< यिर्मया 22 >

1 परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरास खाली जा आणि हे वचन तीथे घोषीत कर:
«هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ: ٱنْزِلْ إِلَى بَيْتِ مَلِكِ يَهُوذَا وَتَكَلَّمْ هُنَاكَ بِهَذِهِ ٱلْكَلِمَةِ،١
2 आणि तू असे म्हण, ‘यहूदाच्या राजा, जो तू दावीदाच्या सिंहासनावर बसतो, तो तू परमेश्वराचे वचन ऐक, आणि तू, तुझे चाकर आणि तुझे लोक जे या दारातून आत जातात, तेही ऐको.
وَقُلِ: ٱسْمَعْ كَلِمَةَ ٱلرَّبِّ يَامَلِكَ يَهُوذَا ٱلْجَالِسَ عَلَى كُرْسِيِّ دَاوُدَ، أَنْتَ وَعَبِيدُكَ وَشَعْبُكَ ٱلدَّاخِلِينَ فِي هَذِهِ ٱلْأَبْوَابِ.٢
3 परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.
هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ: أَجْرُوا حَقًّا وَعَدْلًا، وَأَنْقِذُوا ٱلْمَغْصُوبَ مِنْ يَدِ ٱلظَّالِمِ، وَٱلْغَرِيبَ وَٱلْيَتِيمَ وَٱلْأَرْمَلَةَ. لَا تَضْطَهِدُوا وَلَا تَظْلِمُوا، وَلَا تَسْفِكُوا دَمًا زَكِيًّا فِي هَذَا ٱلْمَوْضِعِ.٣
4 कारण जर तुम्ही असे केले, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरूशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार या घराच्या दारातून आत जातील, तो व त्यांचे चाकर व त्याचे लोकही आत जातील.
لِأَنَّكُمْ إِنْ فَعَلْتُمْ هَذَا ٱلْأَمْرَ يَدْخُلُ فِي أَبْوَابِ هَذَا ٱلْبَيْتِ مُلُوكٌ جَالِسُونَ لِدَاوُدَ عَلَى كُرْسِيِّهِ رَاكِبِينَ فِي مَرْكَبَاتٍ وَعَلَى خَيْلٍ. هُوَ وَعَبِيدُهُ وَشَعْبُهُ.٤
5 पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.”
وَإِنْ لَمْ تَسْمَعُوا لِهَذِهِ ٱلْكَلِمَاتِ فَقَدْ أَقْسَمْتُ بِنَفْسِي، يَقُولُ ٱلرَّبُّ، إِنَّ هَذَا ٱلْبَيْتَ يَكُونُ خَرَابًا.٥
6 कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की, गिलादाप्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल.
لِأَنَّهُ هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ عَنْ بَيْتِ مَلِكِ يَهُوذَا: جِلْعَادٌ أَنْتَ لِي. رَأْسٌ مِنْ لُبْنَانَ. إِنِّي أَجْعَلُكَ بَرِّيَّةً، مُدُنًا غَيْرَ مَسْكُونَةٍ.٦
7 कारण मी तुझ्याविरूद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे. शस्त्रांसहित मनुष्ये, ते तुझे चांगले गंधसरु तोडून त्यांना अग्नीत पाडतील.
وَأُقَدِّسُ عَلَيْكَ مُهْلِكِينَ، كُلَّ وَاحِدٍ وَآلَاتِهِ، فَيَقْطَعُونَ خِيَارَ أَرْزِكَ وَيُلْقُونَهُ فِي ٱلنَّارِ.٧
8 “अनेक राष्ट्रे या नगरीजवळून जातील. त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला विचारेल ‘या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’
وَيَعْبُرُ أُمَمٌ كَثِيرَةٌ فِي هَذِهِ ٱلْمَدِينَةِ، وَيَقُولُونَ ٱلْوَاحِدُ لِصَاحِبِهِ: لِمَاذَا فَعَلَ ٱلرَّبُّ مِثْلَ هَذَا لِهَذِهِ ٱلْمَدِينَةِ ٱلْعَظِيمَةِ؟٨
9 ह्यावर दुसरा उत्तर देईल, ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले.”
فَيَقُولُونَ: مِنْ أَجْلِ أَنَّهُمْ تَرَكُوا عَهْدَ ٱلرَّبِّ إِلَهِهِمْ وَسَجَدُوا لِآلِهَةٍ أُخْرَى وَعَبَدُوهَا.٩
10 १० मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.
«لَا تَبْكُوا مَيْتًا وَلَا تَنْدُبُوهُ. ٱبْكُوا، ٱبْكُوا مَنْ يَمْضِي، لِأَنَّهُ لَا يَرْجِعُ بَعْدُ فَيَرَى أَرْضَ مِيلَادِهِ.١٠
11 ११ कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाण सोडले आहे आणि तो परत येणार नाही.
