< यशया 8 >

1 परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज असे लिही.”
耶和華對我說:「你取一個大牌,拿人所用的筆,寫上『瑪黑珥‧沙拉勒‧哈施‧罷斯』。
2 माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन.
我要用誠實的見證人,祭司烏利亞和耶比利家的兒子撒迦利亞記錄這事。」
3 मी एका संदेष्ट्रीकडे गेलो. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला मग परमेश्वर मला म्हणाला, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.
我-以賽亞與妻子同室;她懷孕生子,耶和華就對我說:「給他起名叫瑪黑珥‧沙拉勒‧哈施‧罷斯;
4 कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.”
因為在這小孩子不曉得叫父叫母之先,大馬士革的財寶和撒馬利亞的擄物必在亞述王面前搬了去。」
5 परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला,
耶和華又曉諭我說:
6 “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात, आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात.
「這百姓既厭棄西羅亞緩流的水,喜悅利汛和利瑪利的兒子;
7 म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील.
因此,主必使大河翻騰的水猛然沖來,就是亞述王和他所有的威勢,必漫過一切的水道,漲過兩岸;
8 आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”
必沖入猶大,漲溢氾濫,直到頸項。以馬內利啊,他展開翅膀,遍滿你的地。」
9 अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका; युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल.
列國的人民哪,任憑你們喧嚷,終必破壞; 遠方的眾人哪,當側耳而聽! 任憑你們束起腰來,終必破壞; 你們束起腰來,終必破壞。
10 १० योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे.
任憑你們同謀,終歸無有; 任憑你們言定,終不成立; 因為上帝與我們同在。
11 ११ परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला,
耶和華以大能的手,指教我不可行這百姓所行的道,對我這樣說:
12 १२ “हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका, ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका.
「這百姓說同謀背叛,你們不要說同謀背叛。他們所怕的,你們不要怕,也不要畏懼。
13 १३ सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा.
但要尊萬軍之耶和華為聖,以他為你們所當怕的,所當畏懼的。
14 १४ तो एक पवित्रस्थान होईल; परंतु इस्राएलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेच लागणारा धोंडा व अडखण्याचा खडक आणि यरूशलेमेतील रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल.
他必作為聖所,卻向以色列兩家作絆腳的石頭,跌人的磐石;向耶路撒冷的居民作為圈套和網羅。
15 १५ पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”
許多人必在其上絆腳跌倒,而且跌碎,並陷入網羅,被纏住。」
16 १६ माझी साक्ष पक्की बांध, नोंद अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून माझ्या शिष्यांना दे.
你要捲起律法書,在我門徒中間封住訓誨。
17 १७ मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन, जो याकोबाच्या घराण्यापासून आपले तोंड लपवितो; मी त्याची प्रतीक्षा करीन.
我要等候那掩面不顧雅各家的耶和華;我也要仰望他。
18 १८ पाहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे व चमत्कारांसाठी जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत.
看哪,我與耶和華所給我的兒女,就是從住在錫安山萬軍之耶和華來的,在以色列中作為預兆和奇蹟。
19 १९ ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?
有人對你們說:「當求問那些交鬼的和行巫術的,就是聲音綿蠻,言語微細的。」你們便回答說:「百姓不當求問自己的上帝嗎?豈可為活人求問死人呢?」
20 २० म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही.
人當以訓誨和法度為標準;他們所說的,若不與此相符,必不得見晨光。
21 २१ ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील. जेव्हा ते भुकेले होतील तेव्हा संतापून आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील.
他們必經過這地,受艱難,受飢餓;飢餓的時候,心中焦躁,咒罵自己的君王和自己的上帝。
22 २२ ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील आणि पाहा विपत्ती अंधकार व दु: खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील.
仰觀上天,俯察下地,不料,盡是艱難、黑暗,和幽暗的痛苦。他們必被趕入烏黑的黑暗中去。

< यशया 8 >