< यशया 62 >
1 १ “मी सियोनेकरीता शांत राहणार नाही, आणि यरूशलेमेकरीता तिचा चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण जळत्या मशालीप्रमाणे निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही.”
為了熙雍我決不緘默,為了耶路撒冷我決不休息,直到她的正義顯現有如光明,她的救恩燃灼有如火炬。
2 २ मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील.
萬民都要見到你的正義,眾王都要看見你的榮耀;人要給你起一個新的名號,是上主親口所指定的。
3 ३ तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील.
你將是上主手中的榮冠,是你天主掌中的王冕。
4 ४ यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल.
你不再稱為「被遺棄的,」你的地域也不再稱為「荒涼的;」因為你要稱為「我可愛的,」你的地域要稱為「已婚的,」因為上主喜愛你,你的地域將要婚嫁。
5 ५ जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील.
就如青年怎樣娶處女,你的建造者也要怎樣娶你;新郎怎樣喜愛新娘,你的天主也要怎樣喜愛你。
6 ६ हे यरूशलेमे, तुझ्या वेशीवर मी रखवालदार ठेवला आहे. ते रांत्रदिवस गप्प बसणार नाहीत. जे तुम्ही परमेश्वरास स्मरता, ते तुम्ही शांत बसू नका.
耶路撒冷啊!我在你的城牆上派了守望者,他們日夜總不緘默;提醒上主的人哪! 你們總不要休息!
7 ७ यरूशलेमेला पुन: स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका.
你們也不要讓他休息,直到他建立了熙雍,直到他使耶路撒冷在大地成為可讚美的。
8 ८ परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची आणि सामर्थ्यवान बाहूची शपथ वाहीली आहे, खचित तुमचे धान्य मी तुझ्या शत्रूंना अन्न व्हायला देणार नाही.
上主憑他的右手和他強有力的手臂發誓說:「我決不再將你的五穀交給你的仇人吃,也決不再讓外邦人喝你所勞作的美酒。
9 ९ जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील, आणि द्राक्षे गोळा करणारा त्याचा द्राक्षरस माझ्या पवित्र भूमीवर पितील.
惟有那收割的能吃,並頌揚上主;那收集的,將在我聖殿的庭院裏喝。」
10 १० वेशीतून आत ये, लोकांचा मार्ग तयार करा! बांध, मार्ग तयार कर, रस्त्यावरील दगड बाजूला काढा, राष्ट्रांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा.
過去!經過大門罷!修平人民的路!修路!把路修好,除去上面的石頭;你們要為萬民豎起一面旗幟。
11 ११ पाहा! परमेश्वराने पृथ्वीच्या सीमेपर्यंत घोषीत केले आहे की, “सियोनेच्या कन्येला सांग, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्यांचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्यांचे प्रतिफळ त्याच्यापुढे आहे.”
看哪!上主向大地四極宣佈說:你們應向熙雍女子說:看!你的救主來了!看!他的勝利品與他同在,他獲得的酬勞在他面前。
12 १२ त्यांना पवित्र लोक, “परमेश्वराने खंडणी भरून सोडवलेले” असे म्हटले जाईल आणि तुला शोधलेली, न टाकलेली नगरी असे म्हटले जाईल.
人要稱他們為「聖潔的民族,」「上主贖回的。」你要被稱為「蒙愛的,」「不被棄的城。」