणि सर्व मानवजातीत तू आपल्या नावाची किर्ती केली आहे.
जिसने मुल्क — ए — मिस्र में आज तक, और इस्राईल और दूसरे लोगों में निशान और 'अजायब दिखाए और अपने लिए नाम पैदा किया, जैसा कि इस ज़माने में है।
21 २१ कारण तू आपले लोक इस्राएलांना चिन्ह आणि चमत्कारांनी, आपला सामर्थ्यवान हाताने, बाहू उभारून आणि मोठ्या दहशतीने मिसरामधून बाहेर आणलेस.
क्यूँकि तू अपनी क़ौम इस्राईल को मुल्क — ए — मिस्र से निशान और 'अजायब और क़वी हाथ और बलन्द बाज़ू से, और बड़ी हैबत के साथ निकाल लाया;
22 २२ नंतर तू त्यांच्या पूर्वजांना दूध व मध वाहण्याचा हा जो देश देण्याची शपथ वाहिली. तो हाच देश तू त्यांना दिला.
और यह मुल्क उनको दिया जिसे देने की तूने उनके बाप — दादा से क़सम खायी थी ऐसा मुल्क जिसमे दूध और शहद बहता है।
23 २३ आणि त्यांनी प्रवेश केला आणि त्याचा ताबा घेतला. पण त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही किंवा तुझ्या नियमाचे आज्ञापालन केले नाही. त्यांना तू जे करण्याची आज्ञा दिली होती त्यांनी काहीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर ही सर्व संकटे आणली.
और वह आकर उसके मालिक हो गए, लेकिन वह न तेरी आवाज़ को सुना और न तेरी शरी'अत पर चले, और जो कुछ तूने करने को कहा उन्होंने नहीं किया। इसलिए तू यह सब मुसीबत उन पर लाया।
24 २४ पाहा! हे नगर काबीज करण्यासाठी वेढे घातले आहेत. कारण तलवार, दुष्काळ आणि मरी, यामुळे हे नगर जे खास्दी त्याविरूद्ध लढाई करतात त्यांच्या हाती देण्यात आले आहे. कारण तू जे काही बोललास ते घडले आहे. आणि पाहा, ते तू पाहिले आहे.
दमदमों को देख, वह शहर तक आ पहुँचे हैं कि उसे फ़तह कर लें, और शहर तलवार और काल और वबा की वजह से कसदियों के हवाले कर दिया गया है, जो उस पर चढ़ आए और जो कुछ तूने फ़रमाया पूरा हुआ, और तू आप देखता है।
25 २५ तरी तू मला म्हणालास, तू आपल्यासाठी रुप्याने शेत खरेदी कर आणि साक्षीसाठी साक्षीदार बोलाव, जरी मी हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जात आहे.”
तो भी, ऐ ख़ुदावन्द ख़ुदा, तूने मुझसे फ़रमाया कि वह खेत रुपया देकर अपने लिए ख़रीद ले और गवाह ठहरा ले, हालाँकि यह शहर कसदियों के हवाले कर दिया गया।
26 २६ मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
तब ख़ुदावन्द का कलाम यरमियाह पर नाज़िल हुआ:
27 २७ “पाहा! मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे काय?”
देख, मैं ख़ुदावन्द, तमाम बशर का ख़ुदा हूँ, क्या मेरे लिए कोई काम दुश्वार है?
28 २८ यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, हे नगर मी खास्द्यांच्या आणि बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देतो. तो हे काबीज करील.
इसलिए ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है कि: देख, मैं इस शहर को कसदियों के और शाह — ए — बाबुल नबूकदनज़र के हवाले कर दूँगा, और वह इसे ले लेगा;
29 २९ आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तिही जाळून टाकतील.
