< यिर्मया 16 >

1 परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले, ते म्हणाले. संराष्ट्र आला:
וַיְהִי דְבַר־יְהוָה אֵלַי לֵאמֹֽר׃
2 तू आपणास पत्नी करून घेऊ नको आणि या ठिकाणी तुला मुले व मुली न होवोत.
לֹֽא־תִקַּח לְךָ אִשָּׁה וְלֹֽא־יִהְיוּ לְךָ בָּנִים וּבָנוֹת בַּמָּקוֹם הַזֶּֽה׃
3 कारण या ठिकाणी जन्म घेणाऱ्या मुला आणि मुलींना आणि त्यांच्या आयांना ज्यांनी त्यांना जन्म दिला आणि त्यांचे बाप ज्यांमुळे ते या ठिकाणी जन्माला आले, त्यांना परमेश्वर असे म्हणतो,
כִּי־כֹה ׀ אָמַר יְהוָה עַל־הַבָּנִים וְעַל־הַבָּנוֹת הַיִּלּוֹדִים בַּמָּקוֹם הַזֶּה וְעַֽל־אִמֹּתָם הַיֹּלְדוֹת אוֹתָם וְעַל־אֲבוֹתָם הַמּוֹלִדִים אוֹתָם בָּאָרֶץ הַזֹּֽאת׃
4 “ते रोगग्रस्त मृत्यू मरतील, त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही आणि त्यांना पुरले जाणार नाही. ते शेणखताप्रमाणे जमिनीवर असतील. कारण ते लोक तलवारीने आणि उपासमारीने नष्ट होतील. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व भूमीवरील प्राण्यांस आहार असे होतील.”
מְמוֹתֵי תַחֲלֻאִים יָמֻתוּ לֹא יִסָּֽפְדוּ וְלֹא יִקָּבֵרוּ לְדֹמֶן עַל־פְּנֵי הָאֲדָמָה יִֽהְיוּ וּבַחֶרֶב וּבָֽרָעָב יִכְלוּ וְהָיְתָה נִבְלָתָם לְמַאֲכָל לְעוֹף הַשָּׁמַיִם וּלְבֶהֱמַת הָאָֽרֶץ׃
5 कारण परमेश्वर असे म्हणतो, ज्या घरी शोक आहे, त्या घरात जाऊ नकोस. विलाप करायला आणि सहानुभूती दाखवायला त्या लोकांजवळ जाऊ नको. कारण या लोकांपासून मी आपली शांती व प्रेमदया व करुणा काढून नेल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.
כִּֽי־כֹה ׀ אָמַר יְהוָה אַל־תָּבוֹא בֵּית מַרְזֵחַ וְאַל־תֵּלֵךְ לִסְפּוֹד וְאַל־תָּנֹד לָהֶם כִּֽי־אָסַפְתִּי אֶת־שְׁלוֹמִי מֵאֵת הָעָם־הַזֶּה נְאֻם־יְהוָה אֶת־הַחֶסֶד וְאֶת־הָֽרַחֲמִֽים׃
6 म्हणून या देशातील मोठे आणि लहान मरतील. ते पुरले जाणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणी शोक करणार नाही. त्यांच्याकरिता कोणी आपल्याला कापून घेणार नाही किंवा आपले केस कापणार नाहीत.
וּמֵתוּ גְדֹלִים וּקְטַנִּים בָּאָרֶץ הַזֹּאת לֹא יִקָּבֵרוּ וְלֹֽא־יִסְפְּדוּ לָהֶם וְלֹא יִתְגֹּדַד וְלֹא יִקָּרֵחַ לָהֶֽם׃
7 मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.
וְלֹֽא־יִפְרְסוּ לָהֶם עַל־אֵבֶל לְנַחֲמוֹ עַל־מֵת וְלֹֽא־יַשְׁקוּ אוֹתָם כּוֹס תַּנְחוּמִים עַל־אָבִיו וְעַל־אִמּֽוֹ׃
8 ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात त्यांच्यासोबत तू खायला व प्यायला बसू जाऊ नकोस.
וּבֵית־מִשְׁתֶּה לֹא־תָבוֹא לָשֶׁבֶת אוֹתָם לֶאֱכֹל וְלִשְׁתּֽוֹת׃
9 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, पाहा! तुझ्या डोळ्या देखत मी आनंद आणि उत्सव, नवऱ्याचा आणि नवरीचा शब्द बंद होणार, असे मी करीन.
