< यिर्मया 31 >
1 १ परमेश्वर असे म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व कुळांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”
“उस समय,” यह याहवेह की वाणी है, “मैं इस्राएल के सारे परिवारों का परमेश्वर हो जाऊंगा तथा वे मेरी प्रजा ठहरेंगी.”
2 २ परमेश्वर असे म्हणतोः “मी इस्राएलास विसावा देण्यास येईन तेव्हा जे कोणी तलवारीपासून निभावले आहेत त्या लोकांस रानात अनुग्रह मिळेल.”
यह याहवेह की वाणी है: “वे लोग, जो तलवार प्रहार से उत्तरजीवित रह गए, जब इस्राएल ने चैन की खोज की; उन्हें निर्जन क्षेत्र में आश्रय प्राप्त हो गया.”
3 ३ परमेश्वर पूर्वी मला दिसला व म्हणाला, हे इस्राएला, मी सार्वकालिक प्रीतीने, तुझ्यावर प्रीती केली आहे. म्हणून मी विश्वासाच्या कराराने तुला आपल्याजवळ ओढून घेतले आहे.
सुदूर देश में याहवेह उसके समक्ष प्रकट हुए, याहवेह ने उससे यह बात की: “मैंने तुम्हें, मेरे लोगों को, अनश्वर प्रेम से प्रेम किया है, इसलिये मैंने तुम्हें अत्यंत प्रेमपूर्वक अपनी ओर आकर्षित किया है.
4 ४ हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.
तब मैं पुनः तुम्हारा निर्माण करूंगा, और तुम निर्मित हो जाओगी, कुंवारी इस्राएल तुम पुनः खंजरी उठाओगी तथा उनमें सम्मिलित हो जाओगी, जो आनन्दमग्न हो रहे होंगे.
5 ५ तू पुन्हा शोमरोनाच्या डोंगरावर द्राक्षमळ्यांची लागवड करशील. शेतकरी लागवड करतील आणि त्याच्या फळांचा चांगला उपयोग होईल.
शमरिया की पहाड़ियों पर पुनः द्राक्षालता रोपण प्रारंभ हो जाएगा; रोपक इन्हें रोपेंगे ओर उनका सेवन करेंगे.
6 ६ असा एक दिवस येईल की, त्यामध्ये एफ्राईमाच्या डोंगरावरील पहारेकरी ओरडून सांगतील. उठा, आपण परमेश्वर आपला देव याच्याकडे वर सियोनेला जाऊ.
क्योंकि एक दिन ऐसा भी आएगा जब एफ्राईम के पर्वतों से प्रहरी पुकारेंगे, ‘चलो-चलो, हमें याहवेह हमारे परमेश्वर के समक्ष ज़ियोन को जाना है.’”
7 ७ परमेश्वर असे म्हणतो, “याकोबासाठी आनंदाचा गजर करा! राष्ट्रांतील प्रमुख लोकांसाठी आनंदाने जयघोष करा! ऐकू येईल अशी स्तुती करा. म्हणा, ‘हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचे, इस्राएलाच्या वाचलेल्यांचे तारण कर.’
क्योंकि अब याहवेह का यह आदेश है: “हर्षोल्लास में याकोब के लिए गायन किया जाए; तथा राष्ट्रों के प्रमुख के लिए जयघोष किया जाए. स्तवन के साथ यह वाणी की जाए, ‘याहवेह, अपनी प्रजा को उद्धार प्रदान कीजिए, उनको, जो इस्राएल के बचे हुए लोग हैं.’
8 ८ पाहा, मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून आणीन, पृथ्वीच्या अगदी शेवटच्या ठिकाणाहून मी त्यांना एकत्र करीन. त्यांच्यामध्ये आंधळे आणि पंगू, गर्भवती आणि ज्या कोणी त्यांच्या प्रसूतीची वेळ आली असेल त्याही त्यांच्याबरोबर असतील. त्यांची मोठी मंडळी इकडे परत येईल.
यह देखना, कि मैं उन्हें उत्तरी देश से लेकर आऊंगा, मैं उन्हें पृथ्वी के दूर क्षेत्रों से एकत्र करूंगा. उनमें ये सभी होंगे: नेत्रहीन, अपंग, गर्भवती स्त्री तथा वह जो प्रसूता है; एक साथ यह विशाल जनसमूह होगा, जो यहां लौट आएगा.
