< यिर्मया 30 >
1 १ यिर्मयाला परमेश्वरापासून जे वचन आले ते हे आहे आणि म्हणाले,
主からエレミヤに臨んだ言葉。
2 २ परमेश्वर, इस्राएलाचा देव, जे काही बोलला, तो म्हणतो, “मी तुझ्याशी बोललेले सर्व वचने आपणासाठी पुस्तकात लिहून ठेव.
「イスラエルの神、主はこう仰せられる、わたしがあなたに語った言葉を、ことごとく書物にしるしなさい。
3 ३ कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.
主は言われる、見よ、わたしがわが民イスラエルとユダの繁栄を回復する日が来る。主がこれを言われる。わたしは彼らを、その先祖に与えた地に帰らせ、彼らにこれを保たせる」。
4 ४ इस्राएलाविषयी व यहूदाविषयी ही परमेश्वराने जाहीर केलेली वचने आहेत.
これは主がイスラエルとユダについて言われた言葉である。
5 ५ कारण परमेश्वर हे म्हणाला, “आम्ही दहशतीने थरथर कापणाऱ्याची वाणी ऐकली आहे शांतीची नाही.
「主はこう仰せられる、われわれはおののきの声を聞いた。恐れがあり、平安はない。
6 ६ विचारा व पाहा जर पुरुष बालकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे? त्या सर्वांची चेहरे फिक्के का पडली आहेत?
子を産む男があるか、尋ねてみよ。どうして男がみな子を産む女のように手を腰におくのをわたしは見るのか。なぜ、どの人の顔色も青く変っているのか。
7 ७ हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही. तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्यांचे रक्षण होईल.
悲しいかな、その日は大いなる日であって、それに比べるべき日はない。それはヤコブの悩みの時である。しかし彼はそれから救い出される。
8 ८ सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.
万軍の主は仰せられる、その日わたしは彼らの首からそのくびきを砕き離し、彼らの束縛を解く。異邦の人はもはや、彼らを使役することをしない。
9 ९ पण परमेश्वर त्यांचा देव याची आणि दावीद त्यांचा राजा ज्याला मी त्यांच्यावर स्थापीन त्याची ते सेवा करतील.
彼らはその神、主と、わたしが彼らのために立てるその王ダビデに仕える。
10 १० परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको. कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही.
主は仰せられる、わがしもべヤコブよ、恐れることはない、イスラエルよ、驚くことはない。見よ、わたしがあなたを救って、遠くからかえし、あなたの子孫を救って、その捕え移された地からかえすからだ。ヤコブは帰ってきて、穏やかに安らかにおり、彼を恐れさせる者はない。
11 ११ कारण परमेश्वर असे म्हणतो, मी तुला तारायला तुम्हाबरोबर आहे. मग मी ज्या राष्ट्रातून तुझी पांगापांग केली आहे. त्या सर्वांचा मी पूर्ण शेवट करीन, पण मी खात्रीने तुझा शेवट करणार नाही, तरी मी तुला न्यायाने शासन करीन आणि खचीत तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.
主は言われる、わたしはあなたと共にいて、あなたを救う。わたしはあなたを散らした国々をことごとく滅ぼし尽す。しかし、あなたを滅ぼし尽すことはしない。わたしは正しい道に従ってあなたを懲らしめる。決して罰しないではおかない。
12 १२ कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे.
主はこう仰せられる、あなたの痛みはいえず、あなたの傷は重い。
13 १३ तुझा वाद चालवणारा कोणीही नाही; तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही.
あなたの訴えを支持する者はなく、あなたの傷をつつむ薬はなく、あなたをいやすものもない。
14 १४ तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.
あなたの愛する者は皆あなたを忘れてあなたの事を心に留めない。それは、あなたのとがが多く、あなたの罪がはなはだしいので、わたしがあだを撃つようにあなたを撃ち、残忍な敵のように懲らしたからだ。
15 १५ तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत.
なぜ、あなたの傷のために叫ぶのか、あなたの悩みはいえることはない。あなたのとがが多く、あなたの罪がはなはだしいので、これらの事をわたしはあなたにしたのである。
16 १६ म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन.
しかし、すべてあなたを食い滅ぼす者は食い滅ぼされ、あなたをしえたげる者は、ひとり残らず、捕え移され、あなたをかすめる者は、かすめられ、すべてあなたの物を奪う者は奪われる者となる。
17 १७ कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.
主は言われる、わたしはあなたの健康を回復させ、あなたの傷をいやす。それは、人があなたを捨てられた者とよび、『だれも心に留めないシオン』というからである。
18 १८ परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी याकोबाच्या डेऱ्याचे भविष्य परत फिरवीन आणि त्याच्या घराण्यावर दया करीन. मग नगर नाशाच्या ढिगाऱ्यावर बांधण्यात येईल आणि ज्याठिकाणी किल्ले होते त्याच जागी पुन्हा होतील.
主はこう仰せられる、見よ、わたしはヤコブの天幕を再び栄えさせ、そのすまいにあわれみを施す。町は、その丘に建てなおされ、宮殿はもと立っていた所に立つ。
19 १९ नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल, कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाहीत.
感謝の歌と喜ぶ者の声とが、その中から出る。わたしが彼らを増すゆえ、彼らは少なくはなく、また彼らを尊ばれしめるゆえ、卑しめられることはない。
20 २० मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन.
その子らは、いにしえのようになり、その会衆はわたしの前に堅く立つ。すべて彼らをしえたげる者をわたしは罰する。
21 २१ त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल. तो त्यांच्यामधूनच निघेल जेव्हा मी त्यास जवळ येऊ देईन आणि जेव्हा तो माझ्याजवळ येईल. कारण जो माझ्याजवळ यायला कोणाची हिंमत आहे? हे परमेश्वराचे निवेदन आहे.
その君は彼ら自身のうちのひとりであり、そのつかさは、そのうちから出る。わたしは彼をわたしに近づけ、彼はわたしに近づく。だれか自分の命をかけてわたしに近づく者があろうかと主は言われる。
22 २२ मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”
あなたがたは、わたしの民となり、わたしはあなたがたの神となる」。
23 २३ पाहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. ते तुफान निरंतर आहे. ते धुव्वा उडविणारी वावटळ दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळेल.
見よ、主の暴風がくる。憤りと、つむじ風が出て、悪人のこうべをうつ。
24 २४ परमेश्वर आपल्या हृदयाचे उद्देश पूर्ण करून सिद्धीस नेईपर्यंत त्याचा संतप्त क्रोध परत जाणार नाही. अंतीम दिवसात, तुम्हास ते समजतील.
主の激しい怒りは、み心に思い定められたことを行って、これを遂げるまで、退くことはない。末の日にあなたがたはこれを悟るのである。