< यशया 59 >
1 १ पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
耶和華的膀臂並非縮短,不能拯救, 耳朵並非發沉,不能聽見,
2 २ तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे. आणि तुमच्या पापांनी त्यास आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे.
但你們的罪孽使你們與上帝隔絕; 你們的罪惡使他掩面不聽你們。
3 ३ कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत. तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते.
因你們的手被血沾染, 你們的指頭被罪孽沾污, 你們的嘴唇說謊言, 你們的舌頭出惡語。
4 ४ कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही. ते पोकळ शब्दांवर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात, ते दुष्टाईची गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात.
無一人按公義告狀, 無一人憑誠實辯白; 都倚靠虛妄,說謊言。 所懷的是毒害; 所生的是罪孽。
5 ५ ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.
他們菢毒蛇蛋, 結蜘蛛網; 人吃這蛋必死。 這蛋被踏,必出蝮蛇。
6 ६ त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत. त्यांची कृत्ये ही पापाची कृत्ये आहेत, आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत.
所結的網不能成為衣服; 所做的也不能遮蓋自己。 他們的行為都是罪孽; 手所做的都是強暴。
7 ७ त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात, आणि निष्पाप रक्त पाडायला ते घाई करतात. त्यांचे विचार हे अन्यायाचे विचार आहेत, हिंसा आणि नाश हे त्यांचे मार्ग आहेत.
他們的腳奔跑行惡; 他們急速流無辜人的血; 意念都是罪孽, 所經過的路都荒涼毀滅。
8 ८ त्यांना शांतीचा मार्ग माहित नाही, आणि त्यांच्या वाटेत न्याय आढळत नाही. त्यांनी कुटिल मार्ग स्थापिले, आणि जो कोणी या मार्गात प्रवास करतो तो शांतता ओळखत नाही.
平安的路,他們不知道; 所行的事沒有公平。 他們為自己修彎曲的路; 凡行此路的都不知道平安。
9 ९ यास्तव न्याय आम्हापासून दूर आहे, आणि चांगुलपणा आमच्यापर्यंत पोहचत नाही. आम्ही प्रकाशासाठी थांबतो, पण पाहा अंधार; आम्ही तेज शोधतो, पण आम्ही काळोखात चालतो.
因此,公平離我們遠, 公義追不上我們。 我們指望光亮,卻是黑暗, 指望光明,卻行幽暗。
10 १० आम्ही आंधळ्यांप्रमाणे भिंती चाचपतो, त्याप्रमाणे जे पाहू शकत नाहीत. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही भर दूपारी पडतो; बलवानांमध्ये आम्ही मरण पावलेल्या मनुष्यांप्रमाणे आहोत.
我們摸索牆壁,好像瞎子; 我們摸索,如同無目之人。 我們晌午絆腳,如在黃昏一樣; 我們在肥壯人中,像死人一般。
11 ११ आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो, आम्ही न्यायाची वाट पाहातो पण काही नाही; तारणाची वाट पाहतो परंतु ते आम्हापासून फार दूर आहे.
我們咆哮如熊, 哀鳴如鴿; 指望公平,卻是沒有; 指望救恩,卻遠離我們。
12 १२ कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत, आणि आमची पातके आम्हांविरूद्ध साक्ष देतात. कारण आमचे अपराध आमच्या सोबत आहेत, आणि आम्हांस आमची पातके माहीत आहेत.
我們的過犯在你面前增多, 罪惡作見證告我們; 過犯與我們同在。 至於我們的罪孽,我們都知道:
13 १३ आम्ही बंड केले, परमेश्वरास नकारले आणि आमच्या देवाला अनुसरण्याचे सोडून दूर फिरलो आहे. आम्ही खंडणी बद्दल बोललो आणि बाजूला वळलो आहो, वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.
就是悖逆、不認識耶和華, 轉去不跟從我們的上帝, 說欺壓和叛逆的話, 心懷謊言,隨即說出。
14 १४ न्यायास मागे ढकलण्यात आले आहे, आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे. सत्य सार्वजनिक चौकात पडले आहे, आणि सरळपण आत येऊ शकत नाही.
並且公平轉而退後, 公義站在遠處; 誠實在街上仆倒, 正直也不得進入。
15 १५ सत्य जात राहिले आणि दुष्कर्मापासून दूर फिरणारे बळी पडतात. परमेश्वराने पाहिले पण त्यास कोठेच चांगुलपणा सापडला नाही, परमेश्वरास हे आवडले नाही.
誠實少見; 離惡的人反成掠物。 那時,耶和華看見沒有公平, 甚不喜悅。
16 १६ त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही. तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले, आणि त्याच्याच न्यायीपणाने त्यास आधार दिला.
他見無人拯救, 無人代求,甚為詫異, 就用自己的膀臂施行拯救, 以公義扶持自己。
17 १७ त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर घातले, त्याने सूडाचे वस्र परिधान केले आणि जसा झग्याने तसा तो आवेशाने वेष्टिलेला होता.
他以公義為鎧甲, 以拯救為頭盔, 以報仇為衣服, 以熱心為外袍。
18 १८ त्यांच्या कृत्याप्रमाणेच तो त्यांना परतफेड करील, त्याच्या शत्रूस क्रोध, वैऱ्यास प्रतिफल भरून देईल, द्वीपांना दंड म्हणून त्यांचा प्रतिफळ देईल.
他必按人的行為施報, 惱怒他的敵人, 報復他的仇敵, 向眾海島施行報應。
19 १९ ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्याविरुद्ध झेंडा उभारिल.
如此,人從日落之處必敬畏耶和華的名, 從日出之地也必敬畏他的榮耀; 因為仇敵好像急流的河水沖來, 是耶和華之氣所驅逐的。
20 २० मग तारणारा सियोनेकडे येईल आणि याकोबात जे अपराधापासून वळतात त्यांच्याकडेही येईल, परमेश्वर असे म्हणतो.
必有一位救贖主來到錫安- 雅各族中轉離過犯的人那裏。 這是耶和華說的。
21 २१ परमेश्वर म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शब्द जे मी तुझ्या मुखात टाकले, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून सर्वकाळपर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
耶和華說:「至於我與他們所立的約乃是這樣:我加給你的靈,傳給你的話,必不離你的口,也不離你後裔與你後裔之後裔的口,從今直到永遠;這是耶和華說的。」