9 ९ ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन. ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.
वे रोते हुए लौटेंगे; तथा वे प्रार्थना करेंगे और मैं उनका मार्गदर्शन करूंगा. मैं उन्हें जलधाराओं के निकट से लेकर आऊंगा, उनका मार्ग सीधा समतल होगा, जिस पर उन्हें ठोकर नहीं लगेगी, क्योंकि मैं इस्राएल के लिए पिता हूं, तथा एफ्राईम मेरा पहलौठा पुत्र है.
10 १० राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा. तुम्ही राष्ट्रांनी म्हणावे, ज्याने इस्राएल विखरला तोच त्यास एकवटील आणि जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो तसा तो त्यास राखील.
“राष्ट्रों, याहवेह का संदेश सुनो, दूर तटवर्ती क्षेत्रों में घोषणा करो; जिसने इस्राएल को छिन्न-भिन्न कर दिया है: वही उन्हें एकत्र भी करेगा, वह उन्हें इस प्रकार सहेजेगा, जिस प्रकार चरवाहा अपनी भेड़-बकरियों को.
11 ११ कारण परमेश्वराने खंडणी भरून याकोबाला सोडवले आहे आणि त्याच्यासाठी जो खूप बलवान होता त्याच्या हातातून त्यास मुक्त केले आहे.
क्योंकि याहवेह ने मूल्य चुका कर याकोब को छुड़ा लिया है तथा उसे उसके बंधन से विमुक्त कर दिया है, जो उससे सशक्त था.
12 १२ मग ते येतील आणि सियोनेच्या शिखरावर आनंदाने गातील. परमेश्वराच्या चांगुलपणामुळे धान्यासाठी आणि द्राक्षरसासाठी, तेलासाठी, आणि थवा व कळपांची संततीसाठी आनंदित होऊन येतील. त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते पुन्हा कधी दुःखीत होणार नाहीत.
वे लौटेंगे तथा ज़ियोन की ऊंचाइयों पर आकर हर्षोल्लास करेंगे; याहवेह की कृपादृष्टि के कारण वे आनंदित हो जाएंगे— अन्न, नई दाखमधु तथा प्रचूर तेल के कारण, भेड़ों एवं पशुओं के बच्चों के कारण. उनका जीवन सिंचित उद्यान सदृश होगा, वे पुनः अंत न होंगे.
13 १३ मग कुमारी आनंदीत होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध एकत्र आनंद करतील. कारण मी त्यांच्या शोकाचे रुपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्याऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल.
तब कुंवारी कन्या का हर्ष नृत्य में फूट पड़ेगा इसमें जवान एवं प्रौढ़, दोनों ही सम्मिलित हो जाएंगे. क्योंकि मैं उनकी छाया को उल्लास में परिवर्तित कर दूंगा; मैं उनके शोक को आनंद में ढाल कर उन्हें सांत्वना प्रदान करूंगा.
14 १४ नंतर मी याजकांचा जीव विपुलतेत तृप्त करीन. माझे लोक ते स्वतःला माझ्या चांगुलपणाने भरतील.” असे परमेश्वर म्हणतो.
मेजवानी ऐसी होगी कि पुरोहितों के प्राण तृप्त हो जाएंगे, तथा मेरी प्रजा मेरे द्वारा किए गए कल्याण पर संतुष्ट हो जाएगी,” यह याहवेह की वाणी है.
15 १५ परमेश्वर असे म्हणतो, “रामांत विलाप आणि अतिखेदाचे रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे. ती नाहीत म्हणून सांत्वन पावत नाही.”
याहवेह की बात यह है: “रामाह नगर में एक शब्द सुना गया, रोना तथा घोर विलाप! राहेल अपने बालकों के लिए रो रही है. धीरज उसे स्वीकार नहीं क्योंकि अब वे हैं ही नहीं.”
16 १६ परमेश्वर असे म्हणतो, तू रडण्यापासून आपला आवाज आणि आपले डोळे आसवांपासून आवर. कारण तुझ्या दुःखाचे प्रतिफळ तुला मिळेल. असे परमेश्वर म्हणतो. तुझी मुले शत्रूंच्या देशातून परत येतील.
