< यशया 66 >

1 परमेश्वर असे म्हणतो, “आकाश माझे सिंहासन आणि पृथ्वी पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी कोठे घर बांधाल? मला विश्रांतीची जागा कुठे आहे?”
כֹּ֚ה אָמַ֣ר יְהוָ֔ה הַשָּׁמַ֣יִם כִּסְאִ֔י וְהָאָ֖רֶץ הֲדֹ֣ם רַגְלָ֑י אֵי־זֶ֥ה בַ֙יִת֙ אֲשֶׁ֣ר תִּבְנוּ־לִ֔י וְאֵי־זֶ֥ה מָקֹ֖ום מְנוּחָתִֽי׃
2 “सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत.” परमेश्वर असे म्हणतो. “पण जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे, आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्यास मी मान्य करतो.”
וְאֶת־כָּל־אֵ֙לֶּה֙ יָדִ֣י עָשָׂ֔תָה וַיִּהְי֥וּ כָל־אֵ֖לֶּה נְאֻם־יְהוָ֑ה וְאֶל־זֶ֣ה אַבִּ֔יט אֶל־עָנִי֙ וּנְכֵה־ר֔וּחַ וְחָרֵ֖ד עַל־דְּבָרִֽי׃
3 जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे. जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा असा आहे, जो धूप जाळतो तो मूर्तीची स्तुती करणारा असा आहे, त्यांनी स्वत: आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यांचा जीव त्याच्या अमंगळ पदार्थाच्या ठायी संतोष पावतो.
שֹׁוחֵ֨ט הַשֹּׁ֜ור מַכֵּה־אִ֗ישׁ זֹובֵ֤חַ הַשֶּׂה֙ עֹ֣רֵֽף כֶּ֔לֶב מַעֲלֵ֤ה מִנְחָה֙ דַּם־חֲזִ֔יר מַזְכִּ֥יר לְבֹנָ֖ה מְבָ֣רֵֽךְ אָ֑וֶן גַּם־הֵ֗מָּה בָּֽחֲרוּ֙ בְּדַרְכֵיהֶ֔ם וּבְשִׁקּוּצֵיהֶ֖ם נַפְשָׁ֥ם חָפֵֽצָה׃
4 अशाच प्रकारे मी त्यांची शिक्षा निवडेन. ते ज्या गोष्टींना फार भितात तिच त्यांच्यावर आणीन. कारण जेव्हा मी बोलावले तेव्हा कोणी उत्तर दिले नाही. जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले आणि ज्यात मला संतोष नाही ते त्यांनी निवडले.
גַּם־אֲנִ֞י אֶבְחַ֣ר בְּתַעֲלֻלֵיהֶ֗ם וּמְגֽוּרֹתָם֙ אָבִ֣יא לָהֶ֔ם יַ֤עַן קָרָ֙אתִי֙ וְאֵ֣ין עֹונֶ֔ה דִּבַּ֖רְתִּי וְלֹ֣א שָׁמֵ֑עוּ וַיַּעֲשׂ֤וּ הָרַע֙ בְּעֵינַ֔י וּבַאֲשֶׁ֥ר לֹֽא־חָפַ֖צְתִּי בָּחָֽרוּ׃ ס
5 जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका, तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे, ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो. पण ते लाजवले जातील.
שִׁמְעוּ֙ דְּבַר־יְהוָ֔ה הַחֲרֵדִ֖ים אֶל־דְּבָרֹ֑ו אָמְרוּ֩ אֲחֵיכֶ֨ם שֹׂנְאֵיכֶ֜ם מְנַדֵּיכֶ֗ם לְמַ֤עַן שְׁמִי֙ יִכְבַּ֣ד יְהוָ֔ה וְנִרְאֶ֥ה בְשִׂמְחַתְכֶ֖ם וְהֵ֥ם יֵבֹֽשׁוּ׃
6 नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे.