כִּי כֹה אָמַר יְהוָה צְבָאוֹת אֱלֹהֵי יִשְׂרָאֵל הִנְנִי מַשְׁבִּית מִן־הַמָּקוֹם הַזֶּה לְעֵינֵיכֶם וּבִֽימֵיכֶם קוֹל שָׂשׂוֹן וְקוֹל שִׂמְחָה קוֹל חָתָן וְקוֹל כַּלָּֽה׃
10 १० आणि मग असे होईल, तू ही वचने या लोकांस सांगशील आणि ते तुला म्हणतील, परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध काय पाप केले?
וְהָיָה כִּי תַגִּיד לָעָם הַזֶּה אֵת כָּל־הַדְּבָרִים הָאֵלֶּה וְאָמְרוּ אֵלֶיךָ עַל־מֶה דִבֶּר יְהוָה עָלֵינוּ אֵת כָּל־הָרָעָה הַגְּדוֹלָה הַזֹּאת וּמֶה עֲוֺנֵנוּ וּמֶה חַטָּאתֵנוּ אֲשֶׁר חָטָאנוּ לַֽיהוָה אֱלֹהֵֽינוּ׃
11 ११ तेव्हा तू त्यांना असे सांग, परमेश्वर असे म्हणतो: कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडून अन्य दैवतांच्या मागे गेले आणि त्यांची पूजा केली व त्यांना नमन केले. त्यांनी मला सोडले आणि माझे नियमशास्त्र पाळले नाही.
וְאָמַרְתָּ אֲלֵיהֶם עַל אֲשֶׁר־עָזְבוּ אֲבוֹתֵיכֶם אוֹתִי נְאֻם־יְהוָה וַיֵּלְכוּ אַֽחֲרֵי אֱלֹהִים אֲחֵרִים וַיַּעַבְדוּם וַיִּשְׁתַּחֲווּ לָהֶם וְאֹתִי עָזָבוּ וְאֶת־תּוֹרָתִי לֹא שָׁמָֽרוּ׃
12 १२ पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. कारण पाहा! प्रत्येक मनुष्य आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. कोणीही असा नाही जो माझे ऐकतो.
וְאַתֶּם הֲרֵעֹתֶם לַעֲשׂוֹת מֵאֲבֽוֹתֵיכֶם וְהִנְּכֶם הֹלְכִים אִישׁ אַֽחֲרֵי שְׁרִרוּת לִבּֽוֹ־הָרָע לְבִלְתִּי שְׁמֹעַ אֵלָֽי׃
13 १३ म्हणून मी तुम्हास देशाबाहेर काढून तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशात घालवून देईन, आणि दिवसरात्र तुम्ही तेथे दुसऱ्या देवांची पूजा कराल, कारण मी तुमच्यावर अनुग्रह करणार नाही.
וְהֵטַלְתִּי אֶתְכֶם מֵעַל הָאָרֶץ הַזֹּאת עַל־הָאָרֶץ אֲשֶׁר לֹא יְדַעְתֶּם אַתֶּם וַאֲבֽוֹתֵיכֶם וַעֲבַדְתֶּם־שָׁם אֶת־אֱלֹהִים אֲחֵרִים יוֹמָם וָלַיְלָה אֲשֶׁר לֹֽא־אֶתֵּן לָכֶם חֲנִינָֽה׃
14 १४ यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो. असे दिवस येत आहेत, ज्यात, ज्याने मिसरच्या भूमीतून इस्राएलाच्या लोकांची सुटका तो परमेश्वर जिवंत आहे. असे लोक आणखी म्हणणार नाही.
לָכֵן הִנֵּֽה־יָמִים בָּאִים נְאֻם־יְהוָה וְלֹֽא־יֵאָמֵר עוֹד חַי־יְהוָה אֲשֶׁר הֶעֱלָה אֶת־בְּנֵי יִשְׂרָאֵל מֵאֶרֶץ מִצְרָֽיִם׃
15 १५ ज्याने इस्राएलाच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली आणि त्या देशात जिथे त्याने त्यांना पांगवले, त्यातूनही काढून वर आणले तो परमेश्वर जिवंत आहे. असे ते म्हणतील आणि त्यांचा जो राष्ट्र मी त्याच्या पूर्वजांना दिला होता त्यामध्ये मी त्यांना परत आणीन.
