< याको. 1 >
1 १ याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.
Jakab, Istennek és az Úr Jézus Krisztusnak szolgája, az elszórtan levő tizenkét nemzetségnek; üdvözletemet.
2 २ माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
Teljes örömnek tartsátok, atyámfiai, mikor különféle kísértésekbe estek,
3 ३ तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.
Tudván, hogy a ti hiteteknek megpróbáltatása kitartást szerez.
4 ४ आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे.
A kitartásban pedig tökéletes cselekedet legyen, hogy tökéletesek és épek legyetek minden fogyatkozás nélkül.
5 ५ म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.
Ha pedig valakinek közületek nincsen bölcsessége, kérje Istentől, a ki mindenkinek készségesen és szemrehányás nélkül adja; és megadatik néki.
6 ६ पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे.
De kérje hittel, semmit sem kételkedvén: mert a ki kételkedik, hasonlatos a tenger habjához, a melyet a szél hajt és ide s tova hány.
7 ७ अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल.
Mert ne vélje az ilyen ember, hogy kaphat valamit az Úrtól;
8 ८ कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो.
A kétszívű, a minden útjában állhatatlan ember.
9 ९ दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा.
Dicsekedjék pedig az alacsony sorsú atyafi az ő nagyságával;
10 १० आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल.
A gazdag pedig az ő alacsonyságával: mert elmúlik, mint a fűnek virága.
11 ११ सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल.
Mert felkél a nap az ő hévségével, és megszárítja a füvet; és annak virága elhull, és ábrázatának kedvessége elvész: így hervad el a gazdag is az ő útaiban.
12 १२ जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
Boldog ember az, a ki a kísértésben kitart; mert minekutána megpróbáltatott, elveszi az életnek koronáját, a mit az Úr ígért az őt szeretőknek.
13 १३ कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.
Senki se mondja, mikor kísértetik: Az Istentől kísértetem: mert az Isten gonoszsággal nem kísérthető, ő maga pedig senkit sem kísért.
14 १४ तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो.
Hanem mindenki kísértetik, a mikor vonja és édesgeti a tulajdon kívánsága.
15 १५ मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते.
Azután a kívánság megfoganván, bűnt szűl; a bűn pedig teljességre jutván halált nemz.
16 १६ माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.
Ne tévelyegjetek szeretett atyámfiai!
17 १७ प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.
Minden jó adomány és minden tökéletes ajándék felülről való, és a világosságok Atyjától száll alá, a kinél nincs változás, vagy változásnak árnyéka.
18 १८ आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
Az ő akarata szült minket az igazságnak ígéje által, hogy az ő teremtményeinek valami zsengéje legyünk.
19 १९ माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा.
Azért, szeretett atyámfiai, legyen minden ember gyors a hallásra, késedelmes a szólásra, késedelmes a haragra.
20 २० कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.
Mert ember haragja Isten igazságát nem munkálja.
21 २१ म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.
Elvetvén azért minden undokságot és a gonoszságnak sokaságát, szelídséggel fogadjátok a beoltott ígét, a mely megtarthatja a ti lelkeiteket.
22 २२ वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
Az ígének pedig megtartói legyetek és ne csak hallgatói, megcsalván magatokat.
23 २३ जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे.
Mert ha valaki hallgatója az ígének és nem megtartója, az ilyen hasonlatos ahhoz az emberhez, a ki tükörben nézi az ő természet szerinti ábrázatát:
24 २४ तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.
Mert megnézte magát és elment, és azonnal elfelejtette, milyen volt.
25 २५ परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.
De a ki belenéz a szabadság tökéletes törvényébe és megmarad a mellett, az nem feledékeny hallgató, sőt cselekedet követője lévén, az boldog lesz az ő cselekedetében.
26 २६ जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.
Ha valaki istentisztelőnek látszik köztetek, de nem zabolázza meg nyelvét, sőt megcsalja a maga szívét, annak az istentisztelete hiábavaló.
27 २७ अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
Tiszta és szeplő nélkül való istentisztelet az Isten és az Atya előtt ez: meglátogatni az árvákat és özvegyeket az ő nyomorúságukban, és szeplő nélkül megtartani magát e világtól.