< यशया 56 >

1 परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा; कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे.
Thus he says Yahweh keep justice and do righteousness for [is] near salvation my to come and righteousness my to be revealed.
2 जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो. तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे.
How blessed! [is the] person [who] he does this and [the] child of humankind [who] he takes hold on it [who] keeps [the] sabbath from profaning it and [who] keeps hand his from doing any evil.
3 जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.
And may not he say [the] son of foreignness who has joined himself to Yahweh saying certainly he will separate me Yahweh from with people his and may not he say the eunuch here! I [am] a tree dry.
4 कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात.
For thus - he says Yahweh to the eunuchs who they keep sabbaths my and they choose [that] which I desire and [they are] keeping hold on covenant my.
5 त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल. मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही.
And I will give to them in house my and in walls my a monument and a name good more than sons and more than daughters a name of perpetuity I will give to him which not it will be cut off.
6 जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत, जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात
And [the] sons of foreignness who join themselves to Yahweh to serve him and to love [the] name of Yahweh to become of him servants every [one who] keeps [the] sabbath from profaning it and [those who] keep hold on covenant my.
7 त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील.
And I will bring them to [the] mountain of holiness my and I will make rejoice them in [the] house of prayer my burnt offerings their and sacrifices their [will be] for acceptance on altar my for house my a house of prayer it will be called for all the peoples.
8 ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.
[the] utterance of [the] Lord Yahweh [who] gathers [the] banished [ones] of Israel still I will gather to it to gathered [ones] its.
9 रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका!
O every animal of [the] field come to devour O every animal in the forest.
10 १० त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही; ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत.
(Watchmen its *Q(K)*) [are] blind all of them not they know all of them [are] dogs dumb not they are able to bark [they] dream [they] lie down [they] love to slumber.
11 ११ त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत.
And the dogs [are] mighty of appetite not they know satiety and they [are] shepherds not they know to understand all of them to own way their they have turned everyone to own unjust gain his from end his.
12 १२ ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.”
Come let me take wine and let us drink strong drink and it will be like this day tomorrow great abundance exceedingly.

< यशया 56 >