और कसदी जो इस शहर पर चढ़ाई करते हैं, आकर इसको आग लगाएँगे और इसे उन घरों के साथ जलाएँगे, जिनकी छतों पर लोगों ने बा'ल के लिए ख़ुशबू जलायी और ग़ैरमा'बूदों के लिए तपावन तपाए कि मुझे ग़ज़बनाक करें।
30 ३० कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी निश्चित आपल्या तरुणपणापासून माझ्या दृष्टीने जे वाईट तेच करीत आली आहेत. इस्राएलाच्या लोकांनी आपल्या हातानी प्रत्यक्ष कृती करून त्यांनी खचित माझा अपमान केला आहे.” असे परमेश्वर म्हणत आहे.
क्यूँकि बनी — इस्राईल और बनी यहूदाह अपनी जवानी से अब तक सिर्फ़ वही करते आए हैं जो मेरी नज़र में बुरा है; क्यूँकि बनी — इस्राईल ने अपने 'आमाल से मुझे ग़ज़बनाक ही किया, ख़ुदावन्द फ़रमाता है।
31 ३१ ज्या दिवशी त्यांनी हे नगर बांधले त्यादिवसापासून आतापर्यंत ते माझा क्रोध आणि कोप चेतविण्याचे कारण होत आले आहेत. म्हणून ते मी आपल्यापुढून दूर करीन.
क्यूँकि यह शहर जिस दिन से उन्होंने इसे ता'मीर किया, आज के दिन तक मेरे क़हर और ग़ज़ब का ज़रिया' हो रहा है; ताकि मैं इसे अपने सामने से दूर करूँ
32 ३२ कारण इस्राएल व यहूदातील सर्व लोकांनी, त्यांचे राजे, सरदार, याजक, संदेष्टे आणि यहूदातील प्रत्येक व्यक्तीने व यरूशलेमेत राहणाऱ्यांनी मला कोपविण्यासाठी ज्या दुष्टपणाच्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्वांमुळे मी असे करीन.
बनी — इस्राईल और बनी यहूदाह की तमाम बुराई के ज़रिए' जो उन्होंने और उनके बादशाहों ने, और हाकिम और काहिनों और नबियों ने, और यहूदाह के लोगों और येरूशलेम के बशिन्दों ने की, ताकि मुझे ग़ज़बनाक करें।
33 ३३ “त्यांचे तोंड फिरविण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, जरी मी त्यांना अति उत्सुकतेने शिकविले. मी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एकानेही बोध स्विकारण्यास माझे ऐकले नाही.
क्यूँकि उन्होंने मेरी तरफ़ पीठ की और मुँह न किया, हर चन्द मैंने उनको सिखाया और वक़्त पर ता'लीम दी, तो भी उन्होंने कान न लगाया कि तरबियत पज़ीर हों,
34 ३४ नंतर त्यांनी ज्या घरास माझे नाव ठेवले आहे ते अशुद्ध करण्यास त्यांच्या निंद्य गोष्टी आणून ठेवल्या.
बल्कि उस घर में जो मेरे नाम से कहलाता है, अपनी मकरूहात रख्खीं ताकि उसे नापाक करें।
35 ३५ आणि त्यांनी बआल देवाची जी उंचस्थाने हिन्नोमाच्या मुलाच्या खोऱ्यात आहेत ती त्यांनी आपली मुले व मुली यांचा मोलख देवाला होमार्पण करण्यासाठी बांधली. हे काही करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. आणि यहूदाने पाप करावे म्हणून त्यांनी किळसवाणी गोष्टी कराव्या, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
और उन्होंने बा'ल के ऊँचे मक़ाम जो बिन हिनूम की वादी में हैं बनाए, ताकि अपने बेटों और बेटियों को मोलक के लिए आग में से गुज़ारें, जिसका मैंने उनको हुक्म नहीं दिया और न मेरे ख़याल में आया कि वह ऐसा मकरूह काम करके यहूदाह को गुनाहगार बनाएँ।
36 ३६ म्हणून आता, ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता, हे तलवार, दुष्काळ व मरीने बाबेलाच्या राजाच्या हाती देण्यात येईल त्या नगराविषयी मी, परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो,
और अब इस शहर के बारे में, जिसके हक़ में तुम कहते हो, 'तलवार और काल और वबा के वसीले से वह शाह — ए — बाबुल के हवाले किया जाएगा, ख़ुदावन्द, इस्राईल का ख़ुदा, यूँ फ़रमाता है:
37 ३७ पाहा, ज्या प्रत्येक देशात मी आपल्या क्रोधाने, कोपाने आणि महारोषाने त्यांना घालवून दिले आहे, तेथून मी त्यांना गोळा करून परत येथे आणीन आणि त्यांना सुरक्षित राहण्याची शक्ती देईन.
