< यिर्मया 29 >
1 १ बंदिवान करून नेलेल्यांतील राहिलेले वडील याजक, संदेष्टे आणि यरूशलेमेमधून बाबेलास ज्यास नबुखद्नेस्सराने कैद करून नेले होते, त्या सर्व लोकांस यिर्मया संदेष्ट्याने यरूशलेमेहून पत्र पाठवले.
先知耶利米从耶路撒冷寄信与被掳的祭司、先知,和众民,并生存的长老,就是尼布甲尼撒从耶路撒冷掳到巴比伦去的。(
2 २ राजा यकन्या, राजमाता, व उच्च अधिकारी, यहूदाचे व यरूशलेमेचे नेते, व कारागीर हे यरूशलेमेमधून निघून गेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठवले.
这在耶哥尼雅王和太后、太监,并犹大、耶路撒冷的首领,以及工匠、铁匠都离了耶路撒冷以后。)
3 ३ ज्यांना यहूदाचा राजा सिद्कीया याने बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्याकडे एलास शाफानाचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा यांच्या हस्ते पत्र पाठवले.
他借沙番的儿子以利亚萨和希勒家的儿子基玛利的手寄去。他们二人是犹大王西底家打发往巴比伦去见尼布甲尼撒王的。
4 ४ पत्रात असे म्हटले, ज्यांना मी यरूशलेमेहून कैद करून बाबेलास नेण्यास लावले त्या सर्वांना सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे सांगतो,
信上说:“万军之耶和华—以色列的 神对一切被掳去的(就是我使他们从耶路撒冷被掳到巴比伦的人)如此说:
5 ५ “घरे बांधून त्यामध्ये राहा. बागे लावा आणि त्याचे फळ खा.
你们要盖造房屋,住在其中;栽种田园,吃其中所产的;
6 ६ स्त्रिया करा, आणि मुलाला व मुलीला जन्म द्या, नंतर आपल्या मुलांसाठी स्त्रिया करून द्या आणि तुमच्या मुलींना नवरे करून द्या. त्यांनी मुलांना व मुलींना जन्म द्यावा. तेथे तुम्ही वाढा, कमी होऊ नका.
娶妻生儿女,为你们的儿子娶妻,使你们的女儿嫁人,生儿养女。在那里生养众多,不致减少。
7 ७ मी ज्या नगरांत तुम्हास बंदिवान करून न्यायला लावले त्याच्या शांतीसाठी झटा आणि त्यांच्यावतीने माझ्याबरोबर मध्यस्थी करा. कारण त्यांच्या शांतीत तुमची शांती आहे.”
我所使你们被掳到的那城,你们要为那城求平安,为那城祷告耶和华;因为那城得平安,你们也随着得平安。
8 ८ कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “तुमच्यामध्ये असलेले तुमचे संदेष्टे आणि ज्योतिषीह्न्जी यांनी तुम्हास फसवू नये आणि तुम्ही ज्यास आपली स्वप्ने पाहण्यास लावता त्याचे तुम्ही ऐकू नका.
万军之耶和华—以色列的 神如此说:不要被你们中间的先知和占卜的诱惑,也不要听信自己所做的梦;
9 ९ कारण ते माझ्या नामाने लबाड भविष्य सांगतात. मी त्यांना बाहेर पाठविले नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
因为他们托我的名对你们说假预言,我并没有差遣他们。这是耶和华说的。
10 १० कारण परमेश्वर असे म्हणतो, जेव्हा बाबेलाच्या राज्यास सत्तर वर्षे होतील, मी तुम्हास मदत करील आणि तुम्हास या स्थळी परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन.
“耶和华如此说:为巴比伦所定的七十年满了以后,我要眷顾你们,向你们成就我的恩言,使你们仍回此地。
11 ११ कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
耶和华说:我知道我向你们所怀的意念是赐平安的意念,不是降灾祸的意念,要叫你们末后有指望。
12 १२ मग तुम्ही माझा धावा कराल आणि जाऊन माझी प्रार्थना कराल आणि तेव्हा मी तुमचे ऐकेन.
