< यिर्मया 14 >
1 १ परमेश्वराचे वचन जे अवर्षणाबद्दल यिर्मयाकडे आले:
RAB kuraklığa ilişkin Yeremya'ya şöyle seslendi:
2 २ “यहूदा शोक करो, तिची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत, त्यांचे यरूशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे.
“Yahuda yas tutuyor, Kentleri bitkin; Halkı karalar giymiş, yerlere oturmuş, Yeruşalim'in haykırışı yükseliyor.
3 ३ त्यांचे थोरजन त्यांच्या चाकरांना पाण्यासाठी पाठवतात, ते सर्व अयशस्वी परत येतात, म्हणून ते लज्जित व फजीत होऊन आपले चेहरे झाकून घेतात.
Soylular uşaklarını suya gönderiyorlar. Sarnıçlara gidiyor, ama su bulamıyor, Kapları boş dönüyorlar. Aşağılanmış, utanç içinde, Başlarını örtüyorlar.
4 ४ ह्यामुळे जमीनीत भेगापडल्या आहेत, कारण भूमीवर कोठेही पाणी नाही. म्हणून शेतकरी लज्जीत होऊन आपली डोकी झाकत आहे.
Ülke yağmursuz, toprak çatlamış, Irgatlar utanç içinde başlarını örtüyorlar.
5 ५ कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते.
Kırdaki geyik bile Yeni doğmuş yavrusunu bırakıyor, Çünkü ot yok.
6 ६ उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकतात, त्यांचे डोळे खोल गेले आहेत, कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.
Yaban eşekleri çıplak tepelerde durmuş, Çakal gibi soluyorlar; Gözlerinin feri sönmüş, Çünkü otlak yok.”
7 ७ जरी आमची दुष्टाई आमच्याविरूद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर. कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.
Suçlarımız bize karşı tanıklık etse de, Adın uğruna bir şeyler yap, ya RAB! Pek çok döneklik ettik, Sana karşı günah işledik.
8 ८ इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले. तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?
Ey İsrail'in Umudu, Sıkıntı anlarındaki Kurtarıcısı! Neden ülkede bir yabancı, Ancak bir gece konaklayan yolcu gibisin?
9 ९ जो वाचवू शकत नाही अशा वीर योद्ध्याप्रमाणे तू का गोंधळात आहेस? कारण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो, आम्हास सोडून जाऊ नकोस.”
Neden şaşırmış biri gibi, Kurtarmaya gücü yetmeyen savaşçı gibisin? Aramızdasın sen, ya RAB, Seniniz, bırakma bizi!
10 १० परमेश्वर या लोकांस असे म्हणतो: त्यांना भटकने प्रिय झाले आहे, त्यांनी आपले पाय असे करण्या पासून आवरून धरले नाही. यास्तव परमेश्वर त्यांच्यापासून आनंदी नाही, आता तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.
Bu halk için RAB diyor ki, “Gezip tozmayı pek sever, Ayaklarını dolaşmaktan esirgemezler. Bu yüzden RAB onlardan hoşnut değil, Şimdi anımsayacak suçlarını, Günahları için onları cezalandıracak.”
11 ११ परमेश्वर मला म्हणाला, “या लोकांच्या भल्यासाठी तू प्रार्थना करु नकोस.
Sonra RAB bana, “Bu halkın iyiliği için yalvarma” dedi,
12 १२ कारण जरी ते उपवास करतील, तरी मी त्यांचे रडने ऐकणार नाही, आणि जरी ते होमार्पण व धान्यार्पण करतील, त्यामध्ये मी आनंद पावणार नाही. कारण तलवार व दुष्काळ आणि रोगराई यांनी मी त्यांचा नाश करीन.”
“Oruç tutsalar bile feryatlarına kulak vermeyeceğim. Yakmalık sunu, tahıl sunusu sunsalar bile kabul etmeyeceğim. Tersine, kılıçla, kıtlıkla, salgın hastalıkla yok edeceğim onları.”
13 १३ तेव्हा मी म्हणालो, “हे, प्रभू परमेश्वरा, पाहा! संदेष्टे त्यांना सांगत आहेत की, तुम्ही तलवार पाहणार नाही, आणि दुष्काळ तुमच्यासाठी असणार नाही, कारण मी तुम्हास या ठिकाणी खरी सुरक्षितता देत आहे.”
Bunun üzerine, “Ah, Egemen RAB, peygamberler bu halka, ‘Kılıç yüzü görmeyecek, kıtlık çekmeyeceksiniz; burada size kalıcı esenlik sağlayacağım’ diyorlar” dedim.
