< यिर्मया 17 >

1 “यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत.
[the] sin of Judah [is] inscribed with a stylus of iron with a point of flint [is] engraved on [the] tablet of heart their and to [the] horns of altars your.
2 त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात.
When remember children their altars their and Asherah poles their at tree[s] luxuriant on hills high.
3 विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत.
Mountain my in the field wealth your all treasures your to plunder I will give high places your for sin in all territories your.
4 मी दिलेला वारसा तू गमावशील. मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन. कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.”
And you will let fall and in you from inheritance your which I gave to you and I will make serve you enemies your in land which not you know for a fire you have kindled in anger my until perpetuity it will burn.
5 परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो.
Thus - he says Yahweh [is] cursed the man who he trusts in humankind and he makes flesh strength his and from Yahweh it turns aside heart his.
6 कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही. तो निर्जन, कोरड्या व बरड जमिनीवर व रहिवासी नसलेल्या जागी वस्ती करीन.
And he will be like a bush in the desert plain and not he will see if it will come good and he will dwell parched places in the wilderness a land of saltiness and not anyone dwells.
7 परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे.
[is] blessed The man who he trusts in Yahweh and he is Yahweh trust his.
8 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते, तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात. मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही.”
And he will be like a tree - planted at water and [which] at a stream it sends out roots its and not (he will see *Q(K)*) if it will come heat and it will be leafage its luxuriant and in a year of drought not it will be anxious and not it will cease from producing fruit.
9 हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार?
[is] deceitful The heart more than everything and [is] incurable it who? will he know it.
10 १० मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास, मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो.
I Yahweh [am] searching [the] heart [am] testing [the] kidneys to give to everyone (according to ways his *Q(K)*) according to [the] fruit of deeds his.
11 ११ अन्यायाने जो श्रीमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे. पण त्याच्या आयुष्याच्या मध्यांनात, ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल.
A partridge [which] it gathers a brood and not it has laid [one who] makes wealth and not with justice in [the] middle of (days his *Q(K)*) it will leave him and at end his he will be a fool.
12 १२ आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन, जे सुरुवातीपासून भारदस्त आहे.
[is] a throne of Glory a high place from first [time] [the] place of sanctuary our.
13 १३ परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल. कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्यास सोडले आहे.
O hope of Israel O Yahweh all [those who] forsake you they will be ashamed (and disloyal [ones] my *Q(K)*) in the land they will be written down for they have forsaken [the] spring of water living Yahweh.
14 १४ परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस.
Heal me O Yahweh so I may be healed save me so let me be saved for [are] praise my you.
15 १५ पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.”
Here! they [are] saying to me where? [is] [the] word of Yahweh let it come please.
16 १६ मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे.
And I not I have hastened - from a shepherd after you and a day incurable not I have desired you you know [the] utterance of lips my before face your it was.
17 १७ तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस.
May not you become to me an object of terror [are] refuge my you in a day of calamity.
18 १८ माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो. अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक.
Let them be put to shame pursuers my and may not I be put to shame I let them be dismayed they and may not I be dismayed I bring on them a day of calamity and double destruction destroy them.
19 १९ परमेश्वराने मला असे म्हटले: “यहूदाचे राजे यरूशलेमेच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या द्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांस सांग. मग यरूशलेमेच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.
Thus he said Yahweh to me go and you will stand in [the] gate of [the] sons of (the people *Q(K)*) which they go in it [the] kings of Judah and which they go out in it and in all [the] gates of Jerusalem.
20 २० त्यांना सांग, यहूदाच्या राजांनो आणि सर्व यहूदा लोकांनो व यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
And you will say to them hear [the] word of Yahweh O kings of Judah and all Judah and all [the] inhabitants of Jerusalem who go in the gates these.
21 २१ परमेश्वर असे म्हणतो: तुम्ही आपला जीव जपा आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरूशलेमेच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका.
Thus he says Yahweh take heed to lives your and may not you carry a burden on [the] day of the sabbath and you will bring [it] in [the] gates of Jerusalem.
22 २२ आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.
And not you must bring out a burden from houses your on [the] day of the sabbath and any work not you must do and you will set apart as holy [the] day of the sabbath just as I commanded ancestors your.
23 २३ पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात.
And not they listened and not they inclined ear their and they stiffened neck their to not (to listen *Q(K)*) and to not to accept correction.
24 २४ असे होईल की, जर तुम्ही खचित माझे ऐकाल आणि शब्बाथाच्या दिवस पवित्र पाळण्यासाठी, यरूशलेमेच्या प्रदेशद्वारातून तुम्ही ओझी आणली नाहीत आणि त्या दिवशी काम नाही केले, परमेश्वर असे म्हणतो.
And it will be certainly [if] you will listen! to me [the] utterance of Yahweh to not - to bring a burden in [the] gates of the city this on [the] day of the sabbath and to set apart as holy [the] day of the sabbath to not to do (on it *Q(K)*) any work.
25 २५ तर या नगराच्या दारातून दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि सरदार, रथांमधे व घोड्यावर बसून आत जातील, ते व त्यांचे सरदार, यहूदा आणि यरूशलेमेत राहणारे, आत जातील, आणि हे नगर सर्वकाळ राहीन.
And they will come in [the] gates of the city this kings - and princes [who] sit on [the] throne of David [who] ride - in chariot[s] and on horses they and officials their everyone of Judah and [the] inhabitants of Jerusalem and it will remain the city this for ever.
26 २६ ते सर्व यहूदा आणि यरूशलेमेच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून, आणि बन्यामीनच्या देशातून आणि खालच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून, होमार्पण आणि धान्यार्पण, यज्ञ व धूप आणतील आणि उपकारस्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील.
And they will come from [the] cities of Judah and from round about Jerusalem and from [the] land of Benjamin and from the Shephelah and from the hill country and from the Negev [those who] bring burnt offering and sacrifice and grain offering and frankincense and [those who] bring a thank-offering [the] house of Yahweh.
27 २७ पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”
And if not you will listen to me to set apart as holy [the] day of the sabbath and to not - to carry a burden and to go in [the] gates of Jerusalem on [the] day of the sabbath and I will kindle a fire in gates its and it will consume [the] fortresses of Jerusalem and not it will be extinguished.

< यिर्मया 17 >