< यशया 57 >
1 १ धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे.
Taisnais iet bojā, un nav neviena, kas to ņem pie sirds, un dievbijīgie top aizrauti, un neviens to neliek vērā. Jo taisnais top aizrauts, pirms ļaunums nāk.
2 २ तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो.
Kas savu taisno ceļu gājuši, nāk pie miera un dus savos kambaros.
3 ३ पण तुम्ही, चेटकिणीच्या मुलांनो, व्यभिचारिणी आणि जाराच्या संतानांनो, इकडे जवळ या.
Bet jūs, nākat šurp, zīlnieces bērni, laulības pārkāpēja un maucinieces dzimums.
4 ४ तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता? कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता? तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय?
Par ko jūs smejaties? Pret ko jūs atplēšat savu muti un izstiepjat savu mēli? Vai jūs neesat pārkāpēju bērni un viltnieku dzimums?
5 ५ तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता, तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्यांमध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता.
Jūs esat sakarsuši uz dievekļiem apakš visiem zaļiem kokiem un nokāvāt bērnus pie upēm apakš akmens kalnu stūriem.
6 ६ नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत. तू तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का?
Pie gludeniem upes akmeņiem bija tava daļa, tā bija tava tiesa, un tiem tu izlēji dzeramu upuri un upurēji ēdamu upuri; vai Man ar to bija mierā būt?
7 ७ तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस.
Tu taisīji savu gultu lielā un augstā kalnā, ir tur tu uzkāpi, upurus upurēt.
8 ८ तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले, तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले. तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस.
Un aiz durvīm un stenderēm tu liki savu piemiņas zīmi, jo atstādamies no manis tu atsedzi un kāpi un taisīji platu savu gultu un līki ar tiem.
9 ९ तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस. तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस. (Sheol )
Tu iemīlēji viņu gultu un uzlūkoji to vietu. Tu gāji ar eļļu pie ķēniņa un nesi daudz smaržīgu zāļu, un tālu sūtīji savus vēstnešus un meties zemē līdz ellei. (Sheol )
10 १० तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.” आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस.
Tu nopūlējies savā garā ceļā un nesacīji: velti! Tu atradi jaunu spēku, tāpēc tu nenoguri.
11 ११ तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस? तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस. मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही.
Bet no kā tev bija bail un ko tu bijies? Jo tu paliki par meli un Mani nepieminēji un neņēmi pie sirds. - Vai nav tā, kad Es sen dienām klusu cietis, tad tu Manis nebīsties?
12 १२ मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता, ते तुला मदत करणार नाही.
Es darīšu zināmu tavu taisnību un tavus darbus, ka tie tev nepalīdzēs.
13 १३ जेव्हा तू रडशील, तेव्हा तुझ्या मूर्तींचा समुदाय तुला सोडवो. त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्याठायी आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल, आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल.
Kad tu brēksi, tad lai tev palīdz tavs (dievekļu) pulks; bet vējš tos visus aiznesīs, un vēsma tos aizraus. Bet kas uz Mani paļaujas, tas iemantos zemi un Manu svēto kalnu.
14 १४ तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा, माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका.
Un Viņš sacīs: līdziniet, līdziniet, sataisiet ceļu, atņemat šķēršļus no Manu ļaužu ceļa.
15 १५ कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो, नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.
Jo tā saka tas Augstais un Varenais, kas dzīvo mūžīgi un kā vārds ir svēts: Es dzīvoju augstībā un svētā vietā un pie tā, kam sagrauzts un pazemīgs gars, ka dzīvu daru garu pazemīgiem un dzīvu daru sirdi sagrauztiem.
16 १६ कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागही धरणार नाही. कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील.
Jo Es nebāršos mūžīgi nedz dusmošos bez gala; jo priekš Mana vaiga nonīktu gars un tās dvēseles, ko esmu radījis.
17 १७ कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो. पण तरीही तो मागे हटला व आपल्या हृदयाच्या मार्गात चालत गेला.
Es biju apskaities par viņu grēcīgo mantas kārību un tos situ un apslēpos un apskaitos, taču tie atkāpušies aizgāja pa savas sirds ceļu.
18 १८ मी त्याचे मार्ग पाहिले आहेत, पण मी त्यास बरे करीन. मी त्यास मार्गदर्शन करीन आणि त्यास व त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल.
Es ieraudzīju viņu ceļus, un tos dziedināšu, un Es tos vadīšu un došu prieku tiem, kas apbēdināti.
19 १९ आणि मी त्यांच्या मुखातून आभारवचने उच्चारवीन, जो दूर आहे त्याला, आणि जो जवळ आहे त्यास शांती, असो, असे परमेश्वर म्हणतो, आणि मी त्यास निरोगी करीन.
Es radīšu lūpu augļus: miers, miers lai ir tiem, kas tālu un kas tuvu, saka Tas Kungs, un Es tos dziedināšu.
20 २० पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही, आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात.
Bet tie bezdievīgie ir kā aizkustināta jūra, kas nevar nostāties, un viņas viļņi izmet dūņas un dubļus.
21 २१ “पाप्यांस काही शांती नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
Bezdievīgiem nav miera, saka mans Dievs.