لِأَنَّهُ هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ عَنْ شَلُّومَ بْنِ يُوشِيَّا مَلِكِ يَهُوذَا، ٱلْمَالِكِ عِوَضًا عَنْ يُوشِيَّا أَبِيهِ: ٱلَّذِي خَرَجَ مِنْ هَذَا ٱلْمَوْضِعِ لَا يَرْجِعُ إِلَيْهِ بَعْدُ.١١
12 १२ ज्या ठिकाणी त्यास निर्वासित केले, तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही.
بَلْ فِي ٱلْمَوْضِعِ ٱلَّذِي سَبُوهُ إِلَيْهِ، يَمُوتُ. وَهَذِهِ ٱلْأَرْضُ لَا يَرَاهَا بَعْدُ.١٢
13 १३ जो अनीतीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो, त्यास हाय हाय!
«وَيْلٌ لِمَنْ يَبْنِي بَيْتَهُ بِغَيْرِ عَدْلٍ وَعَلَالِيَهُ بِغَيْرِ حَقٍّ، ٱلَّذِي يَسْتَخْدِمُ صَاحِبَهُ مَجَّانًا وَلَا يُعْطِيهِ أُجْرَتَهُ.١٣
14 १४ जो कोणी असे म्हणतो, “मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन.” जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. त्यास हाय हाय!
ٱلْقَائِلُ: أَبْنِي لِنَفْسِي بَيْتًا وَسِيعًا وَعَلَالِيَ فَسِيحَةً. وَيَشُقُّ لِنَفْسِهِ كُوًى وَيَسْقُفُ بِأَرْزٍ وَيَدْهُنُ بِمُغْرَةٍ.١٤
15 १५ तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून चांगला राजा आहेस काय? तुझे वडील खात, पीत नव्हते काय? तरी ते न्याय आणि नितीमानता करत असत. तेव्हा त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
هَلْ تَمْلِكُ لِأَنَّكَ أَنْتَ تُحَاذِي ٱلْأَرْزَ؟ أَمَا أَكَلَ أَبُوكَ وَشَرِبَ وَأَجْرَى حَقًّا وَعَدْلًا؟ حِينَئِذٍ كَانَ لَهُ خَيْرٌ.١٥
16 १६ तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.
قَضَى قَضَاءَ ٱلْفَقِيرِ وَٱلْمِسْكِينِ، حِينَئِذٍ كَانَ خَيْرٌ. أَلَيْسَ ذَلِكَ مَعْرِفَتِي، يَقُولُ ٱلرَّبُّ؟١٦
17 १७ पण तुझ्या दृष्टीस आणि हृदयात अनीतीने मिळवलेली मिळकत आणि निर्दोष व्यक्तीचे रक्त पाडणे, आणि पीडणे व जूलूम करणे या शिवाय काही नाही.
لِأَنَّ عَيْنَيْكَ وَقَلْبَكَ لَيْسَتْ إِلَا عَلَى خَطْفِكَ، وَعَلَى ٱلدَّمِ ٱلزَّكِيِّ لِتَسْفِكَهُ، وَعَلَى ٱلِٱغْتِصَابِ وَٱلظُّلْمِ لِتَعْمَلَهُمَا.١٧
18 १८ यास्तव यहूदाचा राजा, योशीया, याचा मुलगा यहोयाकीम ह्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की, हाय! माझ्या बंधू, किंवा हाय! माझ्या बहिणी, असे बोलून ते त्याच्याकरीता शोक करणार नाही. “हाय! स्वामी! हाय! प्रभू! असे बोलून ते विलाप करणार नाही.
لِذَلِكَ هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ عَنْ يَهُويَاقِيمَ بْنِ يُوشِيَّا مَلِكِ يَهُوذَا: لَا يَنْدُبُونَهُ قَائِلِينَ: آهِ يَا أَخِي! أَوْ آهِ يَا أُخْتِي! لَا يَنْدُبُونَهُ قَائِلِينَ: آهِ يَا سَيِّدُ! أَوْ آهِ يَا جَلَالَهُ!١٨
19 १९ एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरूशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृतदेह ओढत नेऊन यरूशलेमेच्या वेशीबाहेर फेकून देतील.”
يُدْفَنُ دَفْنَ حِمَارٍ مَسْحُوبًا وَمَطْرُوحًا بَعِيدًا عَنْ أَبْوَابِ أُورُشَلِيمَ.١٩
20 २० “लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर. अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.
«اِصْعَدِي عَلَى لُبْنَانَ وَٱصْرُخِي، وَفِي بَاشَانَ أَطْلِقِي صَوْتَكِ، وَٱصْرُخِي مِنْ عَبَارِيمَ، لِأَنَّهُ قَدْ سُحِقَ كُلُّ مُحِبِّيكِ.٢٠
21 २१ तू सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस, मी ऐकणार नाही. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस.
