< यिर्मया 10 >
1 १ इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वर जे वचन तुम्हास घोषीत करीत आहे ते ऐका.
Israel imkhui nangmih taengah BOEIPA loh a thui olka te ya uh.
2 २ परमेश्वर असे म्हणतो, “देशांचे मार्ग शिकू नका. आणि आकाशातील चिंन्हाना घाबरुन जाऊ नका, कारण त्यामुळे राष्ट्रे भयभीत असतात.
BOEIPA loh he ni a thui. Namtom kah longpuei te awt uh boel lamtah vaan miknoek nen khaw rhihyawp uh boeh. Te lamlong ni namtom rhoek khaw a rhihyawp uh.
3 ३ त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. कारण कोणी जंगलातून झाड तोडतो, असे ते कुऱ्हाडीने केलेले कारागीराच्या हाताचे काम आहे.
A honghi pilnam kah khosing dongah he duup lamkah thing ni kutthai kut kah bibi loh tubael neh a saii ngawn.
4 ४ नंतर ते त्यांना चांदीसोन्याने त्यांना सजवतात. ते खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने व खिळ्याने ते घट्ट बसवितात.
ngun neh, sui neh a sawtthen sak tih, thicung neh thilung neh a khing dongah lol voel pawh.
5 ५ अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांसच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.”
Te te uitang lo kah vatai bangla om tih cal thai pawh. A kan uh thai pawt dongah a koh la a koh uh. Te te rhih uh boeh. Thaehuet uh thai pawt tih a voelphoeng ham khaw a om uh moenih.
6 ६ परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे.
BOEIPA namah bang moenih. Namah tah na len tih na ming khaw, thayung thamal dongah tanglue pai.
7 ७ तुला कोण भिणार नाही, हे राष्ट्राच्या राजा? कारण तू त्या योग्यतेचा आहेस, कारण राष्ट्रांच्या सर्व ज्ञान्यांमध्ये आणि त्यांच्या सर्व राज्यांमध्ये तुझ्यासारखा कोणी नाही.
Namtom kah manghai namah aka rhih pawt te unim? Namtom hlangcueih boeih khuikah khaw na taengah naep ngawn tih a ram pum ah namah bang a om moenih.
8 ८ ते सर्व पशूसारखे आणि मूर्ख आहेत, दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्तींचे अनुयायी आहेत.
Pakhat la dom uh thae tih a hong thing kah thuituennah dongah ang uh.
9 ९ ते लोक तार्शीशाहून ठोकून आणलेली चांदी आणि उफाजहून आणलेले सोने, कारागिराच्या व सोनाराच्या हातचे अशे ते काम आहे. ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात शहाणे लोक असे देव तयार करतात.
Tarshish lamkah cak ben hang khuen tih Uphaz lamkah sui khaw kutthai kah a bibi mai ni. Te boeih te aka picai kah kut long ni hlangcueih kah bibi bangla a pueinak te a thim neh daidi neh a loeih pah.
10 १० पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जिवंत आणि सार्वकालीक राजा आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत.
Tedae BOEIPA amah he oltak Pathen, mulhing Pathen neh kumhal manghai ni. A thinhul dongah diklai hinghuen tih a kosi te namtom loh ueh pawh.
11 ११ परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांस पुढील संराष्ट्र द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्गांतून आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.
Amih pathen rhoek taengah khaw he tlam he thui uh. Amih loh vaan neh diklai a saii pawt dongah te rhoek tah diklai lamkah neh vaan hmui lamloh hmata uh ni.
12 १२ ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.
A thadueng neh diklai a saii, a cueihnah neh lunglai a thoh tih a lungcuei neh vaan khaw a dih.
13 १३ त्याच्या वाणीने आकाशात पाण्याच्या गडगडाट होतो, आणि तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो, आणि आपल्या भांडारातून वारा बाहेर काढतो.
Vaan kah tui len khaw a ol a paek tih diklai khobawt lamkah khoboei khaw a pongpa sak. Diklai te rhaek neh khotlan a saii pah tih a thakvoh lamloh khohli a thoeng sak.