याहवेह का आदेश है: “अपने रुदन स्वर को नियंत्रित करो तथा अपनी अश्रुधारा को प्रतिबद्ध करो, क्योंकि तुम्हारे श्रम को पुरस्कृत किया जाएगा,” यह याहवेह की वाणी है. “वे शत्रु के देश से लौट आएंगे.
17 १७ परमेश्वर असे म्हणत आहे, “तुझ्या भविष्यासाठी तुला आशा आहे.” “तुझे वंशज आपल्या सीमेत परत येतील.
तुम्हारा सुखद भविष्य संभव है,” यह याहवेह की वाणी है. “तुम्हारे वंशज निज भूमि में लौट आएंगे.
18 १८ खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
“वस्तुस्थिति यह है कि मैंने एफ्राईम का विलाप करना सुना है: ‘जिस प्रकार उद्दंड बछड़े को प्रताड़ित किया जाता है उसी प्रकार आपने मुझे भी प्रताड़ित किया है, और मैंने इससे शिक्षा ग्रहण की है. मुझे अपनी उपस्थिति में ले आइए, कि मैं पूर्ववत हो जाऊं, क्योंकि याहवेह, आप ही मेरे परमेश्वर हैं.
19 १९ कारण मी तुझ्यापासून भटकल्यानंतर, मी पश्चाताप केला. मला शिक्षण मिळाल्यानंतर, मी दुःखात आपल्या छातीवर थापा मारल्या. कारण माझ्या तरुणपणातील अपराधाच्या अपकीर्तीमुळे मी लज्जित व शरमिंदा झालो.”
जब मैं आपसे दूर हो गया था, तब मैंने लौटकर पश्चात्ताप किया; जब मेरी समझ में आ गया, तब मैंने अपनी छाती पीटी; मुझे लज्जित होना पड़ा. तथा मेरी प्रतिष्ठा भी भंग हो गई क्योंकि मैं अपनी जवानी की लांछना लिए हुए चल रहा था.’
20 २० एफ्राईम माझे बहुमूल्य मुल नाही काय? तो माझा प्रिय मोहक मुलगा नाही का? कारण जरी कधी मी त्याच्याविरुध्द बोललो, तरी खचित मी त्यास आपल्या मनात प्रेमाने आठवण करीतच असतो. याप्रकारे माझे हृदय त्याच्यासाठी कळवळते. मी खरोखर त्याच्यावर दया करीन. असे परमेश्वर म्हणतो.
क्या एफ्राईम मेरा प्रिय पुत्र है, क्या वह सुखदायक संतान है? वस्तुतः जब-जब मैंने उसके विरोध में कुछ कहा, मैंने उसे प्रेम के साथ ही स्मरण किया. इसलिये मेरा हृदय उसकी लालसा करता रहता है; इसमें कोई संदेह नहीं कि मैं उस पर अनुकम्पा करूंगा,” यह याहवेह की वाणी है.
21 २१ तू आपल्यासाठी रस्त्यांवर खुणा कर. तू आपल्यासाठी मार्गदर्शक खांब ठेव. तू जो योग्य मार्ग घेतला, त्या मार्गावर आपले लक्ष ठेव. हे इस्राएला! कुमारी, तू आपल्या नगराकडे परत ये.
“अब अपने लिए मार्ग निर्देश नियत कर लो; अपने लिए तोड़ सूचक खड़े कर लो. तुम्हारा ध्यान राजपथ की ओर लगा रहे, उसी मार्ग पर, जिससे तुम गए थे. कुंवारी इस्राएल, लौट आओ, लौट आओ अपने इन्हीं नगरों में.
22 २२ विश्वासहीन मुली, तू किती वेळ सतत हेलकावे घेशील? कारण परमेश्वराने पृथ्वीवर काहीतरी नवे निर्माण केले आहे. स्त्री तिच्या रक्षणासाठी बलवान पुरुषाला घेरील.
हे भटकने वाली कन्या, कब तक तुम यहां वहां भटकती रहोगी? याहवेह ने पृथ्वी पर एक अपूर्व परिपाटी प्रचलित कर दी है— अब पुरुष के लिए स्त्री सुरक्षा घेरा बनेगी.”
23 २३ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी लोकांस परत त्यांच्या देशात आणीन, यहूदाच्या नगरांत व देशात राहणारे ते हे म्हणतील, ‘तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करो!
