< यशया 60 >
1 १ “उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.”
Ustani, svijetli se, jer doðe svjetlost tvoja, i slava Gospodnja obasja te.
2 २ जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल.
Jer, gle, mrak æe pokriti zemlju i tama narode; a tebe æe obasjati Gospod i slava njegova pokazaæe se nad tobom.
3 ३ राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
I narodi æe doæi k vidjelu tvojemu i ka svjetlosti koja æe te obasjati.
4 ४ तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील.
Podigni oèi svoje unaokolo, i vidi: svi se skupljaju i idu k tebi, sinovi æe tvoji iz daleka doæi i kæeri tvoje nosiæe se u naruèju.
5 ५ तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल.
Tada æeš vidjeti, i obradovaæeš se, i srce æe ti se udiviti i raširiti, jer æe se k tebi okrenuti mnoštvo morsko i sila naroda doæi æe k tebi.
6 ६ मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
Mnoštvo kamila prekriliæe te, dromedari iz Madijama i Efe; svi iz Save doæi æe, zlato i kad donijeæe, i slavu Gospodnju javljaæe.
7 ७ केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.
Sva stada Kidarska skupiæe se k tebi, ovnovi Navajotski biæe ti na potrebu; prineseni na oltaru mom biæe ugodni, i dom slave svoje proslaviæu.
8 ८ हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात?
Ko su ono što lete kao oblaci i kao golubovi na prozore svoje?
9 ९ द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे.
Ostrva æe me èekati i prve laðe Tarsiske, da dovezu sinove tvoje iz daleka, i s njima srebro njihovo i zlato njihovo, imenu Gospoda Boga tvojega i sveca Izrailjeva, jer te proslavi.
10 १० विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”
I tuðini æe sazidati zidove tvoje, i carevi njihovi služiæe ti; jer u gnjevu svom udarih te, a po milosti svojoj pomilovaæu te.
11 ११ तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.
I tvoja æe vrata biti svagda otvorena, neæe se zatvoriti ni danju ni noæu, da ti se dovede sila naroda, i carevi njihovi da se dovedu.
12 १२ खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील.
Jer narod i carstvo, koje ti ne bi služilo, poginuæe, taki æe se narodi sasvijem zatrti.
13 १३ माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील.
Slava Livanska tebi æe doæi, jela, brijest i šimšir, da ukrase mjesto svetinje moje da bih proslavio mjesto nogu svojih.
14 १४ ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.
I sinovi onijeh koji su te muèili doæi æe k tebi klanjajuæi se, i svi koji te preziraše padaæe k stopalima nogu tvojih, i zvaæe te gradom Gospodnjim, Sionom sveca Izrailjeva.
15 १५ “तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.”
Što si bio ostavljen i mrzak tako da niko nije prolazio kroza te, mjesto toga æu ti uèiniti vjeènu slavu, i veselje od koljena do koljena.
16 १६ तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.
Jer æeš mlijeko naroda sati, i sise carske dojiæeš, i poznaæeš da sam ja Gospod spasitelj tvoj i izbavitelj tvoj, silni Jakovljev.
17 १७ “मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”
Mjesto mjedi donijeæu zlata, i mjesto gvožða donijeæu srebra, i mjedi mjesto drva, i gvožða mjesto kamenja, i postaviæu ti za upravitelje mir i za nastojnike pravdu.
18 १८ तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील.
Neæe se više èuti nasilje u tvojoj zemlji ni pustošenje i potiranje na meðama tvojim; nego æeš zvati zidove svoje spasenjem i vrata svoja hvalom.
19 १९ “दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही, आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही. पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल, आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.”
Neæe ti više biti sunce vidjelo danju, niti æe ti sjajni mjesec svijetliti; nego æe ti Gospod biti vidjelo vjeèno i Bog tvoj biæe ti slava.
20 २० “तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल, आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.”
Neæe više zalaziti sunce tvoje, niti æe mjesec tvoj pomrèati; jer æe ti Gospod biti vidjelo vjeèno, i dani žalosti tvoje svršiæe se.
21 २१ “तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.”
I tvoj æe narod biti sav pravedan, naslijediæe zemlju navijek; mladica koju sam posadio, djelo ruku mojih biæe na moju slavu.
22 २२ “जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.”
Od maloga æe postati tisuæa i od nejakoga silan narod; ja Gospod brzo æu uèiniti to kad bude vrijeme.