تَكَلَّمْتُ إِلَيْكِ فِي رَاحَتِكِ. قُلْتِ: لَا أَسْمَعُ. هَذَا طَرِيقُكِ مُنْذُ صِبَاكِ، أَنَّكِ لَا تَسْمَعِينَ لِصَوْتِي.٢١
22 २२ वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब पाळील, आणि तुझे मित्र पाडावपणात जातील. मग खरोखरच तू निराश होशील आणि तू केलेल्या सर्व वाईट गोष्टींमुळे लज्जित व फजीत होशील.
كُلُّ رُعَاتِكِ تَرْعَاهُمُ ٱلرِّيحُ، وَمُحِبُّوكِ يَذْهَبُونَ إِلَى ٱلسَّبْيِ. فَحِينَئِذٍ تَخْزَيْنَ وَتَخْجَلِينَ لِأَجْلِ كُلِّ شَرِّكِ.٢٢
23 २३ जो तू राजा आहेस, तू आपल्या लबानोनाच्या राणात, जे तू गंधसरुमध्ये आपले घरटे करतोस, पण जेव्हा तुला यातनांच्या प्रसूतिवेदना जसे बाळंतपणे होतात, तेव्हा तू कशी केवीलवाणी होशील.”
أَيَّتُهَا ٱلسَّاكِنَةُ فِي لُبْنَانَ ٱلْمُعَشِّشَةُ فِي ٱلْأَرْزِ، كَمْ يُشْفِقُ عَلَيْكِ عِنْدَ إِتْيَانِ ٱلْمُخَاضِ عَلَيْكِ، ٱلْوَجَعِ كَوَالِدَةٍ!٢٣
24 २४ “परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.
حَيٌّ أَنَا، يَقُولُ ٱلرَّبُّ، وَلَوْ كَانَ كُنْيَاهُو بْنُ يَهُويَاقِيمَ مَلِكُ يَهُوذَا خَاتِمًا عَلَى يَدِي ٱلْيُمْنَى فَإِنِّي مِنْ هُنَاكَ أَنْزِعُكَ،٢٤
25 २५ कारण मी तुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी, व जे तुझा जीव घेऊ पाहतात, आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार.
وَأُسَلِّمُكَ لِيَدِ طَالِبِي نَفْسِكَ، وَلِيَدِ ٱلَّذِينَ تَخَافُ مِنْهُمْ، وَلِيَدِ نَبُوخَذْرَاصَّرَ مَلِكِ بَابِلَ، وَلِيَدِ ٱلْكَلْدَانِيِّينَ.٢٥
26 २६ मी, तुला व तुझ्या आईला, जिने तुला जन्म दिला, तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.
وَأَطْرَحُكَ وَأُمَّكَ ٱلَّتِي وَلَدَتْكَ إِلَى أَرْضٍ أُخْرَى لَمْ تُولَدَا فِيهَا، وَهُنَاكَ تَمُوتَانِ.٢٦
27 २७ आणि तुम्ही या भूमीत परत यायला पाहाल, पण ते परत येणार नाही.”
أَمَّا ٱلْأَرْضُ ٱلَّتِي يَشْتَاقَانِ إِلَى ٱلرُّجُوعِ إِلَيْهَا، فَلَا يَرْجِعَانِ إِلَيْهَا.٢٧
28 २८ कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या हा आहे काय? कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे यहोयाकीन आहे काय? तो व त्याची मुले का बाहेर फेकले आहेत? आणि माहीत नाही अश्या परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात आले?
هَلْ هَذَا ٱلرَّجُلُ كُنْيَاهُو وِعَاءُ خَزَفٍ مُهَانٍ مَكْسُورٍ، أَوْ إِنَاءٌ لَيْسَتْ فِيهِ مَسَرَّةٌ؟ لِمَاذَا طُرِحَ هُوَ وَنَسْلُهُ وَأُلْقُوا إِلَى أَرْضٍ لَمْ يَعْرِفُوهَا؟٢٨
29 २९ हे भूमी, भूमी, भूमी, परमेश्वराचे वचन ऐक!
يَا أَرْضُ، يَا أَرْضُ، يَا أَرْضُ ٱسْمَعِي كَلِمَةَ ٱلرَّبِّ!٢٩
30 ३० परमेश्वर असे म्हणतो, “यहोयाकीनाबद्दल हे लिहून घे. तो नि: संतान होईल, ‘तो त्याच्या दिवसात यशस्वी होणार नाही आणि त्याची कोणतीही संतान यशस्वी होऊन दावीदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करणार नाही.”
هَكَذَا قَالَ ٱلرَّبُّ: ٱكْتُبُوا هَذَا ٱلرَّجُلَ عَقِيمًا، رَجُلًا لَا يَنْجَحُ فِي أَيَّامِهِ، لِأَنَّهُ لَا يَنْجَحُ مِنْ نَسْلِهِ أَحَدٌ جَالِسًا عَلَى كُرْسِيِّ دَاوُدَ وَحَاكِمًا بَعْدُ فِي يَهُوذَا.٣٠

< यिर्मया 22 >