14 १४ परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही आणि त्यांना अशी कोणतीही आज्ञा केली नाही किंवा त्याच्याशी बोललोही नाही. पण त्यांच्या हृदयातून निघणारे कपट, खोटे दर्शन, व दैवप्रश्न व व्यर्थता हे भविष्य ते तुम्हास सांगतात.
RAB, “Peygamberler benim adımla yalan peygamberlik ediyorlar” dedi, “Onları ne gönderdim, ne onlara buyruk verdim, ne de seslendim. Size uydurma görümlerden, falcılıktan, boş şeylerden, akıllarından geçen hayallerden söz ediyorlar.
15 १५ यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी ज्यांना पाठवले नाही, अशे जे भविष्यवादी माझ्या नावात भविष्य सांगतात आणि असे म्हणतात या देशावर तलवार व उपासमार येणार नाही. ते संदेष्टे तलवारीने आणि उपासमारीने मरतील.
Adımla konuşan peygamberler için ben RAB diyorum ki, onları göndermediğim halde, ‘Bu ülkede kılıç da kıtlık da olmayacak’ diyorlar. Ama kendileri de kılıçla, kıtlıkla yok olacaklar.
16 १६ आणि ज्या लोकांस त्यांनी भवीष्य सांगितले, ते उपासमार व तलवार यामुळे यरूशलेमेच्या रस्त्यावर फेकले जातील. त्यांना व त्यांच्या स्त्रिया व मुलांना आणि मुलींना कोणी पुरणारा पण असणार नाही, कारण त्यांची दुष्टाई मी त्यांच्यावर ओतीन.
Peygamberlik ettikleri halk da kıtlık ve kılıç yüzünden Yeruşalim sokaklarına atılacak. Onları da karılarını, oğullarını, kızlarını da gömecek kimse olmayacak. Yaptıkları kötülüğü kendi başlarına getireceğim.
17 १७ हे वचन त्यांना सांग: माझ्या डोळ्यांत अश्रू रात्रंदिवस वाहोत, ते थांबू नयेत. कारण माझ्या लोकांच्या कन्येचे पडणे खूप मोठे आहे, तिची जखम मोठी आणि ठीक न होणारी आहे.
“Onlara de ki, “‘Gözlerim gece gündüz Durmadan gözyaşı döksün, Çünkü erden kızım, halkım Ağır bir yara aldı, Ezici bir darbe yedi.
18 १८ जर मी रानात बाहेर गेलो तर पाहा, तीथे तलवारीने मारले गेलेले आहेत. आणि जर मी शहराजवळ आलो तर पाहा! दुष्काळाने ग्रासलेले आहेत. कारण दोघेही, याजक आणि संदेष्टे ज्ञान नसल्याने भटकत आहे.”
Kıra çıksam, kılıçtan geçirilenleri, Kente girsem, kıtlıktan kırılanları görüyorum. Olup bitenden habersiz peygamberlerle kâhinlerse Ülkeyi dolaşıp duruyorlar.’”
19 १९ “काय तू यहूदाला पूर्णपणे नाकारले आहे का? तू सियोनचा राग करतोस काय? बरे न होण्या इतके तू आम्हांला का पीडलेस? आम्हांस शांती असेल ही आशा बाळगली, पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही. आणि बरे होण्याची वाट पाहिली, पण पाहा, तेथे फक्त भयच आहे.
Yahuda'yı büsbütün mü reddettin? Siyon'dan tiksiniyor musun? Neden şifa bulmayacak kadar yaraladın bizi? Esenlik bekledik, iyilik gelmedi. Şifa umduk, yılgınlık bulduk.
20 २० परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हास जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याविरूद्ध अपराध केले.
Yaptığımız kötülükleri, Atalarımızın suçlarını biliyoruz, ya RAB; Gerçekten sana karşı günah işledik.
21 २१ परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, आम्हांला नाकारू नकोस, तुझ्या वैभवशाली सिंहासनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. आठवण कर आणि आम्हा बरोबर तुझा करार तोडू नको.
Adın uğruna bizi küçümseme, Görkemli tahtının hor görülmesine izin verme. Bizimle yaptığın antlaşmayı anımsa, Bozma onu.
22 २२ राष्ट्राच्या मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य आहे काय? किंवा आकाश स्वत: पावसाच्या सरी पाडण्यास सशक्त आहेत काय? जो हे सर्व करतो, तो तूच आमचा एकमेव परमेश्वर देव नाही काय? आमची आशा तुझ्यामध्ये आहे. कारण तुच या सर्व गोष्टी केल्या आहेत.”
Ulusların değersiz putlarından herhangi biri Yağmur yağdırabilir mi? Gökler kendiliğinden Sağanak yağdırabilir mi? Bunu yalnız sen yapabilirsin, Ya RAB Tanrımız. Umudumuz sende, Çünkü bütün bunları yapan sensin.