< यशया 9 >
1 १ जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल. मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची, अप्रतिष्ठा केली, पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील.
For not gloom [will belong] to [that] which distress [belonged] to it like the time former he treated with contempt [the] land of Zebulun and [the] land of Naphtali and the latter [time] he will make honored [the] way of the sea [the] other side of the Jordan Galilee of the nations.
2 २ जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे; जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे.
The people which walk in the darkness they will see a light great [those who] dwell in a land of deep darkness a light it will shine on them.
3 ३ तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे, हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो, लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत.
You will multiply the nation (to it *Q(K)*) you will magnify the rejoicing they will rejoice before you like [the] rejoicing at the harvest just as people are glad when divide they plunder.
4 ४ कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे.
For - [the] yoke of burden its and [the] staff of shoulder its [the] rod of the [one who] oppresses it you will shatter like [the] day of Midian.
5 ५ कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील ती अग्नीला भक्ष होतील.
For every boot [which] marches with shaking and cloak rolled in blood and it will be for burning fuel of a fire.
6 ६ कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील.
For a child he will be born to us a son he will be given to us and it was the dominion on shoulder his and someone called name his a wonder a counselor God mighty father of perpetuity prince of peace.
7 ७ त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
(To [the] increase of *Q(K)*) the dominion and to peace there not [will be] an end on [the] throne of David and over kingdom his to establish it and to sustain it in justice and in righteousness from now and until perpetuity [the] zeal of Yahweh of hosts it will accomplish this.
8 ८ प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे.
A word he has sent [the] Lord in Jacob and it will fall on Israel.
9 ९ सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,
And they will know the people all of it Ephraim and [the] inhabitant[s] of Samaria with pride and with greatness of heart saying.
10 १० “विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”
Bricks they have fallen and hewn [stone] we will rebuild sycamores they have been cut down and cedars we will substitute.
11 ११ म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील;
And he set on high Yahweh [the] opponents of Rezin against him and enemies his he provoked.
12 १२ पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.
Aram from [the] east and Philistines from [the] west and they consumed Israel with all [the] mouth for all this not it has turned back anger his and still hand his [is] stretched out.
13 १३ तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.
And the people not it has turned back to the [one who] struck it and Yahweh of hosts not they have sought.
14 १४ म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.
And he cut off Yahweh from Israel head and tail palm branch and bulrush day one.
15 १५ नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.
An old [man] and [one] uplifted of face he [is] the head and a prophet [who] teaches falsehood he [is] the tail.
16 १६ जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात.
And they were [the] guides the people this misleading and [those who] were guided by him [were] confused.
17 १७ म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही, कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते. या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील.
There-fore on young men its not he rejoices - [the] Lord and fatherless ones its and widows its not he has compassion on for all of it [is] godless and doing evil and every mouth [is] speaking disgraceful folly for all this not it has turned back anger his and still hand his [is] stretched out.
18 १८ दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते; वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात.
For it has burned like fire wickedness thorn[s] and bush[es] it consumes and it has kindled [the] thickets of the forest and they have swirled a rising up of smoke.
19 १९ सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत, आपल्या भावाचीही कोणी मनुष्य गय करीत नाही.
By [the] wrath of Yahweh of hosts it has been scorched [the] land and it was the people like fuel of a fire each brother his not they spared.
20 २० ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत. प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील.
And it devoured on [the] right [side] and it was hungry and it ate on [the] left [side] and not they were satisfied everyone [the] flesh of own arm his they ate.
21 २१ मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील. कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील.
Manasseh Ephraim and Ephraim Manasseh together they on Judah for all this not it has turned back anger his and still hand his [is] stretched out.