< यिर्मया 21 >
1 १ यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कीयाचा मुलगा पशहूर आणि मासेया याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले. त्याने म्हटले,
Detta är det ord, som af Herranom skedde till Jeremia, då Konung Zedekia sände till honom Pashur, Malchia son, och Zephanja, Maaseja Prestens son, och lät säga honom:
2 २ “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्यास आमच्यापासून परतवून लावेल.”
Fråga dock Herran för oss; ty NebucadNezar, Konungen i Babel, örligar emot oss; att Herren dock ville göra med oss efter all sin under, på det han må draga ifrån oss.
3 ३ यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कीया राजाला असे सांगा,
Jeremia sade till dem: Detta säger till Zedekia:
4 ४ परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो पाहा! तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन. बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरूशलेममध्ये आणीन.
Så säger Herren Israels Gud: Si, jag skall vända de vapen tillbaka, som I uti edra händer hafven, der I med striden emot Konungen i Babel, och emot de Chaldeer, som eder omkring murarna belagt hafva; och skall församla dem i en hop midt i stadenom.
5 ५ मी माझ्या सामर्थ्यवान हाताने, क्रोधाने व रोशाने व मोठ्या कोपाने तुमच्याशी युद्ध करीन.
Och jag skall strida emot eder med uträckto hand, med starkom arm, med stor vrede, grymhet och obarmhertighet;
6 ६ मी त्या शहरात राहणाऱ्यांना व मनुष्यांना व प्राण्यांना मारीन. ते मोठ्या रोगराई ने मरतील.
Och skall slå inbyggarena i denna stadenom, både folk och fä, så att de skola dö i en stor pestilentie.
7 ७ परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन.
Och derefter, säger Herren, skall jag gifva Zedekia, Juda Konung, samt med hans tjenare, och folkena, som i denna stadenom af pestilentie, svärd och hunger qvarlefde äro, uti NebucadNezars händer, Konungens i Babel, och uti deras fiendars händer, och uti deras händer som efter deras lif stå, att han så skall slå dem med svärdsegg, att der ingen skonan, eller nåde, eller barmhertighet med skall vara.
8 ८ आणि तू या लोकांस सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा! जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतो,
Och säg desso folkena: Så säger Herren: Si, jag sätter eder före vägen till lifvet, och vägen till döden.
9 ९ जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.
Hvilken som blifver i denna stadenom, han måste dö igenom svärd, hunger och pestilentie; men den som gifver sig ut till de Chaldeer, som eder belägga, han skall blifva lefvandes, och skall behålla sitt lif, likasom ett byte.
10 १० परमेश्वर असे म्हणतो, कारण मी आपले मुख या शहराच्याविरूद्ध चांगल्यासाठी नाही तर त्याच्या वाईटासाठी केले आहे. मी बाबेलाच्या राजाला ते देऊन टाकीन. तो ते आगीत भस्मसात करील.
Ty jag hafver ställt mitt ansigte öfver denna staden till olycko, och till intet godt, säger Herren; han skall Konungenom i Babel öfvergifven varda, att han skall uppbränna honom med eld.
11 ११ यहूदाच्या राजाच्या घराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका.
Och hörer Herrans ord, I af Juda Konungs huse.
12 १२ दावीदाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही सकाळी न्याय करा. जो लूटलेला त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडवा. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्नीप्रमाणे बाहेर निघेल आणि त्यास कोणीही विझवू शकणार नाही.
Du Davids hus, detta säger Herren: Håller domen om morgonen, och hjelper den beröfvada utu våldsverkarens hand, på det min grymhet icke skall utfara lika som en eld, och brinna så, att det ingen utsläcka kan, för edart onda väsendes skull.
13 १३ खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार?
Si, säger Herren: Jag säger dig, du som bor i dalenom, på bergen och på jemna markene, och säger: Ho vill öfverfalla oss, eller komma in uti vårt fäste?
14 १४ परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन. आणि मी तिच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.”
Jag vill hemsöka eder, säger Herren, efter edra gerningars frukt; jag skall upptända en eld uti edar skog, han skall förtära allt det deromkring är.