< यिर्मया 3 >

1 ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो.
有話說:人若休妻, 妻離他而去,作了別人的妻, 前夫豈能再收回她來? 若收回她來,那地豈不是大大玷污了嗎? 但你和許多親愛的行邪淫, 還可以歸向我。 這是耶和華說的。
2 डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.
你向淨光的高處舉目觀看, 你在何處沒有淫行呢? 你坐在道旁等候, 好像阿拉伯人在曠野埋伏一樣, 並且你的淫行邪惡玷污了全地。
3 म्हणून वसंत ऋतूतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही. पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा. तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.
因此甘霖停止, 春雨不降。 你還是有娼妓之臉, 不顧羞恥。
4 माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय.
從今以後,你豈不向我呼叫說: 我父啊,你是我幼年的恩主。
5 “तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.”
耶和華豈永遠懷怒,存留到底嗎? 看哪,你又發惡言又行壞事, 隨自己的私意而行。」
6 नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.
約西亞王在位的時候,耶和華又對我說:「背道的以色列所行的,你看見沒有?她上各高山,在各青翠樹下行淫。
7 मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहीण, यहूदाने पाहिले.
她行這些事以後,我說她必歸向我,她卻不歸向我。她奸詐的妹妹猶大也看見了。
8 धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.
背道的以色列行淫,我為這緣故給她休書休她;我看見她奸詐的妹妹猶大,還不懼怕,也去行淫。
9 तिने तिचा राष्ट्र “भ्रष्ट” केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्ती तयार केल्या.
因以色列輕忽了她的淫亂,和石頭木頭行淫,地就被玷污了。
10 १० इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो
雖有這一切的事,她奸詐的妹妹猶大還不一心歸向我,不過是假意歸我。這是耶和華說的。」
11 ११ तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे!
耶和華對我說:「背道的以色列比奸詐的猶大還顯為義。
12 १२ तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहीन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी विश्वासू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही.
你去向北方宣告說: 耶和華說:背道的以色列啊,回來吧! 我必不怒目看你們; 因為我是慈愛的, 我必不永遠存怒。 這是耶和華說的。
13 १३ तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरूद्ध गेलात. प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू अन्य दैवतांसोबत आपले मार्ग वाटून घेतले, आणि माझा शब्द ऐकला नाही, असे परमेश्वर म्हणतो.
只要承認你的罪孽, 就是你違背耶和華-你的上帝, 在各青翠樹下向別神東奔西跑, 沒有聽從我的話。 這是耶和華說的。
14 १४ अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन.
耶和華說:背道的兒女啊,回來吧! 因為我作你們的丈夫, 並且我必將你們從一城取一人, 從一族取兩人,帶到錫安。
15 १५ माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.
我也必將合我心的牧者賜給你們。他們必以知識和智慧牧養你們。」
16 १६ आणि त्या दिवसात असे होईल की, तुम्ही देशात बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल. परमेश्वर असे म्हणतो, त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बनवणार पण नाही.
耶和華說:「你們在國中生養眾多;當那些日子,人必不再提說耶和華的約櫃,不追想,不記念,不覺缺少,也不再製造。
17 १७ त्या वेळेला यरूशलेम बद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरूशलेममध्ये एकत्र येतील. या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.
那時,人必稱耶路撒冷為耶和華的寶座;萬國必到耶路撒冷,在耶和華立名的地方聚集。他們必不再隨從自己頑梗的惡心行事。
18 १८ त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
當那些日子,猶大家要和以色列家同行,從北方之地一同來到我賜給你們列祖為業之地。」
19 १९ मी म्हणालो, मी तुला लेकरांमध्ये कसे ठेवीन? आणि रमणीय देश, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचे सुशोभित वतन, तुला कसे देईन? तेव्हा मी म्हटले तुम्ही मला माझ्या ‘पिता’ असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही.
我說:我怎樣將你安置在兒女之中, 賜給你美地, 就是萬國中肥美的產業。 我又說:你們必稱我為父, 也不再轉去不跟從我。
20 २० पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात. इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.
以色列家,你們向我行詭詐, 真像妻子行詭詐離開她丈夫一樣。 這是耶和華說的。
21 २१ उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, इस्राएली लोक रडत आहेत. कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला, त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.
在淨光的高處聽見人聲, 就是以色列人哭泣懇求之聲, 乃因他們走彎曲之道, 忘記耶和華-他們的上帝。
22 २२ “विश्वासहीन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करीन. पाहा! आम्ही तुझ्याकडे येण्याचे कारण म्हणजे तू आमचा देव परमेश्वर आहेस!”
你們這背道的兒女啊,回來吧! 我要醫治你們背道的病。 看哪,我們來到你這裏, 因你是耶和華-我們的上帝。
23 २३ टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो, खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,
仰望從小山或從大山的喧嚷中得幫助, 真是枉然的。 以色列得救,誠然在乎耶和華-我們的上帝。
24 २४ तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.
從我們幼年以來,那可恥的偶像將我們列祖所勞碌得來的羊群、牛群,和他們的兒女都吞吃了。
25 २५ आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.
我們在羞恥中躺臥吧!願慚愧將我們遮蓋;因為從立國以來,我們和我們的列祖常常得罪耶和華-我們的上帝,沒有聽從耶和華-我們上帝的話。

< यिर्मया 3 >