< यशया 61 >
1 १ प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.
L’esprit du Seigneur Yahweh est sur moi, parce que Yahweh m’a oint; il m’a envoyé porter la bonne nouvelle aux malheureux; panser ceux qui ont le cœur brisé. Annoncer aux captifs la liberté et aux prisonniers l’élargissement;
2 २ परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला, आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे.
publier une année de grâce pour Yahweh, et un jour de vengeance pour notre Dieu; consoler tous les affligés;
3 ३ सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.
Apporter aux affligés de Sion et leur mettre un diadème au lieu de cendre, l’huile de joie au lieu du deuil, un manteau de fête au lieu d’un esprit abattu; on les appellera térébinthes de justice, plantations de Yahweh pour sa gloire.
4 ४ “ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.”
Ils rebâtiront les ruines antiques; ils relèveront les décombres d’autrefois; ils restaureront les villes détruites, les décombres des âges passés.
5 ५ परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील.
Les étrangers seront là pour paître vos troupeaux; les fils de l’étranger seront vos laboureurs et vos vignerons.
6 ६ तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल.
Mais vous, on vous appellera prêtres de Yahweh; on vous nommera « ministres de notre Dieu ». Vous mangerez les richesses des nations, et vous vous parerez de leur magnificence.
7 ७ “तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.”
Au lieu de votre honte, vous aurez double portion et au lieu de l’ignominie, ils se réjouiront de leur part; ils posséderont ainsi double part dans leur pays; il y aura pour eux une joie éternelle.
8 ८ कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन.
Car moi, Yahweh, j’aime la justice; je hais le pillage fait avec perfidie; je leur donnerai fidèlement leur salaire, et je ferai avec eux une alliance éternelle.
9 ९ त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांस आशीर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”
Leur race sera renommée parmi les nations; et leur postérité au milieu des peuples; tous ceux qui les verront reconnaîtront qu’ils sont une race bénie de Yahweh.
10 १० मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो. कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
Je serai ravi d’allégresse en Yahweh, et mon cœur se réjouira en mon Dieu, parce qu’il m’a revêtu des vêtements du salut, et m’a couvert du manteau de la justice, comme le fiancé orne sa tête d’un diadème, comme la mariée se pare de ses joyaux.
11 ११ कारण पृथ्वी जशी आपले अंकूरलेले रोप उगवते, आणि जशी बाग त्याच्यामधील लागवड उगवते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रांसमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरीत करीन.
Car comme la terre fait éclore ses germes, et comme un jardin fait germer ses semences, ainsi le Seigneur Yahweh fera germer la justice, et la louange devant toutes les nations.