इस्राएल के परमेश्वर, सेनाओं के याहवेह की यह वाणी है: “जब मैं उनकी समृद्धि लौटा दूंगा, तब यहूदिया देश में तथा उसके नगरों में पुनः ‘उनके मुख से ये वचन निकलेंगे, पवित्र पर्वत, पूर्वजों के आश्रय, याहवेह तुम्हें आशीष दें.’
24 २४ कारण यहूदा आणि त्याची सर्व नगरे एकत्र राहतील. तेथे शेतकरी आणि मेंढपाळ त्याच्या कळपाबरोबर राहतील.
यहूदिया के सभी नगरों के निवासी, किसान तथा चरवाहे अपने पशुओं सहित वहां एक साथ निवास करेंगे.
25 २५ कारण मी थकलेल्यांना पिण्यास पाणी देईन आणि तहानेने व्याकुळ झालेल्या प्रत्येक जीवास भरेन.
क्योंकि मैं थके हुए व्यक्ति में संतोष, तथा हताश व्यक्ति में उत्साह का पुनःसंचार करता हूं.”
26 २६ यानंतर, मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की, माझी झोप ताजीतवानी करणारी होती.
यह सुन मैं जाग पड़ा. उस समय मुझे यह बोध हुआ कि मेरी निद्रा मेरे लिए सुखद अनुभूति छोड़ गई है.
27 २७ परमेश्वराचे म्हणणे असे आहे. “पाहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी यहूदाच्या व इस्राएलाच्या घराण्यांत मनुष्यबीज आणि पशुबीज पेरीन.
“यह देखना, वे दिन आ रहे हैं,” यह याहवेह की वाणी है, “जब मैं इस्राएल के परिवार में तथा यहूदिया के परिवार में मनुष्य का तथा पशु का बीज रोपित करूंगा.
28 २८ मग असे होईल की, उपटायला व पाडायला, मोडायला व नाशाला, व पीडायला जशी मी त्यांच्यावर नजर ठेवत असे, तशी बांधायला व लावायला मी त्यांच्यावर नजर ठेवीत जाईन.” असे परमेश्वर म्हणतो.
जिस प्रकार मैं उनके उखाड़ने में, उनके तोड़ने में, उनके पराभव करने में, उनके नष्ट करने में तथा उन पर सर्वनाश लाने में मैं उन पर नजर रखता आया, उसी प्रकार मैं उनका परिरक्षण भी करता रहूंगा, जब वे निर्माण करेंगे तथा रोपण करेंगे,” यह याहवेह की वाणी है.
29 २९ “त्या दिवसात कोणीही पुन्हा असे म्हणणार नाहीत की, वडिलाने आंबट द्राक्षे खाल्ली, पण मुलांचे दात आंबले आहेत.
“उन दिनों में उनके मुख से ये शब्द पुनः सुने नहीं जाएंगे, “‘खट्टे अंगूर तो पूर्वजों ने खाए थे, किंतु दांत खट्टे हुए वंशजों के.’
30 ३० कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येकजण आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील.”
किंतु हर एक की मृत्यु का कारण होगा स्वयं उसी की पापिष्ठता; हर एक व्यक्ति, जो खट्टे अंगूर खाएगा, दांत उसी के खट्टे होंगे.
31 ३१ परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, “मी इस्राएलाच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन.
“यह देख लेना, वे दिन आ रहे हैं,” यह याहवेह की वाणी है, “जब मैं इस्राएल वंश के साथ तथा यहूदिया वंश के साथ एक नयी वाचा स्थापित करूंगा.
32 ३२ मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो.
उस वाचा के सदृश नहीं, जो मैंने उस समय उनके पूर्वजों के साथ स्थापित की थी, जब मैंने उनका हाथ पकड़कर उन्हें मिस्र देश से उनका निकास किया था, यद्यपि मैं उनके लिए पति-सदृश था, उन्होंने मेरी वाचा भंग कर दी,” यह याहवेह की वाणी है.
33 ३३ “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
“किंतु उन दिनों के बाद इस्राएल वंश के साथ मैं इस वाचा की स्थापना करूंगा,” यह याहवेह की वाणी है. “उनके अंतर्मन में मैं अपना व्यवस्था-विधान संस्थापित कर दूंगा तथा उनके हृदय पर मैं इसे लिख दूंगा. मैं उनका परमेश्वर हो जाऊंगा, तथा वे मेरी प्रजा.