你们要呼求我,祷告我,我就应允你们。
13 १३ कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल, तेव्हा मी तुम्हास सापडेन.
你们寻求我,若专心寻求我,就必寻见。
14 १४ परमेश्वर असे म्हणतो की मग मी तुम्हास प्राप्त होईल. “मी तुम्हास बंदिवासातून परत आणीन आणि ज्या सर्व राष्ट्रांत व सर्व स्थानात मी तुम्हास विखरविले त्यातून मी तुम्हास एकवटीन आणि ज्या स्थानातून मी तुम्हास कैद करून नेले आहे त्याकडे मी तुम्हास परत आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.
耶和华说:我必被你们寻见,我也必使你们被掳的人归回,将你们从各国中和我所赶你们到的各处招聚了来,又将你们带回我使你们被掳掠离开的地方。这是耶和华说的。
15 १५ “कारण तुम्ही म्हटले आहे की, परमेश्वराने आम्हासाठी बाबेलामध्ये संदेष्टे उत्पन्न केले आहेत.”
“你们说:‘耶和华在巴比伦为我们兴起先知’;
16 १६ दावीदाच्या सिंहासनावर जो बसला आहे त्याच्याविषयी आणि जे लोक त्या नगरात राहतात, तुमचे बांधव जे बंदिवासात तुमच्याबरोबर बाहेर गेले नाहीत, त्या सर्वांविषयी परमेश्वर म्हणतो,
所以耶和华论到坐大卫宝座的王和住在这城里的一切百姓,就是未曾与你们一同被掳的弟兄,
17 १७ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, पाहा, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ आणि आजार पाठवीन. कारण मी त्यांना कुजलेल्या अंजिरासारखे करीन जे खाण्याससुद्धा घाणेरडे असते.
万军之耶和华如此说:‘看哪,我必使刀剑、饥荒、瘟疫临到他们,使他们像极坏的无花果,坏得不可吃。
18 १८ आणि मी त्यांचा तलवार, दुष्काळ आणि मरीने पाठपुरावा करीन आणि पृथ्वीवरील सर्व राज्याच्या दृष्टीने दहशत पोहचेल असे मी त्यांना करीन. मी त्यांना ज्या राष्ट्रात विखरविले आहे तेथे भयंकर भीती, शाप व निंदा व उपहास या गोष्टींचे ते विषय होतील.
我必用刀剑、饥荒、瘟疫追赶他们,使他们在天下万国抛来抛去,在我所赶他们到的各国中,令人咒诅、惊骇、嗤笑、羞辱。
19 १९ परमेश्वर असे म्हणतो, याचे कारण हे आहे की, मी आपले सेवक संदेष्टे यांच्याद्वारे माझी वचने पाठवली, तरी त्यांनी माझे ऐकले नाही. मी वारंवार त्यांना पाठवले पण तुम्ही ऐकले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
耶和华说:这是因为他们没有听从我的话,就是我从早起来差遣我仆人众先知去说的,无奈他们不听。这是耶和华说的。
20 २० “तर बंदिवानानो ज्या तुम्हास यरूशलेमेहून बाबेलास पाठविले ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.”
所以你们一切被掳去的,就是我从耶路撒冷打发到巴比伦去的,当听耶和华的话。’”
21 २१ कोलायाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया, ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात, यांच्याविषयी इस्राएलाचा देव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराच्या हाती देईन. आणि तो त्यास तुमच्या डोळ्यांसमोर ठार करील.
万军之耶和华—以色列的 神论到哥赖雅的儿子亚哈,并玛西雅的儿子西底家,如此说:“他们是托我名向你们说假预言的,我必将他们交在巴比伦王尼布甲尼撒的手中;他要在你们眼前杀害他们。
22 २२ नंतर यहूदाचे जे सर्व बंदिवान करून बाबेलात नेलेल्या या मनुष्यांविषयी हा शाप म्हणतील, सिद्कीया व अहाब यांना बाबेलाच्या राजाने अग्नीवर भाजले तसे परमेश्वर तुला करो.
