< यशया 64 >

1 अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील,
Inu Yehova, bwanji mukanangongʼamba mlengalenga ndi kutsika pansi, kuti mapiri agwedezeke pamaso panu!
2 जसा अग्नी काड्या पेटवतो, जसा अग्नी पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंस आपले नाव कळवायला राष्ट्रे तुझ्यापुढे थरथर कापावीत म्हणून तू खाली उतरून आला असता तर किती बरे झाले असते!
Monga momwe moto umatenthera tchire ndiponso kuwiritsa madzi, tsikani kuti adani anu adziwe dzina lanu, ndiponso kuti mitundu ya anthu injenjemere pamaso panu.
3 जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षीत नव्हत्या, तेव्हा तू खाली उतरून आलास, पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले.
Pakuti nthawi ina pamene munatsika munachita zinthu zoopsa zimene sitinaziyembekezere, ndipo mapiri anagwedezeka pamaso panu.
4 तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे, ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही, हे देवा तुझ्याशिवाय कोण्याच्या डोळ्याने ते पाहिले नाही.
Chikhalire palibe ndi mmodzi yemwe anamvapo kapena kuona Mulungu wina wonga Inu, amene amachitira zinthu zotere amene amadikira pa Iye.
5 जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, जे तुझ्या मार्गात तुझी आठवण करतात आणि ते पाळतात, त्यांना मदत करायला तू आला आहे, पण तू रागावलास आणि आम्ही पाप केले. त्या मध्ये आमचे तारण होईल का?
Inu mumabwera kudzathandiza onse amene amakondwera pochita zolungama, amene amakumbukira njira zanu. Koma Inu munakwiya, ife tinapitiriza kuchimwa. Kodi nanga tingapulumutsidwe bwanji?
6 कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत, आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
Tonsefe takhala ngati anthu amene ndi odetsedwa, ndipo ntchito zathu zili ngati sanza za msambo; tonse tafota ngati tsamba, ndipo machimo athu akutiwuluzira kutali ngati mphepo.
7 तुझ्या नावाला हाक मारेल असा कोणी नाही आहे, आणि तुला धरून घ्यायला कोणी प्रयत्न करीत नाही. कराण तू आपले मुख आम्हापासून लपवले आहे आणि आम्हांस आमच्या पातकांच्या हाती सोपवून दिले आहे.
Palibe amene amapemphera kwa Inu kutekeseka kuti apemphe chithandizo kwa Inu; pakuti mwatifulatira ndi kutisiya chifukwa cha machimo athu.
8 पण तरीही परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहो.
Komabe, Inu Yehova ndinu Atate athu. Ife ndife chowumba, Inu ndinu wowumba; ife tonse ndi ntchito ya manja anu.
9 परमेश्वरा, आमच्यावर सतत रागावू नकोस आणि आमची पातके कायमची लक्षात ठेवू नकोस. जे आम्ही तुझे लोक आहोत, कृपया आम्हा सर्वांकडे लक्ष दे.
Inu Yehova, musatikwiyire kopitirira muyeso musakumbukire machimo athu mpaka muyaya. Chonde, mutiganizire, ife tikupempha, pakuti tonsefe ndi anthu anu.
10 १० तुझी पवित्र नगरे वाळवंटाप्रमाणे बनली आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमेचा नाश झाला आहे.
Mizinda yanu yopatulika yasanduka chipululu; ngakhaletu Ziyoni wasanduka chipululu, Yerusalemu ndi wamasiye.
11 ११ आमचे पवित्र आणि सुंदर मंदिर, जेथे आमचे पूर्वज तुझी उपासना करत असत, त्यास अग्नीने नष्ट करण्यात आले आहे. आणि आम्हास प्रिय असलेल्या सर्व गोष्टींचा नाश झाला आहे.
Nyumba yanu yopatulika ndi yaulemu, kumene makolo athu ankakutamandani, yatenthedwa ndi moto ndipo malo onse amene tinkawakonda asanduka bwinja.
12 १२ परमेश्वरा तू कसा काय आपणाला आवरू शकतो? तू गप्प राहशील आणि आम्हास सतत पीडशील काय?
Inu Yehova, zonse zachitikazi, kodi mungokhala osatithandiza? Kodi mudzapitirizabe kukhala chete ndi kutilangabe mopitirira muyeso?

< यशया 64 >