< यिर्मया 28 >
1 १ मग त्याच वर्षी असे झाले की, यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला चौथ्या वर्षाच्या व पाचव्या महिन्यात अज्जूरचा मुलगा हनन्या संदेष्टा, जो गिबोनाकडचा होता, परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी याजक व सर्व लोकांसमोर माझ्याशी बोलला. तो म्हणाला,
And it came about in that year, when Zedekiah first became king of Judah, in the fourth year, in the fifth month, that Hananiah, the son of Azzur the prophet, who came from Gibeon, said to Jeremiah in the house of the Lord, before the priests and all the people,
2 २ “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, बाबेलाच्या राजाने लादलेले जोखड मी मोडले आहे.
These are the words of the Lord of armies, the God of Israel: By me the yoke of the king of Babylon has been broken.
3 ३ बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील सर्व वस्तू घेऊन बाबेलास नेली ती मी दोन वर्षांच्या आत, परत या स्थानात आणीन.
In the space of two years I will send back into this place all the vessels of the Lord's house which Nebuchadnezzar, king of Babylon, took away from this place to Babylon:
4 ४ यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.
And I will let Jeconiah, the son of Jehoiakim, king of Judah, come back to this place, with all the prisoners of Judah who went to Babylon, says the Lord: for I will have the yoke of the king of Babylon broken.
5 ५ जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला,
Then the prophet Jeremiah said to the prophet Hananiah, before the priests and all the people who had come into the house of the Lord,
6 ६ यिर्मया संदेष्टा म्हणाला, आमेन, परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातील नेलेल्या वस्तू आणि बंदिवासातील सर्व बाबेलाहून परत या स्थानात आणण्यासाठी परमेश्वराने दिलेली सर्व वचने, जी भविष्य म्हणून तू सांगितली आहेत, ती खरी होवोत.
The prophet Jeremiah said, So be it: may the Lord do so: may the Lord give effect to the words which you have said, and let the vessels of the Lord's house, and all the people who have been taken away, come back from Babylon to this place.
7 ७ जरी, हे जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी बोलतो ते आता ऐक.
But still, give ear to this word which I am saying to you and to all the people:
8 ८ माझ्यापूर्वी आणि तुझ्यापूर्वी फार पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, त्यांनीसुद्धा अनेक देशाविषयी व मोठ्या राज्यांविषयी, लढायांविषयी, दुष्काळ व मरी येतील असे भाकीत केले होते.
The prophets, who were before me and before you, from early times gave word to a number of countries and great kingdoms about war and destruction and disease.
9 ९ जो संदेष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदेष्ट्याचे वचन खरे ठरेल तेव्हा तो संदेष्टा खरोखरच परमेश्वराने पाठविलेला आहे हे समजेल.”
The prophet whose words are of peace, when his words come true, will be seen to be a prophet whom the Lord has sent.
10 १० परंतु हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून व तोडून टाकले.
Then Hananiah the prophet took the yoke from the neck of the prophet Jeremiah and it was broken by his hands.
11 ११ मग हनन्या सर्व लोकांसमोर बोलला व म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘ह्याप्रमाणेच बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने लादलेले जोखड दोन वर्षाच्या आत मी प्रत्येक राष्ट्रांच्या मानेवरून काढून तोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.
And before all the people Hananiah said, The Lord has said, Even so will I let the yoke of the king of Babylon be broken off the necks of all the nations in the space of two years. Then the prophet Jeremiah went away.
12 १२ जेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मयाच्या मानेवरून जोखड काढून तोडल्यानंतर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.
Then after the yoke had been broken off the neck of the prophet Jeremiah by Hananiah the prophet, the word of the Lord came to Jeremiah, saying,
13 १३ “जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन.
Go and say to Hananiah, This is what the Lord has said: Yokes of wood have been broken by you, but in their place I will make yokes of iron.
14 १४ कारण मी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, ‘बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याची सेवा सर्व राष्ट्रांनी करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवले आहे, ते त्याची सेवा करतील. याशिवाय मी त्यास शेतातील वन्यपशूंवरही अधिकार देईन.”
For the Lord of armies, the God of Israel, has said: I have put a yoke of iron on the necks of all these nations, making them servants to Nebuchadnezzar, king of Babylon; and they are to be his servants: and in addition I have given him the beasts of the field.
15 १५ नंतर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टा म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू या लोकांस लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले.
Then the prophet Jeremiah said to Hananiah the prophet, Give ear, now, Hananiah; the Lord has not sent you; but you are making this people put their faith in what is false.
16 १६ म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुला या जगातून उचलीन, या वर्षी तू मरशील, कारण तू परमेश्वराविरूद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस.”
For this reason the Lord has said, See, I will send you away from off the face of the earth: this year death will overtake you, because you have said words against the Lord.
17 १७ आणि त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्या मेला.
So death came to Hananiah the prophet the same year, in the seventh month.