34 ३४ नंतर परमेश्वरास ओळखा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत मला ओळखतील.” असे परमेश्वर म्हणतो. “कारण मी त्यांच्या अन्यायांची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”
तब हर एक व्यक्ति अपने पड़ोसी को, हर एक व्यक्ति अपने सजातीय को पुनः यह कहते हुए यह शिक्षा नहीं देने लगेगा, ‘याहवेह को जान लो,’ क्योंकि वे सभी मुझे जान जाएंगे, छोटे से बड़े तक,” यह याहवेह की वाणी है. “क्योंकि मैं उनकी पापिष्ठता क्षमा कर दूंगा तथा इसके बाद उनका पाप मैं पुनः स्मरण ही न करूंगा.”
35 ३५ परमेश्वर असे म्हणतो, जो परमेश्वर दिवसा प्रकाशण्यासाठी सूर्य देतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशण्याची तजवीज करतो. जो समुद्रास खवळतो या करीता त्याच्या लाटा गर्जतात त्यांना तो शांत करतो. सेनाधीश परमेश्वर असे त्याचे नाव आहे. तो असे म्हणतो.
यह याहवेह की वाणी है, जिन्होंने दिन को प्रकाशित करने के लिए सूर्य को स्थित किया है, जिन्होंने चंद्रमा तथा तारों के क्रम को रात्रि के प्रकाश के लिए निर्धारित कर दिया, जो समुद्र को हिलाते हैं कि उसकी लहरों में गर्जन आए— उनका नाम है सेनाओं के याहवेह:
36 ३६ “जर या स्थिर गोष्टी माझ्या दृष्टीपुढून नष्ट झाल्या तर इस्राएलाचे वंशजही माझ्यासमोर सर्वकाळ राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.”
“यदि यह व्यवस्थित विन्यास मेरे समक्ष से विघटित होता है,” यह याहवेह की वाणी है, “तब एक राष्ट्र के रूप में इस्राएल के वंशजों का अस्तित्व भी मेरे समक्ष से सदा-सर्वदा के लिए समाप्त हो जाएगा.”
37 ३७ परमेश्वर असे म्हणतो, जर फक्त उंचात उंच आकाशाचे मोजमाप करणे शक्य असेल, आणि जर फक्त पृथ्वीच्या खालचे पाये शोधून काढता येऊ शकतील, तर मीही इस्राएलाच्या सर्व वंशजांनी जे सर्व काही केले आहे त्यामुळे त्यांना नाकारीन, असे परमेश्वर म्हणतो.
यह याहवेह की वाणी है: “यदि हमारे ऊपर विस्तीर्ण आकाशमंडल का मापा जाना संभव हो जाए तथा भूतल में पृथ्वी की नीवों की खोज निकालना संभव हो जाए, तो मैं भी इस्राएल द्वारा किए गए उन सारे कार्यों के कारण इस्राएल के सभी वंशजों का परित्याग कर दूंगा,” यह याहवेह की वाणी है.
38 ३८ “पाहा असे दिवस येत आहेत की; असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल.
देखना, “वे दिन आ रहे हैं,” यह याहवेह की वाणी है, “जब हनानेल स्तंभ से लेकर कोने के प्रवेश द्वार तक याहवेह के लिए नगर को पुनर्निर्माण किया जाएगा.
39 ३९ मग त्यासाठी मापनसूत्र गारेबाच्या टेकडीपर्यंत नीट पुढे निघून जाईल आणि तेथून गवाथाकडे वळेल.
मापक डोर आगे बढ़ती हुई सीधी गारेब पर्वत तक पहुंच जाएगी, तत्पश्चात वह और आगे बढ़कर गोआह की ओर मुड़ जाएगी.
40 ४० प्रेतांचे व राखेचे पूर्ण खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपऱ्यापर्यंत सर्व शेते परमेश्वरास पवित्र होतील. ती पुन्हा कधीही उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”
शवों तथा भस्म से आच्छादित संपूर्ण घाटी तथा किद्रोन सरिता तक विस्तृत खेत, पूर्व तोड़ के घोड़े-द्वार के कोण तक का क्षेत्र याहवेह के निमित्त पवित्र ठहरेगा. यह क्षेत्र तब सदा-सर्वदा के लिए न तो उखाड़ा जाएगा और न ही ध्वस्त किया जाएगा.”