כִּי אִם־חַי־יְהוָה אֲשֶׁר הֶעֱלָה אֶת־בְּנֵי יִשְׂרָאֵל מֵאֶרֶץ צָפוֹן וּמִכֹּל הָֽאֲרָצוֹת אֲשֶׁר הִדִּיחָם שָׁמָּה וַהֲשִֽׁבֹתִים עַל־אַדְמָתָם אֲשֶׁר נָתַתִּי לַאֲבוֹתָֽם׃
16 १६ परमेश्वर असे म्हणतो, पाहा! लवकरच मी पुष्कळ मासे धरणाऱ्यांना पाठवीन. म्हणजे ते लोकांस मासे धरल्यासारखे पकडतील. त्यानंतर पुष्कळ शिकाऱ्यांना पाठवीन म्हणजे ते प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून त्यांची शिकार करतील.
הִנְנִי שֹׁלֵחַ לדוגים לְדַיָּגִים רַבִּים נְאֻם־יְהוָה וְדִיגוּם וְאַֽחֲרֵי־כֵן אֶשְׁלַח לְרַבִּים צַיָּדִים וְצָדוּם מֵעַל כָּל־הַר וּמֵעַל כָּל־גִּבְעָה וּמִנְּקִיקֵי הַסְּלָעִֽים׃
17 १७ कारण माझे डोळे त्यांच्या मर्गावर आहेत, ते माझ्यासमोरुन लपलेले नाहीत. त्यांचे अन्याय माझ्या डोळ्यांपासून लपलेला नाहीत.
כִּי עֵינַי עַל־כָּל־דַּרְכֵיהֶם לֹא נִסְתְּרוּ מִלְּפָנָי וְלֹֽא־נִצְפַּן עֲוֺנָם מִנֶּגֶד עֵינָֽי׃
18 १८ मी पहिल्याने त्याच्या त्याच्या अन्यायाची आणि पापांची फेड दुपटीने करीन, कारण माझी भूमी त्यांनी आपल्या तिरस्करणीय मूर्तींच्या आकृतींनी विटाळवीली आहे. आणि माझे वतन त्यांनी आपल्या ओंगळ मूर्ती स्थापून कलंकित केले आहे.
וְשִׁלַּמְתִּי רִֽאשׁוֹנָה מִשְׁנֵה עֲוֺנָם וְחַטָּאתָם עַל חַלְּלָם אֶת־אַרְצִי בְּנִבְלַת שִׁקּֽוּצֵיהֶם וְתוֹעֲבוֹתֵיהֶם מָלְאוּ אֶת־נַחֲלָתִֽי׃
19 १९ परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस. पृथ्वीच्या शेवटापासून राष्ट्रे तुझ्याकडे येतील आणि ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांना कपटाचा वारसा मिळाला आहे. जे खाली आहे, त्यामध्ये काहीच हित नाही.”
יְהוָה עֻזִּי וּמָעֻזִּי וּמְנוּסִי בְּיוֹם צָרָה אֵלֶיךָ גּוֹיִם יָבֹאוּ מֵֽאַפְסֵי־אָרֶץ וְיֹאמְרוּ אַךְ־שֶׁקֶר נָחֲלוּ אֲבוֹתֵינוּ הֶבֶל וְאֵֽין־בָּם מוֹעִֽיל׃
20 २० लोक स्वत: साठी देव निर्माण करु शकतील काय? पण ते देव नव्हेतच.
הֲיַעֲשֶׂה־לּוֹ אָדָם אֱלֹהִים וְהֵמָּה לֹא אֱלֹהִֽים׃
21 २१ यास्तव पाहा! परमेश्वर म्हणतो “मी त्यांना कळवीन, या एकदाच मी अपला हात व आपले सामर्थ्य त्यांना कळवीन, म्हणजे ते जाणतील की माझे नाव परमेश्वर आहे.”
לָכֵן הִנְנִי מֽוֹדִיעָם בַּפַּעַם הַזֹּאת אוֹדִיעֵם אֶת־יָדִי וְאֶת־גְּבֽוּרָתִי וְיָדְעוּ כִּֽי־שְׁמִי יְהוָֽה׃

< यिर्मया 16 >