קֹ֤ול שָׁאֹון֙ מֵעִ֔יר קֹ֖ול מֵֽהֵיכָ֑ל קֹ֣ול יְהוָ֔ה מְשַׁלֵּ֥ם גְּמ֖וּל לְאֹיְבָֽיו׃
7 “तिला कळा येण्यापुर्वीच ती प्रसूत झाली, तिला वेदना लागण्याच्या आधीच तिला पुरुषसंतान झाले.”
בְּטֶ֥רֶם תָּחִ֖יל יָלָ֑דָה בְּטֶ֨רֶם יָבֹ֥וא חֵ֛בֶל לָ֖הּ וְהִמְלִ֥יטָה זָכָֽר׃
8 अशी गोष्ट कोणी ऐकली काय? कोणी अशी गोष्ट पाहिली आहे काय? एकाच दिवसात राष्ट्र जन्म घेते काय? एक राष्ट्र एका क्षणात स्थापन होईल का? कारण सियोन प्रसूतिवेदना पावली तेव्हाच ती आपली मुले प्रसवली.
מִֽי־שָׁמַ֣ע כָּזֹ֗את מִ֤י רָאָה֙ כָּאֵ֔לֶּה הֲי֤וּחַל אֶ֙רֶץ֙ בְּיֹ֣ום אֶחָ֔ד אִם־יִוָּ֥לֵֽד גֹּ֖וי פַּ֣עַם אֶחָ֑ת כִּֽי־חָ֛לָה גַּם־יָלְדָ֥ה צִיֹּ֖ון אֶת־בָּנֶֽיהָ׃
9 परमेश्वर म्हणतो, मी आईला प्रसूतिच्या वेळेत आणून तिचे मुल जन्मविणार नाही काय? जो मी जन्मास आणतो तो मी गर्भस्थान बंद करीन काय? तुमचा देव असे म्हणतो.
הַאֲנִ֥י אַשְׁבִּ֛יר וְלֹ֥א אֹולִ֖יד יֹאמַ֣ר יְהוָ֑ה אִם־אֲנִ֧י הַמֹּולִ֛יד וְעָצַ֖רְתִּי אָמַ֥ר אֱלֹהָֽיִךְ׃ ס
10 १० यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.
שִׂמְח֧וּ אֶת־יְרוּשָׁלַ֛͏ִם וְגִ֥ילוּ בָ֖הּ כָּל־אֹהֲבֶ֑יהָ שִׂ֤ישׂוּ אִתָּהּ֙ מָשֹׂ֔ושׂ כָּל־הַמִּֽתְאַבְּלִ֖ים עָלֶֽיהָ׃
11 ११ कारण तुम्ही तिच्या सांत्वनांचे स्तन चोखून तृप्त व्हावे, आणि तिच्या महिम्याच्या विपूलतेचे दूध ओढून घेऊन संतुष्ट व्हावे.
לְמַ֤עַן תִּֽינְקוּ֙ וּשְׂבַעְתֶּ֔ם מִשֹּׁ֖ד תַּנְחֻמֶ֑יהָ לְמַ֧עַן תָּמֹ֛צּוּ וְהִתְעַנַּגְתֶּ֖ם מִזִּ֥יז כְּבֹודָֽהּ׃ ס
12 १२ परमेश्वर असे म्हणतो “मी तुमच्यावर नदीप्रमाणे हे वैभव पसरवेल, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा वाहणारा ओघ तुमच्या कडे येईल. तुम्ही ते चोखाल, तुम्ही कडेवर वाहिले जाल आणि मांड्यांवर खेळविले जाल.
כִּֽי־כֹ֣ה ׀ אָמַ֣ר יְהוָ֗ה הִנְנִ֣י נֹטֶֽה־אֵ֠לֶיהָ כְּנָהָ֨ר שָׁלֹ֜ום וּכְנַ֧חַל שֹׁוטֵ֛ף כְּבֹ֥וד גֹּויִ֖ם וִֽינַקְתֶּ֑ם עַל־צַד֙ תִּנָּשֵׂ֔אוּ וְעַל־בִּרְכַּ֖יִם תְּשָׁעֳשָֽׁעוּ׃
13 १३ आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरूशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल.”
כְּאִ֕ישׁ אֲשֶׁ֥ר אִמֹּ֖ו תְּנַחֲמֶ֑נּוּ כֵּ֤ן אָֽנֹכִי֙ אֲנַ֣חֶמְכֶ֔ם וּבִירֽוּשָׁלַ֖͏ִם תְּנֻחָֽמוּ׃
14 १४ तुम्ही हे पाहाल आणि तुमचे हृदय हर्ष पावेल, आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे नवी होतील. आणि परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाकडे आहे हे कळेल, पण त्याच्या शत्रूंचा त्यास राग येईल.
וּרְאִיתֶם֙ וְשָׂ֣שׂ לִבְּכֶ֔ם וְעַצְמֹותֵיכֶ֖ם כַּדֶּ֣שֶׁא תִפְרַ֑חְנָה וְנֹודְעָ֤ה יַד־יְהוָה֙ אֶת־עֲבָדָ֔יו וְזָעַ֖ם אֶת־אֹיְבָֽיו׃
15 १५ कारण पाहा! परमेश्वर अग्नीसहीत येईल, आणि अग्नीद्वारे आपला क्रोध प्रकट करावा, आणि धमकीसोबत ज्वाला निघाव्यात म्हणून त्याचे रथ वावटळीसारखे होतील.
כִּֽי־הִנֵּ֤ה יְהוָה֙ בָּאֵ֣שׁ יָבֹ֔וא וְכַסּוּפָ֖ה מַרְכְּבֹתָ֑יו לְהָשִׁ֤יב בְּחֵמָה֙ אַפֹּ֔ו וְגַעֲרָתֹ֖ו בְּלַהֲבֵי־אֵֽשׁ׃
16 १६ कारण परमेश्वर अग्नीने आणि तलवारीने सर्व मनुष्यावर न्याय करेल. परमेश्वर मारले जातील ते खूप असतील.
כִּ֤י בָאֵשׁ֙ יְהוָ֣ה נִשְׁפָּ֔ט וּבְחַרְבֹּ֖ו אֶת־כָּל־בָּשָׂ֑ר וְרַבּ֖וּ חַֽלְלֵ֥י יְהוָֽה׃
17 १७ जे डुकराचे मांस खातात व अमंगळ गोष्टी व उंदीर खाऊन, बागांच्यामध्ये झाडा खाली आपणाला पवित्र करतात आपणांस स्वच्छ करतात, ते एकत्र नाश होतील असे परमेश्वर म्हणतो.
הַמִּתְקַדְּשִׁ֨ים וְהַמִּֽטַּהֲרִ֜ים אֶל־הַגַּנֹּ֗ות אַחַ֤ר אֶחַד (אַחַת֙) בַּתָּ֔וֶךְ אֹֽכְלֵי֙ בְּשַׂ֣ר הַחֲזִ֔יר וְהַשֶּׁ֖קֶץ וְהָעַכְבָּ֑ר יַחְדָּ֥ו יָסֻ֖פוּ נְאֻם־יְהוָֽה׃
18 १८ कारण मला त्यांचे विचार आणि कल्पना ठाऊक आहेत. ती वेळ येणार आहे जेव्हा मी सर्व राष्ट्रांना व भाषांना एकत्र करीन. आणि ते येतील व माझे वैभव पाहतील.
וְאָנֹכִ֗י מַעֲשֵׂיהֶם֙ וּמַחְשְׁבֹ֣תֵיהֶ֔ם בָּאָ֕ה לְקַבֵּ֥ץ אֶת־כָּל־הַגֹּויִ֖ם וְהַלְּשֹׁנֹ֑ות וּבָ֖אוּ וְרָא֥וּ אֶת־כְּבֹודִֽי׃
19 १९ काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील.