14 १४ ज्ञानाशिवाय, प्रत्येक मनुष्य अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात. कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यामध्ये काही सजीवपणा नाही.
Hlang boeih he mingnah dongah rhawm coeng tih aka picai boeih khaw mueithuk dongah koh coeng. A muei hong neh a khuiah hil om pawh.
15 १५ त्या निरुपयोगी आहेत, खोट्यांचे काम आहेत, त्यांच्या शिक्षेसमयी त्यांचा नाश होईल.
Amih ahonghi neh a hohap kah khoboe tah amamih kah cawhnah tue vaengah milh bitni.
16 १६ पण देव, याकोबाचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.
Jakob kah hamsum tah he bang moenih. Amah kah rho la Israel koca boeih aka hlinsai tah a ming khaw caempuei BOEIPA ni.
17 १७ अहो वेढ्यामध्ये जगत असलेल्या लोकांनो. आपल्या वस्तू गोळा करा आणि राष्ट्र सोडा.
Vongup ah aka om, aka om loh na hnocun te diklai lamloh coi uh laeh.
18 १८ परमेश्वर असे म्हणतो, पाहा, यावेळी, मी देशात राहणाऱ्यांना बाहेर फेकून देईन. आणि त्यांना धडा शिकवावा म्हणून त्यांना दु: ख देईल.”
BOEIPA loh he ni a thui. Tahae ah diklai khosa rhoek te voeikhat la ka dong coeng he. Amih soah ka daengdaeh daengah ni a hmuh uh eh.
19 १९ माझी मोडलेली हाडे आणि संक्रमीत झालेल्या जखमांमुळे मला हाय हाय! तेव्हा मी म्हणालो, “खचित हे माझे दु: ख आहे, आणि मला ते पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”
Anunae kai aih he, ka pocinah dongah ka hmasoe khaw nue coeng. Tedae tloh he ka phuei mai eh ka ti coeng.
20 २० माझ्या तंबूचा नाश झाला आणि माझ्या तंबूचे सर्व दोर तुटले आहेत. माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत. माझा तंबू उभारायला एकही मनुष्य उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही मनुष्य शिल्लक नाही.
Ka dap khaw a rhoelrhak tih ka liva khaw boeih pat. Ka ca rhoek khaw kai lamloh coe uh tih om uh pawh. Ka dap aka tuk tih ka himbaiyan aka thoh khaw om voel pawh.
21 २१ कारण मेंढपाळ मूर्ख झाले आहेत. ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत. म्हणून त्यांना यश नाही, त्यांचे सर्व कळप विखरले आहेत.
Boiva aka dawn khaw a dom coeng tih BOEIPA te toem uh pawh. Te dongah ni cangbam uh pawt tih a rhamtlim khaw boeih a taekyak pah.
22 २२ बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहूदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला. उत्तरेतून मोठा भूमीकंप येत आहे.
Tlangpuei khohmuen lamkah hinghuennah puei loh Judah khopuei te khopong kah pongui khuirhung la khueh ham olthang ol ha pawk coeng ke.
23 २३ परमेश्वरा, मला माहीत आहे, मनुष्याची वाट ही त्याच्याकडून नाही येत. चालत्या मनुष्यास आपली पावले नीट करता येत नाही.
BOEIPA aw, a longpuei te hlang kah pawt tih hlang dongah a pongpa kolla a khokan a rhoekbah te khaw ka ming.
24 २४ परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील.
Aw BOEIPA kai he tiktamnah nen mah n'thuituen lamtah na thintoek nen boel saeh. Kai nan hnop ve.
25 २५ जे राष्ट्र तुला ओळखत नाही आणि जे कुटुंब तुझ्या नामाचा धावा करत नाही, त्यावर तू आपला क्रोध ओत. कारण त्यांनी याकोबाचा विनाश केला आहे आणि त्यास खाऊन टाकले आहे, त्यांनी त्यास क्षीण केले आहे. त्याची वस्ती ओसाड केली आहे.
Nang aka ming pawh namtom so neh na ming aka phoei pawt cako soah na kosi te hawk mai. Jakob te a yoop la a yoop uh coeng. Te dongah amah te a khah uh tih a tolkhoeng te a pong sakuh.