< यिर्मया 20 >
1 १ इम्मेराचा मुलगा पशहूर याजक, जो परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. त्याने यिर्मयाने परमेश्वराच्या मंदिरात केलेले भविष्य सांगताना ऐकले,
2 २ म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले.
3 ३ दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर मागोर मिस्साबीब (प्रत्येक बाजूला भय) असे आहे.
4 ४ कारण परमेश्वर असे बोलला आहे, तू आपणाला व आपल्या सर्व जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना भय असा होशील, कारण तुझ्या त्यांना तू आपल्या डोळ्यांसमोर शत्रूंच्या तलवारीने पडताना पाहशील. मी सर्व यहूदाला बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्यांना तलवारीने कापून काढील.
5 ५ मी त्यांना या नगराचे सर्व धन व त्याची सर्व मिळकत व त्याचे सर्व द्रव्ये देईन, म्हणजे यहूदाच्या राजांची सर्व द्रव्ये मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन. आणि ते ती लूटतील आणि ती घेऊन बाबेलास जातील.
6 ६ पण पशहूर तू आणि तुझ्या घरातील सर्व लोकांस कैद करून नेतील, आणि तू बाबेलास जाऊन मरशील, आणि तेथे तुला व तुझ्यावर प्रेम करणारे ज्यांना तू खोटे भविष्य सांगितले त्यांनाही पुरतील.”
7 ७ परमेश्वरा, तू मला वळवले आणि मी खरच वळलो, तू माझ्यापेक्षा सामर्थी असल्याने तू जिंकलास मी हास्याचे कारण ठरलो आहे. माझा प्रत्येक दिवस चेष्टेने भरलेला असतो.
8 ८ कारण जेव्हा मी बोललो, तेव्हा मी ओरडलो, मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपहास असे करण्यात आले आहे.
9 ९ जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता ह्यापुढे विचार करणार नाही, मी त्याचे नाव ह्यापुढे घोषीत करणार नाही. पण त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडांत आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही.
10 १० मी बऱ्याच लोकांकडून दहशतवादी अफवा ऐकल्या आहेत. तक्रार, आम्ही तक्रार करणे आवश्यक आहे माझ्या जवळ असणारा प्रत्येकजन, मला पाडण्यास टपला आहे, कदाचित त्यास फसवले जाऊ शकते. तेव्हा आपण त्यास पराभूत करु आणि त्याचा सूड घेऊ.
11 ११ पण परमेश्वर माझ्यासोबत बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून जे माझा पाठलाग करणारे ते पडतील. ते मला पराभूत करणार नाहीत. ते अतिशय लाजवले जातील, कारण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कधी न विसरली जाणारी अशी त्यांची सर्वकाळीक अप्रतिष्ठा होईल.
12 १२ पण तू सेनाधीश परमेश्वर, जो धार्मिकांची पारख करणाऱ्या, अंतर्याम व हृदय पाहणाऱ्या, तर मग आता त्यांच्यावर तुझा सुड उगवताना मला पाहू दे, कारण तुझ्या समोर मी आपला वाद प्रकट केला आहे.
13 १३ परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. कारण त्याने खिन्न झालेल्या व्यक्तीचा जीव दुष्टांच्या हातातून सोडवला आहे.
14 १४ मी जन्मलो तो दिवस शापित असो. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला, तो दिवस आशीर्वादीत न होवो.
15 १५ तुम्हास मुलगा झाला, असे बोलून माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलांना देऊन त्यांना आनंदी करणारा मनुष्य शापित असो,
16 १६ परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो. तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.
17 १७ कारण त्याने मला उदरातच मारुन टाकले नाही, कारण अशाने माझी आई माझी कबर झाली असती व तिचे गर्भस्थान सगर्भ राहीले असते.
18 १८ मी फक्त क्लेश व दु: ख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरीताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो?