< यशया 65 >

1 ज्यांनी विचारले नाही, त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो. ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा नाही केला, त्यांना मी म्हणालो, मी इथे आहे! मी इथे आहे!
素来没有访问我的,现在求问我; 没有寻找我的,我叫他们遇见; 没有称为我名下的,我对他们说: 我在这里!我在这里!
2 मी पूर्ण दिवस आपला हात त्या लोकांसाठी पसरला जे हट्टी आहेत, जे चांगल्या मार्गाने चालत नाहीत, जे आपल्याच कल्पना योजतात आणि आपल्याच विचारांच्या मागे चालतात.
我整天伸手招呼那悖逆的百姓; 他们随自己的意念行不善之道。
3 ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात.
这百姓时常当面惹我发怒; 在园中献祭, 在坛上烧香;
4 ते कबरींमध्ये बसून रात्रभर पहातात, आणि डुकराचे मांस खातात व त्यांच्या पात्रांत ओंगळ मासाचा रस्सा असतो.
在坟墓间坐着, 在隐密处住宿, 吃猪肉; 他们器皿中有可憎之物做的汤;
5 तरी ते असे म्हणतात, ‘दुर उभा राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे. या गोष्टी माझ्या नाकात जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत, अशी अग्नी जी सतत जळत राहते.
且对人说:你站开吧! 不要挨近我,因为我比你圣洁。 主说:这些人是我鼻中的烟, 是整天烧着的火。
6 “पाहा, हे माझ्या समोर लिहीले आहे, मी गप्प बसणार नाही, पण त्यांना परत फेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईन.”
看哪,这都写在我面前。 我必不静默,必施行报应, 必将你们的罪孽和你们列祖的罪孽, 就是在山上烧香, 在冈上亵渎我的罪孽, 一同报应在他们后人怀中, 我先要把他们所行的量给他们; 这是耶和华说的。
7 “त्यांची पापे आणि त्यांच्या वडिलांची पापे मी त्यांच्या पदरी भरून देईन.” परमेश्वर असे म्हणतो. “पर्वतांवर धूप जाळण्याबद्दल आणि टेकड्यांवर माझी थट्टा केल्या बद्दल मी त्यांना त्याची परत फेड करीन. मी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून देईन.”
8 परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घडांत जेव्हा रस आढळतो, तेव्हा कोणी म्हणते, त्याचा नाश करू नका, कारण त्यामध्ये काही चांगले आहे.” मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही.
耶和华如此说:葡萄中寻得新酒, 人就说:不要毁坏, 因为福在其中。 我因我仆人的缘故也必照样而行, 不将他们全然毁灭。
9 मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन. माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील.
我必从雅各中领出后裔, 从犹大中领出承受我众山的。 我的选民必承受; 我的仆人要在那里居住。
10 १० मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. या सर्व गोष्टी, ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील.
沙 平原必成为羊群的圈; 亚割谷必成为牛群躺卧之处, 都为寻求我的民所得。
11 ११ “पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता.
但你们这些离弃耶和华、 忘记我的圣山、给时运摆筵席、 给天命盛满调和酒的,
12 १२ पण मी तुम्हास तलवारीसाठी नेमले आहे, आणि तुम्ही सर्व वधण्यासाठी वाकवले जाल, कारण मी जेव्हा बोलाविले, तुम्ही उत्तर दिले नाही, जेव्हा मी बोललो, तुम्ही ऐकले नाही; त्याऐवजी तुम्ही माझ्या नजरेत जे वाईट ते केले, आणि मला आवडत नसलेल्या गोष्टी करण्याची तुम्ही निवड केली.”
我要命定你们归在刀下, 都必屈身被杀; 因为我呼唤,你们没有答应; 我说话,你们没有听从; 反倒行我眼中看为恶的, 拣选我所不喜悦的。
13 १३ तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही भुकेले रहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले रहाल.” माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.
所以,主耶和华如此说: 我的仆人必得吃,你们却饥饿; 我的仆人必得喝,你们却干渴; 我的仆人必欢喜,你们却蒙羞。
14 १४ माझ्या सेवकांच्या हृदयांत आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील. पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, आणि आत्म्याच्या भंगाने तुम्ही आक्रंदन कराल.
我的仆人因心中高兴欢呼, 你们却因心中忧愁哀哭, 又因心里忧伤哀号。
15 १५ तुम्ही तुमची नावे माझ्या निवडलेल्यांसाठी बोलावे म्हणून शाप अशी ठेवून जाणार. मी, प्रभू परमेश्वर, तुम्हास ठार मारील. मी माझ्या सेवकांना नव्या नावाने बोलावील.
你们必留下自己的名, 为我选民指着赌咒。 主耶和华必杀你们, 另起别名称呼他的仆人。
16 १६ जो कोणी पृथ्वीवर आपणाला आशीर्वाद देईल, तो सत्याच्या देवाच्या ठायी स्वत: ला आशीर्वाद देईल. जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो, तो सत्याच्या देवाची शपथ वाहील. कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत.
这样,在地上为自己求福的, 必凭真实的 神求福; 在地上起誓的, 必指真实的 神起誓。 因为,从前的患难已经忘记, 也从我眼前隐藏了。
17 १७ कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार, आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही.
看哪!我造新天新地; 从前的事不再被记念,也不再追想。
18 १८ पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदासर्वकाळ आनंद व उल्लास कराल. पाहा! मी यरूशलेमेला हर्ष आणि तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणीन.
你们当因我所造的永远欢喜快乐; 因我造耶路撒冷为人所喜, 造其中的居民为人所乐。
19 १९ “मी यरूशलेमविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन सुखी होईन.” तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही.
我必因耶路撒冷欢喜, 因我的百姓快乐; 其中必不再听见哭泣的声音和哀号的声音。
20 २० तिच्या मध्ये काही दिवस जगेल असे तान्हे बाळ, किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही. जो शंभर वर्षांचा होऊन मरण पावला, तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल. शंभर वर्षात मरण पावलेला एक पापी मनुष्य शाप समजला जाईल.
其中必没有数日夭亡的婴孩, 也没有寿数不满的老者; 因为百岁死的仍算孩童, 有百岁死的罪人算被咒诅。
21 २१ “ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.”
他们要建造房屋,自己居住; 栽种葡萄园,吃其中的果子。
22 २२ एकाने घर बांधायचे व त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्षमळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. कारण झाडाच्या दिवसांप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
他们建造的,别人不得住; 他们栽种的,别人不得吃; 因为我民的日子必像树木的日子; 我选民亲手劳碌得来的必长久享用。
23 २३ ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत. कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत.
他们必不徒然劳碌, 所生产的,也不遭灾害, 因为都是蒙耶和华赐福的后裔; 他们的子孙也是如此。
24 २४ त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन.
他们尚未求告,我就应允; 正说话的时候,我就垂听。
25 २५ लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. पण धूळ ही सापाचे अन्न होईल. माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
豺狼必与羊羔同食; 狮子必吃草与牛一样; 尘土必作蛇的食物。 在我圣山的遍处, 这一切都不伤人,不害物。 这是耶和华说的。

< यशया 65 >