देख, मैं उनको उन सब मुल्कों से जहाँ मैंने उनको गैज़ — ओ — ग़ज़ब और बड़े ग़ुस्से से हॉक दिया है, जमा' करूँगा और इस मक़ाम में वापस लाऊँगा और उनको अम्न से आबाद करूँगा।
38 ३८ ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.
और वह मेरे लोग होंगे और मैं उनका ख़ुदा हूँगा।
39 ३९ त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजानी त्यांच्या चांगल्यासाठी प्रत्येक दिवशी माझा आदर करावा म्हणून मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.
मैं उनको यकदिल और यकरविश बना दूँगा, और वह अपनी और अपने बाद अपनी औलाद की भलाई कि लिए हमेशा मुझसे डरते रहेंगे।
40 ४० आणि मी त्याजशी सर्वकाळचा करार करीन. तो असा की, मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपला आदर त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत.
मैं उनसे हमेशा का 'अहद करूँगा कि उनके साथ भलाई करने से बाज़ न आऊँगा, और मैं अपना ख़ौफ़ उनके दिल में डालूँगा ताकि वह मुझसे फिर न जाएँ।
41 ४१ नंतर मी त्यांचे चांगले करण्यास आनंद करीन. मी आपल्या सर्व अंत: करणाने आणि जिवाने त्यांची या देशात प्रामाणिकपणे लागवड करेन.
हाँ, मैं उनसे ख़ुश होकर उनसे नेकी करूँगा, और यक़ीनन दिल — ओ — जान से उनको इस मुल्क में लगाऊँगा।
42 ४२ परमेश्वर असे म्हणतो, जसे मी हे सर्व मोठे अरिष्ट या लोकांवर आणले आहे, तसे ज्या चांगल्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोललो आहे, त्या मी सर्व त्यांच्यासाठी करीन.
“क्यूँकि ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है कि: जिस तरह मैं इन लोगों पर यह तमाम बला — ए — 'अज़ीम लाया हूँ, उसी तरह वह तमाम नेकी जिसका मैंने उनसे वा'दा किया है, उनसे करूँगा।
43 ४३ ज्या देशाविषयी तुम्ही म्हणता, ‘हे ओसाड आहे, तेथे कोणी मनुष्य व पशू नाहीत. तो खास्द्यांच्या हाती दिला आहे, मग त्या या देशात शेते खरेदी करतील.
और इस मुल्क में जिसके बारे में तुम कहते हो कि 'वह वीरान है, वहाँ न इंसान है न हैवान, वह कसदियों के हवाले किया गया,' फिर खेत ख़रीदे जाएँगे।
44 ४४ बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतीच्या प्रदेशातील व यहूदातील नगरांत व डोगराळ प्रदेशाच्या नगरात व तळवटीच्या नगरात व नेगेबच्या नगरात लोक रुप्याने शेते खरेदी करतील आणि खरेदीखतावर सह्या घेऊन मोहोरबंद करतील व साक्षीदार बोलावून आणतील. कारण त्यांचे बंदिवासात गेलेले परत येतील. असे परमेश्वर म्हणत आहे.
बिनयमीन के ''इलाक़े में और येरूशलेम के 'इलाक़े में और यहूदाह के शहरों में और पहाड़ी के, और वादी के, और दख्खिन के शहरों में लोग रुपया देकर खेत ख़रीदेंगे; और क़बाले लिखाकर उन पर मुहर लगाएँगे और गवाह ठहराएँगे, क्यूँकि मैं उनकी ग़ुलामी को ख़त्म कर दूँगा, ख़ुदावन्द फ़रमाता है।”