住巴比伦一切被掳的犹大人必借这二人赌咒说:‘愿耶和华使你像巴比伦王在火中烧的西底家和亚哈一样。’
23 २३ हे यासाठी होईल की, कारण त्यांनी इस्राएलामध्ये लज्जास्पद गोष्टी केल्यात, आपल्या शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर व्यभिचार केला आणि जे मी त्यांना आज्ञापिले नाही ते वचन ते खोटेपणाने माझ्या नावाने बोलले आहेत. कारण जो मी एक आहे तो जाणतो. असे परमेश्वर म्हणतो.
这二人是在以色列中行了丑事,与邻舍的妻行淫,又假托我名说我未曾吩咐他们的话。知道的是我,作见证的也是我。这是耶和华说的。”
24 २४ शमाया नेहेलमकराबद्दल, हे सांग,
“论到尼希兰人示玛雅,你当说,
25 २५ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, कारण जे सर्व लोक यरूशलेमेत आहेत त्यांच्याकडे व मासेयाचा मुलगा याजक सफन्या व सर्व याजक यांच्याकडे तू आपल्या नावाने पत्रे पाठवून व म्हटले,
万军之耶和华—以色列的 神如此说:你曾用自己的名寄信给耶路撒冷的众民和祭司玛西雅的儿子西番雅,并众祭司,说:
26 २६ परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी.
‘耶和华已经立你西番雅为祭司,代替祭司耶何耶大,使耶和华殿中有官长,好将一切狂妄自称为先知的人用枷枷住,用锁锁住。
27 २७ म्हणून आता, अनाथोथकर यिर्मया जो आपणास तुम्हासमोर संदेष्टा म्हणवतो त्यास तू का धमकावले नाहीस?
现在亚拿突人耶利米向你们自称为先知,你们为何没有责备他呢?
28 २८ कारण त्याने बाबेलास आम्हाकडे पत्र पाठवले व म्हटले की, “बंदिवास दीर्घकाळ राहील, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व त्याची फळे खा.”
因为他寄信给我们在巴比伦的人说:被掳的事必长久。你们要盖造房屋,住在其中;栽种田园,吃其中所产的。’”
29 २९ सफन्या याजकाने हे पत्र यिर्मया संदेष्ट्याला ऐकू येईल असे वाचले.
祭司西番雅就把这信念给先知耶利米听。
30 ३० मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
于是耶和华的话临到耶利米说:
31 ३१ “सर्व बंदिवासांतल्या लोकांस निरोप पाठव व सांग, नेहेलमकर घराण्यातील शमाया याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘कारण शमायाने तुम्हास भविष्य सांगितले आहे पण मी त्यास पाठविलेले नाही. कारण तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवावा, असे त्याने केले आहे.
“你当寄信给一切被掳的人说:‘耶和华论到尼希兰人示玛雅说:因为示玛雅向你们说预言,我并没有差遣他,他使你们倚靠谎言;
32 ३२ म्हणून परमेश्वर असे म्हणतो की, पाहा, मी शमाया नेहेलमकराला आणि त्याच्या वंशजाला शिक्षा करीन. या लोकांमध्ये वस्ती करायला त्याचा कोणी उरणार नाही. मी आपल्या लोकांसाठी जे चांगले करीन ते तो पाहणार नाही. कारण त्याने परमेश्वराविरूद्ध गैरविश्वासाचे भाषण केले आहे. असे परमेश्वर म्हणतो.
所以耶和华如此说:我必刑罚尼希兰人示玛雅和他的后裔,他必无一人存留住在这民中,也不得见我所要赐与我百姓的福乐,因为他向耶和华说了叛逆的话。这是耶和华说的。’”