< यशया 50 >
1 १ परमेश्वर असे म्हणत आहे, ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र कोठे आहे? आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार कोठे आहे? पाहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे, तुमच्या आईला दूर पाठविण्यात आले. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हास देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले,
Saa siger HERREN: Hvor er eders Moders Skilsmissebrev, med hvilket jeg sendte hende bort; eller hvem var jeg noget skyldig, saa jeg solgte eder til ham? Nej, for eders Brøde solgtes I, for eders Synd blev eders Moder sendt bort.
2 २ मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का? माझा हात तुझी खंडणी देण्यास तोकडा होता? माझ्यात तुला सोडवण्याचे सामर्थ्य नाही का? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो; मी नद्यांचे वाळवंट करतो; त्यांचे मासे पाण्या अभावी मरतात आणि सडतात.
Hvi var der da ingen, da jeg kom, hvi svarede ingen, da jeg kaldte? Er min Haand for kort til at udfri, har jeg ingen Kraft til at redde? Ved min Trusel udtørrer jeg Havet, Strømme gør jeg til Ørk, saa Fiskene raadner af Mangel paa Vand og dør af Tørst;
3 ३ मी आकाशाला काळे कपडे घालतो. मी ते गोणपाटासह झाकतो.
jeg klæder Himlen i sort og hyller den ind i Sæk.
4 ४ थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे. तो मला सकाळी सकाळी जागे करतो; तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो.
Den Herre HERREN gav mig Lærlinges Tunge, at jeg skulde vide at styrke de trætte med Ord; han vækker hver Morgen mit Øre, han vækker det til at høre, som Lærlinge hører.
5 ५ प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही.
Den Herre HERREN aabned mit Øre, og jeg stred ikke imod, jeg unddrog mig ikke;
6 ६ ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही.
min Ryg bød jeg frem til Hug, mit Skæg til at rives, mit Ansigt skjulte jeg ikke for Haan og Spyt.
7 ७ कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही.
Mig hjælper den Herre HERREN, saa jeg ikke beskæmmes; jeg gør derfor mit Ansigt som Sten og ved, jeg bliver ikke til Skamme.
8 ८ मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.
Min Retfærdiggører er nær; lad os mødes, om nogen vil Strid; om nogen vil trætte med mig, saa træde han hid!
9 ९ पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील.
Se, den Herre HERREN hjælper mig, hvo vil fordømme mig? Se, alle slides op som en Klædning, Møl fortærer dem.
10 १० परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत? प्रकाशाविना गहन काळोखात कोण चालतो? त्याने परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपल्या देवावर अवलंबून रहावे.
Frygter nogen af jer HERREN, han lytte til hans Tjener, enhver, som vandrer i Mørke og uden Lys; han stole paa HERRENS Navn, søge Støtte hos sin Gud!
11 ११ पाहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता; ते तुम्ही आपल्या अग्नीच्या प्रकाशात आणि तुम्ही पेटविलेल्या ज्योतीत चाला. परमेश्वर म्हणतो, माझ्या हातून, हे तुमच्याकडे येईलः तुम्ही वेदनेच्या जागी खाली पडून रहाल.
Alle I, som optænder Ild og sætter Pile i Brand, gaa ind i eders brændende Ild, i Pilene, I tændte! Fra min Haand skal det ramme eder, i Kval skal I ligge.