וְשַׂמְתִּ֨י בָהֶ֜ם אֹ֗ות וְשִׁלַּחְתִּ֣י מֵהֶ֣ם ׀ פְּ֠לֵיטִים אֶֽל־הַגֹּויִ֞ם תַּרְשִׁ֨ישׁ פּ֥וּל וְל֛וּד מֹ֥שְׁכֵי קֶ֖שֶׁת תֻּבַ֣ל וְיָוָ֑ן הָאִיִּ֣ים הָרְחֹקִ֗ים אֲשֶׁ֨ר לֹא־שָׁמְע֤וּ אֶת־שִׁמְעִי֙ וְלֹא־רָא֣וּ אֶת־כְּבֹודִ֔י וְהִגִּ֥ידוּ אֶת־כְּבֹודִ֖י בַּגֹּויִֽם׃
20 २० आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
וְהֵבִ֣יאוּ אֶת־כָּל־אֲחֵיכֶ֣ם מִכָּל־הַגֹּויִ֣ם ׀ מִנְחָ֣ה ׀ לַֽיהוָ֡ה בַּסּוּסִ֡ים וּ֠בָרֶכֶב וּבַצַּבִּ֨ים וּבַפְּרָדִ֜ים וּבַכִּרְכָּרֹ֗ות עַ֣ל הַ֥ר קָדְשִׁ֛י יְרוּשָׁלַ֖͏ִם אָמַ֣ר יְהוָ֑ה כַּאֲשֶׁ֣ר יָבִיאוּ֩ בְנֵ֨י יִשְׂרָאֵ֧ל אֶת־הַמִּנְחָ֛ה בִּכְלִ֥י טָהֹ֖ור בֵּ֥ית יְהוָֽה׃
21 २१ “ह्यातीलच काही लोकांस मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर असे म्हणतो.
וְגַם־מֵהֶ֥ם אֶקַּ֛ח לַכֹּהֲנִ֥ים לַלְוִיִּ֖ם אָמַ֥ר יְהוָֽה׃
22 २२ कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो.
כִּ֣י כַאֲשֶׁ֣ר הַשָּׁמַ֣יִם הַ֠חֳדָשִׁים וְהָאָ֨רֶץ הַחֲדָשָׁ֜ה אֲשֶׁ֨ר אֲנִ֥י עֹשֶׂ֛ה עֹמְדִ֥ים לְפָנַ֖י נְאֻם־יְהוָ֑ה כֵּ֛ן יַעֲמֹ֥ד זַרְעֲכֶ֖ם וְשִׁמְכֶֽם׃
23 २३ आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो.
וְהָיָ֗ה מִֽדֵּי־חֹ֙דֶשׁ֙ בְּחָדְשֹׁ֔ו וּמִדֵּ֥י שַׁבָּ֖ת בְּשַׁבַּתֹּ֑ו יָבֹ֧וא כָל־בָּשָׂ֛ר לְהִשְׁתַּחֲוֹ֥ת לְפָנַ֖י אָמַ֥ר יְהוָֽה׃
24 २४ “आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील, कारण त्यांचा किडा मरणार नाही आणि त्यांचा अग्नी कधी विझणार नाही. आणि ते मनुष्ये सर्व मनुष्यास घृणास्पद होतील.”
וְיָצְא֣וּ וְרָא֔וּ בְּפִגְרֵי֙ הָאֲנָשִׁ֔ים הַפֹּשְׁעִ֖ים בִּ֑י כִּ֣י תֹולַעְתָּ֞ם לֹ֣א תָמ֗וּת וְאִשָּׁם֙ לֹ֣א תִכְבֶּ֔ה וְהָי֥וּ דֵרָאֹ֖ון לְכָל־בָּשָֽׂר׃

< यशया 66 >